* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FORWARD AND DELETE
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985344
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AMOLIKA FORWARDS A COMPUTER GAME ‘DATE OF DEATH’ TO NAROTTAM. THE GAME GIVES THE DATE OF DEATH AFTER SOME BASIC DATA IS FED IN. NAROTTAM TRIES THE GAME AFTER FILLING IN DATA OF HIS FRIEND, KUMAR. KUMAR’S DEATH SHATTERS NAROTTAM WHO TAKES ILL MENTALLY. HE DOES NOT RESPOND TO ANY MEDICAL TREATMENT. LATER AS AMOLIKA HAS A CONVERSATION WITH HIM SHE LEARNS THAT HE HAD SEXUALLY ABUSED A SIX YEAR OLD CHILD. DETERMINED TO PUNISH HIM FOR HIS HIDEOUS CRIME, AMOLIKA DESIGNS THE GAME HERSELF AND FORWARDS IT TO HIM. AWARE OF HIS OBSESSION TOWARDS COMPUTER GAMES AND MAILS SHE IS SURE THAT HER GAME WILL SUCCEED: NARROTAM WILL MEET HIS END. SHE SIMPLY WALKS AWAY FROM NAROTTAM; NEVER INTENDING TO RETURN.
‘बदला घेण्यासाठी रक्तलांच्छितच घटना घडायला हव्यात असं कोण म्हणतं? आणि जर तसं म्हणत असतील, तर ते चूक, अयोग्य. शांत मनाने आणि अक्कलहुशारीनेही बदला घेता येतो. आणि मग तो गुन्हा ठरत नाही. ठरवता येत नाही. गुन्हेगार सापडतच नाही.’ अमोलिका मनातल्या मनात असाच काहीसा विचार करत होती,
प्रसादबन पुरस्कार, नांदेड २०१४.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarShucheta Khadilkar

    Khup chan pustak ahe jarur vacha

  • Rating StarLOKPRABHA - 22-08-2014

    अनपेक्षित शेवटाची कहाणी... सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात ‘साइन इन-युवर नेम - पासवर्ड - मेल - ओपन - क्लिक - क्लिक - फॉरवर्ड - सेंट’ या सगळ्या स्टेप्स काही सेकंदात करता येतात, आणि एखादा आवडलेला ई-मेल क्षणात दुसऱ्याला पाठवता येतो. पण बीभत्स ई-मेल्सच्य चक्रव्यूहात अडकले की भल्याभल्यांचा अभिमन्यू होऊ शकतो. अशा क्षणिक आनंदाच्या मृगजळामागे धावणाऱ्या नरोत्तमाच्या आयुष्याचा होणारा धक्कादायक शेवट म्हणजे स्वाती चांदोरकरांची ही कादंबरी. कादंबरीची नायिका अमोलिका वास्तुविद्याविशारद आहे. रुपाने देखणी नसली तरी नाकी-डोळी नीटस असणारी ही आत्मविश्वासू मुलगी, सुसंस्कारित, नीतिमान आहे. या उलट तिचा नवा आणि कादंबरीचा नायक नरोत्तम फडणीस हा सुखवस्तू घरातला, हुशार मात्र अहंकारी आणि ‘ग’ची बाधा झालेला तरुण. कादंबरी या दोन मुख्य पात्रांभोवती फिरते. अमोलिका बांधीलकी पाळणारी तर नरोत्तम विषयासक्त असल्याने अधमेध्ये त्यांच्या संसारात वादळे येत राहतात. मात्र वाट चुकलेला नरोत्तम, त्याला येणारे अश्लील ई-मेल्स इतरांना फॉरवर्ड करत राहतो, ई-मेल फॉरवर्ड करण्याइतकं आयुष्य सोपं असतं, या समजुतीवर जगू लागतो. लग्नानंतर, मुलगा झाल्यावरही त्याची ही सवय सुटत नाही, उलट ती व्यसनात बदलते. असा हा नरोत्तम म्हणजे, ध्येयहीन, शरीरसुखाची चटक लागलेला, त्याचा विश्वात बुडालेला, भरकटलेल्या वाटेवरचा तरुण पिढीचा जणू प्रतिनिधी आहे. या लोकांना ताटात वाढलेले नीट खाण्याचेही भान उरत नाही आणि व्हायचे तेच होते. त्यांची आयुष्य उद्ध्वस्त होतातच मात्र त्यांचे संसारही धुळीला मिळतात, कधी कधी अनेक कोवळ्या कळ्या या विकृतींना बळी पडून भस्म होतात. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कथेची नायिका करते. अवघी २०० पानेही नसलेल्या या पुस्तकात घडणाऱ्या घटना अत्यंत वेगाने घडत जातात अमोलिकाचे व्यावसायिक आयुष्य यशस्वितेचे शिखर गाठत असते, एका हॉस्पिटलचे डिझाइन बनवताना तिने केलेल्या बारकाव्यांचा अभ्यास, उगाचंच नसून त्याचा उपयोग कथेच्या शेवटी लेखिकेने अत्यंत खुबीने केला आहे. कादंबरी अनोळखी वळणे घेत पुढे जाते, शेवट अत्यंत अनपेक्षित, अकल्पित आणि चटका लावणारा आहे. आजच्या काळाचे समर्पक चित्र उभे करण्यासाठी, धकाधकीचे जीवनमान शब्दात पकडण्यासाठी लेखिकेने घेतलेला इंग्रजीचा आधार अपरिहार्य वाटतो. रक्षिता, अमोलिकाची आई, बाई सप्रे, फडणीस दांपत्य यांची पात्रे कथेच्या सूत्रात मोलाची भर घालतात. मात्र उमाकांत सप्रेंची मूल्ये, त्यांची वैचारिक बैठक वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. उदाहरणादाखल त्यांचे पत्नीला म्हणजे बाई सप्रेंना उद्देशून एक स्वागत आहे. ‘मला नेहमीच एक कोडं पडतं. समजा एक व्यक्ती... तिला तिच्या लहानपणी काही गोष्टी मिळाल्या नाहीत, म्हणजे प्रेम, वात्सल्य, कौतुक वगैरे, अशी व्यक्ती मोठी होते. तिचं लग्न होतं. तिला मूल होतं. तर, त्या मुलाला ती कसं वाढवेल? जे आपल्याला मिळालं नाही, ते ती आपल्या मुलाला देईल? की जे मिळालंच नाही म्हणून द्यायचं कसं हेच तिला समजणार नाही. बाई या दुसऱ्या प्रकारात मोडतात. नायिकेची भावनिक गुंतागुंत, त्यावर अलगद फुंकर घालणारी अकील या तिच्या सहकाऱ्याची निखळ मैत्री स्वाती चांदोरकरांनी सुरेख रेखाटली आहे. कादंबरी नात्यांमधल्या गुंत्याबद्दल भाष्य करेल असे वाटत असताना, एका सामाजिक समस्येकडे आपले लक्ष वेधते. मलपृष्ठावरील पुस्तकाच्या मजकुराचा हळूहळू संदर्भ लागतो. सूडभावनेने पेटलेल्या व्यक्ती गुंड प्रवृत्तीच्या असतात, या गृहीतकाला फोल ठरवणारे वळण वाचकांचे कुतूहल वाढवते. बदल्याची आग सर्वसामान्यांचेही आयुष्य ढवळून काढू शकते, याची खात्री पटते आणि शांत डोक्याने केलेल्या कट-कारस्थानांचा मक्ता हा पुरुषवर्गाचा किंवा सराईत गुन्हेगारांचा, या धारणेला शंभर टक्के हादरे देणारा शेवट कादंबरीचा परमोच्च बिंदू ठरेल असा आहे. म्हणूनच आवर्जून वाचावे असे पुस्तक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more