* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FARASI PREMIK
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177664522
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2004
  • Weight : 300.00 gms
  • Pages : 336
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A STORY OF A WOMAN WHO HAS TRAVELLED FAR AWAY FROM HER MOTHERLAND TO A DISTANT CITY IN SEARCH OF LOVE AND FREEDOM. THIS STORY IS ABOUT A BENGALI GIRL, NEELANJANA MANDAL. SHE MARRIES KISHANLAL WHO OWNS A RESTAURANT AND COMES TO STAY WITH HIM IN PARIS. SHE FINDS HERSELF CAGED IN KISHANLAL`S EXCLUSIVE PARIS APARTMENT. SHE REALIZES THAT AFTER MARRIAGE SHE HAS BECOME A MERE PUPPET IN KISHANLAL`S HANDS. SHE IS NO MORE THAN A SERVANT TO FINISH THE CHORES AND THEN AT NIGHT TO SATISFY HIS LUST. SHE CHOKES WITH THIS REALIZATION. SHE IS LOOKING FOR CHANGE FROM THIS DULL LIFE OF A PRISONER. SHE MEETS BENOYAR DUPONT. A VERY HANDSOME, FAIR, BLUE EYED FRENCH. NEELA FALLS IN LOVE WITH HIM. HE INTRODUCES HER TO THE STREETS, CAFES, ART GALLERIES OF PARIS. HE OPENS A UNIVERSE IN FRONT OF NEELA. SHE GETS INVOLVED IN HIM, THEY COME TOGETHER. SLOWLY, SHE REALIZES THAT EVEN DUPONT IS THE SAME LIKE HER HUSBAND. HE ALWAYS GIVES PREFERENCE TO HIMSELF. HE LOVES ONLY HIM AND NOT HER. SHE GIVES A FULL STOP TO THEIR RELATIONSHIP WHEN SHE REALIZES THAT SHE HAS TO KEEP HER FEELINGS ASIDE WHILE BEING WITH HIM. BUT THIS FULL STOP UNFOLDS A NEW BEGINNING FOR HER, SEARCH OF HER OWN SOUL. THIS NOVEL RELATES THE STRUGGLE AND EFFORTS OF A WOMAN, HER MINDSET IN THIS MALE CHAUVINIST SOCIETY WHILE KEEPING HER ALIVE.
मायभूमीपासून दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि स्वातंत्र्यशोधाची कहाणी. `फरासि प्रेमिक` ही कथा आहे, नीलांजना मंडल या बंगाली तरुणीची. उपाहारगृहमालक असणाऱ्या किसनलालच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये नीलाला सोनेरी पिंजऱ्यात कोंडल्यासारखं वाटतं. लग्नानंतर तिच्या आशाआकांक्षा पूर्ण होणं तर बाजूलाच, पण घरात केवळ मोलकरीण आणि शयनेषु रंभा... एवढंच तिचं स्थान पाहून तिचा जीव घुसमटतो. या कंटाळवाण्या, निराशेच्या गर्तेत निघालेल्या आयुष्यातून कुठं मोरपिशी वाट फुटतेय का? यासाठी नीला आतुर असते आणि अशा वेळी तिच्या आयुष्यात येतो बेनॉयार ड्यूपॉट... गोरापान, निळ्याशार डोळ्यांच्या राजबिंडा फ्रेंच तरुण, नीला त्याच्याप्रेमात आकंठ बुडते. बेनॉयर तिची पेरिसमधल्या रस्त्यांशी, कॅफेजशी, कलादालनांशी ओळख करून देतो... नीलासमोर जणू सर्वस्वी नवं विश्व खुलं होतं. बेनॉयरशी तिचे अगदी उत्कट शारीरिक, भावबंध जुळलेले असतात... हळूहळू इथंही तिला स्वत:च्या आशाआकांक्षा गुंडाळून ठेवाव्या लागतात. अखेर बेनॉयरचं प्रथम प्राधान्य स्वत:ला आहे, त्याचं फक्त स्वत:वर प्रेम आहे... आपल्या प्रियतमेवर नाही, हे उमगल्यावर त्यांच्या संबंधांना पूर्णविराम मिळतो, पण तिच्या आत्मशोधाच्या मार्गाचा आत्ता तर कुठे प्रारंभ झालेला असतो... धाडसी संकल्पनेवर आधारलेली ही कादंबरी लेखिकेनं अतिशय ताकदीनं मांडलेली आहे. निष्ठुर जगात स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या एका स्त्रीच्या मनोवास्थेचं वेधक चित्रण या कादंबरीत आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 29-08-2004

    मायभूमीच्या दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि लढ्याची ही कहाणी आहे– नीलांजन या बंगाली तरुणीची. उपहारगृह मालक असणाऱ्या किशनलालशी तिचा विवाह झाल्यानंतर ती पॅरिसमध्ये येते. पॅरिसमधल्या किशनलालच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये नीलाला सोेरी पिंजऱ्यात कोंडल्यासारखं वाटतं. लग्नानंतर तिच्या आशा-आकांक्षा पूर्ण होणं तर बाजूलाच, पण घरात केवळ मोलकरीण एवढंच तिचं स्थान राहतं. तिचा जीव घुसमटतो. या कंटाळवाण्या, निराशेच्या गर्तेत असतानाच तिला गोरापान, निळ्याशार डोळ्यांचा राजबिंड तरुण भेटतो. ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते... हळूहळू इथंही तिला स्वत:च्या आशा-आकांक्षा गुंडाळून ठेवाव्या लागतात. धाडसी कल्पनेवर आधारलेली ही कादंबरी लेखिकेनं अतिशय ताकदीनं मांडली आहे. निष्ठुर जगात स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या एका स्त्रीच्या मनोवस्थेचं वेधक चित्रण या कादंबरीत आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 03-10-2004

    अस्तित्वाची कहाणी!... ‘फरासि प्रमिक’ (फ्रेंच प्रेमिक) ही तसलिमा नासरीन यांची नवी कादंबरी. मूळच्या या बंगाली कादंबरीचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. तसलिमा यांच्या आजवरच्या वेगळ्या धाटणीच्या लिखाणाप्रमाणे ही कादंबरीही आपले भिन्न अस्तित्व दाखवन देते. नीलांजना मंडल ही एक सुशिक्षित बंगाली तरुणी वाढलेले वय, झालेला प्रेमभंग आणि घरातले वडिलांचे वर्चस्व, त्याखाली दबलेली आई अशी तिची पार्श्वभूमी. त्यावरचा उपाय म्हणजे भावाच्या मित्राने फ्रान्समध्ये राहणाऱ्या किशनलालचे सुचवलेले स्थळ. हा भिन्नप्रांतीय नवरा, त्याचे आचार-विचार आणि जीवन यांची सांगड नीलाशी घातली जाते. फ्रान्सला पोचल्यावर विमानतळावर आलेल्या आठवणी, नंतरची पार्टी, किशनचे वागणे यातून या नववधूचे पुढेच जीवन, गृहकृत्यदक्ष होण्याची धडपड - त्यातला फोलपणा पुढे येतो. किशनचे रासवट वागणे आणि एकूणच परिस्थितीला कंटाळून ती घर सोडते. नीला सुशिक्षित असली तरी या शिक्षणाला फारसा वाव नाही. फ्रेंच भाषेचे प्रस्थ आणि युरोपियनाव्यतिरिक्त व्यक्तीवरचा अविश्वास ठिकठिकाणी डोकावून जातो. भावाच्या मित्राचे घर, नंतर ऑफिसमधील मैत्रिणींचे घर - तिचे भिन्न जीवन याचे अनुभव नीलाला येतात. या टप्प्यावर आजारी आईसाठी ती कोलकत्याला येते. माहेरचे वातावरण, आईबद्दलच्या दाटून आलेल्या भावना ती गेल्यावर आलेले कोरडेपण व्यक्त होत राहते. भोवतालच्यांचे केवळ कर्तव्य म्हणून वागणे, वडिलांची एकाधिकारशाही, भावाचे अप्पलपोटेपण या साऱ्याची चीड तिला येते. माँने ठेवलेल्या पैशांची पुंजी आणि तिच्या आठवणी साठवत नीला फ्रान्सला परतते. याच परतीच्या प्रवासात नीलाला तिचा फ्रेंच प्रेमिक भेटतो. बेनॉयर ड्यूपॉन्टशी झालेली ओळख पुढे वाढतच जाते. एका भक्कम आधाराची गरज असलेली नीला त्याच्यात एकरूप होऊ पाहते. पॅरिसमधल्या रस्त्यांवर, कलादालनांत, संग्रहालयात फिरताना त्याच्यासोबत जीवनाचा आस्वाद घेते. काव्य, संगीत, कला, वाचन अशा आवडी जोपासू पाहते. पत्नी, मुलगी आणि नीला अशा तिढ्यात बेनॉयर अडकलेला असतो. नीलाला प्राधान्य देते तिच्याकडे राहतो. मात्र नीला त्याची हाकलपट्टी करते. खरं तर या संपूर्ण कादंबरीभर तसलिमा नासरीन यांची छाया आहे. ती तशीच ठेवण्यात सुप्रिया वकील यशस्वी झाल्या आहेत. तसलिमा यांचे स्वाभिमानी, अभिमानी विचार, बंगालीप्रेम आणि विचारीपणा यांचे प्रतिबिंब नीलाच्या व्यक्तिमत्त्वात दिसते. फ्रान्समध्ये प्रवेशताना विमानतळावरचा प्रसंग असो किंवा कोलकत्तामध्ये आईची भेट, त्या त्या प्रसंगांना भाषा, आशय, विषय यातून उठाव आला आहे. निवडक ठिकाणी परदेशातही केला जाणारा वंशभेद जाणवून जातो. जवळपास सारी कथा फ्रान्समध्ये घडल्याने तिथले स्थानिक संदर्भ, रीतीभाती, जीवनमान, खानपान यांचे चित्रण सूक्ष्मपणे टिपले आहे. नीलाचे इतरांना समजून घेणे, किशनच्या हॉटेलमधील भारतीयांशी ममत्वाने वागणे, मित्राच्या भावाने केलेल्या विटंबनेने हबकून जाणे हे लेखन नीलाचे व्यक्तिमत्त्व दाखवते. नीलाचे वागणे सुरुवातीला वाहवत चालल्यासारखे वाटते. बेनॉयरशी तिची मैत्री, सलगी, त्याच्यासाठीच जीव टाकणे याचा अर्थ शोधतानाच ती त्याला तोडून टाकते. वडील, भाऊ, मित्र, किशन किंवा बेनॉयर यांची जातकुळी एकच आहे. ‘‘ते कुठल्याही देशातले असले तरी वर्चस्व गाजवतात. स्वत:वर प्रेम करतात.’’ या निष्कर्षाशी नीला येऊन थांबते. एकदा हे कळल्यावर ती बेनॉयरमध्ये गुंतत नाही. स्वत:ला सिद्ध करू पाहते. हे करताना विविध प्रसंगांतील चर्चातून अनेक कलावंत, नामवंत, विचारवंत यांचा सहज परिचय आपल्याला देऊ पाहते. प्रकरणांना दिलेली इंग्रजी, फ्रेंच, मराठी काव्यात्मक शीर्षके उत्सुकता वाढवतात. मुखपृष्ठावरील कुत्रीच्या रेखाटनास संदर्भ अधेमधे लागत शेवटी खऱ्या अर्थाने लागतो. त्यासाठी कादंबरी वाचायला हवी. ‘फारसि प्रेमिक’ नावावरून रोमँटिक प्रेमकथा वाटेल. पण अगदी तसं नाही. अतिशय ताकदीने मांडलेल्या या कादंबरीत स्व-अस्तित्वासाठी झगडणाऱ्या एकीच्या मनोवस्थाचं वेधक चित्रण येतं. मायभूमीपासून दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि स्वातंत्र्यशोधाची ही कहाणी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more