* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"ONE AMAZING STORY. TWO DIFFERENT ENDINGS. AT THE END OF PERUMAL MURUGAN’S TRAILBLAZING NOVEL ONE PART WOMAN, READERS ARE LEFT ON A CLIFFHANGER AS KALI AND PONNA’S INTENSE LOVE FOR EACH OTHER IS TORN TO SHREDS. WHAT IS GOING TO HAPPEN NEXT TO THIS BELOVED COUPLE? IN A LONELY HARVEST-ONE OF TWO INVENTIVE SEQUELS THAT PICK UP THE STORY RIGHT WHERE ONE PART WOMAN ENDS-PONNA RETURNS FROM THE TEMPLE FESTIVAL TO FIND THAT KALI HAS KILLED HIMSELF IN DESPAIR. DEVASTATED THAT HE COULD PUNISH HER SO CRUELLY, BUT CONSTANTLY HAUNTED BY MEMORIES OF THE HAPPINESS SHE ONCE SHARED WITH KALI, PONNA MUST NOW LEARN TO FACE THE WORLD ALONE. WITH POIGNANCY AND COMPASSION, MURUGAN WEAVES A POWERFUL TALE OF FEMALE SOLIDARITY AND SECOND CHANCES."
"पेरुमल मुरुगन यांच्या वन पार्ट वुमन (माधुरोबागन) या कादंबरीच्या घवघवीत यशानंतर काली आणि पोन्ना यांच्या उत्कट प्रेमाच्या अशा चिंध्या उडालेल्या पाहून वाचक विमनस्क होतात. या प्रेमी जोडप्याचं पुढे काय होणार? माधुरोबागन जिथे संपतं तिथूनच ‘एकाकी सुगी’ (अ लोनली हार्वेस्ट - आलवायन) ही कादंबरी सुरू होते. दोन उत्तरार्धांपैकी एक असणार्‍या या कादंबरीत पोन्ना मंदिरोत्सवातून परत येते आणि कालीने स्वत:ला नैराश्येपायी संपवल्याचं तिला दिसून येतं. त्याने इतक्या क्रूर पद्धतीने शिक्षा केल्याने पोन्ना जरी उद्ध्वस्त होते तरी त्याच्या बरोबरच्या मधुर आठवणींनी ती सतत झपाटलेली असते. या जगाला एकटीने तोंड द्यायला शिकणं तिला भाग असतं. करुणा आणि मार्मिकता यांच्या मिश्रणातून मुरुगन आपल्यासमोर स्त्रियांचा खंबीरपणा आणि आयुष्य पेलण्याची क्षमता यांची सुरेख गुंफण मांडतात."
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #एकाकी सुगी #पेरुमलमुरुगन #तामिळ #कादंबरी #शुचिताफडके #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #LOVESTORY #MARATHINOVEL #MEHTAPUBLISHINGHOUSE #PERUMALMURUGAN #SHUCHITAPHADAKE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more