* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EKADASH KATHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984187
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AND THAT BHASKAR… MY HUSBAND? WHO IS HE TO YOU, EH? THAT DISEASED, EMACIATED CHEST…THAT ROTTEN MAN… WHAT DOES HE MEAN TO YOU? HE COVERED UP THE STIGMA YOU MAY HAVE HAD TOP BEAR. BUT WHAT PRICE HAVE YOU PAID FOR IT? HOW ARE YOU TWO GOING TO RECOMPENSE? I AM THE ONE WHO IS PAYING THE PRICE...! WITH MY BODY! MY MIND IS DEAD. I HAVE NEITHER A HOME NOR PARENTS. YOU CAME FEARING THAT HE MAY DISOWN ME. NOT BECAUSE YOU CARED. WHAT KIND OF A MOTHER ARE YOU? YOU, WHO THREW YOUR OWN CHILD TO THE WOLVES? WHY DID YOU EDUCATE ME? WHY DID YOU ALWAYS INSIST THAT I STAND ON MY OWN FEET?... YOU DID NOT WANT ME TO BE LIKE THAT, ISN’T IT?
आणि तो भास्कर... माझा नवरा? कोण लागतोय ग तुझा? तो कुजट छातीचा पिंजरा... तो किडका माणूस... कोण तुझा? तुझ्या नावाला लागणारा कलंक झाकला त्याने म्हणून केवढी विंÂमत दिलीस? तुम्ही काय किंमत चुकवणार? किंमत चुकवतेय मी...! माझ्या शरीराची किंमत! मन मेलं माझं. मला ना घर आहे ना आईबाप. तो मला नांदवणार नाही या भीतीने आलात तुम्ही. माझी काळजी आहे म्हणून नाही. कशी आई आहेस तू? पोटचा गोळा असा लोकांसाठी खाईत टाकलास? कशाला शिकवलं मला? कशाला सारखं स्वत:च्या पायावर उभं रहा म्हणत होतीस? अंधारे बोचरे धरून डोळे पुसायचीस तू - तुला मी तशी व्हायला नको होते ना?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKADASHKATHA #EKADASHKATHA #एकादशकथा #SHORTSTORIES #MARATHI #CHHAYAMAHAJAN #छायामहाजन "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more