* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A KIDNAPPED MIND
  • Availability : Available
  • Translators : SUSHMA JOSHI
  • ISBN : 9788184989885
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 272
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
HOW DO WE BEGIN TO DESCRIBE OUR LOVE FOR OUR CHILDREN? PAMELA RICHARDSON SHOWS US WITH HER PASSIONATE MEMOIR OF LIFE WITH AND WITHOUT HER ESTRANGED SON, DASH. FROM AGE FIVE DASH SUFFERED PARENTAL ALIENATION SYNDROME AT THE HANDS OF HIS FATHER. INDOCTRINATED TO BELIEVE HIS MOTHER HAD ABANDONED HIM, AFTER YEARS OF MONITORED PHONE CALLS AND IMPEDED ACCESS EIGHT-YEAR-OLD DASH DECIDED HE DIDN’T WANT TO BE "FORCED" TO VISIT HER AT ALL; LATER HE TOLD HER HE WOULD NEVER SEE HER AGAIN IF SHE TOOK THE CASE TO COURT. BUT HE DIDN’T COUNT ON HIS INDEFATIGABLE MOTHER’S FIERCE LOVE. FOR EIGHT MORE YEARS PAMELA BATTLED DASH’S FATHER, THE LEGAL SYSTEM, THEIR PSYCHOLOGIST, THE SCHOOL SYSTEM, AND DASH HIMSELF TO TRY AND PROTECT HER SON - FIRST FROM HIS FATHER, THEN FROM HIMSELF. A KIDNAPPED MIND IS A HEARTRENDING AND MESMERIZING STORY OF A CANADIAN MOTHER’S EXILE FROM AND REUNION WITH HER CHILD, THROUGH GRIEF AND BEYOND, TO PEACE.
आईचा आपल्या मुलाबद्दलचा शोक आणि ’पालकदुराव्याची लक्षणे’ (पॅरेन्टलएलिनेशनसिंड्रोम - पी.ए.एस.) सांगणारी ही दुपदरी कहाणीआहे. 1985 मध्ये डॉ.रिचर्ड गार्डनर यांनी ’पीएएस’ प्रथम उजेडात आणला. मुला बद्दलचा कस्टडीचा वाद आणि तदनुषंगाने मुलाला पढवणे, दुसर्या जोडीदाराबद्दल मुलाच्या मनात विष कालवणे (इतकंकी, ते पढवलेले विचार शेवटी त्या मुलाला स्वत:चेच वाटू लागतात.) यामुळे त्या मुलाचे मानसिक संतुलन ढासळते. यालाच ’पीएएस’ नाव दिले गेले. पॅमेला रिचर्डसनचा मुलगा डॅश हा त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून पीएएसपीडित होता. याला कारण त्याचा बापच होता. फोनवरचे निर्बंध आणि अॅक्सेसमध्ये आणलेले अगणित अडथळे याकडे दुर्लक्षकरून, ’आपल्या आईने आपल्याला टाकून दिलं, तिने विश्वासघात केला,’ हे डॅशच्या मनावर हरतर्हेने बिंबवले गेले. आणि आठ वर्षांच्या डॅशने ठरवले की, आईकडे जाण्यासाठी त्याच्यावर बळजबरी करू नये. शेवटीतर त्याने आईला असे ही सांगितले की, ’जर आई कोर्टात गेली, तर तो तिचे तोंडही पाहणार नाही.’ यानंतरची आठ वर्षे डॅशचा बाप, न्यायव्यवस्था, मानसोपचार- तज्ज्ञ, शिक्षण व्यवस्थायासार्यांशी पॅमेला झुंजत राहिली.आपल्या मुलाचा त्याच्या बापापासून आणि शेवटी त्याचा त्याच्या स्वत:पासून बचाव करण्यासाठी झगडत राहिली.

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDBOOKS #AKIDNAPPEDMINDMARATHI #TRUESTORIES #SUSHMAJOSHI
Customer Reviews
  • Rating StarDaily Aikya 7-5-17

    मुलं या जगात येतात तेव्हा ती त्यांच्या पालकांवर, त्यांच्या प्रेमावर पूर्णतया विसंबून असतात. मुलांचं पालन पोषण करण्याची पद्धती, क्षमता या वेगवेगळ्या असतात. पण बहुतेक जण हे आयुष्यभराचं काम यशस्वीरित्या पार पाडतात. तथापि काही मुलांना मात्र असं पालकांचं ुख मिळत नाही. काही आई वडिलांना त्यांच्या शारीरिक, मानसिक अक्षमता, आजारपणं, व्यसनाधीनता, गुन्हेगारी, गरिबी, युद्ध अशा अनेक कारणांमुळे मुलांचे संगोपन करता येत नाही. अशावेळी या परिस्थितीतील मुलांचे पालन-पोषण कुटुंबातील इतर व्यक्ती, त्या कुटुंबाचे मित्रमंडळ, शेजारी किंवा सामाजिक संस्था याकडून केले जाते. पण काही वेळा असेही पालक आढळतात, की ते आपल्या मुलांचं रक्षण, संगोपन, शिक्षण, मार्गदर्शन करण्यास अपयशी ठरतात. आई-वडील झालेली ही मंडळी काही असमर्थ किंवा पुरेशी साधनसामग्री नसलेली अशी अजिबात नसतात. उलट ही मंडळी पालकत्व सोडलं तर स्वच्छ विचारांची, हिकमती, जीवनाच्या इतर क्षेत्रात कार्यक्षमत असतात. या मंडळींचे मुलांवरचे प्रेम, आस्था विचारात घेतली, तर या पालकांपेक्षा या व्यक्ती स्वतःच्या गरजांकडे अधिक लक्ष देतात. आणि त्यांच्या या स्वतःबद्दलच्या निष्ठेमुळे ही मंडळी इतरांपेक्षा वेगळी वाटतात. स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या भरात संबंध, नाते नष्ट करतात. मग त्यासाठी कसलीही किंमत मोजण्यास त्यांची तयारी असते. पॅमेला रिचर्डसनच्या ‘अ किडनॅप्ड माइंड’ या पुस्तकात तिने आपल्या मुलाची मानसिक पडझड आणि परिणामी त्याची आत्महत्या हे सारं नोंदवलं आहे. ही एक व्यथित करणारी कहाणी आहे. यात डॅशची जगण्याची धडपड आहे. त्याच्या बापाने आपल्या माजी पत्नीवर सूड उगवण्यासाठी आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आपल्या मुलाच्या गरजाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं होतं. अशा परिस्थितीतील डॅशची धडपड आहे. डॅशला जणू त्याच्या सोळा वर्षांच्या आयुष्यातील अकरा वर्षे मानसिकदृष्टया ओलीस ठेवलं गेलं होतं. ‘अ किडनॅप माइंड’ ही केवळ एका आईची, तिचा कटू घटस्फोट आणि कस्टडी, यानंतर मुलाची कस्टडी मिळवण्याची लढाई यांची कहाणी नाही. एखाद्या मुलाचा दोन्ही पालकांवर प्रेम करण्याचा आणि दोघांकडून त्याच्यावर प्रेम करवून घेण्याचा हक्क हिरावून घेतल्यामुळे त्याची जी भावनिक हानी होते. त्या हानीची ही कहाणी आहे. न्याय व्यवस्थेचं मुलांच्या गरजांकडे केलं जाणारं दुर्लक्ष, याची ही कथा आहे. आई-बापाच्या उबदार प्रेमाचा अनुभव घेतलेल्या आनंदी निरोगी मुलाला, पद्धतशीरपणे एका पालकाच्या प्रेमापासून का तोडलं जातं, त्या कारणांचा कायद्याच्या मूलभूत चौकटीच्या पलीकडे जावून शोध घेण्याची न्यायव्यवस्थेची अनास्था या कथेत आहे. डॅशची कथा ही ‘पालक दुराव्याचे’ मानसिक कटुतम दुष्पपरिणाम सोसण्याचे प्रतिनिधित्व करते. ‘पालक दुराव्याचे दुष्परिणाम’ हे कस्टडी केसमधले ‘जोड उत्पन्न’ आहे. आपल्या माजी जोडीदाराला धडा शिकवणे, हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवल्याने आपल्या पाल्याच्या आनंदाकडे, भल्याकडे दुर्लक्ष करणारे अनेक पालक आहेत. त्यामुळे कित्येक मुलांना हे दुःख भोगावे लागत आहे. हे पालक मूल आणि दुसरा पालक यांच्यातील नातेसंबंध मुद्दाम नष्ट करत असतात. घटस्फोटानंतर ‘संयुक्त कस्टडी’ हा चांगला पर्याय आहे असा विचार १९८० नंतर कोर्टाने केला. पण तेव्हापासून त्या घटना वारंवार घडत असल्याने संबंधित व्यावसायिकांच्या लक्षात येत आहे. पालक दुराव्याचे मानसिक दुष्परिणाम ही बाब विवाद्य झाली आहे. कारण ‘जस्टीस फॉर चिल्ड्रेन’आणि नॅशनल अलायन्स फॉर फॅमिली कोर्ट अशा सारख्या इतर काही घटकांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी ही बाब अस्तित्वात नाही, असे मत व्यक्त केले आहे. माझा विश्वास आहे, की हे पुस्तक काही दृष्टिकोन देईल. घटस्फोटित पालकांची मुलं शिक्षणात अयशस्वी ठरतात. मग हे शिक्षण उपपत्तीवर वा निरीक्षणावर आधारलेलं असो. अशा मुलांच्या गरजांकडे बघण्याची व्यापक आणि वेगळी दृष्टी अ किडनॅप्ड माइंड या पुस्तकामुळे मिळेल, असा मला विश्वास आहे. या कारणामुळेच हे पुस्तक न्यायाधीश, कुटुंब वकील आणि घटस्फोटित कुटुंबाचे सर्व संबंधित यांनी जरूर वाचले पाहिजे. आपल्या मुलाला त्याच्या आयुष्यभर, त्याच्या मदतीसाठी आणि नंतर त्याचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये यासाठी पॅमेला रिचर्डसनने दाखवलेली ताकद, केलेला पाठपुरावा आणि तिची बांधिलकी याची मी प्रशंसा करते. या उत्तम पुस्तकाला हातभार लावण्याची संधी मिळाली, हा माझा सन्मानच समजते. ...Read more

  • Rating StarSAKAL 5-6-16

    ‘अ किडनॅप्ड माइंड’ या इंग्रजी पुस्तकाचा ‘एका मातेचा लढा’ हा मराठी अनुवाद सुषमा जोशी यांनी केला आहे. पॅमेला रिचर्डसन यांनी इंग्लिशमध्ये ही सत्यकथा लिहिली आहे. घटस्फोट, घटस्फोटित पालक, त्यांची मुलं हे आता जगभरातलं सर्वत्र दिसणारं ओळखीचं समाजचित्र आहे. टस्फोट घेताना सहजीवनाची होणारी पडझड, कुटुंब, आई-वडील-भावंडं यांच्याबरोबर एकत्र जगण्याचा संपणारा प्रवास हा वेदनादायक अनुभव असल्याची जाणीव ‘एका मातेचा लढा’ या सत्यकथनातून होते. घटस्फोट घेतल्यानंतर मूल आईकडं राहणार, की बाबांकडं? हा कळीचा प्रश्न असतो. आई-वडील विभक्त झाल्यानंतर ‘मूल,’ मुलावरचा हक्क ही त्या दोघांमध्ये स्पर्धा, असूयेची, कुरघोडीची, विजयाची गोष्ट होते. मुलाची वाढ, त्याचं संगोपन, त्याचं भावविश्व, त्याचं मोठं होणं या गोष्टींना मुलाचा ताबा या प्रकरणात दुय्यम स्थान प्राप्त होतं. अपत्य हे घटस्फोटित पालकांचं सूड उगवण्याचं हक्काचं साधन होतं. आई किंवा वडील खूप वाईट आहेत. आणि माझ्या सांगण्याप्रमाणे वागायचं, बोलायचं हे त्या मुलाला वारंवार सांगितल जातं. या प्रकारामध्ये मुलाचं कोवळं, निरागस भावविश्व विस्कटून जातं. त्याला खूप मानसिक, भावनिक दडपण सहन करीत जगावं लागतं. हा दबाव सहन झाला नाही तर ही मुलं स्वत:वर, शाळेतल्या मुलांवर, एकूणच जगावर चिडतात. प्रसंगी कमालीची क्रूर होतात. या पुस्तकात घटस्फोटित आईच्या नजरेतून मुलांच्या उद्ध्वस्त भावविश्वाची, त्याच्या मनावरील प्रचंड दबावाची, त्यातून घडणाऱ्या त्याच्या आचरणाची कहाणी सांगितलेली आहे. घटस्फोटीत पालकांच्या आचरणाची कटुता मुलाला एकलकोंडा, निराश तर करतेच. पण त्याचं भावनिक-मानसिक संतुलन नष्ट करते. अशा मुलाचं जगणं हे त्याचे पालक, नातेवाईक, शाळा यांच्यासमोरची एक समस्या बनते. याचंच चित्रण इथं केलंय. घटस्फोटित पाल्याचा आत्महत्या करण्याच्या दिशेने होणारा प्रवास यातून स्पष्ट होतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more