* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EK DIWA VIZATANA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984699
  • Edition : 5
  • Publishing Year : APRIL 1986
  • Weight : 180.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TALES LIKE THE TITLE STORY OF THIS COLLECTION BELONG TO THE GENRE OF INEXPLICABLE MYSTERIES. ‘CHAUTHI KHIDAKI’ IS A FANTASTIC SCIENTIFIC TALE BUILT AROUND THE CONCEPT OF TIME. ‘PORKHEL’ USES THEANALOGY OF A CHILDAT PLAY WITH HER DOLLS, TO HIGHLIGHT THAT HUMAN BEINGS ARE MERE PAWNS IN THE HANDS OF FATE. ‘SUCHETA CHAKRAPANI ANI TICHA KOKILKANTH’ TACKLES THE TANGLE BETWEEN AN ARTISTE AND HER ART – A FANTASTIC RENDERING REMINISCENT OF MAGICAL REALISM. MATKARI’S STORIES GIVE US THE FEELING OF ENTERING A JUNGLE AT DUSK. THE READER BEGINS HIS JOURNEY ALONG THE BORDER THAT SEPARATES REALITY FROM FANTASY. MATKARI EMPLOYS DIFFERENT NARRATIVE STYLES AND STRUCTURE TO LEAD THE READER ALONG FAMILIAR AS WELL AS UNFAMILIAR PATHS IN THIS JUNGLE.WHILE BEING IMMENSELY ATTRACTIVE, THIS JOURNEY TAKES THE READER INTO EVER DEEPER REGIONS.
या संग्रहातल्या ‘एक दिवा विझताना’सारख्या कथा न आकळणारी गूढरहस्ये या सूत्राभोवती फिरतात. ‘चौथी खिडकी’ ही एक अफलातून विज्ञानकथा ‘काळ’ या संकल्पनेभोवती रचली आहे, तर ‘पोरखेळ’सारख्या कथेमधून मानवाचे नियतीच्या हातातले बाहुले असणे, हे सूत्र बाळाच्या बाहुल्यांशी खेळण्याच्या प्रतीकातून सूचित केले आहे. कलावंत आणि कला यांच्यातला तिढा मांडणारी ‘सुचेता चक्रपाणी आणि तिचा कोकिळकंठ’ ही कथा एक उत्कृष्ट पँÂटसी ठरते; ती जादुई वास्तववादाची आठवण करून देते. संधिप्रकाशातल्या धूसर वातावरणात एखाद्या अरण्यात शिरावे, तसे मतकरी यांच्या कथा वाचताना वाटते. वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषेवर प्रवास सुरू होतो. वाचकांना या अरण्यातल्या कळलेल्या, न कळलेल्या वाटांकडे नेण्यासाठी मतकरी कथनाचे वेगवेगळे घाट, निवेदनशैली यांचा वापर करतात. हा प्रवास विलक्षण आकर्षक असतोच; पण तो आत आत खोलातही नेतो.

No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
  • Rating StarOmkar Dilip Bagal

    एक दिवा विझताना - रत्नाकर मतकरी (समीक्षण - ओंकार दिलीप बागल) प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या - १२८ पाने किंमत - १९० रुपये मुखपृष्ठ - या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर काळोख्या अंधाराचे चित्र आहे. हा अंधार म्हणजेचं दिवा विझल्यानंत होणारा गर्द काळोख. विझलेल्या दिव्याचं आणि त्यामुळे पसरलेल्या या अंधाराचं अनैसर्गिक गूढ यातून समोर येतं. शुभ्र सफेद वस्त्रावर सांडलेला रक्ताचा पसरट डाग हा मृत्यूसंबंधित घटनेचा संकेत देण्याचा प्रयत्न करतो. अंधार, काळोख, रक्ताचा डाग या सर्व गोष्टी, माणसाच्या शेवटच्या प्रवासातील बाबी, कथासंग्रहातील भयावह घटनांचे सूचक असल्याचं लक्षात येतं. प्रस्तूत कथासंग्रह `एक दिवा विझताना` हा लेखक रत्नाकर मतकरी यांचा एक अभूतपूर्व साहित्याचा नमूना आहे. याशिवाय लेखकांची अ‍ॅडम, कबंध, खेकडा, निजधाम, निर्मनुष्य, परदेशी, पानगळीचं झाड अशी बरीच कथासंग्रहे प्रकाशित झाली आहेत. `एक दिवा विझताना` या कथासंग्रहात एका पेक्षा एक सर्रास ठरणाऱ्या एकूण सात संकीर्ण कथा आहेत. या सर्व कथा वाचकाला निश्चितचं बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत. प्रत्येक कथा वाचत असताना एका अनोख्या गोष्टीचे गूढ उकलत जाते. विज्ञाननिष्ठ तत्वांची पायमल्ली न करता मानवाच्या चाकोरीबद्ध बुद्धीला आव्हान देणाऱ्या काही शक्तींचा लेखकांनी परिचय करून दिला आहे. भौतिक जगात प्रमाण मानलं जाणाऱ्या विज्ञानासोबतचं मानवी पंचेंद्रियांच्या जाणिवांवर आधारलेल्या काही अपरिचित शक्तींचा अनुभव लेखकांनी मांडलेला आहे. गृहीत न धरलेल्या मानवी मनाच्या सामर्थ्यास केंद्रबिंदू ठेवून परलोकाचा अभ्यास म्हणजे विज्ञानाच्या काही अंशी पलीकडे जाण्यासारखचं. अशा गोष्टींचा उहापोह करण्यासाठी लागणारं विज्ञान या क्षणाला ठाऊक नसलं तरी भविष्यात पाश्चात्य संशोधक याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतील असं वाचताना आपलं मत तयार होत जातं. या कथासंग्रहातील पहिल्याचं कथेत अ‍ॅनिमियाचा प्रादुर्भाव झालेला एक तरुण मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या धाकट्या भावाला एका अगम्य शक्तीचा परिचय होतो. डॉक्टरांनीसुद्धा त्याच्याकडे वेळ कमी असल्याचं नमूद केलेलं असतं. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी कि मानवी मनाची शक्ती सांगणारं हे रहस्य त्या रुग्णाचे काही काळासाठी आयुष्य वाढवतं. वैद्यकीय चिकित्सकेतसुद्धा ही गोष्ट अचंबित करणारी आहे. मानवी मनाच्या सुप्त शक्तीवर लिहिलेली ही कथा वाचकाला सुन्न करून टाकते. कथासंग्रहातील "अशब्द" ही कथा भावनिक पातळीवर लिहिली गेली असून, दोन मानवी मनांचा होणारा सवांद आणि त्यासंबंधित घडलेल्या नैसर्गिक घटनांचा उल्लेख या कथेतून अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या मांडला आहे. टेलीपॅथीनुसार दोन माणसं प्रत्यक्षात न बोलता मनातल्या विचारांचे दुसऱ्या मनापर्यंत संप्रेषण करू शकतात. परंतू त्यासाठी माणूस जिवंत असायला हवा, कारण या कथेतील पात्र मृत व्यक्तीशी संभाषण कशी काय करू शकते हे समजण्याच्या खूप पलीकडे आहे. "चौथी खिडकी" ही कथा टाईम ट्रॅवेल वा भविष्य भ्रमण करणाऱ्या संशोधनाचा एक सुंदर अनुभव देणारी कथा म्हणून वाचकांच्या पसंत पडेल याची खात्री आहे. भविष्य भ्रमण याविषयी अनेक देशांत संशोधन चालू असल्याचं कित्येक वैज्ञानिक लेखांत आपल्याला वाचायला मिळतं, त्यामूळे वाचकाला ही कथा रुचण्यास अधिक मदत होईल. याशिवाय "रूममेट" ही कथा वाचताना कंटाळवाणी वाटत असली तरी तिचा शेवट तितकाच अकल्पित आणि भयावह आहे. कथेची नायिका अनावधनाने तिच्या मैत्रिणीचा खून करते आणि यामागे तिचं मानसिक आजारपण असतं. मानसिक विकारातून एखाद्याचा खून करण्याइतपत बुद्धी भ्रष्ट होऊ शकते याबद्दल अलीकडेचं संशोधन झालेलं आहे. लहानपणीचा "पोरखेळ" कधी आपल्या जीवनाचा अकल्पित भाग बनू शकतो, याची प्रचिती एका कथेतून वाचकांना मिळते. मानवाचे नियतीच्या हातातले बाहुले असणे, हे सूत्र बाळाच्या बाहुल्यांशी खेळण्याच्या प्रतीकातून सूचित केले आहे. कलावंत आणि कला यांच्यातला तिढा मांडणारी ‘सुचेता चक्रपाणी आणि तिचा कोकिळकंठ’ ही कथा एक उत्कृष्ट फँटसी आहे, ही कथा वाचकाला जादुई वास्तववादाची आठवण करून देते. म्हणजे असं खरंचं झालं तर माणसाच्या स्वतंत्र बुद्धिप्रणालीला काही महत्वचं उरणार नाही एवढं नक्की. "नाईटमेअर" ही कथा आपल्या आयुष्यातील सहज घडणाऱ्या घटनेचा उत्तरार्ध कसा होऊ शकतो हे सांगत त्याचा माणसाच्या एकंदर आयुष्यावर कशा प्रकारे आघात होऊ शकतो याचं गांभीर्य लक्षात आणून देते. या सर्व कथांकडे बारकाईने पाहिल्यास असं लक्षात येतं कि लेखकांनी माणसाच्या मृत्यूच्या मार्गात घडत असलेल्या काही गोष्टींचे गूढ उकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवा विझत असताना नेमकं काय होत असेल एवढंच सांगून मतकरी थांबत नाहीत तर जीवित व्यक्ती आणि मृत व्यक्ती यांना प्रत्यक्षात एकरूप करून सोडतात. मृत्यूसंदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या किंवा सध्याच्या काळात संशोधनात्मक पातळीवर असलेल्या वैज्ञानिक गोष्टींच्या आधारे या कथा लिहिलेल्या आहेत. मुळात सध्या आपण ज्यास अकल्पित असं संबोधत आहे, त्या गोष्टी भविष्यात प्रत्यक्षात अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्याचा आधार वैज्ञानिक सिद्धांत असून त्या केवळ मानवी आकलनक्षमतेच्या बाहेर आहेत एवढंचं. अशा प्रकारे, रत्नाकर मतकरींचा "एक दिवा विझताना" हा कथासंग्रह म्हणजे लेखकांचा कोणत्याही गोष्टीचा "शेवट" प्रचंड विलक्षण, थोडंसं विचित्र आणि अद्वितीय करण्याचा हातखंडा वाचकांच्या लक्षात येतो. संधिप्रकाशातल्या धूसर वातावरणात एखाद्या अरण्यात शिरावे, तसे मतकरी यांच्या कथा वाचताना वाटते. वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषेवर प्रवास सुरू होतो. वाचकांना या अरण्यातल्या कळलेल्या, न कळलेल्या वाटांकडे नेण्यासाठी रत्नाकर मतकरी कथनाचे वेगवेगळे घाट, निवेदनशैली यांचा वापर करतात. हा प्रवास विलक्षण आकर्षक असतोच, पण तो आत आत खोलातही नेतो. "एक दिवा विझताना" या कथासंग्रहाविषयी मतकरी म्हणतात, "मी सांगत आहे, त्या घटनेमागचे गूढ कधी उलगडेल, तेव्हा खरे. त्याचे स्पष्टीकरण भविष्यात मिळेल. आजच्या आपल्या तुटपुंज्या ज्ञानाच्या कक्षेत ते बसत नाही." लेखकांच्या विधानांशी समर्पक असणाऱ्या या कथा मात्र मानवी कल्पनाशक्तीची सर्व दारे नक्कीच खिळखिळी करून ठेवतात. -©ओंकार दिलीप बागल (7506582341/ bagalomkar2@gmail.com) ...Read more

  • Rating StarNarendra Gaikwad

    रत्नाकर मतकरी म्हणजे गुढ कथांचे राजेच...

  • Rating StarNeeten Vaidya

    यातली अशब्द ही कथा अप्रतिम आहे.

  • Rating StarNagesh Dhawade

    ज्याने हे पुस्तक वाचलं असेल तो ते कधीही विसरणार नाही.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more