* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOME
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980585
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 372
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN MANJU KAPUR`S EMBLEMATIC NEW NOVEL, THE SEEMINGLY TRANQUILWOFID OF A JOINT FAMILY IS COMING APART. BANWARI LAL, PATRIARCH OF A CLOTH BUSINESS IN THE MIDDLE CLASS NEW DELHI NEIGHBOURHOOD OF KAROL BAGH, IS A BELIEVER IN THE OLD WAYS. MEN WORK,; OUT OF TLTE HOME, WOMEN WITHIN. MEN CARRYFORWARD THE FAMILY LINE, WOMEN ENABLE THEIR MISSION. HIS TWO SONS UNQUESTIONINGLY FOLLOW THEIR FATHER IN BUSINESS AND IN LIFE, BUT THEIR WIVES WILL NOT. NEITHER WILL HIS GRAND-DAUGLTTER, WHO MAKES CONSIDERED UNAVAILABLE TO THE WOMEN OF THE FAMILY. WITH UNSWERVING ATTENTION, KAPUR FOLLOWS THE MEMBERS OF THIS TRADITIONAL FAMILY INTO THE UNEASY WORLD THEY COME TO INHABIT. FROM THE FRENETIC SENSORY OVERLOAD OF MODERN URBAN INDIA, SHE CONSTRUC.TS A STORY AS INTRICATE, QUIET AND DAZZLING AS THE FABRIC PRODUCED BY THE FAMILY. TOLD IN A SUSTAINED COLLOQUIAL VOICE, HOME STARTLING ITS SWEEP_AND UNERRINGLY ACCURATE IN THE BLEAKNESS AND HOPE IT PRESENTS.
पाकिस्तानात भरभराटीला आलेलं कापड दुकान फाळणीच्या वणव्यात बेचिराख झाल्यावर, गरोदर पत्नी आणि दोन लहान मुलांसह, चालत चालत सरहद्द ओलांडून दिल्लीच्या निर्वासित छावणीत दाखल झालेले लाला बनवारीलाल. शून्यापासून सुरुवात करून पुन्हा करोल बागेतले प्रतिष्ठित व्यापारी म्हणून स्वत:ला सिद्ध करेपर्यंतचा आणि त्यानंतरचा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास. काळानुसार केलेले, करावे लागलेले बदल. एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय दोन्हींचा समतोल राखणं, पिढ्या-पिढ्यांच्या विचारांतलं अंतर, घरातल्या माणसा-माणसांचे बदलते विचार, वाढत राहणारे नातेसंबंध, वेगवेगळे स्वभाव या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फ़ैमिली’ वाचताना घडत राहतं. आई-वडील, पती-पत्नी, बहिणी-बहिणी, सासू-सुना, दीर-जावा, मुलं-मुली, व्याही-विहिणी अशा कुटंबातल्या सगळ्या नातेसंबंधांचं अचूक वर्णन वास्तवदर्शी, ओघवत्या बोलीभाषेतून वाचताना, प्रसंग सजीव होऊन नजरेसमोर उभे राहतात. दैनंदिन जीवनात येणारे छोटे-मोठे विजयाचे, पराभवाचे, आनंदाचे, काळजीचे प्रसंग. एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण. सत्तासंघर्ष, निरपेक्ष आणि सापेक्ष माया-ममता, परंपरा पाळण्याचे आणि संस्कृती राखण्याचे प्रयत्न हे सारं आपल्यासमोर घडल्यासारखं वाटतं आणि पाश्र्वभूमीवर जाणवत राहतो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीचा, बदलत्या व्यावसायिक, धार्मिक आणि नैतिक कल्पनांचा धावता आलेख. ‘फ़ैमिली’मधली माणसं आपल्यातली, ओळखीची वाटतात. तिथेच राहून आपल्याशी गप्पा मारल्यासारखी लेखिका हकिगत सांगत जाते आणि आपण त्यात गुंतून राहतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #FAMILYHOME #फॅमिली #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #MANJUKAPUR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PRABHAT 6-12-2009

    एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय यांचा समतोल राखणं, पिढ्यापिढ्यांच्या विचारातलं अंतर, वाढत राहणारे नातेसंबंध या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फॅमिली’ हे पुस्तक वाचताना घडतं. फाळणीनंतर पाकिस्तानातून अनेक हिंदू कुटुंबं भारतात आली. हिंसाचाराच्या आगीत होरपळले्या यांपैकी अनेकांनी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करत नवीन विश्वाची निर्मिती केली. ‘फॅमिली’ या कादंबरीत अशाच एका कुटुंबाची कथा वाचायला मिळते. मंजू कपूर यांनी लिहिलेल्या ‘होम’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे. पाकिस्तानात भरभराटीला आलेल्या एका प्रख्यात कापड दुकानदाराची कथा यामध्ये चितारली आहे. फाळणीच्या वणव्यात हे कापड दुकान बेचिराख होतं आणि आपली गरोदर पत्नी, दोन मुलांना घेऊन कुटुंबप्रमुख चालत-चालत दिल्लीच्या निर्वासित छावणीत येतात. लाला बनवारीलाल असं या कुटुंबप्रमुखाचं नाव.दिल्लीत आल्यावर शून्यापासून सुरुवात करून पुन्हा प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ते स्वत:ला सिद्ध करतात. बनवारीलाल परिवार हा अशा स्तरातला होता की, ज्यांनी बाजारातलं आपलं अव्वल स्थान टिकविण्यासाठी पिढ्यांनपिढ्या प्रयत्न केले होते. लग्नसंबंध जोडताना त्यामुळे समृद्धीत भर पडेल असं पाहिलं होतं. कोणत्याही परिस्थितीत कुटुंब विभक्त होऊ द्यायचं नाही, असा या परिवाराचा नियम होता. या परिवाराने आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून कुटुंबाचा पाया भक्कम करण्याचं शिक्षण दिलं होतं. मुलांना देण्यात आलेले शिक्षण, अंगी बाणवलेली मूल्यं, जोडलेले संबंध या सगळयांमागे त्यांच्या जीवनात सौख्य भरणारा सोन्या-चांदीचा प्रवाह सतत वाहत राहिला पाहिजे, हा एकच हेतू होता. या कादंबरीत विविध व्यक्तिरेखा येतात. कादंबरीची सुरुवात सोना आणि सुनीता या दोन बहिणींच्या कुटुंबाची ओळख करून देत होते. या दोघी सख्ख्या बहिणी असल्या तरी दोघींच्या स्वभावात आणि रुपातही बराच फरक आहे. सोना नितळ गोरेपणा, अप्रतिम सौंदर्य घेऊन जन्माला आलेली, तर सुनीता तिच्या तुलनेत सावळी आणि रुपानेही सामान्य. सोनाच्या सौंदर्याच्या बळावरच तिला बनवारीलालसारख्या नावाजलेल्या व्यापारी कुटुंबातून मागणी येते, तर सुनीताचा विवाह सरकारी नोकरी असणाऱ्या मुलाशी होतो. सोनाचा बनवारीलाल परिवार हा एकत्र कुटुंबपद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व देणारा. घराण्याचा वंश सुरू राहण्यासाठी मुलगा हवाच, हा त्यांचा हट्ट. या घरात मुलगा असणाऱ्या स्त्रीचं स्थान वरचं असतं. दुर्दैवाने सोनाला लग्नानंतर बरीच वर्षे मूल होत नाही. तिच्या धाकट्या दिराचं लग्न होऊन त्या दांपत्याला मूल होतं तरी सोनाची कूस उजवलेली नसते. यामुळे थोरली सून असूनही तिचं घरातलं वजन कमी झालेलं असतं. सासूकडून आणि नणंदा-जावांकडूनही तिला बरंच ऐकून घ्यावं लागलेलं असतं. याउलट धाकट्या सूनेला मूल झाल्यानंतर तिचा भाव वधारतो. इकडे सुनीताच्या पोटालाही मूल नसतं. मात्र, तिला सोनासारखा त्रास सहन करावा लागत नाही. तिचं कुटुंबही मर्यादित असतं. गृहउद्योग करून पतीला हातभार लावण्यात ती मोठा वाटा उचलते. तिच्या या उद्योगात सोनाचा पतीही मदत करतो. इकडे काही वर्षांनी सोनाच्या पोटी मूल जन्माला येतं आणि तिची घरातली किंमत एकदम वाढते. पहिली मुलगी जन्माला येते आणि पाठोपाठ एक मुलगा. आई झाल्यामुळे सोनाचं घरातील स्थान एकदम उंचावलेलं असतं. आता ती थोरली सून म्हणून घरभर तोरा मिरवू शेत असते. स्थान, घरची श्रीमंती, पदरात दोन मुलं या साऱ्यामुळे तिचा अहंकार आपोआप उसळून येतो. या कुटुंबात पुरुषांनी व्यवसाय सांभाळायचा आणि स्त्रियांनी संसार पहायचा, मुलांचं संगोपन करायचं, कुटुंबाचा वंश पुढे सुरू ठेवायचा हीच पारंपारिक कल्पना असते. मुलगा असो किंवा मुलगी त्यांच्या शिक्षणाला फारसं महत्त्व नसतंच. सोनाच्या पोटी जन्मलेली निशा मात्र, अभ्यासात कमालीची हुशार असते. तिचं लग्न व्हायचं असेल तर तिनं सुंदर दिसलं पाहिजे, घरकामात हुशार बनलं पाहिजे हा तिच्या आईचा आणि इतरांचाही दृष्टिकोन असतो. तथापि, सुनीताच्या पतीला शिक्षणाचं महत्त्व माहिती असतं. याच दरम्यान बनवारीलाल कुटुंबात विकी हा मुलगा दाखल झालेला असतो. सोनाच्या नणंदेचा मुलगा. त्याच्या आईचा सासरी छळ झाल्यामुळे तिने आत्महत्या केलेली असते आणि या मुलाला त्याचे मामा (सोनाचा पती) आपले घरी घेऊन आलेले असतात. मुलगा त्याच्या वडिलांप्रमाणेच स्वार्थी, आत्मकेंद्री असतो. पौगंडावस्थेतील विकी छोट्या निशाचं लैंगिक शेषण करतो. पण, ही गोष्ट कोणालाही कळत नाही; पण निशाच्या मनावर त्या घटनेचा जबरदस्त परिणाम झालेला असतो. पुढे ती मोठी झाल्यावर एका तरुणाशी तिचं प्रेम जमतं. मात्र, त्याचं कुटुंब बनवारीलाल कुटुंबाच्या तुलनेत खालच्या दर्जाचं असल्याने हे प्रकरण संपवलं जातं. पुढे निशाची ओढाताण सुरू होते. ती कशी संपते हे सांगत असतानाच ‘फॅमिली’ची गोष्ट संपते. एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय यांचा समतोल राखणं, पिढ्यांनपिढ्यांच्या विचारातलं अंतर, वाढत राहणारे नातेसंबंध या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फॅमिली’ हे पुस्तक वाचताना घडतं. कुटुंबातील सर्व घडामोडींचं अचूक वर्णन वास्तवदर्शी आणि ओघवत्या बोलीभषेतून वाचाताना प्रसंग सजीव होऊन नजरेसमोर उभे राहतात. एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण याचंही सुरेख दर्शन ‘फॅमिली’ मध्ये घडतं. लेखिकेने वाचकांशी गप्पा माराव्यात अशा पद्धतीने कादंबरीचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या मूळ लेखिका मंजू कपूर या दिल्लीतील इरांडा हाऊस येथे इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. इरांडा हाऊस येथून पदवी प्राप्त करून त्यांनी कॅनडातील डलहौसी विद्यापीठातून एम.फील केले. त्यांच्या ‘डिफिकल्ट डॉटर्स’ या पहिल्या कादंबरीला युरेशियन विभागासाठी कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला. त्यांच्या नावावर इतरही अनेक दर्जेदार पुस्तकाचा मराठी अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी तेवढ्याच ओघवत्या शैलीत केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more