* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"A HEARTBREAKING NOVEL THAT TELLS THE PHILOSOPHY OF HEART AND THE PAIN OF HEART AND THE FAILURE OF HIS WIFE, SHANKARAMA`S WIFE SHANKARAMA, AND THEIR SON, WHO ARE UNABLE TO MEET THEM, IN ADVERSE CONDITIONS AND NATURE. ORIGINALLY KATDA GOVINDAYYA IS THE INSPIRATION FOR THIS PERSON`S SPEECH, BEHAVIOR, HONESTY AND ENDURING ATTITUDE. THE AUTHORS HAVE PLAYED THIS CHARACTER IN THEIR LIVES. "
प्रतिकूल परिस्थीती आणि निसर्गाशी दोन हात करत जगणारे गोपालय्या आणि त्यांना साथ देणारी पत्नी शंकरम्मा यांचे सहजीवन तसेच त्यांचा मुलगा त्या उभयतांना भेटायला येत नसल्याची हृदयातील वेदना व त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी मनोवेधक कादंबरी. मुळात कट्टद गोविंदय्या या व्यक्तीचं बोलणं, वागणं, सच्चेपणा आणि धीरोदात्त वृत्ती या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. लेखकाने त्यांच्या जीवनावर आधारित गोपालय्या हे पात्र साकारले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DONGARAEVDHA #BETTADJIV #डोंगराएवढा #NOVEL #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #K.SHIVRAMKARANTH "
Customer Reviews
  • Rating StarRupali Sonawane

    शिवराम करंत यांचे पुस्तक आजच वाचून संपवले माणसाच्या कुवतीचा उपहास करणारे डोंगर,जमिनीला दुभंगून मार्ग काढू पाहणारे नवजात ओहोळ,पाच सहा फुटी माणसाला मुंगीसारखे तुच्छ लेखत उभी असलेली पर्वतशिखरे....सर्वच बाबतीत प्रतिकूल परिस्थिती.. अशा निसर्गाच्या छातडावर पाय रोवून उभे राहिलेले गोपालव्या आणि त्यांच्या पत्नी शंकरम्मा यांचे उन्नत जीवन,हृदयाची तीव्र वेदना,त्याचबरोबर त्यांच्या कणखर जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी रसपूर्ण कादंबरी... ...Read more

  • Rating StarPratik Yetavadekar

    कन्नड साहित्यात ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त लेखक हे जवळपास डझनभर आहेत. त्यातील च एक अग्रगण्य नाव म्हणजे के. शिवराम कारंथ. ‘बेत्तद जीव’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी चा मराठी अनुवाद म्हणजेच ‘डोंगराएवढा’ गोपालय्या आणि त्यांची पत्नी शंकरम्मा या दाम्त्याची कहाणी.उत्तर कर्नाटकात एका आडबाजूच्या खेडेगावात राहणारे हे जोडपे.गावाच्या आजूबाजूला पर्वतराजी,जंगले यांनी वेढलेला परिसर.आजूबाजुला असणारी पडजमीन शेतीखाली आणणे आणि त्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता.हाती घेईल ते काम जिद्दीने पार पाडायचे हाच खाक्या.अशा एका दुर्दम्य इच्छा असणाऱ्या माणसाची ही कथा. तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती मुळे वातावरण कायमच थंड त्यामुळे तिथे ती थंडी नवख्या माणसाला बाधत असे आणि थंडी ताप याचा त्रास होत असे तो सहन न झाल्याने अनेक शेतीवर ठेवलेले कामगार एखादा हंगाम राहत आणि पळून जात.अशामुळे गोपालय्या यांचे प्रसंगी नुकसान ही होत असे मात्र त्याला ही ते खंबीरपणे सामोरे जात.कादंबरीत असणारी गोपालय्या ही व्यक्तिरेखा कादंबरीचा सारा अवकाश व्यापून राहिली आहे हे आपल्याला जाणवत राहते.येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य त्यांच्या खास पद्धतीने ते करत असत त्यामुळेच आलेला पाहुणा दोनाचे चार दिवस राहत असे किंवा त्याचा पाय निघत नसे. हे सर्व चालू असताना किंवा करत असताना ही गोपालय्या आणि शंकरम्मा हे दाम्पत्य आपल्या बाळंतपणात अकाली गेलेल्या मुलीच्या दुःखाने आणि मुलगा असूनही तो शहरात राहती मात्र कुठं आहे किंवा काय करतो याची ही यांना माहिती नसते तसेच तो या दोघाना वर्षातून एकदाही भेटायला येत नसे याची खंत मनी बाळगून आपले दिवस पुढे ढकलत असतात मात्र याचा ते कुणालाही मागमूस लागू न देता ते राहत असतात आणि कायम नवं काहीतरी करून आपलं मन गुंतवत असतात अशा दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या आणि खरंच तो कादंबरीच्या शीर्षकाप्रमाणे ‘डोंगराएवढा’ असलेल्या नायकाची कहाणी… ...Read more

  • Rating StarEknath Marathe

    जंगलाच्या वाटेने, एका गावातून दुसऱ्या गावात जाणारा लेखक वाट चुकतो. मागेही परतता येत नाही व पुढेही जाता येत नाही अशा बिकट परिस्थितीत त्याला काही वाटसरु भेटतात व जवळच्या आपल्या गावात घेऊन जातात. गावातील गोपालय्या या हव्यक ब्राह्मणाच्या घरी त्यांची रवानी होते. एका रात्रीपुरता आसरा घेऊन दुसऱ्या दिवशी आपल्या वाटेने जायचा लेखकाचा विचार असतो. त्याचे यजमानपद स्वीकारलेले गोपालय्या व त्यांची पत्नी शंकरी यांच्या व अकृत्रिम प्रेमाने व जिव्हाळ्याने लेखक तिकडे अडकून पडतो. लेखक तिकडच्या आपल्या मुक्कामाचे वर्णन करताना कादंबरीचा नायक गोपालय्या यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक एक पदर उलगडत जातो. शरीराने पहाडासारखा मजबूत पण मनाने अतिशय कोमल अशा नायकाच्या व्यक्तिमत्त्वात आपणही पुरते गुंतून जातो. अतिशय दुर्गम पण तितकाच निसर्गाचा वरदहस्त लाभलेले गाव, त्यात राहणारा आपला नायक, त्याने स्वतःच्याच लग्नाची केलेली खटपट, कष्टाचे डोंगर उपसून निबीड अरण्यात फुलवलेले नंदनवन, त्यासाठी हत्ती, वाघ, गवा, रेडा या जंगली प्राण्यांशी केलेला संघर्ष, लाडक्या मुलीचा बाळंतपणात घरीच झालेला मृत्यू, शिकून-सवरून शहरात पळून गेलेल्या व दहा वर्षात घरी न फिरकलेल्या मुलाचे दुःख, अनाथ असलेल्या मुलाला मायेने जवळ करून त्याचा संसार उभारून देणाऱ्या व त्याच्या भविष्याची तरतूद म्हणून कसदार जमीन त्याच्या नावावर करून देणाऱ्या नायकाच्या स्वभावाचे असे अनेक पैलू कथेत सहज उलगडत जातात. मुलगा घर सोडून गेला हे दुःख मात्र त्यांचे काळीज आत कोठेतरी कुरतडत असतेच. शेवटी लेखकाला त्यांच्या मुलाचा जुना फोटो बघून त्याची ओळख पटते व त्याचा ठावठिकाणा समजतो. एकूण शेवट गोड होतो ! उमा कुलकर्णी यांनी या कादंबरीचा अतिशय ओघवता भावानुवाद केला आहे हे वेगळे सांगायला नकोच ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more