THE BOOK `DELIVERING HAPPINESS` BRINGS US THE INSPIRING JOURNEY OF THE AUTHOR`S LIFE ALONG WITH PROFESSIONAL SUCCESS. THIS STORY OF TONY, WHO DEVELOPED A PASSION FOR BUSINESS AT A VERY YOUNG AGE, TEACHES US A LOT. DIFFICULT, MISCHIEVOUS, STUBBORN, INDUSTRIOUS AS A CHILD; BUT TONY, WHO IS GOAL-ORIENTED, STARTED SMALL BUSINESSES AT AN EARLY AGE. WITH THE HELP OF A FRIEND, HE INITIALLY STARTED A SOFTWARE COMPANY CALLED ``LINK EXCHANGE`` AND THEN A COMPANY CALLED ``ZAPOS`` THAT SELLS SHOES OVER THE INTERNET. HOW MANY DIFFICULTIES HE FACED TO MAKE THIS COMPANY A NAME; HOW HE STOOD BRAVELY, STUBBORNLY; HOW HE CAME UP WITH THE GUIDING PRINCIPLE THAT SAVED THE COMPANY; TONY`S JOURNEY TO THIS POINT HAS BEEN EXTRAORDINARY. THIS BUSINESSMAN, WHO IS ONLY THIRTY-SEVEN YEARS OLD, CONVEYS MANY VALUES TO US THROUGH HIS LIFE STORY.
‘डिलिव्हरिंग हॅपिनेस’ हे पुस्तक आपल्याला, व्यावसायिक यशासोबतच लेखकाच्या आयुष्याचा प्रेरणादायक प्रवास पोहोचवते. अतिशय लहान वयातच व्यवसायाची ओढ निर्माण झालेल्या टोनीची ही कथा आपल्याला बरंच काही शिकवून जाते. लहानपणी मिस्किल, खट्याळ, डांबरट, उद्योगी; पण ध्येयवादी असणार्या टोनीने कुमारवयातच छोट्या छोट्या उद्योगांना सुरुवात केली. मित्राच्या सहकार्यानं त्यानं सुरुवातीला `लिंक एक्स्चेंज’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी आणि त्यानंतर इंटरनेटद्वारा बूट विकणारी ‘झापोस’ नावाची त्यांनी कंपनी सुरू केली. या कंपनीला नावारूपाला आणण्यासाठी त्यानं किती संकटं झेलली; धैर्यानं, जिद्दीनं तो कशा प्रकारे उभा राहिला; कंपनीला तारणारं मार्गदर्शक तत्त्व त्याला कसं उमगलं; इथपर्यंतचा टोनीचा प्रवास हा विलक्षण आहे. केवळ सदतीस वर्षांचा असणारा हा व्यावसायिक त्याच्या जीवनकहाणीतून अनेक मूल्यं आपल्यापर्यंत पोहोचवतो.