"BY SHRI. B.G. KESKAR. A COLLECTION OF SIXTEEN STORIES, DAVHALA SHADES LIGHT ON VILLAGE LIFE, THE PROBLEMS, ENTANGLED SITUATIONS AND VALUES.
IT IS TRUE THAT THE VILLAGES TODAY ARE CHANGING. THE AGE-OLD LIFE-VALUES, SUPERSTITIOUSNESS AND CULTURE IS SEEN TAKING A BACK FOOT. YET, THIS DOES NOT MEAN THAT THEY ARE IMPLEMENTING AN INSIGHT FULL OF REALITIES, BASED ON THE MODERN INDUSTRIAL ERA. THE RURAL WOMEN LIVING IN EXTREME POVERTY EVOKES COMPASSION IN OUR MIND WHILE THE COMMUNITY RESPONSIBLE FOR EXPLOITATION OF THE DOWNTRODDEN CREATES ANGER.
IS THE NEW GENERATION EVEN AWARE OF THIS TRAGEDY? OR, ARE THEY WITNESSING IT WITHOUT ANY SENTIMENT… OR MAYBE HELPLESSNESS…? THIS MISFORTUNE TOUCHES THE CORE OF THE READERS.
"
"‘डव्हाळं’ हा श्री. बा. ग. केसकर यांच्या सोळा कथांचा संग्रह. या संग्रहात श्री. केसकर यांनी ग्रामीण जीवन आणि त्या जीवनातील समस्या, गुंतागुंत व मूल्यसंघर्ष यांचं विश्लेषण प्रत्ययकारी केलं आहे.
आजच्या ग्रामीण जीवनात सुनी जीवनमूल्ये, अंधश्रद्धा आणि कालबाह्य परंपरा काही प्रमाणात कमी होत आहेत, परंतु त्याऐवजी नवी जीवनदृष्टी आणि नव्या यंत्रयुगाच्या प्रखर वास्तवाचं भान मात्र आवश्यक त्या प्रमाणात येत नाही.
त्यामुळे एकीकडे दारिद्र्यात राहूनही कष्ट करणाऱ्या ग्रामीण स्त्रीविषयी सहानुभूती वाटते, तर दुसरीकडे अन्याय, शोषण करणाऱ्या समाजातल्या एका समूहाविषयी विलक्षण संताप निर्माण होतो.
नवी पिढी मात्र संवेदनशून्यपणे, वास्तवाकडे मुर्दाडपणे (की अगतिकतेने?) पाहत जगत आहे. ही अनकलनीय शोकांतिका वाचकाला अंतर्मुख करते.
"