* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DHIND
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668087
  • Edition : 25
  • Publishing Year : FEBRUARY 1995
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
;BY GOD, I DID NOT TOUCH WINE, I DID NOT DRINK IT. UNNECESSARILY DO NOT BLAME ME.` AS RAU KHOT TOTALLY REFUSED EVERYONE PRESENT WAS ASTONISHED, THEY ALL STARTED LAUGHING HEARTILY. SEEING THIS RAU KHOT SAID, "DO NOT LAUGH AT ME, I AM TELLING YOU THE TRUTH. I DID NOT DRINK.` RAMBHAU SAID WITH A SMILE, "MY DEAR, YOUR EYES ARE DECEIVING YOU.` "ANNA, WHAT ARE MY EYES SAYING? NOW JUST SHUT UP FOR GOD`S SAKE.` "OH, YOU MEAN TO SAY THAT WE SHOULD KEEP QUIET TILL YOU ARE OFF THE HANGOVER?` "BUT AS I DID NOT DRINK, SO THERE IS NO QUESTION OF A HANGOVER!` "ARE YOU STILL DENYING THAT YOU ARE HAVING A HANGOVER?` "DO NOT MENTION IT AT ALL. I DID NOT EVEN TOUCH IT, FORGET ABOUT HAVING IT.` ONE OF THE SPECTATORS CAME FORWARD AND SAID LOUDLY, "IF YOU DID NOT EVEN TOUCH IT, THEN WHY WERE YOU HIDING?` "OH! NOW LOOK, WHAT ARE YOU TALKING ABOUT? WHY DO YOU THINK I WAS HIDING?` "YES, YOU WERE HIDING ON THE LOFT, OTHERWISE, WHY WOULD YOU GO THERE?` "WHAT WAS I DOING ON THE LOFT? WHAT A QUESTION, I WAS FAST ASLEEP ON THE LOFT.` "WHY SO? WAS THERE NO SPACE ON THE GROUND BELOW?` "WHY ARE YOU SO CONCERNED WITH IT? IT IS NONE OF YOUR BUSINESS. I WILL SLEEP WHEREVER I PLEASE, BE IT THE GROUND OR THE LOFT.` LISTENING TO RAU`S DIALOGUE EVERYONE AGAIN STARTED LAUGHING HEARTILY.
‘‘म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका.’’ राऊ खोतानं साफ झिडकारलं तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला, ‘‘हसून दावू नका. खरं सांगतो. मी घेतल्याली न्हाई.’’ रामभाऊ हसून म्हणाले – ‘‘गड्या, तुझ डोळं सांगत्यात की रं!’’ ‘‘अण्णा, डोळं काय सांगत्यात? गपा, उगच गप्प् बसा.’’ ‘‘उतरंस्तवर गप् बसावं म्हणतोस व्हय राऊ?’’ ‘‘अहो, काय चढलीया काय मला?’’ ‘‘अजून चढली न्हाई म्हणतोस?’’ ‘‘अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नगा. शिवल्याला न्हाई म्या त्याला!’’ एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, ‘‘शिवल्यालं न्हाई, तर मग दडून का बसला होतास?’’ ‘‘शेबास! मी काय दडून बसलो होतो काय?’’ ‘‘दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास?’’ ‘‘माळ्यावर काय करतोय! गडद झोपलो होतो?’’ ‘‘मग खाली जागा नव्हती काय?’’ ‘‘ते तुम्हाला काय करायचं? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू!’’ राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली.
DHIND
No Records Found
No Records Found
Keywords
#GARVEL#JALE#UMALA#TAKICHEGHAV#KARVAN#AAG#AANN#EKJORDARKARYAKARTA#DHANYADHANYAHANARDEHO#RANDAVPUNAV#MIFEDALELEEKKARJ#GHAT#STORYANIBANITALI#NEMANEMI#DAV#MITING#KHADDA#KADHANI#
Customer Reviews
  • Rating StarRitika Mohan

    Atishay oghavatya shailit lihilel sundar pustak.....

  • Rating StarAbhijit Kalane

    शंकर पाटलांची एक एक कथा म्हणजे टॉनिक गोळी सारखी आहे.. रटाळ जीवनात तरतरी देवून जातात...!

  • Rating StarDAINIK AIKYA 08-07-2007

    ग्रामीण ढंगाच्या अस्सल कथा… ग्रामीण कथाकार म्हणून लोकप्रिय ठरलेल्या, गावरान बोलीचा ठसका प्रकट करणाऱ्या शंकर पाटील यांचे कथासंग्रह नव्या देखण्या स्वरुपात मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे मराठी रसिकांच्या भेटीला आले आहेत. शंकर पाटील यांची कोल्हापूरकडील गावरन बोलीभाषा, चटपटीत संभाषणांचा इरसाल बेरकीपणा, ग्रामीण जीवनातला पिढीजात शहाणपणा, परंपरेचा सामूहिक अंत:स्तर आणि कथानिवेदनातील उत्कंठावर्धक अनपेक्षित बाज यांनी मराठी ग्रामीण साहित्य आणि चित्रपटांना सत्तर-ऐंशीच्या दशकात एक वेगळीच ओळख मिळवून दिली. अस्सल मराठी मातीचा कणखरपणा आणि बेरकीपणा पाटील यांनी जसा पकडला, तसा तो इतर लेखकांना सहजी पकडता आला नाही. कथाकथनाच्या माध्यमातून अनुभवविश्वात स्थानापन्न केले आणि खेड्यांपासून मनोमन दूर गेलेल्या नगरजनांनाही आपली नाळ नेमकी कुठे जोडलेली आहे हे उत्कटपणे दाखवून दिले. पाटलांच्या कथा केवळ ग्रामीण जीवनदर्शन घडवत नाहीत, केवळ गावरान किस्से सांगून थांबत नाहीत, शहरी वाचकांचे दोन क्षण नर्मविनोदी हास्याने रंजन करावे एवढ्यापुरती ती कथा मर्यादित नाही असे डॉ. भालचंद्र फडके यांच्या सारख्या अभ्यासकाचे मत आहे. पाटील यांच्या एकूणच लेखनामागे सामाजिक जाणीव आहे. ज्या समाजव्यवस्थेत ग्रामीण मन वाढत आहे त्यात स्वातंत्र्य-समता-बंधुता अशा मूल्यांची चपखल रुजवण झालेली नाही याची त्यांना मनोमन खंत वाटते; जे परिवर्तन घडते आहे ते बेगडी आहे, पुस्तकी आहे, फसवे आहे, हे ग्रामीण भागात पदोपदी जाणवते. त्याबद्दल ते आतून धुमसत असतात. खेड्यातील आर्थिक स्थित्यंतराचे ग्रामीण समाजमनावर उमटणारे पडसाद- सरंजामशाही मनोवृत्तीला हादरा देण्याएवढे जोरदार नाहीत याचेही शल्य त्यांना जाणवत असावे. पाटील यांच्या आयुष्यातील पहिली पंधरा वीस वर्षे खेड्यात गेली. त्यामुळे त्या खेड्यापाड्यातील बारा बलुत्यातील शेकडो व्यक्ती आणि शेकडो घटना त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या त्या व्यक्तींना, त्या घटनांना अस्सल कोल्हापुरी बोलीत जिवंत करण्याची त्याची हातोटी विलोभनीयच! त्यामुळे आता खेडी बदलत असली तरी पाटलांच्या या कथांतील माणसे आणि घटना अजूनही आपल्याला साद घालू शकतात. ‘धिंड’ ही कथा पाटील यांच्या लेखनाची सगळी वैशिष्ट्ये प्रकट करणारी आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा त्यांच्या गाजलेल्या कथांमध्ये गणली जाते. जो कोणी मद्य प्राशन करील त्याची गावातून धिंड काढायची असा ठराव ग्रामपंचायतीत १५ ऑगस्टला मंजूर होतो आणि चार दिवसांनी तशी पहिलीच केस राऊ खोताची मिळते, तेव्हा सगळ्या गावात एकच धमाल उडते. भातमाऱ्याचा शिरपा धापा टाकत चावडीत येतो आणि राऊ खोत दारु पिऊन हाल्ट झालाय... घरातच बायकोसंग धुमडी घालतोय अशी बातमी देतो. पाटील आपले बूड हलवत पुढं झुकून नव्या हुरुपानं ह-ह-ह करीत समद्यांना आज्ञा देतात, ‘अरं बघा बघा, त्याला घेऊन या जाव!’ तराळाला ते सांगतात, ‘बघत काय ऱ्हायलाईस?’ खोताचा रा, दारू पिऊन हाल्ट झालाय... अगुदर दवंडी द्यायला भाईर पड. पाक सारं गाव गोळा व्हायला पाहिजे. सूट म्हणावं. राऊ खोताची गाढवावरनं धिंड काढायची हाय. लगोलग सगळे चावडीवर या. ऐका हो ऐका. चावडीवर लगेच ही गर्दी होते. पंचमंडळी येतात. राऊ खोत येताच पोरं शिट्ट्या मारू लागतात. गाढव उधळतं, सरपंच रामभाऊ विभुते खोताला विचारतात. ‘दारू प्यालास की न्हाई?’’ गुन्हा कबूल हाय का न्हाई? खोत नागाच्या फडीगत झुलल्यागत म्हणतो, ‘‘म्या दारुला शिवला न्हाई’... उगा इनकारणी माझ्यावर अदावत घेऊ नका. ‘मग माळ्यावर तिनीसांजचा काय करत होतास? गडद झोपलो होतो. दारू घेतली न्हवतीस तर घरात बायकूसंग वाद का घालत होतास? मग कुणासंग वाद घालायचा? तुमच्याबरोबर कबूल कर. वास घ्या की त्याच्या तोंडाचा. सबंध चावडीत वास दरवळत होता. वास याचाच की! त्यो तुमच्या नाकात बसलायगा. पाटील मग शेवटचा फ़ैसला सुनावतात. काय लागलाय त्याच्या नादाला?सबंध चावडी घानाय लागलीय. भपकारा याय लागलाय...ते काय सुद्दीत न्हाय... सरळ बोलेना. उचला आणि ठेवा गाढवावर याला. राऊ खोताला गाढवावर उलटं बसवतात. तोंड मागं, पाठ पुढं, खेटराची माळ घालतात. बचकभर गुलाल उधळतात. लेजीम, हलगी, एकच गदारोळ. मारू लागतो. डांग टिकटाक टिक डांग टिकटिक. त्याच्या त्या नादावर लोक नाचू लागतात. गल्लीबोळानं धिंड फिरते. रात्रीचे दोन वाजतात. राऊ तरीही गाडवावरनं उतरायला नकार देतो. अजून म्हारुडा ऱ्हायलाय, मांगुडा ऱ्हायलाय... संबंध गाव म्हंजे संबंध गाव पालथा घालय पायजे. अर्धी धिंड काढता का माझी? लोक दमून गेल्यात. तुला हौस असंल तर उद्या परत फिरु, रामभाऊ समजावू पाहतात. उद्याचं काय नका सांगू... ते कोण चाललेत परत? बोलवा त्यांना... राऊ कुणाल जाऊ देईना. मधनं गेलं तर त्याच्या सात पिढ्या भाईर काढीन अशी धमकी तो देतो. अखेर चांदणी उगवेपर्यंत ही धिंड चालू राहते. रात्रीच्या जागरणानं आणि दमणुकीनं लोक घरोघर निवांत घोरत पडतात. तिसऱ्या प्रहरी राऊ खोत चावडीवर येतो. सगळे सनदी गोळी लागून गडद झोपलेले. राऊ तराळला सांगतो, दवंडी द्याला भाईर पड... येळ घालवू नको. वाजापाची जोडणी करा. पाटील, सरपंच, पंच सारा लवाजमा गोळा करा. नव्या धिंडीची तयारी चालू होते. गावात पिणाऱ्याचा काय तोटा? ग्राम पंचायतीने ठराव केला म्हणून काय झाले? ठरावाने पिणारे थांबतात थोडेच? पकडले जायची भीती... पण तीही किती दिवस वाटणार? ग्रामीण भागातील ही वास्तवता... नाट्यपूर्ण शैलीत धिंड द्वारे समोर येते. समाजातले वेगवेगळे घटक, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांची विशिष्ट कामे वा व्यवसाय... या सर्वांचा कोलाज त्यातून उभा राहतो. शंकर पाटील यांची कुठलीही कथा घ्या. संभाषणातून ती फुलत जाते, खुलत जाते. उलगडत जाते. तिच्यातला विनोद नकळत होत असतो. बोलणाऱ्यातला आपण विनोदी काही बोलतोय याची कल्पनाही बहुतांशी नसते. तमाशा या कथेत देसायांचे तीन गडी खळ्याजवळ रात्री राखणीला बसलेले असतात. जवळच जत्रेत तमाशा चालू असतो. त्या तमाशाला जाण्याची तिघांनाही अनावर इच्छा असते. आता तमाशाला जायचे तरी कसे? ते वेगवेगळे पर्याय विचारात घेतात. एका वेळी दोघांनी जायचे– एकाने राखण करायची. पण मग तू बघायला जाणार- आम्ही काय मांजर मारलंय व्हय? मी काय घोडं मारलंय व्हयं? म्हणजे एक आंबा आणि खाणार तिघं. त्यो कापायचा न्हाई, सोलायचा न्हाई, पिळायचा न्हाई, अन वर तूबी खा आणि आम्हालाही दे, असंच बोलणं आहे तुमचं. आंबा एक त्याला अडवणूक अशी! मग आपण सगळेच गेलो तर? ... आणि चोर आले तर? तीन गडी खळ्याभोवतीनं पडलेत असा सगळा सीन करायचा- लवकरच माघारी यायचं. विरुबाच्या नावानं चांगभलं करू अन् फेडा धोतरं... बांधा एकमेकाला. तेवढ्यात मालक येताना दिसतो आणि सगळ्यांना घाम फुटतो. अशा वेगवेगळ्या घटनांची मालिका उभी करतानाही शंकर पाटील शक्य तेवढे पर्याय पेश करतात. कथेची लांबण त्यामुळे कधीकधी वाढत जाते. परंतु कुठलाही पर्याय डावलला गेला असे वाटू नये यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे आज या कथा वाचताना ग्रामीण मानसिकतेबरोबर कथाकार म्हणून तपशीलातील बारकाव्यांवर भरपूर मेहनत घेणारे शंकर पाटील यांचे निवेदन कौशल्यही आपल्याला खिळवून ठेवते. ...Read more

  • Rating StarKOLHAPUR SAHITYA PARAMPARA 15-9-2009

    ‘कथा सांगती जनक कथांचे’ कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या भागात शंकर पाटील यांचा धावता उल्लेख झाला. पण साहित्यक्षेत्रातील त्यांची कारकीर्द अशी धावत्या उल्लेखापुरती नाही. शंकर बाबाजी पाटील यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२६ ला पट्टणकोडोलीत झाला. ‘धिंड’, ‘नाटक’, ‘िटिंग’, ‘तक्रार’ यांसारख्या त्यांच्या कथा कथनाच्या शैलीमुळे खूप लोकप्रिय झाल्या हे खरे असले तरी प्रारंभीच्या काळात शंकर पाटील यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर साहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केले. १९५९ साली एशिया फाउंडेशनकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीतून शंकर पाटलांनी ग्रामीण जीवनाचा सखोल अभ्यास करत ‘टारफुला’ नावाची एक कादंबरी लिहिली. १९६० ते ७० हा शंकर पाटील यांच्या बहराचा काळ. याच सुमारास त्यांनी आठवी ते दहावी इयत्तांसाठी ग.प्र.प्रधान यांच्यासमवेत ‘साहित्य सरिता’ या वाचनमालेचे संपादन केले. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर मराठी विषयाचे विशेष अधिकारी म्हणूनही श्री. पाटील यांनी काम केले. ‘वळीव’ हा त्यांचा प्रकाशित झालेला पहिला कथासंग्रह होता. त्यानंतर ‘भेटीगाठी’, ‘धिंड’, ‘वावरी शेंग’, ‘खुळ्याची चावडी’, ‘फक्कड गोष्टी’, ‘खेळखंडोबा’, ‘आभाळ’, असे अनेक कथासंग्रह देणाऱ्या शंकर पाटील यांनी ‘गल्ली ते दिल्ली’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’, यासारखी वगनाट्येही लिहिली. ‘पिंजरा’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘पाहुणी’, ‘लक्ष्मी’, ‘भुजंग’, या गाजलेल्या मराठी चित्रपटासंसाठीही त्यांनी लेखन केले होते. या ग्रामीण कथाकाराला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविण्याची संधी मिळाली. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more