* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EK DIWAS
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981834
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANY INDIAN GENERATIONS HAVE SUCCESSFULLY ESTABLISHED THEMSELVES IN AMERICA. EVERY INDIAN HAS A CURIOSITY TO PEEP INTO THE DAY-TO-DAY LIFE OF AN AMERICAN. WE ALL ARE ATTRACTED TO THIS RICHEST AND STRONGEST COUNTRY. SHOBHA CHITRE COMES UP WITH MANY SHORT STORIES, ALL ABOUT AMERICANS, THEIR CULTURE AND THE LIFESTYLE OF INDIANS WHO HAVE SETTLED DOWN IN AMERICA. EACH STORY HAS A STRONG AND TRUE BASE. EACH TELLS US MORE AND MORE ABOUT THE CULTURE THERE, THE WAY PEOPLE THINK AND PLAN THEIR FUTURE, THE WAY THEY EMBRACE LIFE AND FIND OUT SOLUTIONS FOR EACH PROBLEM. THESE STORIES HELP US TO LEARN MANY GOOD THINGS ABOUT AMERICA AND AT THE SAME TIME ASSIST US TO PROBE INTO OUR MINDS TO SHED AWAY THE WRONGFUL NOTIONS WE HAVE DEVELOPED OVER THE YEARS. SHOBHA’S LANGUAGE IS SIMPLE AND HENCE TOUCHES THE CORE OF OUR HEART. SINCE LAST 40 YEARS SHE HAS LIVED IN US YET, SHE HAS NOT LEFT HER BASIC CULTURE ANYWHERE OUT IN THE OPEN. SHE HAS MANAGED TO BALANCE BETWEEN HER INDIAN UPBRINGING AND AMERICAN THINKING. THIS HARMONIOUS BLEND HAS HELPED HER TO ADAPT HERSELF TO HER ENVIRONMENT. WHILE DOING SO, HER SENSITIVE MIND HAS ALWAYS BEEN FASCINATED BY THE REALISTIC NATURE OF AMERICANS. SHE PRESENTS THIS NATURE IN A SUPERBLY COOL MANNER AND A NEUTRAL WAY YET CAPTIVATES OUR MINDS WITH HER AESTHETIC SENSE.
‘एक दिवस’ ते ‘असाही एक दिवस’ या अकरा ललित लेखांचा संग्रह म्हणजे शोभा चित्रे यांच्या सातत्याने चाललेल्या संवेदनशील धडपडीचा आलेख आहे. अमेरिकेत ४० वर्षांहून अधिक काळ राहूनसुद्धा आपल्या मातीवरील, माणसांवरील, भाषेवरील प्रेम विरळ न होऊ देता ‘तिथल्या’ आणि ‘इथल्या’ संस्कृतींना अनुभवाच्या माध्यमात जोडून मराठी साहित्य समृद्ध करण्याचा त्यांचा अनाहूत प्रयत्न, साध्या, सोप्या, सरळ भाषेतून वाचकांशी संवाद साधत त्यांच्या हृदयाचा नकळत ठाव घेण्याची त्यांची वृत्ती, आणि संयत व शांत स्वभावाच्या लेखनातून त्यांनी शमविलेली वादळे अथवा निर्माण केलेली खळबळ – या सगळ्याचा एक विलोभनीय चित्रपट या संग्रहात पाहायला मिळतो. मराठी साहित्यात त्यांच्या लेखनातून उतरणारे हे वेगळे अनुभवविश्व यापुढेही वाचकाला खुणावीत राहील; भुरळ घालील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#EK DIVAS #GULMOHAR #PRIYAPARMESHWARA #YAJANMAVAR #PHUGHYATILMANASA #KHARICHAWATA #KHOLAMBALELA #PRAVAAS #TARUNAASTA #MHATARPAN #AATPATNAGARHOTA #HOW DARE YOU # AASAHI EK DIWAS #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% # #SHOBHACHITRE #शोभाचित्रे #PANGALEECHYAAATHAVANEE #AUTOBIOGRAPHY #EKDIVAS "
Customer Reviews
  • Rating StarSAMNA 8-5-2011

    कसं जेवावं हे प्रत्येकाला लहानपणापासूनच शिकवलं जातं. कोणत्या पदार्थाबरोबर काय तोंडी लावणं घ्यावं. घास कसा घ्यावा. तो चावून कसा गिळावा. हे सगळं प्रत्येक व्यक्तीच्या अंगवळणी पडून गेलेलं असतं. पण समजा एखाद्याला हे विसरायला झालं तर? तुम्ही म्हणाल, ‘हे कस शक्य आहे?’ पण होय! अल्झायमर या रोगामुळे हेच घडतं. अल्झायमर माणसाच्या मेंदूतल्या आठवणीच्या, स्मरणाच्या केंद्रालाच हळूहळू निकामी बनवत जातो. त्या माणसाला कोणतीही, कसलीही आठवणच राहत नाही. या भीषण रोगाचा प्रादुर्भाव जगभर वाढतो आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन अल्झायमरलाच बळी पडले. प्रस्तुत आत्मकथन ‘पानगळीच्या आठवणी’च्या लेखिका शोभा चित्रे यांचे सासरे विष्णू केशव चित्रे हेही अल्झायमरचे बळी ठरले. वास्तविक भाई चित्रे म्हणजे कुणी प्रसिद्ध व्यक्ती नव्हते. त्यांची सारी हयात बडोद्यात गेली. लेखिका शोभा चित्रे या मूळच्या मुंबईकर लग्न होऊन बडोद्याला गेल्या. तिथून प्रथम लंडन, मग अमेरिकेत न्यू जर्सी आणि आता वॉशिंग्टनला स्थिरावल्या आहेत. सासू-सासरे त्यांच्याकडे वॉशिंग्टनला गेलेले असताना प्रसंगाप्रसंगाने लेखिकेला जाणीव होते की, आपल्या सासऱ्यांना अल्झायमर झाला आहे. पण लेखिकेने आत्मकथनाची सुरुवात इथपासून केलेली नाही. तिच्या लग्नापूर्वी तिच्या माहेर-सासरचे संबंध कसे होते इथपासून सुरुवात करून दोन मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांच्या नातेसंबंधाचं अतिशय हृद्य असं चित्र तिथे उभे केलं आहे. त्यामुळे ते आत्मनिवेदन न राहता एका प्रातिनिधिक मराठी कुटुंबाचं चित्रण बनून जातं आणि वाचकाच्या मनात सहसंवेदना निर्माण करतं, मग अल्झायमरचे बळी ठरलेले भाई चित्रे हे फक्त लेखिकेचे सासरे न उरता, सगळ्याच वाचकांचे कुणी आप्त बनून जातात. लेखिकेच्या मांडणीतला अस्सलपणा पानगळीच्या आठवणीला वाचनीय बनवून जातो. तर दुसरीकडे ‘एक दिवस’ या कथासंग्रहातल्या कथा ठराविक साचेबंद वळण घेताना दिसतात. म्हणजे असं की, कथांचा एकूण बाज मराठी मासिकामधल्या नेहमीच्या कथांसारखाच, फक्त पार्श्वभूमी महाराष्ट्राऐवजी अमेरिकेची म्हणजे निसर्गवर्णनांमध्ये उन्हाळ्या-पावसाळ्याऐवजी अमेरिकेतला हाडं फोडणारा हिमवर्षाव. सुट्टीत शिमला, कुलू, मनाली, दार्जिंलिंगच्या वर्णनाऐवजी अलास्का किंवा नायगाराची वर्णनं, नोकरदार स्त्री-पुरुष लोककला लटकून कामावर जाण्याऐवजी स्वत:च्या गाडीतून जातात इत्यादी. वास्तविक अमेरिका हा एक अफाट विस्ताराचा. सतत अनंत उलाढाली चालू असणारा देश आहे. खुद्द अमेरिकेतल्या लेखक-लेखिकांच्या विषय निवडीचा पल्ला अक्षरश: थक्क करून सोडणारा आहे. जीवनाच्या हर एक क्षेत्राला ते अतिशय ताकदीने शब्दबद्ध करून वाचकांपुढे मांडताना दिसतात. मग गेली किमान ३५-३६ वर्षे अमेरिकेत वास्तव्य करून आलेल्या लेखिका शोभा चित्रे यांच्या कथालेखनात तेच ते, संकुचित मराठी मानसिकता दाखवणारे अनुभव का येतात, असा प्रश्न जाणत्या वाचकाला पडतो. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांमध्येही वेगवेगळ्या बुवा, महाराज, माताजी, माई यांचं प्रस्थ वाढताना पाहून लेखिका सचित होते. तिची कथानायिका अशा अंधश्रद्धा नवऱ्याला घटस्फोट देते. गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजे अगदी स्वामी विवेकानंदांच्या काळापासून अनेक हिंदू आध्यात्मिक संस्था अमेरिकेत उत्तम कार्य करीत आहेत याची दखल लेखिका का बरं घेत नाही? आणि खुद्द अमेरिकन माणसंही अंधश्रद्ध नाहीत असं कुठे आहे? सामान्य माणसांनी चर्चच्या मिशनऱयांनी त्याचा गैरफायदा घेत लहान मुलांवर केलेले अत्याचार यांच्या कहाण्या रोज तिथे बाहेर येत आहेत. लेखिका याचीही दखल घेताना दिसत नाही. एकंदरीत ‘पानगळीच्या आठवणी’ आवर्जून वाचनीय, तर ‘एक दिवस’ सामान्य दोन्ही पुस्तकांची मांडणी, मुद्रण, मुखपृष्ठ आदी तांत्रिक अंगे सुबक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more