GRIPPING AND INSPIRING, THIS ACCOUNT TELLS THE STORY OF JAN RUFF-O’HERNE AND THE SHATTERING OF HER IDYLLIC CHILDHOOD IN DUTCH COLONIAL INDONESIA. DEPICTING THE JAPANESE INVASION OF JAVA IN 1942, THIS RIVETING AUTOBIOGRAPHY RECOUNTS HOW SHE WAS TAKEN FROM HER MOTHER AND TWO YOUNGER SISTERS AND FORCED INTO SEXUAL SLAVERY IN A MILITARY BROTHEL. FOLLOWING THE BEATINGS AND RAPES SHE SUFFERED DURING A PERIOD OF THREE MONTHS, THIS RECORD REVEALS HOW SHE WAS FINALLY RETURNED TO PRISON, ONLY TO HAVE HER FAMILY’S LIVES THREATENED IF SHE EVER SPOKE THE TRUTH ABOUT THE ATROCITIES INFLICTED UPON HER. HER SILENCE OVER FIVE DECADES IS PORTRAYED HERE, BROKEN ONLY BY HER WITNESSING KOREAN WAR RAPE VICTIMS MAKING PUBLIC APPEALS FOR JUSTICE AND HER RESOLUTION TO TESTIFY AND SUPPORT THEM. DOCUMENTING HER COURAGEOUS CONFESSION TO HER FAMILY AND HER TIRELESS WORK TO PROTECT THE RIGHTS OF WOMEN IN WAR AND ARMED CONFLICT, THIS RECOLLECTION IS A TRIBUTE TO ONE WOMAN’S INNER STRENGTH, CONSTANT FAITH, AND UNBREAKABLE SURVIVAL.
मनातल्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेली, नव्हे, गाडलेली ही गोष्ट आपल्या मुलींना, नातवंडांना कशी सांगायची? ही गोष्ट साधीसुधी नव्हतीच मुळी. ती एक अत्यंत लाजिरवाणी, दुर्दैवी भोगवटा होता. असा भोगवटा ज्याचं दु:ख, अपमान, लाज इतक्या प्रदीर्घ काळानंतरही तब्बल पन्नास वर्षांनंतरही यात्किंचितही कमी झालेली नाही. एक दिवस आपलं मन त्यांच्याजवळ मोकळं करावंच लागणार आहे, त्याची जाणीव मला होतीच पण मी कुठल्या तोंडानं त्यांना हे सांगणार होते..
‘‘मग ठरवलं, ते सगळं आपण लिहून काढायचं, कागदावर उतरवायचं.’’
आयुष्याचं अर्धशतक– थोडीथोडकी नव्हे, पन्नास वर्षं जॅननं मनात धुमसत राहिलेला कोंडमारा सहन केला. पण १९९२ साली या कोंडमाऱ्यांचा उद्रेक झाला.
ऐन तारुण्यात जॅनला जो शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागला त्याचं हृदयद्रावक कथन या पुस्तकात वाचायला मिळतं. ‘सुखदायिनी’ हे गोड बिरुद ज्या स्त्रियांना लावण्यात आलं ते एखाद्या इंगळीप्रमाणे त्यांना जन्मभर डसत राहिलं पण त्यांना तोंडातून वेदनेचा हुंकार काढण्याचीही सोय नव्हती.
कारण मृत्यूची टांगती तलवार तर त्यांच्या डोक्यावर होतीच शिवाय घरादाराची अब्रू वेशीवर टांगली जाईल ही भीतीही होती.
लैंगिक अत्याचारांमुळे जो अपमान, जे दु:ख तिला सोसावं लागलं त्याची ही कहाणी.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे पुरस्कार २०१२