* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789392482984
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2022
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHRIDHAR, CHARULATA, YASHWANT...THEIR LIVES MOVE IN TOTALLY DIFFERENT ORBITS … THEIR PROBLEMS AND CIRCUMSTANCES ARE COMPLETELY DIFFERENT FROM EACH OTHER WITH ONLY ONE SIMILARITY - THEIR CIRCUMSTANCES HAVE LEFT ONLY ONE ALTERNATIVE FOR THEM – TO PERISH!! ..BUT THEY HAVE IMMENSE DETERMINATION AND INSPIRATION TO SURVIVE ... THE FAST MOVING PLOT OF EKE DIWASHI ELEGANTLY REVEALS THE RELATIONS BETWEEN CORPORATE CONGLOMERATES, POLITICS, CRIME AND FINANCIAL SCAMS…IT MAKES THE READER FEEL THE IMPACT OF THE NEXUS ON COMMON MAN’S LIFE AND TOUCHES HIS EMOTIONS… MESMERIZING TALE WITH NOVEL PLOT AND GENUINE DETAILS CONTRIBUTES A LOT TO READERS LIFE KEEPING HIM ENGROSSED AND ENTERTAINED THROUGH OUT…
श्रीधर, चारुलता, यशवंत, या तिघांचं आयुष्य एकमेकांपासून संपूर्ण वेगळं आहे. त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यांच्यामध्ये परिस्थितीशी संघर्ष करण्याची प्रचंड जिद्द आणि प्रेरणा आहे. परिस्थितीने समोर ठेवलेल्या सर्वनाशाच्या एकमेव पर्यायाला धुडकावून लावत ते परिस्थितीलाच आव्हान द्यायला उभे ठाकले आहेत. या अत्यंत वेगवान आणि उत्कंठावर्धक कथानकात मराठी वाचकांना फारसे परिचित नसलेले जग अनुभवायला मिळते. कथानकाचे नावीन्य आणि विषयाचे खुमासदार तपशील वाचकांचे मनोरंजन करत, कुठलाही अभिनिवेश न आणता, त्यांना खूप काही देऊन जातात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#EKEDIWASHI #GIRISHWALAVALKAR #MARATHINOVEL #MARATHIBOOK #MEHTAPUBLISHINGHOUSE #ONLINEBOOK #MARATHITRANSLATIONS #एकेदिवशी #गिरीशवालावलकर #कादंबरी #मराठीपुस्तके #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीअनुवाद #ऑनलाइनपुस्तके ---------------
Customer Reviews
  • Rating Starकोकण शिल्प - सप्टेंबर २०२२

    उत्कंठावर्धक, वाचनीय कादंबरी … एके दिवशी ही डॉ. गिरीश वालावलकर `यांची कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतीच देखण्या रूपात प्रकाशित केली आहे. या कादंबरीचे समर्पक, देखणे आणि रंगीत मुखपृष्ठ सतीश भावसार यांचे आहे. महामुंबईमध्ये `दिवस उलटताना`मध्ये सुुवातीलाच कादंबरीची झलक तीन-चार परिच्छेदांतून व्यक्त होते आणि वाचकांचे कुतुहल जागे होते. श्रीधर लिमये हा तरुण अतिशय हुशार, केमिकल इंजिनिअर, मुंबईत येऊन स्वतः चा व्यवसाय सुरु करतो. ऊसाच्या रसापासून रंग बनवण्याचे तंत्रज्ञान त्याने विकसित केले. विशेषतः लोखंडावर हा रंग दीर्घकाळ झळाळी देतो. उत्पादन खर्च कमी, त्यामुळे तुलनेने त्याच्या रंगाच्या कमी दरामुळे सुरुवातीपासून विविध फर्निचर कंपन्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याच्या रंगाची लोकप्रियता आणि मागणी सतत वाढत होती. कारखान्यासाठी, घरासाठी श्रीधरने कर्ज घेतले होते. दोन वर्षांनी, फर्निचर कंपन्यांकडून, दर तीन महिन्यांनी मिळणारे रंगाचे पैसे वेळेवर न मिळता फक्त आश्वासनेच मिळू लागली. त्यामुळे बँकेकडून आणखी कर्ज घेतले गेले. हळूहळू पैशांच्या वसुलीअभावी कर्ज ओझे वाढू लागले. श्रीधर आणखी कर्जासाठी रत्नागिरीला आपल्या घरी जातो आणि एका पतसंस्थेत कर्जासाठी प्रयत्न करतो. पण कर्ज मिळत नाही. त्याचे वडील शिक्षक म्हणून निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे श्रीधरला देतात. परंतु श्रीधरचा आर्थिक प्रश्न अधिकाधिक बिकट होत जातो. शेवटी तो पैसे वसुलीसाठी मित्राच्या ओळखीने एका पोलीस अधिकाऱ्याला भेटतो. त्यांच्या सल्ल्यानुसार श्रीधर सुनील मोरेकडे भांडूपला जातो. सुनील मोरे आपल्या गँगच्या सहाय्याने अल्पावधीतच श्रीधरची सर्व मागील बाकी रक्कम वसूल करून देतो. त्यापैकी वीस टक्के रक्कम देण्याचे श्रीधरने मान्य केले होते. परंतु त्याचवेळी गणेश त्याच्या कारखान्याची, रंग निर्मितीच्या यंत्राची बारकाईने पाहणी करतो. याचे श्रीधरला आश्चर्य वाटते. श्रीधर आणि त्याचा धाकटा भाऊ वसंता आपल्या मामाच्या दिवाकरच्या लग्नाला गुहागरला हजर राहतात. दिवाकर हा मुंबईत एका चाळीत दोन खोल्यांच्या घरात राहणारा, व्यसनी माणूस. चारुलता त्याची बायको, दोन छोट्या मुलांसद कसातरी संसार चालवत होती. दिवाकरचा इस्टेट एजंटचा व्यवसाय फारसा चालत नव्हता. उत्पन्नाचा निश्चित मार्ग नसल्याने उधारीवर कसेबसे सर्व जगत होते. व्यसनीपणामुळे घराची वीज तोडण्याची पाळी येते. परब दारु पिऊन पुन्हा एकदा मध्यरात्री वसुलीसाठी येतो. त्यावेळी दिवाकर गायब असतो. परंतू उच्च शिक्षणासाठी मुंबईत भावाकडे आलेला वसंता, चारुशीलाला मुंबईत भावाकडे वसंता, चारुशीलाला आपल्याजवळील फीसाठी पगारापोटी उसने घेतलेले पैसे देऊन तिला भावनिक आणि शारीरिक आधार देतो. यशवंत जगताप आणि त्याचा मित्र सुधीर बालपणापासूनचे मित्र. नववीत असताना १९९२ आणि १९९३ च्या मुंबईतील दंगलीत यशवंतच्या वडिलांचे छोटे दुकान दोनदा जाळले जाते. त्यामुळे यशवंतचे वडील खचून जातात. सर्वांनाच दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. यशवंताचे शिक्षण की अभावी थांबले, बँकेत कारकुनाची नोकरी मिळवण्याचे त्याच्या आई वडिलांचे स्वप्न भंगले होते. यशवंत मिळेल ते काम करु लागला. हॉटेलमधील वेटरचे काम करताना त्याला भोवतालच्या गुन्हेगारी विश्वाची जाणीव होते. सुधीरसह चटकन पैसे मिळवण्यासाठी ते टॅक्सीतून चैन करण्यासाठी जाणाऱ्या एका सरदारजीला लुटण्याची योजना आखतात. परंत त्यांचा अंदाज चुकतो. परिणामी मोठी रक्कम चोरल्याचा त्यांच्याकडून गुन्हा होतो. रात्रभर पोलीस स्टेशनवर डांबून ठेवले जाते. पण संघटनेचे रेगेसाहेब त्यांना सोडवतात. केस मिटवली जाते. त्यानंतर यशवंत अन्य मित्रांच्या सहाय्याने गोदीतील माल चोरुन तो विकून पैसे मिळवू लागतो. हळूहळू मिळणाऱ्या पैशांतून यशवंत विविध धंद्यांत पैसे गुंतवून अल्पावधीतच श्रीमंत होतो. राजकीय पुढारी आणि गुन्हेगार यांची युती होते. एके दिवशी निवडणुकीच्या तोंडावर सुधीर यशवंताला त्वरित देश सोडण्यास सांगतो. मॉरिशसला कोणता उद्योग सुरु करायचा या चिंतेत असताना त्याला श्रीधरविषयी समजते. त्याच्याशी भागिदारी करून उसाच्या रसापासून रंगाचे उत्पादन आपल्या देशात आणि मॉरिशसमध्ये करण्याचे ठरते. सत्तर टक्के हिस्सा यशवंतचा आणि उरलेला श्रीधरचा अशी विभागणी होते. श्रीधरला भागीदारीपत्रावर सही करावीच लागते आणि रात्रीच यशवंत, आईसह विमानतळावर जाण्यासाठी रवाना होतो. एका दिवसाच्या अखेरीला घडणाऱ्या विविध वेगवान घटनांचे विश्व वाचकांसमोर उलगडत जाते. शेवटपर्यत वाचकांची उत्कंठा टिकून राहते. गिरीश यांनी सर्व पात्रे जणू वाचकांसमोर साक्षात उभी केली आहेत. राजकारण, गुन्हेगारी आणि सामान्याचे विश्व एकमेकांत कसे गुंतले आहे हे तीव्रपणे जाणवते. कोकणातील निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील व्यक्तींना काळानुरुप कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते याचे विलक्षण चित्रण कादंबरीत केले आहे. यशवंत, त्याची आई, श्रीधर आणि त्याचे कुटुंबीय, दिवाकर आणि चारुलता ही प्रमुख पात्रे दीर्घकाळ लक्षात राहतील अशीच आहेत. गिरीश यांनी कादंबरीत निर्माण केलेले प्रसंग जणू डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखे साक्षात उभे राहतात हेच गिरीश यांच्या लेखनाचे यश आहे. यशवंत, श्रीधर, चारुलता यांचे पुढे काय झाले असेल अशी उत्सुकता वाचकाला वाटत राहते. कदाचित पुढील कादंबरीत लेखक काही आणखी धक्कादायक, उत्कंठावर्धक गोष्टी वाचकांसमोर ठेवतील. डॉ. गिरीश यांचे स्नेही, अभिनेता संदीप कुलकर्णी आणि अश्विनी भिडे (भा.प्र.से.) यांचे अभिप्राय कादंबरीच्या मलपृष्ठावर वाचावयास मिळतात. डॉ. गिरीश यांचा परिचयही त्यांच्या रंगीत छायाचित्रासह करुन देण्यात आला आहे. `एके दिवशी` ही कादंबरी वाचनीय आणि उत्कंठावर्धक अशीच झाली आहे. -प्रा. शाम जोगळेकर ...Read more

  • Rating Starप्रा. डॉ. गुणेश गोगटे, पुणे

    `एके दिवशी` वाचून झाले. खूप मस्त झालंय. कथानक वेगळे आणि रंजक आहे, नेहेमीप्रमाणे तू अत्यंत ओघवत्या शैलीने लिहिलं आहेस. सर्वच व्यक्तिरेखा well defined आणि उठावदार झाल्यात, माझ्या मते विशेषतः दिवाकरची character तू खूपच अप्रतिम लिहिली आहेस.

  • Rating Starऍड. मंदार तांबे

    प्रवाह पतित... प्रत्येक व्यक्तीला किंवा वस्तूला स्वतःचे असे खास गुणधर्म असतात. तिच्या प्रभावाखाली एकदा का तुम्ही आलात की ते गुणधर्म तुम्हालाही लागू होतात किंवा ते सहन करावे लागतात. आणि हाच नियम कोण्या एखाद्या निर्णयालाही तितकाच लागू पडतो. तुम्हाला नर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते पण एकदा का निर्णय घेतला की मग तुम्ही प्रवाह पतित होता. `एके दिवशी` ह्या कादंबरीतील श्रीधर व यशवंत ह्या दोन्ही पात्रांचे हेच प्राक्तन आपल्याला प्रकर्षाने जाणवते. दोन्ही पात्र त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एका कठीण प्रसंगी एखादा विशिष्ट निर्णय घेतात आणि नंतर त्यांच्याकडे प्रवाह पतित होण्याशिवाय काहीच राहत नाही. त्यामुळेच देणेकऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी श्रीधरने घेतलेला `गुंडवसुलीचा निर्णय` किंवा नगिना बार मध्ये गरिबीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी यशवंताने घेतलेला `वेटरच्या नोकरीचा निर्णय` ह्यांची `जातकुळी` एकच आहे. त्या एका निर्णयामुळे दोघेही प्रवाह पतित झाले. आणि सगळ्यात शेवटी सगळे काही `असून` सगळे काही `नसल्यासारखे` झाले. मग "ह्याच साठी केला होता अट्टाहास / शेवटचा दिन गोड व्हावा" हे बाजूलाच राहते आणि "आगीतून सुटून फुंफाट्यात पडल्यासारखे होते". लहानपणी आपण देवाला नमस्कार केल्यावर "चांगली बुद्धी दे" म्हणून मागणं मागायचो. `हुशार कर`, `श्रीमंत कर` असे मागणं कधीच मागत नव्हतो. कारण हुशारी किंवा श्रीमंती हे परिणाम आहेत आणि ते परिणाम आहेत "चांगल्या बुद्धीचे" व त्यानुसार घेतलेल्या योग्य "निर्णयाचे" . गीतेत त्याला ` कार्याकार्यव्यवस्थितौ" म्हणतात. कार्य काय किंवा अकार्य काय , योग्य काय आणि अयोग्य काय - हे जर का शुद्ध बुद्धीने (चांगल्या बुद्धीने) ठरवता आले नाही तर " ना स सिद्धिंवपाप्नोति न सुखं ना परां गतिम " ह्या उक्ती प्रमाणे त्याला धड सिद्धी (यश) किंवा सुख ही मिळत नाही आणि परम गती (अत्युच्च समाधान वा मुक्ती) तर नाहीच नाही. आणि हो ... उसाच्या रसापासून रंग, मॉरिशस, तिथली व्यवसायाची संधी आदी कादंबरीतील वळणे `एकाचे संकट ती दुसऱ्याची संधी" ह्या म्हणीचा प्रत्यय देतात. कादंबरी नदी प्रमाणे वाहती आहे श्रीधर आणि यशवंत असे दोन काठ आहेत. नदीसारखीच तिला जागोजागी मनमोहक वळणे आहेत. पुढच्या दृश्याची उत्कंठा नदीप्रमाणे कादंबरीत सुद्धा मोहीत करत राहते. नदी प्रमाणे कादंबरीही स्वतःचे असे काही सांगत नाही, पण काठावरचा वाचक मात्र प्रत्येक दृश्याची किंवा घटनांची आपापल्या आवडीनुसार ओळख शोधात राहतो. चांगल्या कादंबरीचे हेच लक्षण असते. लेखक काय सांगतो ह्या पेक्षा वाचक काय ऐकतो ह्यात जास्त काव्य आहे, नाट्य आहे. असो. मुखपृष्ठ छान आहे. ती शोकगाथा आहे आणि म्हणूनच मुखपृष्ठ कादंबरीनुरूप आहे. ...Read more

  • Rating Starप्रा. शाम जोगळेकर

    उत्कंठावर्धक, वाचनीय कादंबरी... `एके दिवशी` ही डॉ. गिरीश वालावलकर यांची कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतीच, देखण्या रूपात प्रकाशित केली आहे. या कादंबरीचे समर्पक, देखणे आणि रंगीत मुखपृष्ठ सतीश भावसार यांचे आहे. महामुंबईमध्ये, दिवस उलटताना... मध्य सुरुवातीलाच कादंबरीची झलक तीन-चार परिच्छेदांतून व्यक्त होते आणि वाचकांचे कुतूहल जागे होते. श्रीधर लिमये हा तरुण अतिश हुशार, केमिकल इंजिनियर, मंबईत येऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करतो. उसाच्या रसापासून रंग बनवण्याचे तंत्रज्ञान त्याने विकसित केले. विशेषत: लोखंडावर हा रंग दीर्घकाळ झळाळी देतो. उत्पादनखर्च कमी, त्यामुळे तुलनेने त्याच्या रंगांच्या कमी दरामुळे तुलनेने त्याच्या रंगाच्या कमी दरामुळे सुरुवातीपासूनच त्याला विविध फर्निचर कंपन्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याच्या रंगांची लोकप्रियता आणि मागणी सतत वाढत होती. कारखान्यासाठी, घरासाठी श्रीधरने कर्ज घेतले होते. दोन वर्षांनी, फर्निचर कंपन्यांकडून, दर तीन महिन्यांनी मिळणारे रंगांचे पैसे वेळेवर न मिळता, फक्त आश्वासनेच मिळू लागली. त्यामुळे बँकेकडून आणखी कर्ज घेतले गेले. हळूहळू पैशांच्या वसुलीअभावी कर्ज ओझे वाढू लागले. श्रीधर आणखी कर्जासाठी रत्नागिरीला आपल्या घरी जातो आणि एका पतसंस्थेत कर्जासाठी प्रयत्न करतो, पण कर्ज मिळत नाही. त्याचे वडील, शिक्षक म्हणून निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे श्रीधरला देतात. परंतु श्रीधरचा आर्थिक प्रश्न अधिकाधिक बिकट होत जातो. शेवटी तो पैसे वसुलीसाठी, मित्राच्या ओळखीने, एका पोलीस अधिकाऱ्याला भेटतो. त्यांच्या सल्ल्यानुसार, श्रीधर सुनील मोरेकडे भांडुपला जातो. सुनील मोरे आपल्या गँगच्या साहाय्याने, अल्पावधीतच श्रीधरची, सर्व मागील बाकी रक्कम वसूल करून देतो. त्यापैकी वीस टक्के रक्कम देण्याचे श्रीधरने मान्य केले होते. परंतु त्याचवेळी गणेश त्याच्या कारखान्याची, रंग निर्मितीच्या यंत्रांची बारकाईने पाहणी करतो, याचे श्रीधरला आश्चर्य वाटते. श्रीधर आणि त्याचा धाकटा भाऊ वसंता, आपल्या मामाच्या, दिवाकरच्या लग्नाला गुहागरला हजर राहतात. दिवाकर हा मंबईत, एका चाळीत, दोन खोल्यांच्या घरात राहणारा, व्यसनी माणूस. चारुलता त्याची बायको, दोन छोट्या मुलांसह कसातरी संसार चालवत होती. दिवाकरचा इस्टेट एजंटचा व्यवसाय फारसा चालत नसल्याने उधारीवर कसेबसे सर्व जगत होते. व्यसनीपणामुळे घराची वीस तोडण्याची पाळी येते. परब दारू पिऊन, पुन्हा एकदा, मध्यरात्री वसुलीसाठी येतो. त्यावेळी दिवाकर गायब असतो. परंतु उच्च शिक्षणासाठी मुंबईत भावाकडे आलेला वसंता, चारुशीलाला आपल्याजवळील फीसाठी पगारापोटी उसने घेतलेले पैसे देऊन, तिला भावनिक आणि शारीरिक आधार देतो. यशवंत जगताप आणि त्याचा मित्र सुधीर बालपणापासून मित्र. नववीत असताना १९९२ आणि १९९३ च्या मुंबईतील दंगलीत यशवंतच्या वडिलांचे छोटे दुकान दोनदा जाळले जाते. त्यामुळे यशवंतचे वडील खचून जातात. सर्वांनाच दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. यशवंतचे शिक्षण फी अभावी थांबले. बँकेत कारकुनाची नोकरी मिळविण्याचे त्याच्या आई-वडिलांचे स्वप्न भंगले होते. यशवंत मिळेल ते काम करू लागला. हॉटेलमधील वेटरचे काम करताना त्याला, भोवतालच्या गुन्हेगारी विश्वाची जाणीव होते. सुधीरसह चटकन पैसे मिळवण्यासाठी ते टॅक्सीतून चैन करण्यासाठी जाणाऱ्या एका सरदारजीला लुटण्याची योजना आखतात. परंतु त्यांचा अंदाज चुकतो. परिणामी मोठी रक्कम चोरल्याचा त्यांच्याकडून गुन्हा होतो. रात्रभर पोलीस स्टेशनवर डांबून ठेवले जाते. पण संघटनेचे रेगेसाहेब त्यांना सोडवतात. केस मिळवली जाते. त्यानंतर यशवंत अन्य मित्रांच्या साहाय्याने गोदीतील माल चोरून, तो विकून पैसे मिळवू लागतो. हळूहळू मिळणाऱ्या पैशांतून यशवंत विविध धंद्यांत पैसे गुंतवून अल्पवधीतच श्रीमंत होतो. राजकीय पुढारी आणि गुन्हेगार यांची युती होते. एके दिवशी निवडणुकीच्या तोंडावर सुधीर यशवंताला त्वरित देश सोडण्यास सांगतो. मॉरिशसला कोणता उद्योग सुरू करायचा या चिंतेत असताना त्याला श्रीधरविषयी समजते. त्याच्याशी भागीदारी करून, उसाच्या रसापासून रंगाचे उत्पादन आपल्या देशात आणि मॉरिशसमध्ये करण्याचे ठरते. सत्तर टक्के हिस्सा यशवंतचा आणि उरलेल्या श्रीधरचा अशी विभागणी होते. श्रीधरला भागीदारीपत्रावर सही करावीच लागते आणि रात्रीच यशवंत, आईसह विमानतळावर जाण्यासाठी रवाना होतो. एका दिवसाच्या अखेरीला घडणाऱ्या विविध वेगवान घटनांचे विश्व वाचकांसमोर उलगडत जाते. शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा टिकून राहते. गिरीश यांनी सर्व पात्रे जणू वाचकांसमोर साक्षात उभी केली आहेत. राजकारण, गुन्हेगारी आणि सामान्यांचे विश्व एकमेकांत कसे गुंतले आहे हे तीव्रपणे जाणवते. कोकणातील निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील व्यक्तींना काळानुरूप कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते याचे विलक्षण चित्रण कादंबरीत केले आहे. यशवंत, त्याची आई, श्रीधर आणि त्याचे कुटुंबीय, दिवाकर आणि चारुलता ही प्रमुख पात्रे दीर्घकाळ लक्षात राहतील अशीच आहेत. गिरीश यांनी कादंबरीत निर्माण केलेले प्रसंग जणू डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखे साक्षात उभे राहतात, हेच गिरीश यांच्या लेखनाचे यश आहे. यशवंत, श्रीधर, चारुलता यांचे पुढे काय झाले असेल, अशी उत्सुकता वाचकाला वाटत राहते. कदाचित पुढील कादंबरीत लेखक काही आणखी धक्कादायक, उत्कंठावर्धक गोष्टी वाचकांसमोर ठेवतील. डॉ. गिरीश यांचे स्नेही, अभिनेता संदीप कुलकणी आणि अश्विनी भिडे (भा.प्र.से.) यांचे अभिप्राय कादंबरीच्या मलपृष्ठावर वाचावयास मिळतात. डॉ. गिरीश यांचा परिचयही त्यांच्या रंगीत छायाचित्रासह करून देण्यात आला आहे. `एके दिवशी` ही कादंबरी वाचनीय आणि उत्कंठावर्धक अशीच झाली ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more