* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS COUNTRY IS WEIRD. IT IS A HUGE AND COLOURFUL COBWEB. THERE ARE JOBS HERE, MACHINES HERE, MECHANISMS HERE, HAPPINESS, TREASURES, DOLLARS, YOU WILL FIND EVERYTHING HERE. OUR PEOPLE FALL PREY TO THE LUXURY. BUT ONCE THEY REACH HERE, THEY ARE UNABLE TO TURN BACK. OUR COUNTRY ALSO HAS NOTHING TO CALL THEM BACK. OUR COUNTRY HAS THOUSANDS OF WINDOWS TO GO OUT, BUT NOT SINGLE DOOR TO CALL THEM BACK THROUGH, TO TAKE THEM IN. YOU WILL NOT BE ABLE TO IMAGINE THE LIFE THERE. ARE THOSE PEOPLE HAPPY WHO END UP BUYING ONLY IN SALES AND WHO KEEP ON MULTIPLYING THE DOLLAR WITH THE CURRENT RATE OF RUPEE? THERE THEY EARN THOUSAND DOLLARS AND WORK IN VERY ORDINARY CIRCUMSTANCES, BUT THEY PRETEND TO EARN 40 THOUSANDS AND TRY TO PROTECT THEIR VANITY. WE GO OVER THERE TO EARN DOLLARS, FOR THAT WE LEAVE EVERYTHING THAT WE ARE A PART OF, OUR PEOPLE, OUR RELATIVES, OUR ORIGIN, WE FACE THE HARSH WEATHER THERE BUT WE NEVER BECOME A PART OF THEIR LIFE. NONE OF THE INDIANS UNDERSTAND HOW COSTLY THIS DOLLAR IS FOR US. WE ARE CAUGHT UP IN THE MARSHY BUSINESS OF DOLLARS. THERE WE GET A MUCH BETTER JOB THAN WE DESERVE. THERE IS NO POLITICS OF LANGUAGE, CASTE ETC. WE CAN WORK IN A HAPPY ENVIRONMENT WITH A CONTENTED MIND. IF I LEAVE EVERYTHING AND COME BACK THEN I WILL BE VERY DEPRESSED.
फार विचित्र आहे हा देश! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथे नोकऱ्या आहेत, यंत्रतंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं जातात पण माघारी यायला जमत नाही. तिथून जावं असा आपला देशही नाही. तिथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही. तिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. तिथं डॉलर मिळविण्यासाठी आम्ही आपली माणसं, घरदार सगळं सोडून, तिथल्या थंडीवाऱ्याला तोंड देत राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर! पण हे भारतात कुणालाही समाजात नाही. पैशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करू शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आलो तर आणखी दु:खी होईन.`

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarRama Jadhav

    डॉलर बहू ही मूळची सुधा मूर्ती लिखित कन्नड कादंबरी. याचा मराठी अनुवाद केला आहे प्रसिद्ध लेखिका, अनुवादक उमा कुलकर्णी यांनी (या वर्षी ज्यांचे निधन झाले ते जेष्ठ लेखक विरुपाक्ष कुलकर्णी यांच्या त्या पत्नी). शामण्णा हे शिक्षक व त्यांची पत्नी गौरम्मा आल्या 3 मुलांसह लहानसा संसार चालवत असतात. मोठा आणि हुशार चंद्रू धारवाडला कामानिमित्त येतो तिथे विनिताच्या प्रेमात पडतो. पण नोकरी आणि ग्रीन कार्ड वगैरेंच्या मागे पळता पळता तो अमेरिकेत स्थायिक होतो. त्याच्यापेक्षा लहान भाऊ गिरीश जो सर्व बाबतीत बराच डावा आहे त्याची वाग्दत्त वधु विनिताच आहे हे कळल्यावर चंद्रूची घोर निराशा होते. वनिता अतिशय सुरेख, सुंदर गळ्याची, कामासही अतिशय तत्पर असते. चंद्रूचे लग्न गावातील श्रीमंत प्रस्थ असलेल्या घरातील जानकीशी होते. चंद्रू आणि जानकी अमेरिकेत आहेत आणि घसघसीत पैसे पाठवतात याचं गौरम्माना अतिरेकी कौतुक असतं. इतकं की त्यांचे विनिताकडेही त्यामुळे दुर्लक्ष होते आणि कधी कधी तर त्या तिला खिजगणतीतही धरत नाहीत. पण कादंबरी तसे बघायला गेले तर वेगवेगळ्या उपकथानकांची आहे. एक हुशार तरुण पैसा आणि अमेरिका यांच्यामागे धावताधावता अव्यक्त प्रेम हरवून बसतो. एक हावरट आणि आळशी नणंद जिला एका वहिनीची किंमतच नाही तर एका वहिनीचं वारेमाप कौतुक आहे आणि मूळ गोष्ट आहे एका सासूची जिची भारतातील सुनेप्रति आणि अमेरिकेतील सुनेप्रति वेगवेगळी वागणूक आहे. आपल्या देशात, आजूबाजूला, लांब कशालाच आपल्यालाही कधी कधी अमेरिकेसारख्या चकचकीत देशाचे आकर्षण वाटते. इतके की आपला खणखणीत रुपयाही डॉलरच्या ओझ्याखाली दबून जातो. अमेरिकेचे सततचे कौतुक असलेल्या गौरम्माला एक वर्षासाठी सुनेच्या(जमुनाच्या) बाळंतपणासाठी अमेरिकेत जावे लागते, तिथे वेगवेगळ्या लोकांशी भेट होते आणि मग त्यांना आपली चूक कशी उमगते, त्या विनिताला समान दर्जा देतात का? अमेरिका आणि भारत यापैकी कुठं जास्त मानसिक आराम आहे असे मानू लागतात,शेवटी त्यांना कोण जवळचं वाटतं? भारतीय सून की डॉलर बहू? याची ही कथा आहे. यातील कथानक हे सर्वसामान्य शेवट असलेला, तरी त्याची मांडणी अतिशय सुरेख केलेली आहे. अमेरिकेत अनेक विधवा, परित्यक्ता यांना समाज सहज आपलंसं करून घेतं, त्यामानाने आपला समाज कसा बंदिस्त आहे याचेही यात छान वर्णन केले आहे. रुपयाला डॉलर्स मध्ये वा उलटे तोलण्याची व त्यावरून त्या माणसाची योग्यता ठरवण्याची जी आपली भारतीय मानसिकता आहे ती यात स्पष्टपणे दिसून येते. पण प्रत्यक्षात त्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे तिथे गेल्याशिवाय कळत नाही. यातील वचनानुसार म्हणायचे झाले तर `नदीपलीकडचं कुरण नेहमीच हिरवंगार दिसत असतं`. वाचनीय आहे. ...Read more

  • Rating StarSarika Nadguada

    परदेशात जाऊन डॉलर मिळवण्याच्या नादात आपण आपली माणसं गमावतो, आपल्या देशा पासून, माती पासून कायमच दुरवतो.. आणी डॉलर कमावून खरच सुखी होतो का?? श्रीमंत होतो का? या साठी डॉलर बहू अवश्य वाचावे असे पुस्तक आहे....

  • Rating StarUjwala Brahmankar - Newadkar

    सुधा मूर्ती ह्यांची सगळीच पुस्तके खुप छान आहेत आणि त्यातील एक म्हणजे डॉलर बहू.. भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील परिस्थीती चे अगदी समर्पक वर्णन केले आहे. पुस्तक वाचतांना बरेच प्रसंग तसे च्या तसे आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. तेव्हा एक डलर म्हणजे चाळीस रुपये होते तर सद्या एक डॉलर ७५ रुपयाच्या घरात जावून पोहचला आहे. आणि ही तफावत वाढतच चालली आहे. डॉलर च्या तुलनेत रुपया अजून कमजोर होत चालला आहे. यामागची कारणे विचारात घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. काही वर्षांपासून अमेरिकेत जावून तिकडेच स्थायिक झालेल्या भारतीयांचे प्रमाण वाढले आहे. चंद्रूचे मित्र राधाकृष्ण जेव्हा त्याला भारतातील चांगली सरकारी नोकरी सोडून अमेरिकेतील त्यांच्या नोकरी आणि कामा बद्दल सांगतात तेव्हा खरच कुठेतरी भारतातील राजकारण, आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांचे पाय खेचणे आणि विशेष म्हणजे गुणवत्तेला प्राधान्य नसणे ह्या गोष्टींचा मनावर खोलवर परिणाम होतो. तसेच जमुना आणि तिच्या अमेरिका स्थायिक भारतीय मैत्रिणींचे भारतात परत न येण्यासाठी ची कारणे आणि त्यांची संभाषणे ऐकून अंगावर काटा येतो. इतके दिवस सर्व सुखसोयींनी युक्त अशा अमेरिकेत राहून त्यांना सर्वच गोष्टींचे स्वातंत्र्य असल्याचं जाणवते. म्हणूनच तीन वर्षांतून तीस दिवस हे त्यांचे धोरण.. ह्याचे कारण जमुना सांगते, `येणाऱ्या-जाणाऱ्यांचा, पाहुण्यांचा त्रास नाही.सास-ूसासरे आणि म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांची सेवा करावी लागत नाही. मला तर अशा या कामाचीकिळसच येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं असताना आपले नवरेही आपलं ऐकतात. कारण दुसरी सपोर्ट सिस्टीम च नसतेना!’भारतात जातांना नातेवाईकांसाठी भेटवस्तू दिल्या की ते पण खूष. गौरम्मांना अमेरिकेत भेटलेल्या जवळ जवळ सर्वच भारतीय माणसांच्या आयुष्याची कहाणी ऐकून ती लोक अमेरिकेत आनंदाने जीवन जगत असल्याचे जाणवते. पण राधाकृष्ण ह्यांनी जेव्हा तिकडे भारतीयांची मुले वयात आल्यावर जी भयावह परिस्थिती असते ती वर्णन केली आहे. अमेरिकेतील काही काळाचे वास्तव्य जेव्हा संपत येते तेव्हा आपल्या भारतात राहणाऱ्या सुनेचा गौरम्माना अभिमान वाटायला लागतो पण तोपर्यंत थोडा उशीरच झालेला असतो. अर्थातच शामण्णा सारखे समजूतदार सासरे विनता ला लाभले होते आणि विनताच्या मनःस्थिती चा त्यांना पूर्णपणे अंदाज आलेला असतो. म्हणुन त्यांनी कथेच्या शेवटी घेतलेला निर्णय मला प्रशंसनीय वाटतो. ...Read more

  • Rating StarAADIKA KADAM

    आजच मा.सुधा मुर्ती यांचे `डॉलर बहू` वाचले.बहुतांश भारतीयांमध्ये असणारे अमेरिका आणि तेथील तथाकथित संपन्न जीवनाचे आकर्षण आणि त्यातील फोलपणा त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत कथासूत्र स्वरूपात या पुस्तकाद्वारे वाचकांपुढे मांडले आहे. अमेरिकन डॉलर च्या भुलभुलैययापेक्षा आपले संस्कार श्रेष्ठ आहेत,हेच सुधा मुर्तीनी खूप सुंदररित्या या कथा/कादंबरीत सांगितले आहे..न वाचलेल्यानी एकदा नक्की वाचावी आणि ज्यांनी वाचली आहे त्यांनी आपले अभिप्राय नक्की सांगावेत ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more