* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DENIAL : A MEMOIR OF TERROR
  • Availability : Available
  • Translators : MAITREYEE JOSHI
  • ISBN : 9788184989922
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 312
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN THIS SKILLFULLY WROUGHT, POWERFUL STUDY, A TERRORISM EXPERT, NATIONAL SECURITY ADVISER (THE ULTIMATE TERRORISTS), AND LECTURER AT HARVARD, RETURNS TO A DEFINITIVE EPISODE OF TERROR IN HER OWN EARLY LIFE AND TRACES ITS GRIM, DAMAGING RAMIFICATIONS. HAVING GROWN UP IN CONCORD, MASS., IN 1973, STERN, THEN 15, AND HER SISTER, A YEAR YOUNGER, WERE FORCIBLY RAPED AT GUNPOINT BY AN UNKNOWN INTRUDER; WHEN THE POLICE REOPENED THE CASE IN 2006, STERN WAS COMPELLED TO CONFRONT THE DEVASTATING EXPERIENCE. THE POLICE INITIALLY TIED THE CASE TO A LOCAL SERIAL RAPIST, WHO SERVED 18 YEARS IN PRISON BEFORE HANGING HIMSELF. STERN`S PAINFUL JOURNEY TAKES HER BACK TO THE TRAUMATIC AFTERSHOCKS OF THE RAPE, WHEN SHE BEGAN TO AFFECT A STERN, HARD VENEER NOT UNLIKE THE STIFF-UPPER-LIP APPROACH TO SURVIVAL HER OWN GERMAN-BORN JEWISH FATHER HAD ASSUMED AFTER HIS CHILDHOOD YEARS LIVING THROUGH NAZI PERSECUTION. COVERING UP HER DEEP-SEATED SENSE OF SHAME WITH ENTRENCHED SILENCE, STERN HAD A CLASSIC POST-TRAUMATIC STRESS DISORDER—WHICH SHE WAS ONLY ABLE TO RECOGNIZE AFTER HER OWN WORK INTERVIEWING TERRORISTS. STERN`S WORK IS A STRONG, CLEAR-EYED, ELUCIDATING STUDY OF THE PROFOUND REVERBERATIONS OF TRAUMA.
फरारी असं म्हणणारी जेसिकास्टर्न,आंतरराष्ट्रीयख्याती ची दहशतवादतज्ज्ञ आणि विरोधाभास असाकी, हीच दहशत तिला स्वत:ला अगदी कोवळ्यावयात अनुभवावी लागली – गनपॉइंटवर केलेल्या बलात्काराच्या रूपानं! तीनहून अधिकत पंयादहशती ची वेदना ती नाकारत राहिली; एका कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसरनं तिची केस पुन्हा हातात घेईपर्यंत. एकीकडं झ्ऊएची लक्षणं (आघातोत्तरतणावविकृती) तर दुसरीकडं कर्तृत्वाची उंच भरारी; अशा दोन पातळ्यां वर तिचं जीवनपुढं जात राहिलं. पण तिच्यातल्या संशोधकानं आपल्या बलात्का-याचा अभ्यास करण्याची चालून आलेली ही संधी वाया नाही घालवली. आपला गुन्हेगार ब्रायनबीट,याच्या मित्रपरिवाराच्या तिनं मुलाखती घेतल्या.ब्रायनबीट जिथं राहत होता ते घर ती बघून आली. इतवंचनाहीतर स्वत:चं कुटुंब,स्वत:चं मन यांचं परिशीलन तिनं केलं आणि त्यातून साकारलं हे पुस्तक... एका धाडसी विषया चातितकाच मनमोकळा आढावाघेणारं हे पुस्तक मनाच्या अथांग डोहात डोकावण्याची जिज्ञासा असणा-या प्रत्येक वाचकासाठी! पण, लेखिका तेवढ्यावरच थांबत नाही. जाता-जाता ती सावधतेचा इशाराही देते. बलात्कारा सारख्या अत्यंत घृणास्पद गुन्ह्याला समाज पटकन विसरून जातो; त्या गुन्ह्याच्या गांभीर्याचा अस्वीकार करतो आणि त्याचे परिणाम त्यासमाजाला तसेच पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागतात.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DENIALAMEMOIROFTERROR #DENIALAMEMOIROFTERROR #डिनायल #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MAITREYEEJOSHI #JESSICASTERN "
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    अलीकडच्या काळात भारतातही स्त्रियांवरच्या बलात्काराच्या, हिंसाचाराच्या बातम्या रोज वाचायला मिळतात. त्यातही अल्पवयीन मुलींवरच्या बलात्काराचं प्रमाण खूप आहे. स्त्रिया विशेषत: मुली या घटनेला कशा सामोऱ्या जात असतील! अनेक मुलींना लैंगिकतेचा, लैंगिक संबंधााकाही अनुभव नसतो, त्यांना काय वाटत असेल? या घटनेनंतरची त्यांची मानसिक स्थिती कशी होत असेल? कशा प्रकारची भीती-दहशत त्यांच्या मनात निर्माण होत असेल? हा प्रसंग पुढच्या आयुष्यात त्या विसरू शकत असतील का? सर्वसामान्य आयुष्य त्या जगू शकत असतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला डिनायल या पुस्तकात मिळतात. इतकंच नाही तर ज्या बलात्काऱ्यांबद्दल आपल्या मनात तीव्र संताप आणि चीड निर्माण होते, ते असा क्रूरपणा का करत असतील याच्याही मानसिकतेचा तपशीलवार शोध घेतलेला दिसतो. या पुस्तकाची लेखिका आहे जेसिका स्टर्न, नावाप्रमाणेच अतिशय करारी स्त्री. जेसिका हॉवर्ड विद्यापीठात दहशतवाद या विषयाची व्याख्याती आहे.दहशतवाद्यांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन तिने टेरर इन द नेम ऑफ गॉड आणि द अल्टिमेट टेररिस्ट ही दोन पुस्तकं लिहिली आहेत. जे आपल्या अभिनव कल्पनांनी जग बदलतील अशा सात विचारवंतांपैकी एक म्हणून टाइम मॅगेझिनने तिची निवड केली होती. ती आणि तिची धाकटी बहीण सारा या दोघींवर एका अनोळखी माणसाने पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार केला होता. डिनायल हे जेसिकाच्या स्वानुभवावर आधारित आत्मवृत्त आहे. बलात्कारापूर्वीचं तिचं आयुष्य, बलात्कार होतानाचं आणि बलात्कारानंतरच्या तिच्या मानसिकतेचं तपशीलवार वर्णन जेसिका करते. बलात्कारापेक्षाही तिला जास्त धक्का बसतो तो पोलीस, समाज, नातेवाईक, यांच्या वागणुकीमुळे. पोलीस घटनेचा पुरता तपास करत नाहीत, जेसिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत. परिणामी तो बलात्कारी नंतरच्या तीन वर्षांच्या काळात आणखी ४४ मुलींवार बलात्कार करतो. अस्वस्थेबरोबरच गंभीरपणे विचार करायला लावणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद मैत्रेयी जोशी यांनी केला आहे. फरारी असं म्हणणारी जेसिकास्टर्न,आंतरराष्ट्रीयख्याती ची दहशतवादतज्ज्ञ आणि विरोधाभास असाकी, हीच दहशत तिला स्वत:ला अगदी कोवळ्यावयात अनुभवावी लागली – गनपॉइंटवर केलेल्या बलात्काराच्या रूपानं! तीनहून अधिकत पंयादहशती ची वेदना ती नाकारत राहिली; एका कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसरनं तिची केस पुन्हा हातात घेईपर्यंत. एकीकडं झ्ऊएची लक्षणं (आघातोत्तरतणावविकृती) तर दुसरीकडं कर्तृत्वाची उंच भरारी; अशा दोन पातळ्यां वर तिचं जीवनपुढं जात राहिलं. पण तिच्यातल्या संशोधकानं आपल्या बलात्का-याचा अभ्यास करण्याची चालून आलेली ही संधी वाया नाही घालवली. आपला गुन्हेगार ब्रायनबीट,याच्या मित्रपरिवाराच्या तिनं मुलाखती घेतल्या.ब्रायनबीट जिथं राहत होता ते घर ती बघून आली. इतवंचनाहीतर स्वत:चं कुटुंब,स्वत:चं मन यांचं परिशीलन तिनं केलं आणि त्यातून साकारलं हे पुस्तक... एका धाडसी विषया चातितकाच मनमोकळा आढावाघेणारं हे पुस्तक मनाच्या अथांग डोहात डोकावण्याची जिज्ञासा असणा-या प्रत्येक वाचकासाठी! पण, लेखिका तेवढ्यावरच थांबत नाही. जाता-जाता ती सावधतेचा इशाराही देते. बलात्कारा सारख्या अत्यंत घृणास्पद गुन्ह्याला समाज पटकन विसरून जातो; त्या गुन्ह्याच्या गांभीर्याचा अस्वीकार करतो आणि त्याचे परिणाम त्यासमाजाला तसेच पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागतात. ...Read more

  • Rating StarDaily Loksatta Chaturang 4-2-17

    निर्भया ... जेसिका स्टर्न, बलात्काराची एक घटना तिचं आयुष्य पार उलटं पालटं करून गेली, पण तिने आपल्या वेदनेलाच लेखणीचं माध्यम ठरवत दहशतवाद, हिंसा यांच्या मागचं सत्य जगापुढे आणलं. त्यासाठी ती अनेक देशातल्या दहशतवाद्यांना भेटली, त्यांच्या मुलाखती घेतल्ा. तिची ही पुस्तकं म्हणजे जगभरच्या दहशतवादाचा आजवरचा प्रवास ठरली आहेत. त्यासाठी तिला स्वत:मधल्या भीतीशी आधी लढावं लागलं. त्यावर मात करत, निर्भय होत जगभरातल्या पीडितांना आधार देणं, निर्भय करणं हेच तिनं आता आपलं जीवित कार्य ठरवलं आहे. ‘‘तो दिवस होता, सोमवार. तारीख १ ऑक्टोबर १९७३. माझी सावत्र आई लिसा माझ्या सावत्र बहिणींना घेऊन बाहेर जेवायला गेली होती. मी आणि माझी सख्खी बहीण सारा घरीच होतो. लिसाने आम्हाला आमचा ‘गृहपाठ करा,’ असं सांगितलं होतं. आम्ही दोघी आज्ञाधारकपणे आमचं काम करीत होतो. तेवढय़ात एक माणूस आत आला. त्यानं आम्हाला पिस्तूल दाखवलं व म्हणाला, ‘किंचाळू नका. खाली बघा.’ अर्थातच मी खाली बघितलं. मग म्हणाला, तो आम्हाला इजा करणार नाही. आम्ही गप्प बसायचं. ब्र काढला तरी तो आम्हाला ठार करेल. मग शांत राहून, समजूतदारपणे खाली मान घालून, त्याच्या सांगण्यानुसार आम्ही जिना चढून वर गेलो. आमच्या पाठीला त्याचं पिस्तूल टेकवलेलं. त्यानंतर त्याने जे जे काही करायला सांगितलं ते ते आम्ही केलं. नंतर त्यानं माझ्यावर बलात्कार केला. मला काही कळेनासं झालं. मी भानरहित अवस्थेत गेले का? मी त्याच्या आज्ञेप्रमाणे वागत होते का? असेन बहुधा. तसंच असेल! पण आज्ञाधारकपणे वावरणारी ती ‘मी’ कुणी तरी वेगळीच होते. माझ्या वागण्यात विचार आणि कृती यांचा मेळच नसावा. ज्याने माझ्या मनाचा ताबा घेतला, त्यानं माझ्या शरीराला निष्क्रिय, मूक आणि शांत राहण्याची आज्ञा दिली. किती वेळ गेला? माहीत नाही. कुणाचा आवाज? माझ्या बहिणीचा? वेदनेनं मला बाहेर काढलं. तिचं रक्षण मला करायचं होतं; पण त्याने तर आपला कार्यभाग तिच्या बाबतीतही साधला होता. मी भानावर आले; पण ‘ती’ मीच होते का याविषयी मला शंका आहे. तो म्हणाला, ‘पोलिसांना सांगू नका, आणखी गोत्यात याल.’ मी मान डोलावली. तो जाताना म्हणाला, ‘हे तर खेळण्यातलं पिस्तूल आहे.’ गाडीचा आवाज आला. तो गेला. सारा, माझी लहान बहीण आधी भानावर आली. तिने फोन फिरवला. फोन बंद. मी सैरभैर झाले. बलात्कारानंतर मी सुन्न अवस्थेत गेले. सारानेच सावरलं. बाहेर थंडीचा कडाका. तरी तिनंच बाहेर नेलं आणि एका हॉटेलमधून आम्हाला सांभाळणाऱ्या दाईला फोन केला. तिचा कसा विश्वास बसणार? आम्ही सुरक्षित गावात, चांगला शेजार असणाऱ्या घरात होतो; पण ती आली, फॅमिली डॉक्टरांना बोलावून तिनं आम्हाला दवाखान्यात नेलं. आमचे डॅड तेव्हा नॉर्वेला होते. ते कधी तरी आले, पण त्या वेळेपासून माझं जगच बदललं. अजूनही मी माझी मला पूर्णपणे सापडलेले नाहीये..’’ ..अंगावर काटा आणणारी ही सत्य घटना. ती सांगतेय अमेरिकन संशोधक, अभ्यासक डॉ. जेसिका स्टर्न. अमेरिकेतल्या कॉन्कॉर्ड या सुप्रसिद्ध गावात राहणारी. वयाच्या पंधराव्या वर्षी झालेला हा आघात तिनं आणि तिच्या बहिणीनं कसा पचवला असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. तासभर तिथे असणाऱ्या त्या बलात्काऱ्याने दोघी बहिणींवर बलात्कार केला. त्या एका तासात जेसिका पार बदलून गेली. तिच्या आठवणी तिने ‘डिनायल- अ मेमॉयर ऑफ टेरर’ – या नावाने प्रकाशित केल्या आहेत. त्या घटनेनंतर ती पुन्हा कशी उभी राहिली, आपलं मन ताळ्यावर आणून आयुष्य जगण्याचा प्रयत्न ती कसा करत राहिली याची ही कहाणी आहे. ती वाचताना तिच्याबद्दल दु:ख तर होतंच, पण तिच्या धाडसाबद्दल अभिमानही वाटतो, कौतुक वाटतं, आयुष्याचा वेगळा अर्थच जणू सापडतो. तो क्लेशकारक प्रसंग घडल्यावर त्या दोघी बहिणी एकमेकींना धरून होत्या. साराला तर किती तरी दिवस एकटीला झोपायची भीती वाटे. आपल्या घरात सगळे निर्भय आहेत. आपण भिऊन कसं चालेल, डॅड रागावतील या दडपणाने त्या तो प्रसंग मनाच्या तळात दडवत राहिल्या. काळ कुणासाठी कधी थांबत नाही. सावत्र आईने या काळात त्यांना सांभाळले, त्यांना समजून घेत जीवनचक्र चालू ठेवलं. दोघींची शिक्षणं झाली, लग्नं झाली. मुलं झाली. वरवर पाहता ठीक होतं; पण आपल्यासारखं कुणी भीतीला कवटाळून राहू नये, भीती व त्यातून येणारी निराशा लपवू नये, असं काही तरी करायची सुप्त इच्छा जेसिकाच्या मनात होती. ‘मग त्यासाठी तिनं काय केलं?’ असं विचारण्यापेक्षा ‘काय केलं नाही तिनं’ असंच म्हणायला हवं. शाळा संपवून ती कॉलेजमध्ये गेली. त्यानंतर १९८५ मध्ये तिने बर्नार्ड कॉलेजमधून रसायनशास्त्रात बी.ए. केलं. तेव्हा तिचा दुय्यम विषय होता- रशियन भाषा. १९८८ मध्ये अमेरिकेच्या एम.आय.टी. या सुप्रसिद्ध संस्थेतून एम.एस. केलं ते केमिकल इंजिनीयिरगमध्ये. त्या वेळी तिचा विशेष विषय होता, अमेरिकेची तंत्रज्ञानविषयक धोरणे. १९९२ मध्ये तिनं हार्वर्डमधून पीएच.डी. मिळवली ती लोकहितवादी (सार्वजनिक) धोरणांच्या विशेष विषयात. खरं म्हणजे तिला लेखनाविषयीचा अभ्यासक्रम घ्यायचा होता; पण त्यासाठी आवश्यक तेवढे गुण तिला मिळाले नाहीत. रसायनशास्त्र हा तिचा दुसरा आवडीचा विषय होता. तिने रसायनशास्त्रात काम करताना रासायनिक शस्त्रांवर संशोधन केलं, पण तिची तिला जाणीव होत होती की, आपल्याला काही वेगळं शोधायचं आहे. शिकत असतानाच दहशतवाद, हिंसा आणि माणसांमधील खलप्रवृत्ती यांचा अभ्यास करण्याचं तिनं मनावर घेतलं आणि १९८३ मध्ये दहशतवादावरील पहिला लेख तिने लिहिला. टॉक्सिक केमिकल्सचा वापर व केमिकल प्लान्ट्सवरील दहशतवादी हल्लय़ांच्या शक्यतेबद्दल सरकारला सावधानतेचा इशारा देणारा तो लेख होता. राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंन्टन यांच्या कारकीर्दीत तिने ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ या अमेरिकेच्या उच्च पातळीवरील सुरक्षा समितीत काम केलं ते रशिया, युक्रेन आणि युरेशिया यांच्या बाबतीतील धोरण समितीची संचालक म्हणून. १९९२-१९९४ या काळात ‘लॉरेन्स लिव्हमोर नॅशनल लॅबोरेटरी’मध्ये खास विश्लेषक म्हणून ती काम करीत होती. ते करीत असताना, रशियामधील काही राजकीय घडामोडींमुळे दहशतवाद्यांच्या हाती, अणुशस्त्रांसंबंधित सामग्री लागण्याची शक्यता आहे व ते घातक ठरू शकेल, असा धोक्याचा इशारा तिने दिला होता. २००१ मध्ये ‘टाइम’ या प्रतिष्ठित नियतकालिकाने तिची जगातील सात विचारवंतांमध्ये निवड केली. त्यासाठीचा निकष होता, आपल्या अभिनव कल्पनांनी जग बदलतील असे विचारवंत! माणसांवरील आघात (ट्रॉमा) आणि हिंसा यावर तिने जे लेखन केलं त्यासाठी तिला २००९ मध्ये प्रतिष्ठित अशी ‘गुगनहाईम फेलोशिप’ मिळाली. त्यानंतर आजपर्यंत दहशतवाद, हिंसा व माणसांमधील खलप्रवृत्ती यांचाच ती अभ्यास करत आहे. या विषयातील जागतिक पातळीवरील तज्ज्ञ अशी तिची ख्याती आहे. जनकल्याणासाठी, मानवतेसाठी उपयुक्त असे संशोधन करून तिने काढलेले निष्कर्ष अमेरिकन सुरक्षा खात्यास साहाय्यकारी ठरले आहेत. आजवर तिची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वेगवेगळ्या दहशतवाद्यांच्या मुलाखतींवर आधारित पहिले पुस्तक, ‘द अल्टिमेट टेररिस्ट्स’ (२००१), ‘टेरर इन द नेम ऑफ गॉड- व्हाय रिलिजस मिलिटन्टस् किल’ (२००४), ‘डिनायल’ (२०१०) आणि दीडेक वर्षांपूर्वी आलेलं ‘इसिस- द स्टेट ऑफ टेरर’ (२०१५). ही पुस्तकं म्हणजे जगभरच्या दहशतवादाचा आजवरचा प्रवासच आहे म्हणा ना! पण केवळ तेवढंच नाही. दहशतवाद्यांच्या मुलाखती घेण्यासाठी ती जगभर फिरली. सौदी अरेबिया, आखाती प्रदेश, पाकिस्तान, भारत, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, यासारख्या देशांमधून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भेटी, त्यांच्या प्रमुख, दुय्यम नेत्यांना भेटणं, प्रश्नावली देऊन उत्तरं मिळवणं अशा अनेक मार्गाचा अवलंब करत ती गेली. धार्मिक दहशतवादाचा फार बारकाईने तिने विचार केला आहे. त्याची वेगवेगळी रूपे, त्यामागची कारणे कोणती, त्या संघटनांमधील नवीन भरती कशी होते, त्यांचे क्रौर्य कशातून जन्माला येते हे सांगताना त्यांच्या दृष्टीने सत् आणि असत् यांचे सापेक्ष रूप कसे ठरवले जाते, सामान्य जनतेलाही त्यांचे आकर्षण कसे व का वाटते अशा अनेक गोष्टी तिने यात वर्णन केल्या आहेत. भाषा अगदी सोपी, लिहिण्यातली तळमळ व अचूकता यामुळे तिची पुस्तके ‘वाचलीच पाहिजेत’च्या यादीत पहिल्या दहांमध्ये राहिली. इसिस या संघटनेच्या जन्मापासून तिचे रूप कसे होते, कसे आहे, इतर दहशतवादी संघटनांपेक्षा तिची कार्यप्रणाली कशी वेगळी आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा व सोशल मीडियाचा वापर त्यांनी किती प्रभावीपणे केला आहे याचे अतिशय सखोल विवेचन तिच्या या पुस्तकात दिसते. त्यांच्याविरुद्ध आपणही सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करू शकतो हे ती सांगते. दहशतवाद हा आज आपल्यासाठी दूरस्थ विषय राहिला नसून प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे, कारण तो आपल्या घरात आला आहे. त्याचे रूप विलक्षण क्रूर व भीतीदायक आहे, ते तुम्हाला विळखा घालत आहे तेव्हा सावध राहण्याचा इशारा जेसिका आपल्या लेखनातून सतत देत आहे. यासाठी सरकारी उच्च स्तरावरून तिचे प्रयत्न चालू आहेत. तरीही या साऱ्या उज्ज्वल कारकीर्दीतही तिचं मन अस्वस्थ होतं. तिचं तिला ते कळत होतं. तिला हळूहळू जाणवत होतं की, आपण एकीकडे करारी, निर्भय अधिकारी असलो तरी दुसरीकडे बलात्कारपीडित, लज्जेनं काळवंडलेली एक जेसिकाही आपल्यात आहे. ‘तिला’ आपल्यातून बाहेर काढून मोकळी करणं भाग आहे. आपल्याला दहशतवादाची भीती वाटतेय का? असेल तर ती विघातक आहे, ती काढून टाकायला हवी. तसं होत नाही तोवर आपण असं दोन स्तरांवर जगत राहणार का? अशा विचारांनी ती मध्येच सैरभैर होई. अतिशय भीती आणि आत्यंतिक आनंद या भावना देखील तिला अनुभवता येत नव्हत्या. तिच्या साऱ्या भावनाच जणू गोठून गेल्या होत्या. जेसिकाने दहशतवाद व हिंसा असा विषय जेव्हा निवडला त्या वेळी हा काही अभ्यासाचा विषय म्हणून निवड करण्याजोगा नाही असंच साऱ्यांचं मत होतं. शिवाय स्त्रियांनी यात काम करणं ही गोष्ट असंभवनीय असंच साऱ्यांना वाटत होतं. तिला मात्र याच विषयात काम करण्याची आतून इच्छा होती. असं का? दहशतवाद या विषयात मला का आवड वाटते? त्या विषयाकडे वळताना मला भीती कशी वाटली नाही? असे प्रश्न तिला आधी पडले नव्हते; पण भूतकाळात घडलेल्या बलात्काराच्या त्या घटनेनंतर तिच्यावर झालेला जो परिणाम होता, त्यामुळे ती नकळत या विषयाकडे वळली होती. हा एक विरोधाभासच होता. मोठय़ा आघातानंतर येणाऱ्या तणावामुळे माणसाचे वागणे बदलते. अनेकदा त्याच्या वर्तनात जाणवेल-न जाणवेल अशी विकृती निर्माण होते. त्याला पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस डिसऑर्डर (ढळरऊ) असे म्हणतात. तिचं तिला हे कळायला, किंबहुना तिला ते स्वीकारायला मात्र तब्बल तेहेतीस वर्षांचा काळ जावा लागला. खरे म्हणजे १९७३ मध्ये पोलीस चौकीत या बलात्काराच्या गुन्ह्य़ाची नोंद झाली. त्याआधी तेथील आजूबाजूच्या परिसरात १९७१ ते १९७३ या काळात तेथे बलात्कारांच्या ४४ पेक्षा अधिक घटनांची नोंद झाली होती असे पोलीस फाइलमध्ये दिसते; परंतु पोलिसांना तेव्हा त्यात काही धागा सापडेना. त्यांनी ती फाइल बंद केली होती. २००६ मध्ये जेसिकाविषयी आस्था असणारा, शाळेतील तिचा वर्गमित्र, पोलीस अधिकारी होता. तो तेथे आला आणि त्याने ती बंद फाइल परत उघडली. तिच्याशी संपर्क साधला. पाठपुरावा करत हे सारे बलात्कार एकानेच केले हे दाखवले. मात्र त्याआधीच अमली पदार्थाचे सेवन करण्याच्या गुन्ह्य़ासाठी त्याच गुन्हेगाराला अठरा वर्षांचा तुरुंगवास झाला होता, त्याने बाहेर आल्यावर आत्महत्या केली, हेही तिला कळले. ती एक प्रकारे मुक्त झाली. आतापर्यंत तिच्या लक्षात आले होते की, कोणत्याही भयानक प्रसंगात आपल्याला भीती वाटत नाही, पण विशिष्ट गंध, क्षुल्लक पण विशिष्ट आवाज, यांच्यामुळे आपण अत्यंत घाबरतो. तसेच दहशतवाद्यांच्या मुलाखती घेताना, दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर त्यांना भेटताना भीती वाटत नाही हे खरे, तरी आपण अनैसर्गिकरीत्या शांत राहतो. त्यावरची एक उपाययोजना म्हणून, मानसशास्त्रज्ञांच्या सल्लय़ानुसार तिने या नकोशा वाटणाऱ्या, मनाच्या तळाशी खोल दडवल्या गेलेल्या आठवणी लिहायला सुरुवात केली. त्यातून किती गोष्टी बाहेर आल्या. ज्या आपल्या मनाशी कबूल करणंही कठीण असतं, त्या गोष्टी मोठय़ा धाडसानं तिनं जगासमोर मांडल्या. ते करताना मनाशी केवढा तरी संघर्ष करावा लागला. कुटुंबाचा, नातेवाईकांचा रोष पत्करावा लागला. एक प्रकारच्या बेभान अवस्थेतच ते लेखन तिनं केलं. भावनांचे वादळ, अनेक पातळ्यांवरील फ्लॅशबॅक, शरम वाटत असतानाही गरज म्हणून अलिप्तता राखत लिहिणं हे सारं दिव्य तिनं पार पाडलं. हेतू कोणता? तर वैयक्तिक, अत्यंत खासगी असं न मानता लिहिलं म्हणजे अशाच पीडितांना आधार वाटेल. बलात्कारासारखा नीच पातळीवरचा गुन्हा समाज पटकन विसरतो, ते करणारा उजळ माथ्याने फिरतो, पण पीडित व्यक्ती वा तिचं कुटुंब मात्र उद्ध्वस्त जीवन जगत राहतात-मरण येत नाही म्हणून! मला वाटतं ‘डिनायल-अ मेमॉयर ऑफ टेरर’ ही केवळ जेसिकाची आत्मकहाणी नाही. अनेक गोष्टींची भीती बाळगत, सत्याचा अस्वीकार करत जगणाऱ्या पीडितांना आणि समाजालाही ती सत्य जाणून घेत, ते समजून घेण्याची प्रेरणा देतेय- भीतीचा, दहशतीचा अस्वीकार करून, आपल्या वेदनेला जाहीर वाचा फोडून! डॉ. मीना वैशंपायन ...Read more

  • Rating StarMILUN SARYAJANI - FEB 2017

    अलीकडच्या काळात भारतातही स्त्रियांवरच्या बलात्काराच्या, हिंसाचाराच्या बातम्या रोज वाचायला मिळतात. त्यातही अल्पवयीन मुलींवरच्या बलात्काराचं प्रमाण खूप आहे. स्त्रिया विशेषत: मुली या घटनेला कशा सामोऱ्या जात असतील! अनेक मुलींना लैंगिकतेचा, लैंगिक संबंधाा काही अनुभव नसतो, त्यांना काय वाटत असेल? या घटनेनंतरची त्यांची मानसिक स्थिती कशी होत असेल? कशा प्रकारची भीती-दहशत त्यांच्या मनात निर्माण होत असेल? हा प्रसंग पुढच्या आयुष्यात त्या विसरू शकत असतील का? सर्वसामान्य आयुष्य त्या जगू शकत असतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला डिनायल या पुस्तकात मिळतात. इतकंच नाही तर ज्या बलात्काऱ्यांबद्दल आपल्या मनात तीव्र संताप आणि चीड निर्माण होते, ते असा क्रूरपणा का करत असतील याच्याही मानसिकतेचा तपशीलवार शोध घेतलेला दिसतो. या पुस्तकाची लेखिका आहे जेसिका स्टर्न, नावाप्रमाणेच अतिशय करारी स्त्री. जेसिका हॉवर्ड विद्यापीठात दहशतवाद या विषयाची व्याख्याती आहे. दहशतवाद्यांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन तिने टेरर इन द नेम ऑफ गॉड आणि द अल्टिमेट टेररिस्ट ही दोन पुस्तकं लिहिली आहेत. जे आपल्या अभिनव कल्पनांनी जग बदलतील अशा सात विचारवंतांपैकी एक म्हणून टाइम मॅगेझिनने तिची निवड केली होती. ती आणि तिची धाकटी बहीण सारा या दोघींवर एका अनोळखी माणसाने पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार केला होता. डिनायल हे जेसिकाच्या स्वानुभवावर आधारित आत्मवृत्त आहे. बलात्कारापूर्वीचं तिचं आयुष्य, बलात्कार होतानाचं आणि बलात्कारानंतरच्या तिच्या मानसिकतेचं तपशीलवार वर्णन जेसिका करते. बलात्कारापेक्षाही तिला जास्त धक्का बसतो तो पोलीस, समाज, नातेवाईक, यांच्या वागणुकीमुळे. पोलीस घटनेचा पुरता तपास करत नाहीत, जेसिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत. परिणामी तो बलात्कारी नंतरच्या तीन वर्षांच्या काळात आणखी ४४ मुलींवार बलात्कार करतो. अस्वस्थेबरोबरच गंभीरपणे विचार करायला लावणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद मैत्रेयी जोशी यांनी केला आहे. – अंजली मुळे पुणे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more