* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEMOCRACYS XI
  • Availability : Available
  • Translators : MEGHNA DHOKE
  • ISBN : 9789353171308
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 512
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SPORTS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NOTHING UNITES INDIA LIKE CRICKET. THE INDIAN TEAM IS A GLORIOUS MIX OF PEOPLE FROM DIFFERENT RELIGIONS, CLASSES, CASTES, REGIONS AND LANGUAGES; WHERE THE SON OF A PUMP MANAGER FROM RANCHI IS TIGHTLY BOUND IN FATE AND DETERMINATION TO THE CHILD PRODIGY OF A MARATHI PROFESSOR FROM MUMBAI AND A MUSLIM FROM THE BACK ALLEYS OF HYDERABAD. AND WHILE DYNASTS CAN RULE THE ROOST IN POLITICS AND BOLLYWOOD, CRICKET IS A MERITOCRATIC SPACE. BUT IT WASN`T ALWAYS THIS WAY. GANDHI, FOR INSTANCE, INTENSELY DISAPPROVED OF CRICKET. DURING THE RAJ IT WAS ASSOCIATED WITH RACISM. IT HAD THE NASTY ODOUR OF COMMUNAL DIVISION, WITH HINDUS AND MUSLIMS PLAYING IN SEPARATE TEAMS. DALITS, MEANWHILE, WERE PERSONAS NON GRATA ON THE FIELD. BESTSELLING AUTHOR AND JOURNALIST RAJDEEP SARDESAI NARRATES THE STORY OF POST-INDEPENDENCE CRICKET THROUGH THE LIVES OF ELEVEN EXTRAORDINARY INDIAN CRICKETERS WHO REPRESENT DIFFERENT DIMENSIONS OF THIS CHANGE - FROM DILIP SARDESAI AND TIGER PATAUDI IN THE 1950S TO M.S. DHONI AND VIRAT KOHLI TODAY. THIS IS NOT A BOOK ABOUT AN ALL-TIME BEST INDIAN CRICKET ELEVEN BUT ONE THAT SEEKS TO SHOW US GLIMPSES OF A CHANGING INDIA THROUGH PERSONAL AND ANECDOTAL BIOGRAPHICAL PORTRAITS. FROM THE DAYS THAT INDIAN CRICKETERS TRAVELLED BY TRAIN AND EARNED A FEW HUNDRED RUPEES FOR TEST MATCHES TO THE BRIGHT LIGHTS OF THE MULTIMILLION-DOLLAR IPL, THIS BOOK PUTS THE SPOTLIGHT ON THE EVOLUTION OF INDIAN CRICKET AND SOCIETY, AND SHOWS HOW A POST-COLONIAL NATION FOUND SELF-RESPECT.
स्वातंत्र्योत्तर सुरुवातीच्या काळात भारतीय क्रिकेट हा खेळ तत्कालीन संस्थानिक, अभिजन, श्रीमंत अशा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असायचा. ‘शाही रंजन’ असेच क्रिकेटचे स्वरूप होते. संस्थाने खालसा झाल्यानंतर कालौघात बदलत्या राजकीय परिस्थितीशी समांतर क्रिकेटची व्याप्ती इतरेजनात वाढत गेली. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक स्थित्यंतर होत असताना भारतीय क्रिकेटमध्ये विकासात्मक परिवर्तन होत गेले. त्या काळापासून ते आजच्या ‘नं-१ पोझिशन’पर्यंत यायला काही दशकांचा कालावधी उलटावा लागला. याच काही दशकांच्या कालावधीत अनेक गुणी खेळाडूंनी क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले. ‘प्रिंट व इलेक्टॉनिक मीडिया’चे नामवंत पत्रकार आणि माजी कसोटीपटू दिलीप सरदेसाई यांचे चिरंजीव राजदीप सरदेसाई यांनी आजवरच्या क्रिकेटपटूंमधील आदर्श ११ जणांची निवड केली (खरेतर बहुतांश वाचकांच्या मनातले हेच आदर्श क्रिकेटर आहेत) आणि प्रत्येक खेळाडूची कारकीर्द वाचकांपुढे मांडली आहे. या ११ कीर्तिमान खेळाडूंची चरित्रकहाणी राजदीप यांनी शब्दबद्ध केली आहे. प्रस्तुत पुस्तकात त्यांची कारकीर्द आकडेवारीसह येतेच, पण त्यांचे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील आयुष्याचे उद्धृत केलेले संदर्भ संक्षिप्त तरीही परिपूर्ण वाटतात. त्या त्या खेळाडूच्या खेळातील व खेळाबाहेरील गुणदोषांचे सटीक आणि सटीप विश्लेषण राजदीप करतात. या खेळाडूंच्या आयुष्यातील क्रिकेटचा ‘उपोद्घात’ (अर्थात प्रारंभ) आणि ‘सिंहावलोकन’ (अर्थात निवृत्ती) असा सर्वसमावेशक तपशील वाचकांना अवगत होतो. राजदीप स्वत: क्रिकेट खेळले आहेत. आनुवंशिक वारसा म्हणून क्रिकेट त्यांच्या रक्तातच आहे. म्हणूनच त्यांचे क्रिकेटविषयीचे विश्लेषण अनुभवाच्या मुशीतून आलेले आहे. एखाद्या खेळाडूविषयी लिहिताना क्रिकेटमधले धुरीण, बुजुर्ग आणि समकालीन क्रिकेटपटूच्या मतमतांतराची पुस्तकात असलेली पखरण हा तर खास ‘राजदीप टच’ म्हणावा लागेल. एखाद्या खेळाडूचे फक्त गुणवर्णन, त्याचे विक्रम आणि आकडेवारी, त्याची विश्वस्तरीय कामगिरी, त्याची शैली, त्याचे कौशल्य, देशातील आणि जगभरातील लोकप्रियता याचेच वर्णन पुस्तकात येते असे नाही. तर त्या खेळाडूचे दोष, त्याच्या चुका, त्याच्या वर्तनातील विसंगती, त्याचे फसलेले निर्णय, त्याच्याविषयीचे प्रवाद आणि समज, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ‘दुसरी’ बाजू असे समग्र चित्र उभे करताना राजदीप शब्दांची कंजुषी करत नाहीत. उलट त्यांच्या लिखाणाला परखडतेची धार येते. राजदीप यांची भाषा प्रवाही आहे. त्यात लालित्य आहे आणि सौंदर्यही... विषयाच्या ओघात आलेली त्यांची काही पल्लेदार वाक्ये पाहू : त्या सभ्य काळाचं दिलीप सरदेसाई हे ‘पॉडक्ट’ होतं... भविष्याच्या पोटात उमेदीचा गर्भ श्वास घेऊ लागला... त्याच्या बॅटमधून धावांचे झरे फुटत होते... आक्रमण हाच बचावाचा उत्तम मार्ग असतो... रिचर्ड्सच्या उंच उडालेल्या चेंडूवर कपिलची नजर रुतलेली होती... ज्या वयात गणित शाळकरी मुलांना घाम फोडतं, त्या वयात हा मुलगा नवीन समीकरणं जुळवत होता... ‘तो’ षटकार म्हणजे आपल्या आगमनाचा तेंडुलकरी ऐलानच होता... याच काळात क्रिकेटचं कॉमर्सशी लग्न झालं... विकासाच्या वाटेत इंडिया पुढे निघून गेला; भारत मात्र मागेच राहिला... पुस्तकात ठायी ठायी असलेली अशी वाक्यं राजदीपच्या प्रतिभेची, लेखनकौशल्याची आणि कल्पनाविलासाची प्रचिती देतात. चिवडा खाताना घासात काजूचा तुकडा यावा, अशीच ही खुमासदार वाक्यं आहेत. मेघना ढोके यांचं अनुवाद कौशल्य लाजबाब आहे. अस्सल मराठीकरणाचा हा उत्तम नमुनाच आहे. राजदीपच्या लेखनाची खुमारी मेघनाने दुणावली आहे. आजच्या काळात क्रिकेट न आवडणारा विरळाच. पण असलाच, तर त्याने हे पुस्तक आवर्जून वाचावे. कदाचित त्याला क्रिकेट श्वासाइतकेच महत्त्वाचे वाटू लागेल...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAJDEEPSARDESAI#DILIPSARDESAI#DEMOCRACYSXI#INDIANCRICKET#MANSURALIKHANPATAUDI#BISHANSINGHBEDI#MEGHANA DHOKE#SUNILGAVASKAR#KAPILDEV#MOHAMMEDAZHARUDDIN#SACHINTENDULKAR#SOURAVGANGULI#RAHULDRAVID#MAHENDRASINGDHONI#VIRATKOHLI# #भारतीय क्रिकेट# राजदीप सरदेसाई# मेघना ढोके#डेमेक्रसीज इलेव्हन#सचिन तेंडूलकर# दिलीप सरदेसाई# मन्सूर अली खान पत्तोडी#बिशन सिंग बेदी# सुनील गावसकर#कपिल देव# मोहम्मद अझरुद्दीन#सौरभ गांगुली#राहूल द्रविड#महेंद्रसिंग धोनी#विराट कोहली#
Customer Reviews
  • Rating Starनीतिन आरेकर

    राजदीपजी, नमस्कार, मी प्राध्यापक नीतिन आरेकर. तुम्ही क्रिकेट खेळत होता तेव्हाही तुम्हाला पाहिलं होतं, अकाली क्रिकेट का सोडलंत तो प्रश्न मनात ठेवून मी तुमचे विविध शोज नेहमीच पाहात होतो. आज तुमचं डेमॉक्रसीज इलेव्हन हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. हा कवळ क्रिकेटचाच नव्हे तर भारतीय लोकशाहीचा घेतलेला धांडोळा आहे. प्रत्येक खेळाडूला अभ्यासताना तुम्ही समकालीन सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक घडामोडी यांचा अर्थ भारतीय मानसाशी लावण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. संस्कृतीच्या विविध क्षेत्रांशी जवळीक असल्याने व स्वतः क्रीडापटू असल्याने तुम्हाला हे सर्व अतिशय चांगल्या रीतीने तपासता आलं. भारतात अशी पुस्तकं लिहिली जात नाहीत. तुम्ही ती उणीव भरून काढलीत, मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद!! ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 13-07-2019

    क्रिकेटचा रंजक इतिहास... ‘डेमोक्रसीज इलेव्हन – भारतीय क्रिकेटची महान गाथा’ हे पुस्तक म्हणजे क्रिकेटचा रंजक इतिहास आहे. या पुस्तकामधून भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ११ महान खेळाडूंचा प्रवास मांडलेला आहे. १९६०च्या दशकामध्ये खेळणारे दिलीप सरदेसाई आणि नाब पतौडी यांच्यापासून सुरुवात होते आणि आत्ताच्या महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली या खेळाडूंपर्यंत लेखक आपल्याला आणून सोडतो. भारतीय क्रिकेटच्या उत्क्रांतीची गोष्ट सांगणारे हे पुस्तक भारतीय क्रिकेट आणि भारतीय समाज कसा बदलत गेला हे स्पष्ट करते. ...Read more

  • Rating StarDaily Lokmat 9th June 19

    एक देश म्हणून भारताची जी काही जागतिक स्तरावरील वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये लोकसंख्येचा विचार करता ‘सर्वांत मोठी लोकशाही’ आणि ‘क्रिकेटवेड्यांचा देश’ यांचा समावेश होतो. देशावर ब्रिटिशांचा अंमल असताना त्यांनी आपल्या विरंगुळ्यासाठी क्रिकेट नावाचे जे रोपटंइथं लावलं, रुजवलं... त्याचा आता महावृक्ष झालाय. या महावृक्षाचा पसारा इतका विस्तारलाय, की या खेळाच्या जन्मदात्यासह संपूर्ण क्रिकेटविश्व त्याच्या कवेत आलं आहे. या खेळाची रुजवात भारतात होत असताना येथील मातीचा गुणही त्याला लागला. क्रिकेट जगतात ठसा उमटविणारी अनेक रत्नं आपल्या देशानं दिली. अशा ११ रत्नांच्या आयुष्याचा ‘लोकशाहीमय’ पट वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या शैलीनं मांडण्याचा यशस्वी प्रयत्न ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि एका क्रिकेटपटूच्या पोटी जन्मलेले राजदीप सरदेसाई यांनी या पुस्तकातून केला आहे. सर्वकालीन महान भारतीय संघाविषयी हे पुस्तक नाही. भारतीय क्रिकेटला आकार देणाºया, यशाचा बॅटन पुढील पिढीच्या हाती देणाऱ्या, जगण्याच्या लढाया लढण्याचं बळ देणाऱ्या, भारतीयांना स्वप्न पाहण्याची; ती पूर्ण करण्याची हिंमत देणाऱ्या ११ खेळाडूंविषयी हे पुस्तक असल्याचं लेखक नमूद करतात. अर्थात ‘डेमोक्रसीज इलेव्हन -`Democracy`s XI - The great Indian Cricket Story`... भारतीय क्रिकेटची महान गाथा’ या पुस्तकामध्ये राजदीप यांनी वडील दिलीप सरदेसाई यांच्यासह मन्सूर अली खान पतौडी, बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, कपिलदेव, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या आजी-माजी दिग्गजांची जडणघडण, खेळाडू आणि व्यक्ती म्हणून वाटचाल, यश-अपयश, आव्हाने, विक्रम, निवृत्तीनंतरचं जीवन, त्यांचं भावविश्व, मजेशीर किस्से यांसह भोवतालची सामाजिक परिस्थिती अशा खुबीनं शब्दबद्ध केली आहे, की वाचणाºयाला जणू हे आपल्या नजरेसमोर घडत असल्याचा भास होतो. ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत कार्यरत पत्रकार मेघना ढोके यांनी तितक्याच ताकदीचा अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. हे पुस्तक उपरोक्त ११ खेळाडूंबद्दलच माहिती देत नाही, तर १९६०च्या दशकाच्या प्रारंभी कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे दिलीप सरदेसाई ते वर्तमान भारतीय संघाचा कर्णधार कोहलीच्या काळापर्यंत भारतीय क्रिकेटचा इतिहासदेखील सांगते. गोव्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ते भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज म्हणून नाव कमावलेले सरदेसाई... राजघराण्यात जन्माला आलेले, अपघातात उजवा डोळा निकामी झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी भारतीय संघात स्थान मिळविणारे, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे ‘टायगर’ हे नाव सार्थ ठरविणारे मन्सूर अली खान पतौडी... भारतीय संघाची नकारात्मक मानसिकता बदलून ताठ मानेने खेळण्याची प्रेरणा देणारे, विंडीजसकट जगभरातील वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना करून सर्वांत प्रथम १० हजार कसोटी धावांचा टप्पा गाठणारे विक्रमादित्य सुनील गावसकर... फिरकीपटूंचा देश ही ओळख मिटवून सर्वाधिक कसोटी बळींचा विक्रम आपल्या नावे करणारे वेगवान गोलंदाज तसेच जागतिक दर्जाचे अष्टपैलू कपिलदेव... हैदराबादच्या गल्लीत वाढलेला मुस्लिम तरुण ते नजाकती मनगटी फटक्यांचे नैसर्गिक कोंदण लाभलेला आणि ऐतिहासिक पदार्पणाद्वारे जगभरातील समीक्षकांची वाहवा मिळविणारा अझर, मुंबईत प्राध्यापकाच्या घरी जन्माला येऊन आपल्या अफाट कर्तृत्वाद्वारे फलंदाजीला नवे जागतिक आयाम देणारा सचिन... संपन्न घरात जन्मलेला बंगाली मुलगा ते इतर संघांना ‘अरे’ला ‘कारे’ म्हणून उत्तर देण्याची सवय भारतीय संघाला लावणारा आक्रमक कर्णधार सौरव गांगुली... रांचीतला पेट्रोल पंप आॅपरेटरचा मुलगा ते भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देणारा कर्णधार, अशा आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविणारी वाटचाल करणारा धोनी... बालपणापासून बेधडक आणि काहीसा मुजोर स्वभाव असलेला, १८ व्या वर्षी रणजी सामना खेळत असताना वडिलांचे निधन झाल्याचे दु:ख बाजूला ठेवून त्याच दिवशी संघाला संकटातून बाहेर काढणारी खेळी करणारा विराट ते कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा सर्वच प्रकारांत स्वत: चांगली कामगिरी करून सहकाºयांना प्रेरणादायी नेतृत्व देणारा कर्णधार... असा खिळवून ठेवणारा या खेळाडूंचा प्रवास राजदीप यांनी चितारला आहे. इतर खेळांप्रमाणे क्रिकेटमध्येही घराणेशाहीला थारा नाही. इथं मैदानावर कामगिरी करा; नाही तर बाहेर व्हा, हाच नियम असतो. हे समजावून सांगताना राजदीप यांनी प्रस्तावनेत सुंदर उदाहरण दिलं आहे... ‘‘राजकीय नेत्याच्या मुलाला राजकारणात सहज जागा मिळू शकते. वाडवडिलांच्या पुण्याईवर विधानसभा-लोकसभेची निवडणूकही जिंकू शकतो. आमदार, खासदार, मंत्री होऊ शकतो. घराणेशाहीचा लाभ घेत बड्या उद्योगपतींची मुलं मोठ्या पदांवर जाऊन बसतात. अभिनेता-अभिनेत्रींच्या मुलांना सिनेमात सहज संधी मिळते. क्रिकेटमध्ये हे शक्य नाही. अफाट गुणवत्ता आणि सर्वोत्तम कामगिरी याशिवाय भारतीय संघात स्थान मिळविणे शक्य नाही.’’ ‘कुणाचा तरी मुलगा’ या पात्रतेच्या आधारे भारतीय संघात स्थान मिळत नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी रोहन गावसकर आणि स्वत:चा दाखला दिला आहे. राजदीप यांनी पुस्तक लिहिताना लेखक म्हणून प्रामाणिकपणा आणि तटस्थपणा जपल्याचे सिद्ध करण्यास हे उदाहरण पुरेसं ठरावं. प्रजासत्ताक भारताचा पाया रचताना घटनेने सर्व नागरिकांना समान संधींचं आकाश उपलब्ध करून दिलं. क्षमतेच्या बळावर गगनभरारी घेता येते, हे भारतीय क्रिकेटने सिद्ध करून दाखविलं आहे. संधीची समानता या लोकशाही मूल्यावर विश्वास ठेवून स्वप्ने पूर्ण करता येतात, या वाचकांच्या विश्वासाला बळकटी देण्याचं काम पुस्तकात उल्लेख असलेल्या ११ खेळाडूंची वाटचाल खचितच करते. हेच या पुस्तकाचं यश आहे. -अमोल मचाले ...Read more

  • Rating StarEknath Marathe

    डेमोक्रसीज इलेव्हन, भारतीय क्रिकेटची महान गाथा, राजदीप सरदेसाई, मराठी भाषांतर मेघना ढोके. भारतीयांचे क्रिकेट वेड अफाट आहे. क्रिकेटर तर देवासारखे पूजनीय आहेत. राजदीप सरदेसाई या स्वतः क्लब लेवल क्रिकेट खेळलेल्या पत्रकाराने हे इंग्रजीत लिहिले आहे व ह त्याचा ओघवता मराठी अनुवाद आहे. क्रिकेटचे विश्व गाजवून सोडणारे 11 भारतीय क्रिकेटपटूंचा अनोखा परिचय, ते जसा उदयाला आले, त्या क्रमाने करून देण्यात आला आहे. सगळ्यात आधी आहेत, लेखकाचे वडील, दिलीप सरदेसाई, गोव्याचे एकमेव कसोटीपटू ! सर्वात शेवटी आहे विराट कोहली ! या पुस्तकात नुसते क्रिकेट नाही तर क्रिकेटला देशाच्या अर्थकारण, राजकारण, समाजकारण या अंगाशी जुळवून बघितले आहे. क्रिकेटवर आधी असलेला शहरी, पदवीधर खेळाडूंचा असलेला प्रभाव ते ग्रामीण व शिक्षण अर्धवट सोडलेले खेळाडू असा छान उलगडला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये झालेली स्थित्यंतरे व तेव्हाचे राजकारण यांची सुद्धा छान संगती लावलेली आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more