* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DIARY OF ANNE FRANK
  • Availability : Available
  • Translators : MANGALA NIGUDKAR
  • ISBN : 9788177661422
  • Edition : 9
  • Publishing Year : MARCH 1988
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS DIARY BY ANNE FRANK IS ONE OF THE MOST VALUABLE LITERATURES IN THE WORLD. YOU WILL NOT COME ACROSS A SINGLE HUMAN BEING WHO HAS NOT SHED TEARS WHILE READING IT. ANNE FRANK WAS A VICTIM OF THE TORTURE CAMPS FOR THE EVACUATION OF THE JEWS DURING THE SECOND WORLD WAR. SHE SUCCEEDED IN RUNNING AWAY FROM THE NAZIS ALONG WITH HER MOTHER, SISTER AND OTHER FOUR PEOPLE. THEY REMAINED IN HIDING NEARLY FOR TWO YEARS. BUT SOMEHOW, THE NAZIS FOUND THEM AND SENT THEM TO THE TORTURE CAMPS. ONLY HER FATHER WAS NOT CAPTIVATED. AFTER ANNE`S DEATH, HER DIARY CAME INTO THE POSSESSION OF HER FATHER. HE PUBLISHED IT IN THE YEAR 1947, IMMEDIATELY IT WAS WELCOMED ON ALL LEVELS BECAUSE OF ITS UNIQUENESS AND ANNE`S PECULIAR WRITING STYLE. SHE HAS REVEALED THE HIDEOUSNESS OF THE TORTURE CAMPS IN HER DIARY, AT THE SAME TIME; SHE HAS VERY FREELY AND INNOCENTLY DESCRIBED THE FEELINGS IN HER MIND DURING HER GROWING YEARS. SHE HAS WRITTEN THAT SHE WANTS TO BE ALIVE EVEN AFTER HER DEATH, AND SHE WAS VERY MUCH THANKFUL TO GOD FOR THE WONDERFUL GIFT OF LIFE AND THE ABILITY TO WRITE A DIARY CAPTURING HER FEELINGS PERFECTLY WELL. DURING LAST 40 YEARS, MILLIONS OF COPIES OF THIS BOOK HAVE BEEN SOLD WORLDWIDE.
‘‘द डायरी ऑफ अ‍ॅन प्रँÂक’’ हे जागतिक साहित्य-विश्वातील एक अमोल लेणे आहे. एका तेरा वर्षीय मुलीची ही अनुभव-गाथा वाचताना; डोळ्यांत टिपूसही येणार नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. दुस-या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा जो छळ झाला, त्यातील अघोरी अनुभव वाट्याला आलेली ही बालिका. आईवडील, बहिण आणि अन्य चार व्यक्ती नात्झी भस्मासुरापासून दूर पळत, एका इमारतीत लपून-छपून जीवन कंठू लागतात. पण दोन वर्षांतच त्यांना हुडवूÂन काढण्यात येते आणि जर्मन छळछावणीत सर्वांची रवानगी होते. कसेबसे वडील मात्र वाचतात. अ‍ॅनच्या मृत्युनंतर तिची डायरी वडिलांच्या हाती आली आणि १९४७ साली ती जेव्हा प्रसिद्ध झाली; तेव्हा तिचे वाङ्मयीन आगळेपण वाचकांच्या तात्काळ ध्यानात आले. महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल झाले होते, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा अमानुष छळ करण्यासाठी मनुष्य कसा प्रवृत्त होतो, याचे प्रत्ययकारी चित्रण तर या डायरीत आहेच; पण एका उमलत्या कळीच्या भावभावनांना तिने आपल्या लेखनात यथेच्छ, कोणताही आडपडदा न ठेवता, वाट मोकळी करून दिली आहे. ‘‘मला मृत्युनंतरही जगायचे आहे, आणि म्हणून देवाने दिलेल्या या देणगीबद्दल मी अत्यंत ऋणी आहे’’ असे तिने लिहिले. ही देवाची देणगी; म्हणजे तिच्यात वसणा-या सर्व भावभावनांना शब्दांत पकडण्याचे सामथ्र्य. गेल्या ४० वर्षांत या पुस्तकाच्या लाखो प्रति खपल्या!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHY & TRUE STORIES #DIARY OF ANNE FRANK #MANGALANIGUDKAR #ANNEFRANK
Customer Reviews
  • Rating StarAniket Save

    "डायरी ऑफ ॲन फ्रँक" ही साहित्य जगताला दिलेली अनमोल देणगी आहे.एक तेरा वर्षे वयाची मुलगी निरागसपणे तिच भावविश्व आपल्या समोर मांडते. दुसऱ्या महायुद्धात नाझी भस्मासुराचा उदय होऊन त्याने `ज्यु` लोकांवर अनन्वित अत्याचार केले. त्या छळापासुन वाचण्यासाी फ्रँक व व्हॅन डॅन कुटुंबिय तसेच डसेल् असे ८ जण एका गुप्तनिवासाचा आसरा घेतात. अॅन लिहिते १२ जुन १९४२ ते ४ ऑगष्ट १९४४ पर्यंत घाबरून, रेडिओ हे एकमेव साधन बाहेरच्या गोष्टी समजण्याच, एकाच घरात कोंडुन, डोक्यावर सतत पकडले जाण्याची टांगती तलवार आणि प्रचंड ताण कसे जगले असतील ते ८-१० दिवस नव्हे तर तब्बल २६ महिने. यात अॅन फ्रँक आपल्या आयुष्यातील प्रत्येक हळुवार घटना बिनदिक्कपणे मांडते. मग त्यात आईविषयी असलेला राग असो किंवा समंजस वडील आणि उमलत्या कोवळ्या वयात प्रेमाची आस, पीटरला घेतलेले पहिले चुंबन अन् त्याच्याशी एकत्र बसुन व्यतीत केलेले क्षण, भविष्याविषयी केलेला विचार. ह्यात अॅन ह्या काळात तिच्या जोडीच्या मुलींपेक्षा प्रगल्भ आणि प्रौढ होते. परिस्थिती माणसाला जबाबदार बनवते. अखेर काय होते अॅन तिचे कुटुंबिय अन् सोबतच्या माणसांच यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं......... ...Read more

  • Rating StarAlka Ghadigaonkar

    आज वाचून झाले. एवढ्या लहान वयात १३ व्या वर्षी ती लिहिती झाली ते १५ वर्षे होईपर्यंत तिने रोजनिशी लिहिली. १६ वयाची होण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला. तिचे लेखन छान आहे. ती जर जास्त जगली असती तर तिचे अजुन छान छान पुस्तके तिने लिहिली असती नक्कीच ! मला हे पुसतक आवडले. ...Read more

  • Rating StarTrupti Kulkarni

    अॅन फ्रँक लिखित, मंगला निगुडकर अनुवादित “डायरी ऑफ अॅन फ्रँक”, या मेहता पब्लिशिंग हाऊस (पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातल्या ‘अॅन’ या मुख्य पात्राला ‘उमा जोशी’ यांनी लिहिलेलं पत्र. || श्री || प्रिय, तारीख : कायमची ॲ, मी हे पुस्तक तू जेव्हा ही रोजनिशी लिहिलीस त्या वयाची असतानाच वाचले आणि अजूनही ते मला तितकीच मनापासून साथ देत आहे. किटी... ही जशी तुझी पत्रसखी तशीच तू माझी ! तुझी ही रोजनिशी म्हणजे हिटलरच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे किती लोकांना प्रचंड मानसिक स्थित्यंतरातून... जावे लागले त्याचे उत्तम उदाहरण. अतिशय अपमानास्पद जगणे ज्यू लोकांच्या वाट्याला आलेले असताना देखील तुम्ही इतके सकारात्मक आणि आशादायी पद्धतीने राहिलात त्याला तोड नाही. मृत्यूचे प्रचंड सावट असताना अज्ञातवासात २ वर्षे काढताना कमीतकमी निराशावादी रोजनिशी लिहणे सोपे नाही ग...! प्रेमळ आईवडील, बहीण, मित्रमैत्रिणी, उबदार घर असुनसुद्धा तू रोजनिशी... किटी... या मैत्रिणीची निवड केलीस, यातुन तू... तुझ्याशीच सगळ्यात खरी आहेस ते कळते. तुझ्या रोजनिशीची वाटचाल आश्वस्त, बंधमुक्त घरातून... बंधनातील अज्ञातवासात असलेल्या घराकडे जाते, अन् हा प्रवास थक्क करणारा आहे. तुमची अज्ञातवासात जायची तारीख होती १६ जुलै १९४२... पण जावे लागले ९ जुलैलाच!!! त्या वेळेला तुमच्या मनाची काय अवस्था झाली असेल ती कल्पनाही करवत नाही. अज्ञातवासात असलेले तेही घर तुम्ही सजवयाचा प्रयत्न केलात. तुझे आई वडील मार्गोट, ड्सेल, पीटर आणि त्याचे आई वडील यांचे इतके उत्तम वर्णन आहे की ते घर, जीना, वरची खिडकी सगळे डोळ्यासमोर येते... चित्रमय रोजनिशी. कितीही भिती वाटली तरी तुझा निर्भिडपणा, उपजत विनोदबुद्धी व रसरसशीतपणा तू अजिबात सोडला नाहीस. पहिल्यांदा तुमच्याकडे खाण्याची चैन होती. पण नंतर ती चैन अजिबात राहिली नाही. अगदी आन्हिकं उरकतानासुध्दा तुम्हाला ज्या अनावस्थेतून जावे लागले, ते वाचताना अंगावर काटा येतो. तुला कितीतरी विषयांत गती होती, आवड होती आणि एकाच वेळी तू ते हाताळू शकत होतीस. इतक्या विपरीत परिस्थितीत तुझा मेंदू इतका लिलया कसा काम करू शकतो? हा प्रश्न सुटतच नाही. पौगंडावस्थेतील त्या काळातल्या मुलीची मानसिक ससेहोलपट अगदी या काळातसुध्दा मनाला भावते, पटते. शेवटचं तुझं पत्र "विसंगती चे बोचके" म्हणजे मानवी मनाचा कवडसा आहे. प्रत्येकजण स्वत:शी आणि इतरांशी वेगळा असतो, पण ते कबूल करण्याचे धारिष्ट्य तुझ्यात आहे. खरंतर तु कोमल, हळवी, निसर्ग सौंदर्याची आवड असलेली मुलगी... पण लोकं आपल्याला हसतील म्हणून तू तुझ्यातल्या हट्टी, खोडकर, आनंदी मुलीला सतत बाहेर येऊ दिलेस; दोन्हीही रूपे लोभसवाणीच! तुला एकच सांगते, तुझ्या लेखनाद्वारे तुला अमर व्हायचं होतं, ते तू झालीस, जगातील ३०/३५ भाषांमध्ये तुझ्या रोजनीशीचा अनुवाद झाला आहे. तुझी ही इच्छा पूर्ण झालीच आहे, पण ते तुझ्यापर्यंत पोहोचेल का गं ? तुझी, पत्रसखी ...Read more

  • Rating StarSarita Chavan

    माझ्या अत्यंत आवडत्या अशा या फेसबुक ग्रुप वरील माझी ही पहिली पोस्ट... या ग्रुपमुळे अनेक अज्ञात तितक्याच विलक्षण पुस्तकांची ओळख झाली आणि घरातील बुकशेल्फ मध्ये त्यांची भर पडत गेली... मनस्वी आभार वाचन संस्कृती जपणाऱ्या ग्रुपवरील सर्व वाचन प्रेमींच.... प्रियअँन फ्रॅंक... तसंतर काही वर्षांपूर्वीच ओळख झाली होती तुझी.. घट्ट रुतून बसली होतीस तू काळजाच्या कोपऱ्यात.. पण या कोरोनाग्रस्त दिवसांत तू अधिकच जवळची होऊन गेलीस.. आम्ही आमच्याच घरात काही जुजबी अडचणी वगळता सुखात लॉकडाऊन आहोत ते ही काहीच दिवसांकरिता.. पण तब्बल दोन वर्षे एका बंदिस्त तळघरात राहून क्षणोक्षणी मृत्यूचे सावट पुऱ्या जगण्यावर आच्छादुन राहिलेले असतानाही आयुष्याकडे पाहण्याचा तुझा रसरशीत आशावाद.. त्या बंदिवासातही जगण्याची तुझी अल्लड, निरागस लोकविलक्षण असोशी.. आणि तुझ्या किशोरवयाला न शोभणारं पण प्रौढानाही लाजवेल असं तुझं जगण्याचं ठाम तत्त्वज्ञान... इतक्या लहान वयात स्वतःला इतकं स्वच्छ ओळखणाऱ्या व्यक्ती विरळाच असतात... वाटत राहतं की तू इच्छिलेलं ते सुंदर, मोकळं, स्वतंत्र-स्वच्छंदी आयुष्य तुला लाभायला हवं होतं... अत्यंत हुशार, तरल, संवेदनशील असणारी तू त्याची हकदार होतीस... पण तुझ्या आयुष्याचा कोवळ्या वयातील शेवट मन विदीर्ण करून जातो...आपसूकच आसवांनी श्रद्धांजली वाहिली जाते तुझ्या प्रति... आणि त्याचवेळी.. सत्तेची राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगून त्यापायी निष्पाप जीवांची नृशंस हत्या करणाऱ्या जगातील तमाम हुकूमशहांविरुद्ध चीड धुमसत राहते मनात.... ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more