* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Editors : MANDAR JOSHI
  • ISBN : 9788195970919
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2023
  • Weight : 1000.00 gms
  • Pages : 273
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MAHESH KOTHARE: A NAME FAMILIAR TO THE MARATHI, HINDI AND GUJRATI CINE WORLD AND DAILY SOAPS. HE STARTED AS A CHILD ARTIST AND IS A VERY POPULAR DIRECTOR TODAY. HE IS FOND OF THE NEWEST TECHNOLOGY, LIKE 3D. A DARING AND DASHING PERSONALITY, HIS JOURNEY FROM A ‘CHILD ARTIST’ TO THE ‘DIRECTOR OF MARATHI CINEMA’ IS IMPRESSIVE. IT IS A COURAGEOUS JUMP IN THE OCEAN OF ENTERTAINMENT. BEING RECOGNISED TRULY BY HIS MOTHER JENMA AND DADDY IS HIS FIRST SUCCESS. THEY WERE HIS STRONG PILLARS. HE WAS LUCKY TO WORSHIP THE ‘ART’ INSPITE OF FACING THE STORMS. HE PROVIDED PURE ENTERTAINMENT FOR THE AUDIENCE. HE IS AN ESTEEMED WITNESS TO THE HISTORY OF CINEMA AND ITS JOURNEY FROM BLACK & WHITE MOVIES TO THE EASTMAN COLOURS. HE WAS LUCKY TO BE IN THE COMPANY OF SENIORS FROM THIS FIELD. HIS EXTENSIVE EXPERIENCE INCREASED HIS KNOWLEDGE BANK FURTHER. ‘DAMN IT ANI BARACH KAHI’ IS A REPRESENTATION OF ALL THE UPS AND DOWNS IN HIS LIFE, HIS PENANCE FOR ART, HIS SENSITIVITY, HIS VICTORY OVER TROUBLES AND HIS TIME-TESTED MANTLE. HIS JOURNEY WAS THAT OF A HUMAN AND AN ARTIST. HE REPENTED FOR HIS MISTAKES. HE HAD TO LOSE HIS DEAR FRIEND ‘LAKSHYA’, A GEM OF A PERSONALITY. HE EXPERIMENTED WITH ALMOST EVERY MOVIE, NEVER STEPPED BACK, AND PUT IN ACTIVE EFFORTS IN BOTH THE HINDI AND MARATHI CINE WORLD. HIS PERSEVERANCE IS BASED ON ‘KEEP ON TRYING’. MAHESH IS A UNIQUE FORMULA HIMSELF. THROUGH HIS BOOK, HE COMMUNICATES WITH US. GETS CONNECTED TO HIS FANS AND ARDENT READERS. HIS SPORTING NATURE IS OBVIOUS. THIS IS THE STRENGTH OF THE BOOK, AND THIS IS THE LIFE SONG OF A TRUE ARTIST.
मराठी, हिंदी व गुजराती चित्रपट-मालिकांतून बालकलाकार ते सिनेदिग्दर्शक म्हणून झेप घेणारे, थ्री-डी सारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा सतत ध्यास घेणारे महेश कोठारे म्हणजे, धाडसी व धडाकेबाज व्यक्तिमत्त्व. ‘बालकलाकार’ ते ‘मराठी चित्रपट दिग्दर्शक’ हा त्यांचा प्रवास म्हणजे– ‘मनोरंजन विश्वाच्या समुद्रात घेतलेली धाडसी उडी!’ आई जेनिमा व डॅडींचे आपल्या मुलाला समजून घेणे, भरभक्कम आधार बनणे, हेच महेशजींच्या आयुष्यातील पहिले यशाचे गमक. वादळात स्वत:ला झोकून देऊन ‘कलेची पूजा’ करण्याचं, अस्सल मनोरंजनाचा आनंद रसिकांना देण्याचं भाग्य त्यांना लाभलं. कृष्ण-धवल चित्रपट ते रंगीत चित्रपटांचा प्रवास व इतिहासाचे साक्षीदार म्हणून महेश कोठारे हे नाव गौरवाने घेतले जाते. सिनेसृष्टीतील जेष्ठ-दिग्गजांचा महेशजींना मिळालेला सहवास व प्रदीर्घ अनुभव नवीन ज्ञानात भर घालणाराच ठरला. कलेची साधना, मनाचे हळवेपण, घोर अडचणींवर केलेली मात, एक सच्चा कलावंत कुठल्या मुशीतून घडतो, तावून-सुलाखून निघतो याची साक्ष खर्‍या अर्थाने ‘डॅम इट व बरेच काही’ मधून दिसते. एक कलावंत व माणूस म्हणून उलगडत जाणारा त्यांचा हा प्रवास, झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त, दिलदार मित्र व मनस्वी लक्ष्याचं चटका लावून जाणं, सतत नवीन प्रयोग व अथक कष्ट, हिंदी-मराठी सिनेमांतील कलात्मक योगदान, जिद्द ही प्रयत्नवादाला साद घालणारी. या पुस्तकातून महेशजी आपल्याशी बोलत आहेत, चाहत्यांशी व रसिक वाचकांशी मनापासून, खिलाडूपणे संवाद साधत आहेत... असेच वाटत राहते, हेच या पुस्तकाचे मर्मस्थान व एका सच्च्या कलावंताचे जीवनगाणे...

No Records Found
No Records Found
Keywords
#महेशकोठारे #मराठीचित्रपटसृष्टी #अभिनय #दिग्दर्शन #चित्रपटनिर्मिती #धुमधडाका #धडाकेबाज #झपाटलेला #मराठीमालिका #जयमल्हार #दख्खनचाराजाज्योतिबा #शब्दांकनसंपादन #मंदारजोशी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #MAHESHKOTHARE #MARATHIACTOR #AUTOBIOGRAPHY #MARATHIMOVIES #MARATHISERIALS #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating Star सामना २० ऑगस्ट २०२३

    स्वप्ननांना वास्तवात उतरवण्याची ताकद मनगटात आणि मनात जिद्द असेल तर आयुष्याचा संघर्ष लीलया पार करता येतो. बालकलाकार ते सिनेदिग्दर्शक म्ह्णून झेप घेणारे व नव्या तंत्रज्ञाला आपलेसे करणारे अभिनेता/दिग्दर्शक महेश कोठारे यांचे `डॅम इट आणि बरच काही` हे यशापशाची वळणे असणारे आत्नचरित्र नुसतेच प्रसिद्ध झाले आहे. मंदार जोशी यांचे सुबद्ध शब्दांकन याला लाभले असून प्रवीण दवणे यांची खुमासदार प्रस्तावना लाभली आहे. कलाकाराचे आयुष्य हे बाहेरून कितीही ग्लॅमरस दिसत असले तरी त्या पदापर्यंत जाण्याचा प्रवास मात्र खडतर असतो. महेश कोठारे यांनी स्वतःच्या आयुष्याकडे चंदेरी वाटचालीकडे आणि त्या वाटचालीत सहभागी झालेल्या सगळ्या व्यक्तींबद्दल प्रांजळपणे केलेले कथन प्रवाही तर आहेच पण तितकेच सच्चे झाले आहे. हातून झालेल्या चुकांची कबुली आणि नंतर काही चुकांची जाणीव झाल्यावर मनातली सल कोणताही आडपडदा न ठेवते मांडणे तितकेच महत्वाचे असते जे या आत्मकथनात सापडते. वैशिष्ट्य म्हणजे अनुभवांचे घटनांचे एकेक पैलू साध्या, सोप्या भाषेतून उलगडत जातात तेव्हा तो वाचकांशी साधलेला एक मैत्रीपूर्ण संवाद बनतो. चांगला चाललेला वकिलीचा व्यवसाय बाजूला सारून महेश यांनी मनरंजनाच्या समुद्रात मारलेली उडी आणि पोहण्याचा आवडीपायी नदीच्या पाण्यात उडी मारणारे तेच महेश पहिल्यापासून धाडशी स्वभावाचे असल्याचे जाणवते. मध्यमवर्गीय समाजात संस्कारांना विशेष महत्व आहे. प्रतिकूल परिस्थिती किंवा आयुष्याला कलाटणी देणारी निर्णायक वेळ किंवा मोहाचे क्षण जेव्हा समोर येतात तेव्हा खरी कसोटी लागते ती संस्कारांची लहानपणापासून झालेले संसार कोणत्याही संकटातून, संघर्षातून सुखरूपपणे बाहेर काढतातच. त्याची प्रचिती आत्मचरित्रात वाचताना पदोपदी येते. आई जेनमा व डॅडीची आणि फिल्मफेअरची बाहुली पतीच्या हातात पाहायला आतुरलेली पत्नी नीलिमा यांची साथ अनमोल ठरली आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्पांवर या तिघांनी त्यांना कायम समजून घेतेले, त्यांचा आधार बनले, धीर दिला आणि हेच महेश यांच्या सफलतेचे रहस्य आहे. कृष्ण-धवल चित्रपट ते रंगीत चित्रपट आणि बालकलाकार ते निर्माता-दिग्दर्शक यात हा संपूर्ण मांडलेला प्रवास अतिशय रंजक झाला आहे. बालकलाकार म्हूणून नावाजलेले असतानाही आईवडिलांनी त्यांना सामान्य मुलांप्रमाणे वाढवले, बेस्ट बसने शाळेत पाठवले. खेळणे, पोहणे, धमाल सुट्ट्या घालवणे अगदी सामान्य घरातला मुलांप्रमाणे त्यांचे बालपण गेल्यामुळे आईवडिलांनी रुजवलेली संस्कारांची मूल्ये महेशमध्ये लहानपणापासूनच जोपासली गेली. म्हणूनच घरची शिकवण, संस्कार आणि शिस्त हीच महेश यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. शाळेच्या सुट्टीतच शूटिंग करण्याचा आग्रह आणि शिक्षणात खंड पडू न देण्याचा शिरस्ता हेच सांगतो. पैसा व प्रसिद्धीच्या मागे न धावणारे महेश यांचे जेनमा-डॅडी आजच्या पालकांसाठी नक्कीच आदर्श ठरावेत. बलराज सहानी, सुलोचनादीदी, मनोजकुमार, संजीव कुमार, राजेश खन्ना , ताराचंद बडजात्या, दादा कोंडके, लता मंगेशकर, आशा भोसले... यांसारख्या तत्कालीन दिग्गजांसोबत वावरण्याची व काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ते पाहता नायक म्हणून महेश यांचे पदार्पण दमदार होणे अपेक्षित होते, परंतु परिस्थितीने अनपेक्षित वळण घेतेले. अशा वेळी प्रचंड जिद्द, पाठपुरावा करण्याचा सकारात्मक गुण, अखंड परिश्रम करण्याची तयारी आणि संयम, याच्या जोरावर ते एकेक टप्पा पार करत यशस्वीपणे पुढे जात राहिले. एक सच्चा कलावंत कुठल्या मुशीतून घडतो, तावून-सुलाखून निघतो याची साक्ष `डॅम इट व बरेच काही` मधून दिसते. यशापयशाचा हिंदोळा वरखाली झुलत असताना वेळोवेळी याच जिद्दीच्या जोरावर आलेल्या संकटांवर त्यांनी मात केली. या प्रवासात त्यांनी `सिनेमास्कोप` पासून ते थ्रीडी` पर्यंतचे आधुनिक तंत्राचे दालन मराठी चित्रपटसृष्टीसाठी खुले केले. एक कलावंत व माणूस म्हणून उलगडत जाणारा त्यांचा जीवनप्रवास, दिलदार मित्रपरिवार, प्रेमळ नातेवाईक, नवीन प्रयोग करण्याचे सातत्य, कठोर मेहनत, हिंदी-मराठी सिनेमातले योगदान आणि महेश यांची जिद्द प्रयत्नवादाला साद घालणारी आहे. प्रसिद्ध व्यक्तीच्या यशात त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा वाट असतो. कोठारे यांचे डॅडी-जेनमा यांची मूल्ये,तत्वे, स्वाभिमान आणि संस्कारांच्या कोंदणाने आकार दिला. पत्नीने तितकीच समर्थपणे साथ दिली. त्यांच्या नातेवाईकांनाही त्यांच्या डॅडीच्या हाकेला ओ देऊन वेळोवेळी साथ दिली हि उल्लेखनीय बाब आहे. पाठारे प्रभू ज्ञातीबद्दलचा सार्थ अभिमान, साजरे होणारे सणवार, पाळल्या जाणाऱ्या चालीरीती यांचाही समावेश यात आहे. या पुस्तकातून महेश कोठारे यांनी रसिक वाचकांशी मनापासून, खिलाडू वृत्तीने संवाद साधला आहे. हा पुस्तकरूपी प्रेरणादायी जीवनप्रवास पुढच्या पिढीसाठी उत्तम दस्तऐवज ठराव असा आहे. नकारात्मकतेला `डॅम इट` म्हणणारे व सकारात्मकता आणि बरच काही आपलेसे करणाऱ्या महेश कोठारे यांचे आत्मचरित्र अतिशय वाचनीय झालेले आहे. एकदा वाचायला घेतले कि, पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेववत नाही हेच त्याचे यश आहे. ...Read more

  • Rating Starमिलिंद पतकी, सांगोला, जि सोलापुर.

    प्रिय मंदारजी, आपले वरील महेश कोठारेंचे आत्मचरीत्र नुकतेच एकहाती वाचून संपवले. आपले मनापासून अभिनंदन. मराठी साहीत्यात एका चांगल्या पुस्तकाची भर आपण घातली आहात. तसे एखाद्या लोकप्रिय व्यक्तीमत्वाचे चरीत्र थोड्या पानात व चांगल्या शब्दात गुंफणे हे का किती खडतर आहे याची थोडी कल्पना मी करु शकतो. पण ही तारेवरची कसरत आपणशेवटपर्यंत न पडता व अतिशय रंजक व वाचनीय पध्दतीने पार पाडलीत. पुस्तकासाठी आपली मेहनत चांगलीच दिसुन येते. महेशजींचा प्रामाणिक पणा व त्यांचे जिवन मर्यादित शब्दात वाचकांसमोर मांडायची धमक आपण यशस्वीपणे पार पाडली आहे. आपली लेखनशैली ही सुंदर आहे, शेवटपर्यंत वाचत राहावस वाटणे ही खुपच अवघड गोष्ट आपल्या शैलीमुळे सोपी झाली आहे. मनापासुन अभिनंदन व असेच नविन नविन पुस्तकांचे लेखन आपणांकडून होवो ही दामाजीपंतांना प्रार्थना. शुभेच्छा. ...Read more

  • Rating StarPratap sapkal

    Dhadakhebaaz

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more