* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEATH OF A SOLDIER
  • Availability : Available
  • Translators : VINITA JOGLEKAR
  • ISBN : 9788184986822
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ON 12 MAY 2009 MARGARET EVISON`S SON LIEUTENANT MARK EVISON OF 1ST BATTALION, THE WELSH GUARDS, DIED OF WOUNDS SUSTAINED WHILST LEADING A PATROL IN HELMAND PROVINCE. HAILED A HERO, MARK`S DEATH WAS A NATIONAL SACRIFICE, HIS GRAVE TO BE ONE OF MANY IN THE IDENTICAL, ORDERED ROWS IN A MILITARY CEMETERY. BUT TO HIS MOTHER MARGARET IT WAS THE MOST INTIMATE OF GRIEFS. IN DEATH OF A SOLDIER, SHE ATTEMPTS TO RECONCILE HER OWN UNANSWERABLE SENSE OF LOSS WITH THE IDEA THAT HER SON DIED FOR A GOOD CAUSE. WITH HER, WE CONFRONT THE HORROR OF HIS DEATH AND WITNESS HER STRUGGLE TO SEE EPITHETS SUCH AS `HEROIC` AND `NOBLE` AS MORE THAN A MASK TO HIDE THAT UGLINESS. INCLUDED IN THE BOOK IS MARK`S DIARY, KEPT WHILE HE WAS IN AFGHANISTAN AND DELIVERED TO MARGARET AT HOME SOME WEEKS LATER. WIDELY QUOTED SINCE ITS DISCOVERY, IT CONTAINS THE THOUGHTS OF A SENSITIVE YOUNG OFFICER AND SERVES AS A POIGNANT REMINDER OF THE TERRIBLE HUMAN COST OF THE WAR IN AFGHANISTAN. DEATH OF A SOLDIER IS AN EXTRAORDINARILY POWERFUL TRIBUTE TO MARK AND A TESTAMENT TO MARGARET`S GREAT LOVE FOR HIM. IT PAINTS A PORTRAIT OF MARK`S SHORT BUT ACCOMPLISHED LIFE, BRINGING HIS EXTRAORDINARY CHARACTER INTO RELIEF AND UNDERLINING THE LOSS SUFFERED BY ALL WHO KNEW HIM. WHILST THIS IS A BOOK ABOUT THE NATURE OF GRIEF, IT IS ALSO THE STORY OF A MOTHER`S STRUGGLE TO UNDERSTAND HOW AND WHY HER SON CAME TO DIE, AND AS SUCH IT TOUCHES ON ISSUES OF PUBLIC INTEREST. AS MARGARET ELOQUENTLY DEMONSTRATES, THAT MIXTURE OF THE PERSONAL AND POLITICAL IS WHAT UNIQUELY CHARACTERISES THE DEATH OF A SOLDIER. ARTICULATE, REVEALING AND AT TIMES ALMOST UNBEARABLY MOVING, THIS IS AN IMPORTANT REFLECTION ON LOSS, WAR AND OUR RESPONSIBILITES TO THOSE WE SEND TO FIGHT.
सद्यस्थितीत बिनतारी यंत्रणा, पाणी, अन्न आणि वैद्यकीय उपकरणं या सगळ्याचीच येथे कमतरता आहे. या असल्या मोहिमांमध्ये मनुष्यबळाची नेमकी उणीव असते. अत्यंत धोकादायक भागांत दोन आठवडे पुरेल इतकच पाणी, अन्न आणि वैद्यकीय सामग्री घेऊन एखाद्या प्लॅटूनला पाठवणं, हे अगदी लाजिरवाणं आहे. ज्या दुखापती होतील त्यावर मी औषधोपचार करूच शकणार नाही आणि सैनिकांचे बळी जातील. खरंतर ते टाळता येऊ शकतील. हे म्हणजे आम्ही डोंबाऱ्यासारखं दोरावरून चालणंच आहे. योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आम्ही दोरावरून पडण्याची शक्यताच जास्त! भिंतीवर डोक आपटून घेण्यासारखंच आहे हे! मला हे सगळं फारच भयानक वाटतंय; म्हणजे इतक की, भीतीनं मी आजारीच पडेन. आज रात्री मी मॉमजवळ हे सगळं बोलेन आणि त्यानंच कदाचित मला थोडा उत्साह येईल....

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKASAINIKACHAMRUTYU #DEATHOFASOLDIER #एकासैनिकाचामृत्यू #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VINITAJOGLEKAR #MARGARETEVISON "
Customer Reviews
  • Rating StarDr.Pramod Bankhele

    हे पुस्तक मार्गारेट एव्हीसन च एकटीच नव्हे ,त्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मुलांच्या मातांच्या भावनांचं सर्वसमावेशक प्रतिनिधित्व करणार आहे.या पुस्तकामुळे एक प्रश्न मात्र मनात येतोच युद्धात किंवा लष्करी कारवाई मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकाचा सर्व स्तरातून दुखवटा व्यक्त केला जातो कुटुंबाला मदत ही केली जाते.आणि ते योग्य ही आहे पण लष्कराला कमीदर्जाच्या किंवा अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे अपुऱ्या वैद्यकीय सेवेमुळे जर सैनिक गमवावे लागत असतील त्यांचं काय? फार उत्तम म्हणून गौरवलेला "रंग दे बसंती" या चित्रपटात ही हाच प्रश्न उपस्थित केलाय,खर तर बुलेटप्रूफ जॅकेट्स,बर्फाळ प्रदेशात वापरण्याची साधन इत्यादी दर्जाहीन असल्यानं आपण किती सैनिक गमावले?चांगलं अन्न योग्य पुरेश्या आणि तात्काळ उपलब्ध असणारी आरोग्य व्यवस्था जर सैनिकांना मिळत नसतील तर वीर गती प्राप्त झालेल्या सैनिकांना पुष्पचक्र वाहताना यांचे हात कसे थरथरत नाहीत?संरक्षणासारख्या गोष्टीतील त्रुटी दाखवणं म्हणजे देशद्रोही ठरवलं जाण असली भिकार मानसिकता जिथे असेल तिथं बोलायचं तरी कुणी? सामान्यांच्या करावर संरक्षणाच्या नावाखाली देश लुटणार्यांना शाहिद झालेल्या सैनिकांच्या नाव घेताना लाज ही वाटत नाही.म्हणून म्हणतो हे पुस्तक फक्त मार्गारेट च नाही ते जगातील सर्व सैनिकांच्या मातांच ,कुटुंबीयांच आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी युद्धखोरी करणाऱ्या मुळे त्रासलेल्या सगळ्या बाधितांच आहे. ...Read more

  • Rating StarSAMNA 3-7-16

    ११ सप्टेंबर २००१ या दिवशी ओसामा बिन लादेनच्या अल कायद्याने अमेरिकेत हाहाकार उडवला. अल कायद्याच्या उच्चशिक्षित इस्लामी अतिरेक्यांनी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे उद्ध्वस्त केले. याला उत्तर म्हणून अमेरिकेने प्रथम अफगाणिस्तान आणि मग इराकवर ल्करी हल्ला चढवला. तेव्हापासून अमेरिकेची इस्लामी दहशतवादाविरुद्धची आंतरराष्ट्रीय लढाई चालू झाली. ती आजही चालूच आहे. आजही अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात आणि इराकमध्ये गुंतून पडलेले आहे. अफगाणिस्तानातली तालिबानची राजवट आणि इराकमधील सद्दाम हुसेनची राजवट अमेरिकेने संपवली. पण म्हणून तिथे शांतता प्रस्थापित झालेली नाही. अतिरेकी सतत घातपाती हल्ले करत असतात आणि त्यात निरपराध नागरिक, सैनिक मरत असतात. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये उतरलेल्या सैन्यांमध्ये अमेरिकेसोबतच तिच्या दोस्त राष्ट्रांचेही सैनिक आहेत. लेफ्टनंट मार्क एव्हिसन हा असाच एक ब्रिटिश सैन्यातला एक अधिकारी. अगदी तरुण, अवघ्या २६ वर्षांचा लेफ्टनंट मार्क अफगाणी अतिरेक्यांच्या गोळीबारात ठार झाला. लेफ्टनंट मार्क एव्हिसनची आई मार्गारेट एव्हिसन ही मानसोपचार समुपदेशक आहे. मानसिक व्याधीने ग्रासलेल्या लोकांना त्या अवस्थेतून बाहेर काढणे हेच तिचे काम आहे. त्यामुळे मानवी मन हेच तिच्या अभ्यासाचे क्षेत्र आहे. आपल्या पोटच्या मुलाच्या अशा हकनाक मृत्युमुळे तिचे स्वत:चेच मन गलबलून गेले आणि त्यातून ‘डेथ ऑफ ए सोल्जर’ या पुस्तकाची निर्मिती झाली. दोनशे वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या सॅण्डहर्स्ट या लष्करी महाविद्यालयातून मार्क एव्हिसन बाहेर पडला. लगेच त्याला वेल्श गार्ड या पथकात लेफ्टनंट म्हणून नेमणूक मिळाली. अफगाणिस्तान हाजी अलेम या ठाण्यावर प्लॅटून कमांडर म्हणून तो कार्यरत होता. ९ मे २००९च्या सकाळी अतिरेकी लपलेल्या ठिकाणांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करताना तो जबर जखमी झाला. वैद्यकीय उपचारांचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. अशी अनेक कोवळी पोरे रोज फुकट मरतायत. इस्लामी अतिरेक्यांनी संपूर्ण आधुनिक जगाविरुद्धच युद्ध पुकारलंय आणि त्यात अशी पोरे हकनाक बळी जातायत. मार्गारेट एव्हिसनचे हे पुस्तक म्हणजे अशा पोरांच्या आयांच्या विव्हल मन:स्थितीची प्रातिनिधिक कहाणीच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more