* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DIGITAL FORTRESS
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184981865
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 472
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHEN THE NATIONAL SECURITY AGENCY S INVINCIBLE CODE-BREAKING MACHINE ENCOUNTERS A MYSTERIOUS CODE IT CANNOT BREAK, THE AGENCY CALLS IN ITS HEAD CRYPTOGRAPHER, SUSAN FLETCHER, A BRILLIANT, BEAUTIFUL MATHEMATICIAN. WHAT SHE UNCOVERS SENDS SHOCK WAVES THROUGH THE CORRIDORS OF POWER. THE NSA IS BEING HELD HOSTAGE NOT BY GUNS OR BOMBS, BUT BY A CODE SO COMPLEX THAT IF RELEASED WOULD CRIPPLE U.S. INTELLIGENCE.NNCAUGHT IN AN ACCELERATING TEMPEST OF SECRECY AND LIES, FLETCHER BATTLES TO SAVE THE AGENCY SHE BELIEVES IN. BETRAYED ON ALL SIDES, SHE FINDS HERSELF FIGHTING NOT ONLY FOR HER COUNTRY BUT FOR HER LIFE, AND IN THE END, FOR THE LIFE OF THE MAN SHE LOVES
एन.एस.ए. या संस्थेने एका महासंगणकाच्या साहाय्याने कोणत्याही गुप्त मजकुराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकुराचा भेद मात्र त्यांच्या महासंगणकाला करता येईना. पाच मिनिटात होणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदर गणितज्ञ स्त्री होती. तिला त्या वेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. एन.एस.ए. संस्थेला ओलीस धरले गेले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे, तर फक्त एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका राष्ट्र पांगळे होण्याची वेळ जवळ येत चालली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत पळापळ करावी लागली. तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. शेवटी काय झाले? ते या खिळवून ठेवणा-या, श्री. अशोक पाध्ये यांनी आपल्या खास शैलीत अनुवाद केलेल्या कादंबरीत वाचा.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES # DIGITAL FORTRESS #THE LOST SYMBOL #ASHOK PADHYE #द लॉस्टसिम्बॉल #डॅनब्राउन #
Customer Reviews
  • Rating StarPranav Survase

    NSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more

  • Rating StarSURESH PHADNIS

    Dan brown यांची अशोक पाध्ये यांनी अनुवादित केलेली आणि मेहता प्रकाशन यांनी २०११ मध्ये प्रकाशित केलेली ही कादंबरी नुकतीच वाचली .छान आहे . कॉम्प्युटर मध्ये व्हायरस घुसवला तर काय अनर्थ होईल आणि सगळी गुपित कशी बाहेर पडतील या भीतीने केलेली धावपळ खूपच छान रगवली आहे.९ भाषेत ही कादंबरी अनुवादित केली आहे.वाचताना मजा येते.जीव धडधडते.पाठलाग ,यंत्रणेचे वर्णन सुरेख आहे .शेवटही छान आहे नक्की वाचा . ...Read more

  • Rating StarPrasad Shelake

    शेवटचं पासवर्ड प्रकरण मला बिलकुल पटलेलं नाही....

  • Rating StarBhagyashree Chalke

    Very good book. All Dan Brown books are good....

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more