FOR FASHION JOURNALIST LAUREN ("LOLO") SCRUGGS, A SHORT FLIGHT TO LOOK AT CHRISTMAS LIGHTS TURNED INTO A NIGHTMARE WHEN SHE WAS STRUCK BY THE PLANE`S SPINNING PROPELLER BLADES. AS LAUREN WAS RUSHED TO THE HOSPITAL, THE WORLD WATCHED IN SHOCK AND HORROR. SEVERAL MAJOR SURGERIES AND THOUSANDS OF PRAYERS LATER, LAUREN WAS STILL ALIVE. BUT SHE HAD SUFFERED BRAIN TRAUMA AND LOST HER LEFT HAND AND LEFT EYE. AND SHE HAD TO FACE SOME INCREDIBLY DIFFICULT QUESTIONS: WHAT KIND OF FUTURE WILL I HAVE? WHERE IS GOD IN ALL THIS PAIN? WILL ANYONE EVER BE ABLE TO LOVE ME NOW? IN STILL LOLO, LAUREN AND HER FAMILY REVEAL WHAT REALLY HAPPENED THAT NIGHT, WHAT LAUREN`S LIFE IS LIKE TODAY, WHAT GOT THEM THROUGH THEIR JOURNEY TOWARD HEALING, AND HOW THEY CONQUERED ALL ODDS TO PERSEVERE AS A FAMILY. CONTAINING EXCLUSIVE PHOTOS AND PERSONAL STORIES FROM LAUREN AND HER FAMILY, STILL LOLO IS A COMPELLING AND FIERCELY BEAUTIFUL ACCOUNT OF FAITH, DETERMINATION, AND STAYING TRUE TO WHO YOU ARE--NO MATTER WHAT.
"ख्रिसमसनिमित्त केलेली शहरातील रोषणाई पाहण्यासाठी फॅशन जर्नालिस्ट लॉरेन ऊर्फ लोलो त्या लहानशा विमानात फेरफटका मारण्यासाठी बसली खरी; पण ती रात्र तिच्यासाठी काळरात्रच ठरली. कारण विमानातून उतरताना विमानाच्या प्रोपेलरच्या फिरणाऱ्या पात्यांमध्ये येऊन तिचा भयंकर अपघात झाला.
आपल्या प्राणांसाठी झगडणाऱ्या जखमी लॉरेनला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेत होते, तेव्हा जणू सगळं जगच धक्का बसल्याप्रमाणे स्तिमित होऊन पाहत होतं. कित्येक मोठ्या शस्त्रक्रियांनंतर आणि हजारो जणांच्या प्रार्थनांनंतर लोलो जिवंत राहिली. पण तिच्या मेंदूला जबर मार बसला होता आणि या अपघातात तिनं आपला डावा हात आणि डोळा गमावला होता. जिथं बाह्य सौंदर्याला प्रचंड महत्त्व दिलं जातं, अशा फॅशनच्या क्षेत्रातच काम करणाऱ्या सुंदर लॉरेनचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं, असं अनेकांना वाटलं होतं.
पण ते चूक होतं !
‘स्टिल लोलो’ या पुस्तकात लॉरेन आपल्याला सांगते की, त्या रात्री नेमकं काय घडलं, या भयंकर अपघातातून ती कशी वाचली आणि बाहेर आली, आणि आज तिचं आयुष्य कसं आहे... तिच्यासमोर उभ्या असलेल्या अत्यंत अवघड प्रश्नांचीही ती न डगमगता, प्रामाणिकपणे उत्तरं शोधायचा प्रयत्न करते- माझं आता भवितव्य काय?
या प्रकारानंतर कोणी माझ्यावर प्रेम करेल की नाही? या सगळ्या वेदनादायी प्रवासात देव कुठं आहे?
भयविरहित जीवन कसं जगावं, आणि आयुष्यात कोणतीही संकटं, आव्हानं समोर आली तरी त्यावर कशी मात करायची, हे तिच्या जीवनकहाणीतून लॉरेन आपल्याला सांगते.
लॉरेन आणि तिच्या कुटुंबाची ही सुंदर कहाणी- ‘स्टिल लोलो’ आपल्याला बरंच काही सांगून जाते- श्रद्धा, जिद्द, चिकाटी आणि काहीही झालं तरी आपलं स्वत्व जपण्याची आस !
"