* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEATH OF A CAD
  • Availability : Available
  • Translators : DEEPAK KULKARNI
  • ISBN : 9789386888358
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CRIME & MYSTERY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN PRISCILLA HALBURTON-SMYTHE BRINGS HER LONDON PLAYWRIGHT FIANCÉ HOME TO LOCHDUBH, EVERYONE IN TOWN IS DELIGHTED... EXCEPT FOR LOVE-SMITTEN HAMISH MACBETH. YET THE AFFAIRS OF HIS HEART WILL HAVE TO WAIT. VILE, BOORISH CAPTAIN BARTLETT, ONE OF THE GUESTS AT PRISCILLA`S ENGAGEMENT PARTY, HAS JUST BEEN FOUND MURDERED - SHOT WHILE ON A GROUSE HUNT. NOW WITH SO MANY TITLED PARTY GUESTS AS PRIME SUSPECTS, EACH WITH THEIR OWN REASON FOR SNUFFING OUT THE DESPICABLE CAPTAIN, HAMISH MUST SMOOTH RUFFLED FEATHERS AS HE INVESTIGATES THE CASE... AND CATCH A KILLER, BEFORE THEY FLY THE COOP!
लॉचडभ हे स्कॉटलंडमधील एक छोटंसं गाव. त्या गावातील कर्नल हालबर्टन- स्मिथ आणि मेरी हालबर्टन- स्मिथ यांची तरुण, सुंदर मुलगी प्रिसिला हालबर्टन- स्मिथ ही लंडनमध्ये फॅशन पत्रकार म्हणून काम करत असते. लंडनमध्ये तरुण नाटककार हेन्री विदरिंगशी तिची भेट होते. हेन्री आणि प्रिसिला एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करायचं ठरवतात. प्रिसिला हेन्रीला घेऊन लॉचडभला येणार आहे, हे समजल्यावर प्रिसिलाचे आई-वडील तिचं आणि हेन्रीचं लग्न ठरल्याच्या आनंदात पार्टीचं आयोजन करतात. याच गावातील तरुण पोलीस इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथ हाही प्रिसिलावर प्रेम करत असतो. प्रिसिला आणि हेन्रीसाठी ज्या पार्टीचं आयोजन केलेलं असतं, त्या पार्टीसाठी बरेच लोक जमलेले असतात. त्यांच्यात कॅप्टन पीटर बार्टलेट नावाचा माणूस असतो. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी पीटर आणि अन्य काही जण शिकारीसाठी जाणार असतात; पण दुसऱ्या दिवशी सकाळी पीटरचा मृतदेह जंगलात सापडतो. हॅमिशच्या मते तो खून असतो. पीटरचा खून झाला आहे, हे हॅमिश कसं सिद्ध करतो आणि खुन्यापर्यंत कसा पोहोचतो, प्रिसिला आणि हेन्रीचं काय होतं, हे जाणून घेण्यासाठी ‘डेथ ऑफ अ कॅड’ ही कादंबरी वाचली पाहिजे.

No Records Found
No Records Found
Keywords
#AHAMISHMACBETHMYSTERY#DETECTIVESTORIESINMARATHI#
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    इंग्लंडमधील प्रसिद्ध नाटककार आपल्या नियोजित पत्नीसमवेत स्कॉटलंडमधील छोट्याश्या खेडेगावात तिच्या आईवडिलांना भेटायला येतो . तिच्या आईवडिलांनी त्यांच्या स्वागतासाठी एक मेजवानी आयोजित केलेली असते. गावातील काही मान्यवरही त्याठिकाणी हजर असतात. हॅमिश मॅकबेथहा आगंतुक पोलीस इन्स्पेक्टरही हजर असतो. पण दुसऱ्या दिवशी त्यातील एका पाहुण्यांचा खून होतो. हजर असलेल्या प्रत्येक माणसावर संशय घेतला जातो . प्रत्येकाला त्याचा खून करायची संधी आणि कारण असते . अतिशय नाईलाजाने हॅशिमला त्या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना देण्यात येते . तेव्हाच दुसराही खून होतो.काय आहे त्यामागचा हेतू ?? कोण करतंय खून?? मोठ्या कौशल्याने हॅशिम खुन्याला शोधून काढतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more