* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DON DHRUV
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666410
  • Edition : 17
  • Publishing Year : 1938
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE HUMAN COMMUNITY IS NOT AS HARMONIOUS OR UNIFORM AS WE THINK. ON THE CONTRARY, IT IS DIVIDED VERY HARSHLY, DISTINCTLY INTO TWO PARTS. ONE PART WORKS ENDLESSLY, EFFORTLESSLY AND THE OTHER PART ENJOYS WITHOUT ANY EFFORTS. THESE TWO PARTS ARE DIVERSE, THEY ARE DRASTICALLY DIFFERENT FROM EACH OTHER. THOUGH THEY LIVE UNDER ONE ROOF, THEY ARE MILES APART FROM EACH OTHER AS IF THEY ARE ON TWO POLES. THERE IS UNEQUALITY EVERWHERE. WOMEN AND DALIT, THE DOWNTRODDEN ARE ALSO PART OF THIS ANTAGONISM, THE INJUSTICE. THE NOVEL HAS THE BACKGROUND OF KONKAN WHERE THE SOCIAL ANTAGONISM IS WORST. IT THROWS LIGHT ON THE POVERY, UNTOUCHABILITY AND IGNORANCE AND ALSO THE EXPLOITATION IN THE NAME OF RELIGION AND TRADITIONS.
मानवी समाज हा एकरूप किंवा एकजीव नाही तर या समाजाचे दोन विचित्र भाग आहेत. एका भागाची चैन दुसया भागाच्या कष्टांवर उभारली आहे; इतकी या भागांमध्ये विषमता आहे. ही दोन सर्वस्वी भिन्न विश्वे आहेत. या दोन विश्वांतील माणसे कितीही जवळजवळ वावरत असली, तरी त्यांच्यामध्ये दोन ध्रुवांचे अंतर आहे. स्त्री आणि दलित या दोन्हींवर होणारे अन्याय हे अशाच विषमतेचा भाग आहेत. कोकणातील खेड्यामधील पाश्र्वभूमीवर बेतलेली ‘दोन ध्रुव’ ही कादंबरी याच भयंकर विषमतेवर आधारित सामाजिक जीवनाचे चित्रण करते. धर्म आणि संस्कृती यांच्या नावाने केलेल्या पद्धतशीर पिळवणुकीची लक्षणे अज्ञान, दारिद्र्य आणि अस्पृश्यता यावर यामध्ये प्रकाश टाकला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #दोन ध्रुव
Customer Reviews
  • Rating StarVikas Dokhe

    कला, धर्म आणि संस्कृती यांच्या नावाखाली समाजात निर्माण झालेल्या भीषण विषमतेचं दर्शन घडवणारी कादंबरी मानवी समाज हा एकरूप किंवा एकजीव नाही तर या समाजाचे दोन विचित्र भाग आहेत. एका भागाची चौन दुसर्या भागाच्या कष्टांवर उभारली आहे; इतकी या भागांमध्ये विमता आहे. ही दोन सर्वस्वी भिन्न विश्वे आहेत. या दोन विश्वांतील माणसे कितीही जवळजवळ वावरत असली, तरी त्यांच्यामध्ये दोन ध्रुवांचे अंतर आहे. स्त्री आणि दलित या दोन्हींवर होणारे अन्याय हे अशाच विषमतेचा भाग आहेत. कोकणातील खेड्यामधील पाश्र्वभूमीवर बेतलेली ‘दोन ध्रुव` ही कादंबरी याच भयंकर विषमतेवर आधारित सामाजिक जीवनाचे चित्रण करते. धर्म आणि संस्कृती यांच्या नावाने केलेल्या पद्धतशीर पिळवणुकीची लक्षणे - अज्ञान, दारिद्र्य आणि अस्पृश्यता - यावर यामध्ये प्रकाश टाकला आहे. ...Read more

  • Rating StarRohini Lokhande

    पुस्तकाचे नाव - दोन ध्रुव लेखक - वि. स. खांडेकर मेहता पब्लिशींग हाऊस किंमत - २०० रु. पद्मभूषण वि. स. खांडेकर हे सर्वोत्कृष्ट भारतीय सन्मान ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रथितयश लेखक माहित नसलेला माणूस विरळाच. त्यांच्या अनेक प्रसिद्ध कादंबऱ्या पैकीही कादंबरी ` दोन ध्रुव ` दोन ध्रुव म्हणजे दोन परस्परविरोधी टोकातील अंतर ही दोन ध्रुवे समाजातील विषमतेवर प्रकाश टाकतात. स्त्री - पुरुष , कला आणि जीवन यांच्या भेदातील वास्तव दाखवतानाच दलितांवर होणारे अन्याय , त्यांचे अज्ञान त्यामुळे होणारी पिळवणूक याचे विदारक दर्शन घडवितात. सौंदर्याची खरी व्याख्या या पुस्तकामुळे स्पष्ट होते. गोष्टीचे मूळ केंद्र हे कामापूरसारख्या एका दारिद्रयाने पिंजलेल्या खेडेगावात आहे. मोजक्या पात्रांभोवती फिरणारी ही कथा अनेक रहस्य उलगडत शेवटी गोड शेवट न करता त्याग आणि समर्पणाकडे नेते. ज्यामुळे आपल्याला सामाजिकतेचे भान राहील. मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य भोगायचे असेल तर वाचनप्रेमींनी जरुर इथे उपभोगावे. शब्दविलास आणि कल्पनाविलास ठायी ठायी भरलेला आहे. कला आणि काल्पनिक सुखाची आशा याउलट वास्तवातले कडवट अनुभवाचे चटके यातील अंतर अनुभवायचे असेल तर `दोन ध्रुव` नक्की वाचा. ...Read more

  • Rating StarChhaya Kulkarni

    प्रेम या विषयावर आवडलेलं साहित्य

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more