* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DHIRUBHAISM
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177669824
  • Edition : 8
  • Publishing Year : AUGUST 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 90
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SO MUCH IS WRITTEN ABOUT THIS WORLD FAMOUS INDIAN BUSINESS TYCOON! HE STARTED FROM SCRAP IN A VERY SMALL VILLAGE IN GUJARAT AND CREATED THE VAST EMPIRE OF `RELIANCE`. THERE ARE NO SUITABLE WORDS TO DESCRIBE HIS ACHIEVEMENT. HE WAS NOT VERY QUALIFIED IN TERMS OF FORMAL EDUCATION; BUT STILL HE HIMSELF WAS A FULL ENCYCLOPEDIA, A UNIVERSITY. HE HAD DEVELOPED HIS OWN PHILOSOPHY AND CULTURE FOR WORKING. HE HAD EMBRACED A FEW PRINCIPLES IN HIS LIFE AND HE STOOD BY THEM THROUGHOUT HIS LIFE; THEY WERE HIGH AIM, A WILL TO WORK TIRELESSLY AND THE POWER OF COMMITMENT. ALMOST EVERYBODY CONSIDERED HIS DREAMS TO BE IMPOSSIBLE TO ACHIEVE. BUT HE CONTINUED HIS JOURNEY; HE NEVER SET APART THE PRINCIPLES EVEN FOR A SINGLE MINUTE. TODAY, WE ALL ARE WELL AWARE OF THE MAGNIFICENT SUCCESS HE ACHIEVED. HIS PRINCIPLES SIMPLE YET VERY SUCCESSFUL ARE WORTHY OF GUIDING COMMON PEOPLE ON THE WAY TOWARDS ACHIEVEMENT. THE AUTHOR OF THIS BOOK A.G. KRISHNAMURTI; IS THE FOUNDER-CHAIRMAN OF THE ADVERTISING COMPANY; MUDRA COMMUNICATION. HE ESTABLISHED THIS COMPANY WITH A SMALL DEPOSIT OF RS. 35 THOUSAND AND ONE ESTEEMED CUSTOMER. TODAY; HIS COMPANY IS ONE OF THE THREE TOPMOST ADVERTISING COMPANIES IN INDIA. HE IS ALSO THE CONSULTING CHAIRMAN OF A.G.K. BRAND. HE DIVIDES HIS TIME BETWEEN AHMADABAD AND HYDERABAD. HE HAS THREE DAUGHTERS AND ONE SON.
गुजरातमधील छोट्या खेड्यापासून ते ‘रिलायन्स’च्या साम्राज्यापर्यंतचा अतिभव्य विस्तार हा विलक्षण टप्पा सर करणा-या धीरुभाई अम्बानींच्या कार्यकर्तृत्वाची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. फारसं औपचारिक शिक्षण नसलेले धीरुभाई स्वत:च एक चालतंबोलतं विद्यापीठ होते. त्यांनी स्वत:चं असं एक कार्यविषयक तत्त्वज्ञान व संस्कृती जोपासली होती. भव्य स्वप्नं, खडतर परिश्रमांची तयारी, निश्चयाचं बळ यांच्या जोडीला त्यांनी काही साधी-सोपी तत्त्वं अनुसरली होती. अशक्य कोटीतल्या वाटणा-या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी याच तत्त्वांच्या साथीनं मार्गक्रमण केलं आणि त्यात नेत्रदीपक यशही मिळवलं. त्यांची हीच तत्त्वं सर्वसामान्यांच्या जीवनातही आशा जागवतील व मार्गदर्शक ठरतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
UNIQUEINSIGHTSOFDHIRUBHAIAMBANI #MUKESHAMBANI #ENTERPRENUERSHIP # TRANSLATED FROM ENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #A.G.KRISHNAMURTHY. #ए.जी.कृष्णमूर्ती
Customer Reviews
  • Rating StarGOADOOT 9-8-2009

    गुजरातमधील छोट्या खेड्यापासून ‘रिलायन्स’च्या साम्राज्यापर्यंतचा विलक्षण टप्पा सर करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांच्या कर्तृत्वाची ओळख साऱ्या जगाला आहे. त्यांचं कार्यविषयक तत्त्वज्ञान नेमकं कसं होतं, हे मेहता प्रकाशनच्या ‘धीरूभाईझम’ या पुस्तकातून प्रतित हों. त्याविषयी... एखादी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाची शिखरं पादाक्रांत करते त्यावेळी तिची वाटचाल इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. तिच्या वाटचालीचा धांडोळा घेताना अनेकांना यशाचा मूलमंत्र सापडतो. आजवर अशा अनेक दिग्गजांच्या यशोगाथा शब्दबद्ध झाल्या आहेत. ‘धीरूभाईझम’ हे मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित करण्यात आलेलं असंच एक पुस्तक. ए. जी. कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ‘धीरुभाईझम’ हे शीर्षकच फार बोलकं आहे. आजपर्यंत आपण अनेक ‘इजम’ ऐकले, वाचले आहेत, पण हा ‘धीरुभाईझम’ जगावेगळा म्हणावा लागेल. आज रिलायन्स उद्योगाचा दबदबा केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगामध्ये आहे. या उद्योगाच्या उभारणीमागील धीरूभाई अंबानी यांचे अथक कष्ट, जिद्द सर्वश्रुत आहेत. फारसं औपचारिक शिक्षण न लाभलेले धीरूभाई स्वतःच एक चालतं बोलकं विद्यापीठ होते, असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख साऱ्या जगाला आहेच. पण त्यांचं कार्यविषयक तत्त्वज्ञान नेमकं काय होतं, याचा परिचय ए. जी. कृष्णमूर्ती यांनी ‘धीरुभाईझम’द्वारे करून दिला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करताना मूळ शीर्षक कायम ठेवण्यात आलं आहे. धीरुभार्इंनी ज्या उमेदीने व्यवसाय केला, अनेक संकटांवर मात केली आणि ‘आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक या पुस्तकाद्वारे मिळते. पुस्तकाला ज्येष्ठ उद्योगपती आणि धीरुभार्इंचे सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरुभाई ‘आशा हे तुमचं सर्वांत शक्तिमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास ही सर्वांत मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरुभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहेत. ‘गुरू’ या चित्रपटातून धीरुभार्इंना समांतर असे एक व्यक्तिमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रूपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशिलवार घेतलेला मागोवा ‘धीरुभाईझम’ मध्ये घेण्यात आला आहे. या पुस्तकाचे ए. जी. कृष्णमूर्ती हे मुद्रा कम्युनिकेशन्स या जाहिरात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. अंबानी परिवाराशी त्यांचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे ‘धीरुभाईझम’ नेमका काय होता, याची त्यांना चांगली कल्पना आहे. एकूण १५ प्रकरणांमधून हा ‘धीरुभाईझम’ उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रत्येक प्रकरण सुटसुटीत, नेमक्या शब्दांमध्ये मांडण्यात आलं असून त्याची शीर्षकही लक्षवेधी आहेत. या प्रत्येक शीर्षकातून धीरुभार्इंचं कार्यविषयक तत्त्वज्ञान प्रतित होतं. ‘बाह्या सरसावून मदतीला पुढं व्हा’, ‘तुमच्या टीमसाठी सुरक्षाकवच बना’, ‘गाजावाजा न करता कल्याणकारी कार्य करा, भव्य स्वप्न बघा, पण डोळे उघडे ठेवून बघा’, अशी शीर्षकं फार बोलकी आहेत. भव्य-दिव्य गोष्टी साध्य करण्यासाठी धीरुभाईप्रमाणे फक्त साध्या, सोप्या तत्त्वज्ञानावर निष्ठा ठेवणं पुरेसं आहे, असं लेखकाने म्हटलं आहे आणि ते खरंही आहे. धीरुभार्इंची जीवनकहाणी हे सकारात्मक वृत्तीच्या सामथ्र्यांचं मूर्तीमंत उदाहरण असून आजचं ‘रिलायन्स’ त्याची साक्ष देत आहे. आवर्जून वाचावी अशी ही कहाणी. ...Read more

  • Rating StarNAVPRABHA 20-7-2009

    धीरूभाईझम आणि प्रतिकूलतेवर मात या ए. जी कृष्णमूर्ती लिखित दोन पुस्तकांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकांमधून धीरूभाई अंबानी यांचे कार्यविषयक असामान्य तत्त्वज्ञान आणि प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या शौर्याची, अथक प्रयत्नांची विलक्षण कहाी रेखाटण्यात आली आहे. वस्तुत: धीरूभाई अंबानी हेच एक विद्यापीठ आहे. ज्या उमेदीने त्यांनी व्यवसाय केला, अनेक संकटावर मात केली आणि ‘आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक धीरूभार्इंवरील दोन पुस्तकांमुळे मिळते. दोन्ही पुस्तकांना ज्येष्ठ उद्योगपती आणि सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरूभाई ‘आशा हे तुमचं सर्वात शक्तीमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास हे सर्वात मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरूभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहे. ‘गुरू’ या चित्रपटातून धीरूभार्इंना समांतर असे एक व्यक्तिमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रूपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशिलवार घेतलेला मागोवा दोन पुस्तकांमधून पहायला मिळतो. ‘प्रतिवूâलतेवर मात’ या पुस्तकातील प्रतिकूलता असूनही, किशोरवयीन स्वातंत्र्यसेनानी, संपूर्ण विश्वास-एक जीवनमार्ग, आव्हानं, अशक्य? - ते काय असतं? विशालहृदयी नेता आदी टप्प्यांमधून धीरूभार्इंचे नेमकं व्यक्तिमत्त्व उलगडतं. धीरूभार्इंनी म्हटलं होतं, ‘आपण स्वप्न बघण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तेसुद्धा भव्य स्वप्न बघण्याचं,’ हे स्वप्न त्यांचे दोन्ही सुपुत्र आज अंमलात आणत आहेत. या संपूर्ण परिवाराने अशा ठराविक गृहितकांवर अढळ श्रद्धा ठेवत मिळवलेलं यश आवर्जून तपासून पाहण्याजोगं आहे. दोन्ही पुस्तके सुमारे ७० पानांची असून त्यांची किंमत अनुक्रमे ८० आणि ७० रुपये अशी आहे. ...Read more

  • Rating StarJYOTI GRANTH WARTA 15-8-2009

    धीरूभाई अंबानींनी स्वप्नपूर्तीच्या मार्गात आलेल्या अनंत अडथळ्यांवर मात करत ‘रिलायन्स’चं भव्य साम्राज्य उभारलं. धीरूभाई व रिलायन्सचं यश इतकं अपूर्व आहे की, बऱ्याच जणांना त्यांच्या संपत्तीच्या झगमगाटापलीकडचं पाहताच येत नाही. पण त्याचं यश असं सहजी लाभलें नव्हतं. ते कष्टसाध्य होतं. या कहाणीतून वाचकांना केवळ स्वप्नं पाहण्याची स्फूर्तीच नव्हे, तर त्यावर पकड मिळवण्याचं धाडसही लाभेल. ...Read more

  • Rating StarPUNYANAGARI 5-2-2009

    आयुष्यात आपण बरेचदा कोड्यात पडतो. स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल का ? प्रतिकूल परिस्थितीत तग धरता आला का ? स्वत:ला सिद्ध करण्यात कमी पडलो का असे प्रश्न आपल्याला अनेकदा पडतात. त्यामुळे वेळ येते ती आत्मपरिक्षणाची. ते करताना आजूबाजूला विविध मातब्बरांची मातबबरी पहायला मिळते. ही माणसं मोठी कशी झाली आणि त्यांनी पाहता पाहता आकाशाल गवसणी कशी घातली हे तपासून पाहताना आश्चर्य वाटतं. म्हणूनच अशा विलक्षण उमेद लाभलेल्या व्यक्तिमत्वांची जीवनगाथा पडताळून पाहण्याची संधी मिळाली की गमवावीशी वाटत नाही. ’मेहता प्रकाशन तर्फे अलीकडेच अशी चार पुस्तके बाजारात आणण्यात आली आहेत. धीरुभाईझम, प्रतिकूलतेवर मात, नवभारताचे शिल्पकार आणि इट हॅपन्ड इन इंडिया या चार पुस्तकांनी प्रत्येक सामान्य माणसाची जिगर जागवल्यास नवल नाही. ’धीरुभाईझम’ आणि ’प्रतिकूलतेवर मात’ या ए.जी. कृष्णमूर्ती लिखित दोन पुस्तकांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकातून धीरुभाई अंबानी यांचे कार्यविषयक असामान्य तत्वज्ञान आणि प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या शौर्याची, अथक प्रयत्नांची विलक्षण कहाणी रेखाटण्यात आली आहे. वस्तुत: धीरुभाई अंबानी हेच एक विद्यापीठ आहे. ज्या उमेदीने त्यांनी व्यवसाय केला, अनेक संकटांवर मात केली आणि ’आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक धीरूभार्इंवरील दोन पुस्तकांमुळे मिळते. दोन्ही पुस्तकांना ज्येष्ठ उद्योगपती आणि सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरुभाई ‘आशा हे तुमचं सर्वात शक्तीमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास हे सर्वात मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरुभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहे. ’गुरु’ या चित्रपटातून धीरुभार्इंना समांतर असे एक व्यक्तीमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रुपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशीलवार घेतलेला मागोवा दोन पुस्तकांमधून पहायला मिळतो. ’प्रतिकूलतेवर मात’ या पुस्तकातील प्रतिकूलता असूनही, किशोरवयीन स्वातंत्र्यसेनानी, संपूर्ण विश्वास - एक जीवनमार्ग, आव्हानं, अशक्य ? - ते काय असतं?, विशालह्रदयी नेता आदी टप्प्यांमधून धीरुभार्इंचं नेमकं व्यक्तीमत्व उलगडतं. धीरुभार्इंनी म्हटलं होतं, आपण स्वप्न बघण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तेसुद्धा भव्य स्वप्न बघण्याचं.’ हे स्वप्न त्यांचे दोन्ही सुपुत्र आज अंमलात आणत आहेत. या संपूर्ण परिवाराने अशा ठरावीक गृहितकांवर अढळ श्रद्धा ठेवत मिळवलेलं यश आवर्जून तपासून पाहण्याजोगं आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more