* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EK PAYARI VAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983371
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DREAMS ARE DREAMS AND CANNOT BE NAMED AS TRUTH OF LIFE, NONETHELESS EVERYONE ENJOYS THEM. STILL, SOMEONE SOMEWHERE GATHERS THE STRENGTH TO COME OUT OF THESE DREAMS AND START JOURNEY IN THE UPWARD DIRECTION, IN SEARCH OF EVOLUTION JUST ONE STEP AT A TIME ON THE STEEP STAIRCASE, DIFFICULT, BREATHTAKING, TIRING STILL JUST ONE MORE STEP EVERY TIME .THAT IS LIFE A FEELING OF SUFFOCATION FROM EVERY SIDE, AND NO IT IS NOT JUST A FEELING. IT IS THE FAILING OF MIND AND BODY AND SOUL. WHAT IS NEEDED THE MOST? JUST SOME FRESH AIR TO FILL MY LUNGS. I WANT TO COME OUT OF ALL THE SUFFERINGS. I AM DYING FOR A TOUCH OF LOVE, A GESTURE OF CONCERN. AND HOW I WANT IT; I AM TRUDGING ALONG THE WAY, MY FEET ARE SWOLLEN, MY SOLES ARE CRACKED. HOW I WISH TO FLOAT ON THE AIR NOW, LIKE A FREE BIRD. I AM TIRED OF THESE BOMBARDING WORDS AND FIGHTS THAT FOLLOW. I AM DYING FOR THE WORDS FULL OF CARE.. THERE IS NO END TO THESE HOPES AND YET THEY ALL SEEM TO BE VACUOUS, I JUST WANT A FIRM MIND AND SOME LIFE AROUND ME JUST TELL ME ONE THING, WILL YOU GIVE ME SOME FREE AIR, SOME LOVE AND SOME CONCERN AND NO MORE INDIFFERENCE WILL YOU OFFER ME A PATH LINED WITH PETALS AND NOT THORNS WILL YOU WHISPER IN MY EARS WITH LOVE AND NOT SHOUT WITH HATREDS. WILL YOU TAKE ME WITH YOU FAR AWAY FROM FEAR.? WILL YOU?
हा संसार! इतकुसा, एवढासा! अनादि-अनंत काळापासून सुरू झालेला सांसार. ह्या संसारात अगणित लहान लहान संसार! ह्या संपूर्ण संसाराची, चराचराची समजा एक मोठ्ठी रेषा आखली ती रेषा म्हणजे काळाची रेषा! ह्या रेषेला प्रत्येकाच्या संसाराची एक रेषा, इवलीशी, तुटक-तुटक! खरं तर रेषा आखता येणारच नाह एखादं टिंबच द्यावं लागेल. त्या टिंबात शिरायचं. तो स्वत:चा संसार! त्यासाठी मग घर, अन्न, धान्य, कपडा-लत्ता, मुलं. मग मुलांची लग्नं. म्हणजे अजून एक टिंब तयार करायचं. त्यात जा-ये करायची. त्या टिंबाला स्वतंत्र आयुष्य द्यायचं नाही आणि आपलं टिंब सोडायचं नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarGauri Savale

    अगदीच अचानकपणे वाचनात आलेले हे पुस्तक. कथा तर उत्तम. शेवटपर्यंत खिळवून ठेवते. एखाद्याचा संसार नीट होण्यात किंवा मोडण्यासाठी फक्त पती पत्नी कारणीभूत नसतात. तसेच केलेल्या चुका सुधारून पण स्वतःचा स्वाभिमान जपून केलेल्या तडजोडी लेखिकेने खूप बारकाईने या स्व गोष्टी उत्तम वर्णनासहित मांडल्या आहेत. नक्की वाचा. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - 18 MAY 2018

    अनुभवांचे अवकाश... आपल्या प्रत्येकाचा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. लहानपणापासून आपल्याला आलेले अनुभव, आपलं राहणं, जगणं, भवताल यातून तो तयार झालेला असतो. एखादी गोष्ट एकाला चुकीची वाटत असेल, तर तीच गोष्ट दुसऱ्याला अगदी बरोबर वाटत असते, कारण तयामागे असणारे आपापले अनुभव. जीवनाविषयी, अनुभवाविषयी आणि त्यातून घडत जाणाऱ्या व्यक्तींविषयी स्वाती चांदोरकर यांनी आपल्या ‘एक पायरी वर’ या कादंबरीमध्ये लिहिले आहे. ‘एक पायरी वर’ या कादंबरीत वैष्णवीची गोष्ट सांगितली आहे. वैष्णवी ही आजच्या कनिष्ठ वर्गात वाढलेल्या मुलींचे प्रतिनिधित्व करते. मुंबईहून दूरच्या उपनगरात जन्मलेली, एका खोलीत आई-वडील, भावंडांसह मोठी झालेली देखणी वैष्णवी, मात्र महत्त्वाकांक्षी. कॉलेजमध्ये गेल्यावर मुंबईतल्या चकचकीत वातावरणाला भुललेली. त्यातून ती शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्नाच निर्णय घेते. पुढे तिला मुलं होणं, तिच्या नवऱ्याचं वागणं, सासू-सासऱ्यांच्या अपेक्षा, वैष्णवीच्या अपेक्षा आणि त्यातून तिचं घराबाहेर पडणं अशी कथा पुढे सरकत राहते. कथेच्या अनुषंगाने वैष्णवी, तिची मैत्रीण शमी, शमीचा नवरा विहंग, वैष्णवीचा मित्र मिहिर, नवरा प्रतोष, मुलं सागर आणि सुषमा, तिच्या सासूबाई, नणंद गौरी, तिचा नवरा अशी पात्रं या इथे वाचायला मिळतात. प्रत्येकाचा स्वत:च्या आयुष्याबद्दल तसाच वैष्णवीबद्दल एक दृष्टिकोन आहे, तो त्यांच्या त्यांच्या अनुभवातून आलेला. वैष्णवीने तरुणपणापासून ते कादंबरीच्या अखेरपर्यंत घेतलेले निर्णय आणि त्यामागची भूमिका तिच्या विचारांतून उलगडत जाते, मात्र लेखिकेने कुठेही तिच्या विचारांचे समर्थन केले नाही की तिला पूर्ण चुकीची ठरवलेली नाही. फक्त ती कशी हे तिच्या आणि इतरांच्या नजरेतून, विचारांतून समजत जाते. वैष्णवीला तिच्या वयोपरत्वे आलेले अनुभव, त्यातून तिला आलेली समज, तिच्या प्रत्येक कृतीमागचं वास्तव यातून ती एक एक पायरी वरवर चढत असते. ही पायरी तिला अनुभवांतून मिळालेली असते तशीच तिने केलेल्या चुकांमधूनही. स्वाती चांदोरकर या व.पु. काळे यांच्या कन्या. त्यांच्या लेखनावर वपुंच्या लेखनशैलीचा प्रभाव जाणवत राहतो. कादंबरीतल्या प्रत्येक पात्राचं स्वत:चं असं तत्त्वज्ञान आहे. कथेत स्वामीजीही आहेत, त्यांचं तत्त्वज्ञानही आहे. वपुंच्या लेखनात त्यांचे प्रत्येक पात्र काही ना काही तत्त्वज्ञान सांगून जातं, तसाच वाचनानुभव ‘एक पायरी वर’ वाचताना येतो. -रेश्मा भुजबळ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more