* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386175519
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.BAL PHONDKE COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SCIENCE, TECHNOLOGY AND POLICE STARTED WORKING TOGETHER SINCE THE TIME THE FINGER PRINTS WERE USED TO REACH A CULPRIT. THEREAFTER, THE CONTINUOUS PROGRESS OF SCIENCE AND TECHNOLOGY HAS HELPED THE POLICE FORCE WITH EXTREMELY INNOVATIVE WAYS TO REACH TO THE CORE OF ANY CRIME. WITH THIS GROWING KNOWLEDGE THE POLICE BECAME SMARTER. BUT HOW COULD THE CULPRITS NOT LEARN ALL THE NEW WAYS? THEY ALSO HAVE LEARNED TO KEEP THEMSELVES UPDATED WITH THE LATEST IN SCIENCE AND TECHNOLOGY. IN A WAY, THIS CAN BE CONSIDERED AS A RACE BETWEEN THE POLICE TASK AND THE CULPRITS. WHILE THE POLICE FORCE TRIES TO MAKE USE OF THE LATEST TECHNOLOGY TO EXPLORE THE TRACKS LED BEHIND BY THE CULPRITS IF THEY GET GUIDANCE FROM A SCIENTIST THEN THE EXPLORATION IS MORE FRUITFUL AND QUICK. AMRUTRAO MOHITE AND DR. KAUSHIK COME TOGETHER FOR AN INVESTIGATION AND MAKE THE JOURNEY THRILLING REVEALING THE CHALLENGES.
‘द्विदल’ या कथासंग्रहातील दोन कथांपैकी पहिली कथा आहे नार्सिसस. सदर कथा ही जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉ. अमर बोस व त्यांची पत्नी शर्मिला बोस या पात्रांभोवती फिरते. डॉ. बोस यांना ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ नावाचा असाध्य आजार जडल्यामुळे त्यांचे शरीर सर्व संवेदना हरवून बसले आहे. या स्थितीतही केवळ आपल्या विलक्षण बुद्धीच्या जोरावर त्यांनी संशोधन करून विज्ञान जगतात आपला ठसा उमटवलेला असतो. त्यांची पत्नी शर्मिलादेखील वैज्ञानिक असते; परंतु बिछान्याला खिळलेल्या पतीसाठी, पतीची प्रतिभा चमकावी म्हणून तिने आपल्या करिअरचा त्याग केलेला असतो. स्वतःचे मन मारून, सर्व सुखांचा त्याग करून शर्मिला आपल्या पतीच्या सेवेसाठी दिवसरात्र तत्पर असते. अमेरिकेत राहणारे बोस पती-पत्नी व्याख्यानांच्या निमित्ताने भारतातील ‘इाQन्स्टट्यूट ऑफ सायन्स’च्या ‘गेस्ट हाऊस’मध्ये उतरलेले असताना एका रात्री डॉ. बोस यांच्यावर हल्ला होतो. संशयाची सुई सर्वप्रथम त्यांच्या पत्नी शर्मिला बोस यांच्यावरच रोखली जाते. त्यातूनच डॉ. कौशिक व कमिशनर अमृतराव यांच्यासमोर बोस पती-पत्नीच्या नात्यातला कडवटपणा समोर येतो. परंतु तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉ. कौशिक व अमृतराव यशस्वीपणे खऱ्या हल्लेखोरापर्यंत पोहोचतात. ‘द्विदल’मधील दुसरी कथा आहे ‘कोव्हॅलंट बाँड.’ ही कथा माधवी, जयंतीबेन आणि दहा वर्षांची एक मुलगी यांच्याभोवती फिरते. एक दहा वर्षांची मुलगी आणि तिच्यावर हक्क सांगणाNया दोन माता. वैज्ञानिकदृष्ट्या दोन्ही माता या त्या मुलीच्या खऱ्या (जैविक) माताच असताना कोणाचा त्या मुलीवर खरा हक्क आहे, हा गुंता सोडवण्यात कमिशनर अमृतराव आणि डॉ. कौशिक कितपत यशस्वी होतात, हे बघणं औत्सुक्याचे ठरते. दोन्हीही कथा वेगळा विषय घेऊन पुढे येताना दिसतात. आजच्या काळात विज्ञानामुळे निर्माण झालेले प्रश्न विज्ञानच सोडवते. केवळ विचारांची योग्य तर्वÂसंगती लावणे आवश्यक आहे, हेच ‘द्विदल’मधील कथा सुचवतात.

No Records Found
No Records Found
Keywords
#DWIDAL #BAL PHONDKE #SCIENCE FICTION #MEDICAL FICTION #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 11 MAY 2018

    नव्या युगाच्या विज्ञानकथा... पूर्वी हाताच्या बोटांचे ठसे, श्वानाने घेतलेला वास किंवा रक्ताचे रिपोर्ट्स यांचाच काय तो गुन्ह्याच्या शोधांमध्ये उपयोग होत होता. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची बरीच प्रगती झाली आहे आणि त्यातून उपलब्ध झालेल्या नवनवीन यंतरणांचा अधिकाधिक वापर गुन्ह्यांच्या तपासासाठी केला जातो. पोलिसांच्या तपासाला कुणा वैज्ञानिकाची जोड मिळाली तर तो तपास कसा चित्तथरारक होतो याची झलक डॉ. बाळ फोंडके यांनी आपल्या ‘द्विदल’ या पुस्तकात समर्पकरीत्या मांडलंय. ‘नार्सिसस’ आणि ‘कोव्हेलेंट बॉण्ड’ या नव्या युगाच्या दोन विज्ञानकथा अनोख्या आहेत. ‘नार्सिसस’ म्हणजे स्वत:च स्वत:च्या प्रतिमेचाही हेवा करावा इतका, की आपणच आपलं आयुष्य संपवावं. या कथेमध्ये लेखकांनी मानवी मनाच्या प्रसिद्धीच्या ईर्षेचा आणि हव्यासाचा मांडलेला सिद्धांत खरा आहे, हे पटवण्यासाठी आत्मक्लेशाची गाठलेली परिसीमा अत्यंत रोमहर्षक पद्धतीने उलगडली आहे. ही कथा वाचकांना उत्सुकतेच्या शिखरावर नक्कीच पोहचवेल यात शंका नाही. या पुस्तकातील दुसरी कथा आहे ‘कोव्हेलेंट बॉण्ड’. कथेच्या शीर्षकातच रसायन शास्त्राच्या व्याख्येनुसार ‘शेअिंरगने होणारा बॉण्ड.’ हा बॉण्ड अत्यंत मजबूत असतो व कोणत्याही रासायनिक प्रक्रियेने तो सहजपणे तुटत नाही. असा हा बॉण्ड सर्वांत मजबूत असतो. दोन्ही भावबंध स्वतंत्ररीत्या अपूर्ण असतात. एक वेगळाच, थक्क करणारा विचार ही कथा देऊन जाते. -मनीषा फडके ...Read more

  • Rating StarKiran Borkar, Vachan Veda 23.9.17

    विज्ञान गुन्हेगारी कथा असे याचे वर्णन करता येईल.गुन्हेगारांच्या शोधासाठी विज्ञानाचा वापर कसा करता येईल याची माहिती लेखकाने अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली आहे.यात दोन कथा आहेत.खुर्चीत विकलांग बनून असलेल्या शात्रज्ञावर घरात हल्ला होतो .तो कोणी केला याच उकल विज्ञानाच्या साहाय्याने केली जाते .तर टेस्ट ट्यूब बेबी किंवा सोरोगेट आईचे भविष्यात येणारे संभाव्य धोके ,दुष्परिणाम कसे असू शकतात याची कथा ही मनोरंजनात्मक पद्धतीने मांडली आहे .तंत्रज्ञान किती पुढे गेले आहे हे पाहून आपण अचंबित होतो . ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 25-06-2017

    वैज्ञानिक रहस्यकथा... प्रसिद्ध शास्त्रज्ञ तसेच विविध विषयांचे व्यासंगी लेखक म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात डॉ. बाळ फोंडके यांचे एक वेगळे ठळक असे स्थान आहे. त्यांचे विज्ञानविषयक लेख, कथा, सदरे, पुस्तके आणि शोधनिबंध प्रसिद्ध आणि वाचकप्रिय आहेत. विज्ञा विषय लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून याबाबत त्यांना अनेक पारितोषिकेही प्राप्त झाली आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने बराच मोठा पल्ला गाठला आहे. त्यातून उपलब्ध नवनवीन यंत्रणांचा अधिकाधिक वापर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस खुबीने करून घेतात, पण गुन्हेगारही या तंत्रज्ञानाचा गैरवापर करू लागले आहेत. अशा वेळी पोलिसांच्या मदतीला जर एखाद्या वैज्ञानिकाची साथ मिळाली तर गुन्ह्याचा तपास अधिक चित्तथरारक होईल. डॉ. बाळ फोंडके यांच्या विज्ञान कथेतील नायक आयुक्त अमृतराव मोहिते आणि डॉ. कौशिक या जोडगोळीने अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. या जोडीच्या दोन मोहिमांची कहाणी म्हणजेच द्विदल कथासंग्रह. ‘नर्सिसस’ या पहिल्या कथेत अमृतराव मोहिते यांनी एका संशोधकाने केलेल्या गुन्ह्यांचा पर्दाफाश ज्या चलाखीने केला आहे ते वाचताना वाचकाची उत्कंठा वाढत जाते. कथानकात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रा. बोस मेंदू आणि चेतासंस्था यांच्या संशोधनात माहीर होते. आपल्या संशोधनाविषयी ते समकक्ष विद्वानांशीच नव्हे तर सर्वसामान्यांनाही तो विषय प्रासादिक भाषेत ते समजावून सांगत. त्यांच्या एका जाहीर व्याख्यानात अमृतरावांनी हजेरी लावली. संपूर्ण शरीरात चैतन्याचा अभाव असणारी व्यक्ती प्रा. बोस असल्याचे कळल्यावर त्यांना धक्काच बसतो. त्यांची सुविद्य पत्नीही संशोधक असून त्यांनी आपल्या या पतीकरिता आपले संपूर्ण करीयर सोडून दिल्याचेही त्यांना कळते. याच दौऱ्यात गेस्ट हाऊसवर प्रा. बोस दांपत्य राहत असताना प्राध्यापकांवर जीवघेणा हल्ला होतो. फक्त मेंदू तल्लख असून सगळे शरीर गलितगात्र असताना प्रा. बोस यांच्या झालेल्या हल्ल्याचा क्लिष्ट तपास अमृतराव आणि डॉ. कौशिक ज्या चित्तथरारक पद्धतीने करतात त्यात वाचकांना गुंतवून ठेवण्यात लेखक यशस्वी झालेत. ‘कोव्हॅलंट बॉण्ड’ या दुसऱ्या कथेत टेस्ट ट्यूब बेबी टेक्नोलॉजी व सरोगेट मदर या असिस्टेड रिप्रॉडक्शन टेक्निकचा उपयोग करून अपत्यप्राप्ती झालेल्या दोन महिलांच्या आयुष्यात पुढे काय गुंतागुंत होते, त्यातून हे प्रकरण कायद्याच्या चौकटीत कशा तऱ्हेने येते, यावर ही कथा बेतली आहे. अशा फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये एखादी झालेली चूक एकाच नव्हे तर दोन कुटुंबांशी कशी भावनिकदृष्ट्या वाताहत करू शकते हे वाचताना आपणही अस्वस्थ होतो. काही वेळेला शारीरिकदृष्ट्या निकोप असूनही काही दांपत्यांना मूल होत नाही. ते अशा क्लिनिक्सचा रस्ता धरतात. अशाच एका क्लिनिकमध्ये नोंदीतील झालेल्या चुकीमुळे दोन स्त्रियांच्या आयुष्यात प्रचंड भावनिक उलथापालथ होते. ती केस आयुक्त अमृतरावांकडे येते. डॉ. कौशिक यांच्या मदतीने त्या मुलीची खरी आई कोण हे सत्य वाचताना वाचकांच्याही मनात हुरहूर निर्माण होते. टेस्ट ट्यूब बेबी या प्रक्रियेबद्दल सामान्य माणसाला अज्ञात असलेली वैज्ञानिक माहिती लेखकाने देऊन वाचकांना आनंदही दिला आहे. पोलिसांच्या तपासाला एखाद्या वैज्ञानिकाची मदत मिळाली तर तपास कसा चित्तथरारक होईल याची झलक या दोन्ही कथांमधून वाचायला मिळते. पुस्तक हातात घेतल्यानंतर ते संपूर्ण वाचूनच आपण थांबतो. आपणही त्या तपासकार्याचा एक भाग होऊन जातो हेच या कथासंग्रहांचे यश म्हणता येईल. सतीश भावसार यांनी चित्तारलेले मुखपृष्ठ विषयाला समर्पक आहे. -प्रतिमा ओतूरकर ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 01-07-2017

    उत्कंठावर्धक विज्ञान कथा... विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा सातत्याने वाहणारा प्रवाह वेगवान असतो. त्यातून निष्पन्न होणाऱ्या सुखसोई-सेवासुविधा सर्वसामान्यांसाठी उपयुक्त असतात. हे जरी खरं असलं तरी त्यांच्या मागील संकल्पनांची ओळख सामान्य वाचकांना होणंगरजेचं असतं. अभिनव शोधांची माहितीही आपल्याला व्हावी म्हणून विज्ञान कथा हे एक प्रभावी माध्यम ठरतं. त्यामध्ये गोष्ट तर गुंफलेली असतेच, पण विज्ञानाच्या वाटचालीवर आधारलेले भविष्यकाळाचे पडसाद त्या कथांमध्ये उमटलेले असतात. या कथांमध्ये विज्ञान सहजतेने आणि सुलभतेने डोकावत असते. यामुळे वाचकांच्या मनामध्ये वैज्ञानिक साहित्य औत्सुक्य निर्माण करते. विज्ञानकथांची अशी काही बलस्थाने लक्षात आल्यामुळे त्यांचे साहित्यिक मूल्य वाढत आहे. सुदैवाने गेल्या काही वर्षात विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारलेल्या कथा किंवा कादंबऱ्यांमुळे मराठी साहित्य विश्वात मोलाची भर पडलेली आहे. मराठी विज्ञानकथाकारांमधील एक ज्येष्ठ लेखक डॉ. बाळ फोंडके यांचा ‘द्विदल’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये नव्या युगांच्या दोन प्रदीर्घ पण उत्कंठावर्धक विज्ञान कथा समाविष्ट आहेत. दोन्ही कथांमध्ये पोलीस अधिकारी अमृतराव मोहिते आणि त्यांना नेहमीच गुन्हे-अन्वेषणाच्या कामी आधारस्तंभ म्हणून लाभलेल्या विज्ञाननिष्ठ डॉ. कौशिक यांच्या चातुर्याची कसोटी पणाला लागलेली दिसते. ‘नर्सिसस’ ही पहिली कथा अमेरिकेत कार्यरत असणाऱ्या शास्त्रज्ञ अमर बोस यांच्यावर बेतलेली आहे. सुरुवातीला त्याचं वैज्ञानिक कार्य आणि त्याचबरोबर त्यांचं ‘आत्मा-देह-चैतन्य-ऊर्जा’ आदी संकल्पनावरील सखोल चिंतन प्रकट झालंय. मेंदू तल्लख असला तरी ते ‘मोटर न्युरॉन डिसीज’मुळे बहुतांशी विकलांग आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व लक्षात घेताना वाचकांना ज्येष्ठ खगोल-गणिती स्टीफन हॉकिंग आठवण होईल. प्रो. बोसांच्या मते आपल्या देहाला फारसं महत्त्व नाही; केवळ मेंदूला आपले कार्य करता यावे म्हणून चेतासंस्थेला ऊर्जा पुरवण्याव्यतिरिक्त देह काही करत नाही. भारतातील एका प्रयोगशाळेत ते आपली पत्नी शर्मिलासह अभ्यास दौरा करण्यासाठी आलेले असताना त्यांचं आम जनतेसाठी एक व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. विषय होता – ‘द सर्च फॉर द सोल’, म्हणजे ‘आत्म्याचा शोध’! हा विषय निश्चितच भारतीयांचे कुतूहल चाळवणारा असल्याने गर्दीचे भरगच्च झालेल्या हॉलमध्ये कमिशनर अमृतराव आणि डॉ. कौशिकदेखील उपस्थित होते. स्पष्ट बोलता येत नसल्याने प्रो. बोस व्हील चेअरवरील संगणकाच्या साह्याने ‘स्पीच सिंथेसायझर’ वापरून व्याख्यान देत होते. त्यांचे व्याख्यान ‘मेट्यालिक’ आवाजात पण सुबोध आणि मननिय असल्याने चांगलेच गाजले. त्याच दिवशी रात्री संस्थेने दिलेल्या आणि पूर्ण सुरक्षित असलेल्या निवासस्थानी प्रो. बोस निद्राधीन झाले. तथापि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीला प्रो. बोस यांचा रक्तबंबाळ झालेला देह दिसला. त्यांना तर कोणीही उघड असे शत्रू नव्हते. जगभर पसरू शकणारी ही बातमी गुप्त ठेवणं आणि या मागील रहस्य शोधण्याचे कार्य आव्हानात्मक होतं. संशयित बरेच होते. अर्थातच डॉ. कौशिक आणि अमृतराव यांनी रहस्यभेद करून ‘चक्षुर्वै सत्यम्’ असा गुन्हेगार शोधून काढलाच. ही कथा मुख्यत: वैज्ञानिक मनोविश्लेषण करणारी आहे. या कथेच्या ‘नर्सिसस’ या नावाच ‘शोध’ मात्र वाचकांनीच घ्यायला हवा! ‘कोव्हॅलंट बॉण्ड’ असं दुसऱ्या कथेचं नाव आहे. रसायनशास्त्रातील अणूंचे होणारे परस्पर ‘बॉण्डिंग’ (बंधन) वेगवेगळ्या प्रकारचे असते. त्यातील ‘कोव्हॅलंट बॉण्ड’ हा खूप पक्का, आणि सहसा अतूट असतो. आई आणि तिचे मूल यांच्यातील नातेसंबंधातील धागे हे ‘कोव्हॅलंट’ असले तरी आधुनिक वैद्यकशास्त्रातील (अशा नाजूक) धाग्यांना ‘कंगोरे’ असू शकतात. पूर्वीच्या कथांमध्ये एखाद्या बालकाचा बाप नक्की कोण असावा, हे शोधून काढायची समस्या असे. कारण आई निश्चितपणे माहिती असते. या कथेतील मोनिका माझीच आहे, असं दोन मातांना वाटतं. मग मोनिकाची आई नेमकी कोणती आहे? अमृतराव आणि डॉ. कौशिक यांनी हे शोधून काढलं आहे. वाचकांना संभ्रमित करणारी ही कथा ‘कोव्हॅलंट बॉण्डिंग’ नेमकं कोठे आहे, याचा उलगडा करते. सध्याच्या आणि भावी काळामध्ये सरोगेट माता, ‘मायटोकाँड्रिया’ (ऊर्जा यंत्रणा) दान करणारी माता आणि अजूनही काही पद्धतीच्या माता उद्भवणार आहेत. साहजिकच नाते-संबंधातील धागे-दोरे नाजूक बनू शकतात. ‘द्विदल’सारख्या वैज्ञानिक कथा संग्रहामध्ये लेखकांनी ‘परिशिष्ट’ समावेश करून अगदी संक्षिप्त स्वरूपात कथाबीज मागील (आधुनिक) विज्ञान-तंत्रज्ञानाचे विवरण करावे, असे मला वाटते. दोन्ही कथा रहस्यमय आहेत, पण त्या भक्कम वैज्ञानिक पायावर आधारलेल्या आहेत. त्यात मुखपृष्ठावर दर्शविलेल्या पिस्तूलाला फारसं महत्त्व नाही. डॉ. बाळ फोंडके यांनी त्यांच्या खास शैलीत सादर केलेल्या दोन्ही कथा वाचकांना खिळवून ठेवतील, यात शंका नाही. -डॉ. अनिल लचके ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more