* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEATH COMES FOR THE ARCHBISHOP
  • Availability : Available
  • Translators : VIJAY TENDULKAR
  • ISBN : 9789353172701
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : HISTORICAL, MODERN & CONTEMPORARY FICTION
  • Available in Combos :AMERICAN CLASSICS COMBO SET-17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BASED ON THE LIFE OF FATHER LATUR AND FATHER JOSEPH VELLET, THE NOVEL ‘DEATH COMES FOR THE ARCHBISHOP ’ IS A CAPTIVATING PIECE OF LITERATURE. THE HEAD BISHOP AT NEW MEXICO SELECTS FATHER LATUR AND FATHER JOSEPH VELLET. THEY BOTH REACH SANTA FE. HOWEVER, THE PRIEST THERE REFUSES TO ACCEPT THEM BOTH. THE CHURCH AT DYURANGO WHICH IS UNDER THE AUTHORITY OF THE PRIEST HAS NOT RECEIVED THE REQUIRED DOCUMENT REGARDING FATHER LATUR’S APPOINTMENT. REALISING THIS, FATHER LATUR TRAVELS THREE THOUSAND MILES TO MEET THE BISHOP AT DYURANGO. AFTER RECEIVING THE AUTHORITY LETTER FROM THE BISHOP, HE COVERS ANOTHER FIFTEEN HUNDRED MILES AND TRAVELS BACK TO SANTA FE. BY THEN, FATHER JOSEPH VELLET HAS SUCCEEDED IN WINNING THE LOCAL CHURCH PEOPLE. HENCE, FATHER LATUR IS RECEIVED WARMLY BY ONE AND ALL. ALONG WITH THE SPREAD OF RELIGION, FATHER LATUR ALSO TAKES OVER THE RESPONSIBILITY OF BUILDING A NEW CHURCH IN SANTA FE. THIS NOVEL FURTHER DESCRIBES THE LIVES OF BOTH FATHER LATUR AND FATHER JOSEPH VELLET.
फादर लतूर आणि फादर जोसेफ व्हेलट यांच्या आयुष्यावर आधारित कादंबरी आहे ‘देवाची माणसे.’ न्यू मॅक्सिको इथं खिश्चन धर्माच्या प्रसारासाठी मुख्य बिशप यांनी निवडलेला फादर लतूर सँता फेला फादर जोसेफ व्हेलटसोबत पोहोचल्यावर तिथले धर्मगुरू त्याचा अधिकार मानण्यास नकार देतात. ड्युरँगोच्या धर्मगुरूंच्या अखत्यारीतील या चर्चला फादर लतूरच्या निवडीची अधिकारपत्रेच पोहोचलेली नसतात. तीन सहस्त्र मैलांचा प्रवास करून फादर लतूर ड्युरँगोच्या बिशपला भेटायला जातात. अधिकारपत्रे मिळवून पंधराशे मैलांचा प्रवास करून सँता फेला परत येतात. तोपर्यंत फादर जोसेफ व्हेलटनं स्थानिक चर्च अधिकाऱ्यांची मर्जी संपादन केलेली असते. त्यामुळे कोणताही वैरभाव न ठेवता फादर लतूरचं स्वागत होतं. धर्मप्रसाराच्या कामाबरोबरच तो सँता फेमध्ये नवं चर्च उभारण्याचं कामही हाती घेतो. या दोन धर्मगुरूंचं काम आणि नव्या वातावरणाशी जुळवून घेतानाचा संघर्ष या कादंबरीतून प्रत्ययास येतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#DEATH COMES FOR THE ARCHBISHOP #WILLA CATHER #VIJAY TENDULKAR #AMERICAN CLASSICS #MARATHI TRANSLATION #ONLINE BOOKS #देवाची माणसे #डेथ कम्स फाॅर द आर्चबिशप #विला कॅथर #विजय तेंडुलकर #मराठी पुस्तके #अमेरिकन क्लासिक्स #आॅनलाइन पुस्तके
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 29-12-2019

    धर्मगुरूंचा प्रवास... दुसरे पुस्तक म्हणजे विला कॅथर लिखित ‘देवाची माणसे’ दोन धर्मगुरूंच्या संघर्षावर ते आहे. लांबच्या कुठल्या तरी गावातल्या चर्चमध्ये जाण्याची आज्ञा त्यांना होते व ते तिथे पोहोचतात, मात्र तेथील माणसे त्यांना स्वीकारत नाहीत आणखी कुठल्ा तरी लांबच्या गावातील एका धर्मगुरूचे अधिकारपत्र आणायला पाठवले जाते. ते मिळवण्यासाठी एक जण जातो व दुसरा गावातच थांबतो. शेवट अर्थातच गोड आहे, पण त्यांचा प्रवास व संघर्ष यांची जी रंजक कथा आहे ती तेंडुलकरांनी मराठीत शब्दश: जिवंतच केली आहे. वाचावी अशीच ही कादंबरी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more