* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EKACH PELA SHIVAMBUCHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663778
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE THEME OF THIS BOOK IS A REAL STORY WHICH THE AUTHOR HAS PRESENTED IN THE FORM OF A DRAMA THOUGH THE NAMES OF THE CHARACTERS HAVE BEEN CHANGED. THE MAIN REASON BEHIND WRITING ABOUT SHIVAMBU IN MUCH DETAIL IS THE QUERIES THAT HE WAS GETTING ALL THESE YEARS FROM ALL HIS PATIENTS, THOSE WHO WERE CURED BY THE THERAPY OF SHIVAMBU. AS, IT IS NOT POSSIBLE TO EXPLAIN THE BENEFITS OF SHIVAMBU PERSONALLY TO EVERYBODY, HE HAS PRESENTED IT IN A FORM OF A BOOK. EVERYONE SHOULD HAVE GOOD HEALTH, WHICH IS THE BASIC FOUNDATION OF A HUMAN LIFE. HEALTH MAKES LIFE WONDERFUL. THIS HEALTH CAN BE ACHIEVED ONLY WHILE BEING WITH THE NATURE. SHIVAMBU IS ONE`S OWN URINE. THE DOCTOR CUM AUTHOR HIMSELF HAS FOLLOWED THE THERAPY FOR HIS BENEFIT AND HAS BEEN BLESSED BY IT. HE HAS CURED MANY A PEOPLE WITH THE USE OF THIS THERAPY WITH A FIRM BELIEF THAT NATURE CURE IS THE BEST SOLUTION, A KEY FOR A HEALTHY AND PEACEFUL LIFE. WE ARE A PART OF NATURE. THROUGHOUT LIFE, OR RATHER FROM BIRTH ITSELF WE TRY TO HOLD ONTO SOMETHING. MANY A TIMES, WE FEEL SOMEBODY AS CLOSE ENOUGH, BUT IT IS ONLY AT THE END OF THE LIFE THAT WE REALISE THAT ACTUALLY NOBODY IS FOR ANYBODY. IF WE MINUTELY OBSERVE THE HUMAN LIFE THEN WE WILL REALISE THAT ALL OUR ATTEMPTS ARE IN ONE DIRECTION, TO MAKE THE LAST MOMENT A VERY PEACEFUL AND A HAPPY ONE. THIS PROBLEM IS TOTALLY SOLVED WITH THE DAILY AND REGULAR USE OF SHIVAMBU. AT LEAST, THOSE WHO ARE VERY MUCH WORRIED ABOUT THE SMOOTH END OF THEIR LIFE SHOULD TRY THE SHIVAMBU THERAPY.
निसर्गोपचारा संबंधीच्या अनेक प्रश्नांचा चिंतनशील व मार्मिक विचार या नाट्य-ग्रंथात सहज, सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे. ते केवळ व्याधिग्रस्तांनीच वाचावे असे नाही, तर मुमुक्षूंनीही वाचावे. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीत्व हे तिच्या स्वास्थ्यानुरुप घडत असते आणि शुद्ध निसर्गोपचार हेच शिकवितो. सर्व लोकांना सर्व काळात उपयोगी पडणारा आणि सर्वत्र लागू होणारा असा हा निसर्गोपचार आहे. डॉ. शशि पाटील हे युरोपॅथिस्ट आहेत. ते मूत्रमार्गाने केल्या जाणाऱ्या उपचारांची नाट्यस्वरुपात माहिती देतात. मूत्र हा शब्दही माणसाला किळसवाणा वाटतो. पण त्या मूत्राचे नैसर्गिक महत्त्व डॅक्टर पटवून देतात. एका सत्यकथेवर आधारित ही नाटिका आहे. निर्सगोपचार उपचार पद्धतीने एका रुग्णाच्या आयुष्यात घडलेले बदल या साहित्यकृतीतून समोर येतात. त्यांचा निसर्गोपचार माणसाला खर्या अर्थाने निसर्गाच्या नजीक नेतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKACHPELASHIVAMBUCHA #EKACHPELASHIVAMBUCHA #एकचपेलाशिवाम्बूचा #HEALTHCARE&PSYCHOLOGY #MARATHI #DR.SHASHIPATIL #डॉ.शशीपाटील "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    स्वत:च्या आरोग्यरक्षणाचे प्रत्येकाजवळ असलेले अमोघ साधन... डॉ. शशि पाटील (जन्म - १९४५) हे गेली पंचवीस वर्षे शिवाम्बू योग व निसर्गोपचार केंद्र चालवत आहेत. देहशुद्धीसाठी शिवाम्बू उपचार व मन:शुद्धीसाठी विपश्यना, ध्यानप्रक्रिया या गोष्टी अत्यंत उपयुक्त आेत असा त्यांचा विश्वास आहे. शिवाम्बू म्हणजे स्वमूत्र. त्याच्या प्राशनाने दुर्धर व्याधीतूनही मुक्तता होते हे शेकडो रुग्णांच्या संदर्भात त्यांना आढळून आले आहे; आणि या स्वस्त सुलभ उपचार पद्धतीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ‘एकच पेला शिवाम्बूचा’ हे चार अंकी नाटक लिहिले आहे. नाटकात फारशा घटना नाहीत. केवळ चर्चा आहे. संवादाच्या रूपात माहिती दिली आहे. शिवाम्बू चिकित्सक अनुभवी डॉक्टरांना युवाशक्तीचा प्रतिनिधी कार्यकर्ता योगेश हा दुर्धर रोगाने मरणासक्त झालेल्या अंबूतार्इंवर उपचार करण्यासाठी बोलावतो. या घटनेपासून या नाटकाचा प्रारंभ होतो. अंबूतार्इंचे पती चिंतोपंत, मुलगा अविनाश, अविनाशची पत्नी श्रद्धा, शेजारी नाना ही अन्य पात्रे. शिवाम्बूबद्दलची माहिती वेगवेगळ्या रोगांच्या संदर्भात देण्यात येते. मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, मधुचंद्रदाह, आम्लपित्त, दंतरोग, ल्यूकेमिया, जिभेचा कर्करोग, बद्धकोष्ठता, रक्तदाब, ह्रदयविकार, एडस्, अशा अनेक विकारांमध्ये शिवाम्बूसेवन कसे प्रभावी ठरते हे उदाहरणे देऊन सांगितले आहे. शिवाम्बूचा इतिहास, वेगवेगळ्या देशात होणारा वापर, शिवाम्बूचे घटक, योग्य आहार व निसर्गोपचार, शिवाम्बू घेण्याची पद्धत, प्रमाण, शिवाम्बूचा मसाज इ. अनेक तपशीलही संभाषणाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहेत. शिवाम्बू सेवनाने वार्धक्यही जाणवत नाही; शरीर चैतन्यपूर्ण व तरतरीत राहते. याची पुन:पुन्हा जाणीव देण्याचा कळकळीचा प्रयत्न या संवादात्मक कृतीत केला आहे. मोरारजी देसाई, पी. बी. पाटील, विनोबा भावे, बाळकोबा भावे, रावजीभाई पटेल, वैद्यराज भोगे वगैरेंची मते शेवटी दिली आहेत. मलावरोध हे सर्व रोगांचे आदिकारण आहे; पांढरपेशा वर्गातील ७०/८० टक्के लोक मलावरोधामुळे देहक्लेश भोगत असतात. आपली जीवनप्रणालीही आपल्या आरोग्याला बाधक अशी आहे याकडेही लक्ष वेधणारी टिपणे दिली आहेत. विविध रोगांमध्ये शिवाम्बूचा जो उपयोग होतो त्यावरून शिवाम्बू उपचारप्रणाली कशी गुणकारी आहे, याची यादीही दिली आहेत. शिवाम्बूचे सेवन पतिपत्नी दोघांनी केले तर निपुत्रिकांना ४/६ महिन्यात फलधारणा होऊ शकते, सीझेरियन वा फोर्सेपची पूर्वपीठिका असणाऱ्या गर्भवती महिलांची नैसर्गिकरीत्या प्रसूती होते, एपिलेप्सीचा बंदोबस्त होतो, बाल व वृद्ध यांना एकाच प्रकारचे उपचार लागू पडतात, असेही डॉ. पाटील यांचे प्रतिपादन आहे. एका अभिनव उपचार पद्धतीबद्दल मनात असणाऱ्या सर्व शंका कुशंका दूर करणारे हे पुस्तक आहे. शिवाम्बूच्या महतीबद्दलचे काही संस्कृत श्र्लोकही येथे द्यावेसे वाटतात. शिवाम्बु चामृतं दिव्यं जरारोगविनाशनम् तदादाय महायोगी कुर्यात् वै निजसाधनम् ।।९।। (शिवाम्बू हे दिव्य अमृत आहे. वार्धक्य, रोग यांचा नाश करणारे आहे. महायोग्यांनी याचे प्राशन करून आपली साधना करावी.) मुखशुद्धिं विधायाथ कृत्वा चावश्यकीं क्रियाम् पिबेत् शिवाम्बु विमलं जन्मरोगविनाशनम् ।।१०।। (उठल्यावर मुखशुद्धी इ. क्रिया कराव्या. नंतर मलरहित शिवाम्बूचे सेवन करावे. जन्मापासूनचे रोग नाश पावतात.) मन:शिला यस्तु योगीं चूर्णितान्तु शिवाम्बुके विलेपनादरोग: स्यादंगे कृष्ण शिरोरुह: ।।४३।। (मन:शिलाचे चूर्ण करून शिवाम्बूमधून त्याचा सर्वांगाला लेप लावल्याने योगी रोगमुक्त होतो तसेच त्याचे मस्तकावरचे केस काळेभोर होतात.) निंबस्य पत्रजरसं तन्मिश्रंच शिवाम्बुना य: सेवने योगयुक्तो स भवेदमरोपम: ।।३२।। (निंबाच्या पानांचा रस शिवाम्बूमध्ये घालून सेवन केल्यास योगी, साधक मनुष्य देवाप्रमाणे कांतिमान होतो.) सर्वोपद्रवनिर्मुक्त: सदाशिववपुर्धर ब्रम्हाण्डगोलके क्रीडन् देववत् मोदतो चिरम् ।।३१।। (पथ्यपूर्ण शिवाम्बू सेवनाने माणूस सर्व उपद्रवांपासून मुक्त राहून शंकरासारखे तेजस्वी शरीर प्राप्त करतो; ब्रम्हांडात क्रीडा करीत देवांप्रमाणे सदैव आनंदी राहतो.) ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more