* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FIFTY SHADES OF GREY
  • Availability : Available
  • Translators : SHOBHANA SHIKNIS
  • ISBN : 9789353171353
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 548
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :E. L. JAMES COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN LITERATURE STUDENT ANASTASIA STEELE INTERVIEWS SUCCESSFUL ENTREPRENEUR CHRISTIAN GREY, SHE FINDS HIM VERY ATTRACTIVE AND DEEPLY INTIMIDATING. CONVINCED THAT THEIR MEETING WENT BADLY, SHE TRIES TO PUT HIM OUT OF HER MIND – UNTIL HE TURNS UP AT THE STORE WHERE SHE WORKS PART-TIME, AND INVITES HER OUT. UNWORLDLY AND INNOCENT, ANA IS SHOCKED TO FIND SHE WANTS THIS MAN. AND, WHEN HE WARNS HER TO KEEP HER DISTANCE, IT ONLY MAKES HER WANT HIM MORE. AS THEY EMBARK ON A PASSIONATE LOVE AFFAIR, ANA DISCOVERS MORE ABOUT HER OWN DESIRES, AS WELL AS THE DARK SECRETS CHRISTIAN KEEPS HIDDEN AWAY FROM PUBLIC VIEW …
‘फिफ्टिी शेड्स ऑफ ग्रे’ ही अ‍ॅनेस्टेशिया (अ‍ॅना) स्टील आणि खिश्चन ग्रे यांची कथा आहे. अ‍ॅनाची पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेली मैत्रीण केट, अ‍ॅनाला एकदा प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या खिश्चन ग्रेची मुलाखत घ्यायला पाठवते. पहिल्याच भेटीत खिश्चन आणि अ‍ॅना एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण अ‍ॅना थोडीशी लाजरी असल्यामुळे आपल्या मनातली ग्रेविषयीची प्रेमभावना स्वीकारायला संकोचत असते; पण ग्रेच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे ती त्या प्रेमभावनेला रोखू शकत नाही आणि ग्रेच्या प्रेमप्रस्तावाला होकार भरते. कौमार्य अबाधित असलेल्या अ‍ॅनाला खिश्चन शरीरसंबंधाचे धडे द्यायला लागतो; मात्र कामक्रीडा करताना त्याच्या काही अटी असतात. त्या अ‍ॅनाला जाचक वाटायला लागतात आणि हळूहळू त्यांच्यात दुरावा निर्माण व्हायला लागतो. शेवटी ते वेगळं व्हायचं ठरवतात. एक यशस्वी उद्योजक आणि चांगला माणूस असलेला ग्रे कामक्रीडेच्या वेळी विकृत होतो. त्याच्यातला माणूस आणि त्याच्यातला कामविकृत पुरुष यांच्यातील द्वंद्व अ‍ॅनाला अस्वस्थ करत असतं. ते द्वंद्व जाणून घेण्यासाठी ‘फिफ्टिी शेड्स ऑफ ग्रे’ वाचलंच पाहिजे.

No Records Found
No Records Found
Keywords
#FIFTYSHADESOFGREY #ELJAMES #SHOBHANASHIKNIS #फिफ्टीशेड्सऑफग्रे# शोभनाशिकनीस #ईएलजेम्स
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 01-09-2019

    खळबळजनक प्रेमकथा… महाविद्यालयीन तरुणी अ‍ॅनास्टॅशिया स्टील आणि उद्योजक ख्रिश्चन ग्रे यांच्यातील अनोखी प्रेमकहाणी `फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे` या कादंबरीतून लेखिका ई. एल. जेम्स यांनी मांडली आहे. ही कादंबरी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली. विशेषतः महिलांनी त डोक्यावर घेतली. अ‍ॅना आणि ख्रिश्चन यांच्या प्रेमकथेत असं नेमकं काय होतं, या उत्सुकतेपोटी जे-जे कादंबरी वाचवतात, तेव्हा कथाविषय धक्का देऊन जातो. आपल्या जोडीदाराला शारीरिक इजा पोहचवून, प्रसंगी अवमानजनक वेदना देत लैंगिक सुखाचा आनंद घेऊ इच्छिणारा ख्रिश्चन या कादंबरीचा नायक आहे. तर त्याच्यावरील प्रेमाखातर या संबंधांचा स्वीकार करणारी अ‍ॅना ही नायिका. ही कादंबरी जून २०१५मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. आजपर्यंत जवळपास बारा कोटींचा खपाचा आकडा गाठलाय. जगातील सर्वाधिक वेगाने विकली गेलेली कादंबरी म्हणून तिचा लौकिक आहे. शिवाय ५२ भाषांमध्ये तिचे अनुवाद केले गेलेत. दुसरा भाग `फिफ्टी शेड्स डार्कर` आणि तिसरा भाग `फिफ्टी शेड्स फ्रीड` नावाने प्रसिद्ध झालेत. पण त्याचबरोबर जगभरात ही कादंबरी आणि त्यावरून काढलेल्या चित्रपटाला बंदीचा सामनाही करावा लागला आहे. एकवीस वर्षांची अ‍ॅना तिची मैत्रिणी केट हिच्यासाठी ख्रिश्चन ग्रे या तरुण उद्योजकाची मुलाखत घेण्यासाठी जाते. पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडते. तोही तिच्यावर भाळतो. दोघं एकमेकांकडे आकृष्ट होत ही प्रेमकथा पुढे सरकत असतानाच, ख्रिश्चन तिला स्वतःविषयी एक धक्कादायक माहिती देतो. ते म्हणजे शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर तिला एका करारावर सही करावी लागेल. एखाद्या मुलीला आकर्षण वाटावं, अशा सगळ्या गोष्टी ख्रिश्चनकडे असतात. मात्र शारीरिक संबंधांबाबत मात्र तो वेगळा असतो. आपल्या जोडीदाराला पीडा देण्यातूनच त्याला लैंगिक सुख लाभतं. हे जेव्हा तो अ‍ॅनाला सांगतो. तेव्हा अ‍ॅना हे स्वीकारायला तयार होत नाही. मात्र ख्रिश्चनवरच्या प्रेमापायी अखेर त्या करारावर सही करते. आजवरच्या कित्येक प्रेमकथांतून वेगवेगळे विषय हाताळले गेले असतील, पण परपीडनातून सुख मिळवण्यासाठी करार करणाऱ्या प्रेमीयुगुलाची कथा प्रथमच लिहिली गेली. त्यामुळे या कादंबरीविषयी चर्चा झाली. कादंबरीत ख्रिश्चनला अशी लैंगिक इच्छा होण्यामागे एक उपकथानक आहे. पण मुळात ख्रिशनची ही अट मान्य होणं, आणि त्यासाठी स्वतःहून तयार होणं, हे वाचकांना धक्का देणारं ठरलं. लैंगिक संबंध आणि त्याभोवती फिरणारी प्रेमकथा असं काहीच स्वरूप असल्यामुळे आणि परपीडन ही गोष्ट अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय असू शकते. त्यामुळे अनेकांना या कांदबरीत नेमकं काय हे जाणून उत्सुकतेचं वाटलं. कादंबरीचा निम्मा भाग हा परपीडनातून लैंगिक सुख कसं मिळवलं जातं, याविषयीच्या औत्सुक्याचा परिचय करून देणारं असल्यानेच कदाचित त्याची चर्चा झाली. शिवाय ठरावीक पानानंतर शारीरिक संबंधांचं वर्णन हेही वाचकांना गुंगवून ठेवणारं आहे. ग्रे यांच्या या लैंगिक सुखाविषयीच्या इच्छा, त्यामागचा भूतकाळ, त्याची प्रेमकथा ते लग्न असा प्रवास या तीन कादंबरींतून मांडला गेला आहे. अर्थात त्यातला पहिला भाग धक्कादायक आहे तो त्यातल्या लैंगिक संबंधातील त्याच्या अनैसर्गिक इच्छांच्या पूर्ततेच्या वर्णनामुळे. अशा कादंबरी केवळ कामूक साहित्य म्हणून सोडून दिलं गेलं नाही, हेच या कादंबरीचं यश आहे. लैंगिकता या गोष्टींपाशी नुसतंच न रेंगाळता, त्याचा तपशीलवार वर्णनातही ही कथा अडकलेली नाही. तर ख्रिश्चन ग्रेच्या आयुष्यातील घटना आणि त्याचा त्याच्या लैंगिकतेवर झालेला परिणाम हेही यात आहे. मात्र तरीही दुर्दैवाने ही कादंबरी केवळ परपीडनात आनंद मानणाऱ्या प्रेमीयुगुलाची कथा म्हणून वाचली गेलीय. ही कादंबरी मराठीत आणताना काही शब्द जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. त्यात खटकण्यासारखं काही नाही. पण भाषेत आणखी सहजता आली असती, तर ते अधिक नैसर्गिक वाटलं असतं. मुळात या कादंबरीत असलेले अनेक दोष अनुवाद करताना बाजूला सारणं तसं कठीणच आहे. अ‍ॅना आणि ग्रे यांच्यातील संवाद हे या कादंबरीचा प्राण आहेत. यू हॅव टू किस अ लॉट फ्रॉग्ज बिफोर यू फाइंड युवर प्रिन्स, अशा सारख्या वाक्यांना मराठीत आणणं कठीणच! -अपर्णा पाटील ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे ....ई. एल. जेम्स अनुवाद.....शोभना शिकनीस मेहता पब्लिशिंग हाऊस पदवीधर होणारी ऍनास्टाशिया स्टील कॉलेजच्या मासिकासाठी प्रसिद्ध तरुण उद्योगपती ख्रिश्चन ग्रे याच्या ऑफिसमध्ये शिरते आणि ख्रिश्चन तिच्या प्रेमात पडतो . दोघेही एकमेकांडे आकर्षिले जातात . पण ख्रिश्चनच्या शारीरिक संबंधविषयी काही अटी आहेत . तो या अटीबाबत आग्रही आहे आणि या अटी पूर्ण करण्यासाठी त्याने एक करारनामा ही तयार केलाय . आपल्याला शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर या करारावर सह्या कराव्या लागतील असे तो ऍनाला सांगतो . तिच्यावर भारी पडून वेदना देऊन सुख मिळवणे हेच ख्रिश्चनसाठी सुख असते .. तिला त्याला गमवायचे ही नाही आणि या अटी स्वीकाराच्या का ?? अश्या पेचात ती अडकते . ती त्यासंबंधी अजून जाणून घेण्यासाठी वेळ घेते .पण पुढे काय घडते .....?? स्त्री पुरुष शारीरिक संबंधाचे अतिरंजित वर्णन केलेले हे पुस्तक आहे . पुरुषांचे संभोगसंबंधी कल्पनाविश्वच यापुस्तकाद्वारे उघड करते. कथा नेहमीच्या प्रेमप्रकरणासारखी पुढे सरकते . अतिश्रीमंत नायक आणि गरीब नायिका . पण त्यांचे संबंध खूपच विस्ताराने आणि रंजकपणे लिहिले आहेत . हीच या पुस्तकाची खरी ओळख आहे . ख्रिश्चनचे खास शयनगृह त्यात असलेली विविध साधने ,त्याचा त्याने केलेला वापर वाचून आपण उद्दीपित होतो . ...Read more

  • Rating Starवाचक

    एका अतिशय नितांत सुंदर पुस्तकाची निरस अनुवाद करून माती कशी करावी याचे सुंदर(?) उदाहरण म्हणून हा पहिला भाग वाचावा. काही ठिकाणी वाचताना लेखिकेने कुठलातरी "सुलभ इंग्लिश इंटू मराठी" वगैरे शब्दकोश डोळ्यांसमोर ठेवून अनुवाद केलाय असा स्पष्टपणे जाणवतं. पुढ्या दोन भागांचा अनुवाद डॉ. सुचिता नंदापूरकर-फडके यांच्याकडून करून घेतल्याबद्दल मेहता पब्लिशिंग चे मनापासून आभार. आणि हि विनंती कि त्यांनी या पहिल्या भागाची पुढील आवृत्ती डॉ सुचिता यांच्याकडून अनुवादित करून पुनः प्रकाशित करावी. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 13-01-2019

    प्रेमातील रंग चितारणारी कादंबरी... ब्रिटिश लेखिका ई. एल. झेम्स यांनी ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’, ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ आणि ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’ ही ट्रायोलॉजी लिहिली असून, या प्रचंड खपाच्या कादंबऱ्या ठरल्या आहेत. एवढंच नाही तर या कादंबऱ्यांवर चित्रपटही नघाले आहेत. या तीनही कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाला आहे. त्यातील ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ ही कादंबरी एका अनोख्या प्रेमकहाणींचे दर्शन घडवते. कादंबरीची नायिका अ‍ॅनास्टॅशिया स्टील ही तरुणी अत्यंत श्रीमंत, बुद्धिमान आणि देखण्या तरुण सीईओची – खिश्चन ग्रेची मुलाखत घ्यायला जाते आणि पाहताक्षणीच त्याच्या प्रेमात पडते. खिश्चनदेखील तिच्या व्यक्तिमत्त्वावर भाळतो. दोघेही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नकळत एकमेकांकडे आकर्षिले जातात. प्रेमाच्या पडद्यावर लहरत राहणाऱ्या या अक्षरलहरी वाचताना वाचक गुंग होतो. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more