* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FREEDOM AT MIDNIGHT
  • Availability : Notify Me
     
  • Translators : MADHAV MORDEKAR
  • ISBN : 9788171617463
  • Edition : 12
  • Publishing Year : JANUARY 1977
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :MAHATMA GANDHI COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FREEDOM AT MIDNIGHT TAKES THE READERS BACK IN TIME, WHEN INDIA WAS ON THE VERGE OF OBTAINING FREEDOM FROM THE BRITISH RAJ. THE AUTHORS START OFF BY THROWING LIGHT ON THE APPOINTMENT OF LORD MOUNTBATTEN AS THE NATION`S FINAL VICEROY. THIS BOOK ALSO COMPRISES OF INTERVIEWS WITH A NUMBER OF WITNESSES TO THESE EVENTS, INCLUDING LORD MOUNTBATTEN. THE AUTHORS ALSO DELVE ON THE PARTITION OF INDIA AND PAKISTAN ON THE BASIS OF RELIGIOUS DIFFERENCES, ALONG WITH THE VIOLENCE THAT FOLLOWED. THEY MOVE ON TO TALK ABOUT THE FURY OF BOTH MUSLIMS AND HINDUS INCITED BY THEIR COMMUNAL LEADERS. THEY ALSO TALK ABOUT THE LARGEST ATROCITY IN THE INDIAN HISTORY, AS MILLIONS OF INNOCENT PEOPLE WERE PULLED OUT OF THEIR DWELLING PLACE AND WERE FORCED TO TRAVEL BY FEET, OXCART, OR TRAIN, TO THE PLACE ASSIGNED TO THEM BY THEIR RELIGIOUS GROUP. SEVERAL MIGRANTS FELL PREY TO THE BLOODTHIRSTY EXTREMISTS FROM BOTH THE RELIGIOUS GROUPS. THIS BOOK ALSO DOCUMENTS SEVERAL HEART-RENDING STORIES DURING THAT PERIOD. FREEDOM AT MIDNIGHT ALSO PROVIDES A DETAILED ACCOUNT ON THE EVENTS THAT LED TO MAHATMA GANDHI`S ASSASSINATION BY NATHURAM GODSE. THE READERS ARE ALSO TOLD ABOUT THE LIFE AND INTENTS OF JAWAHARLAL NEHRU, INDIA`S FIRST PRIME MINISTER AND MUHAMMAD ALI JINNAH, A STRONG PAKISTANI LEADER.
`भारतावर राज्य करण्याची जबाबदारी ब्रिटिश वंशावर नियतीने कशी काय सोपवली हे एक अतक्र्य, अगम्य असे गूढच आहे.` —रुड्यार्ड किपलिंग `भारतातील ब्रिटिश सत्तेवर आपण आपल्याच हाताने उदक सोडत आहोत. आपण आपल्याच हाताने हा धोंडा पायावर पाडून घेत आहोत. त्यातून होणारी हानी आपल्या दृष्टीने अंतिम व आपल्या एकूण अस्तित्वाला धोक्यात आणणारीच ठरेल. यथावकाश, आपल्याला जगातील एक किरकोळ प्रतीची सत्ता बनवणा-या एका प्रक्रियेची ती सुरुवातच ठरणार यात मला तर शंका वाटत नाही.` — विन्स्टन चर्चिल हाऊस ऑफ कॉमन्स मधील एका भाषणात फेब्रुवारी१९३१ `नियतीशी आपण अनेक वर्षांपूर्वी एक करार केलेला होता. आज तो क्षण आला- आपल्या वचनबद्धतापूर्तीचा. त्या वेळी केलेली आपली ती प्रतिज्ञा आज पूर्ण होत आहे... आजच्या या दिवशी, जेव्हा घड्याळात मध्यरात्रीचा टोला पडेल, त्या वेळी जग झोपेत असेल एकीकडे पण आपल्या भारतात मात्र प्रत्येक जण एका नव्या जीवनाचा व स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी जागा असेल. इतिहासात असा एखादा क्षण येतो, पण तोही क्वचितच! त्या क्षणी आपण `जुने जाऊ द्या मरणालागुनि` म्हणत एका नव्या वळणावर पदार्पण करतो. तो क्षण असतो एका युगान्ताचा, राष्ट्रात्म्याच्या जागृतीचा - ज्याचा आवाज सतत दाबून धरण्यात आलेला होता - हुंकार कानी पडण्याचा हा एक अलौकिक क्षण आहे.` —जवाहरलाल नेहरू १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताच्या घटना समितीसमोर भाषण करताना
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #FREEDOMATMIDNIGHT #FREEDOMATMIDNIGHT #फ्रीडमअ‍ॅटमिडनाईट #POLITICS&GOVERNMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MADHAVMORDEKAR #माधवमोर्डेकर #DOMINIQUELAPIERRELARRYCOLLINS "
Customer Reviews
  • Rating StarNivedita Zende

    नुकतच वाचून संपवलं.. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती झाल्यापासून गांधीहत्या पर्यंतचा प्रवास याच्यामध्ये रेखाटलेला आहे. माझ्या सारख्या पिढीला जर स्वातंत्र्य आणि फाळणी या दोन गोष्टींविषयी जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्त अतिशय उत्तम आहे. लेखकांनी लिहितांना अतिशय त्रयस्थपणे ह्यात सगळं मांडलेलं आहे परंतु भारतीय म्हणून तुम्हाला तितकं त्रयस्थ म्हणून पाहता येत नाही. काही गोष्टी अगदी तुमच्या आत जाऊन भिडतात आणि मानसिक त्रास ही देतात. Best seller पुस्तकं आहे म्हणून सहज घेतलं होतं वाचायला, पण हे पुस्तक बेस्ट सेलर का आहे याचे उत्तर स्वतः हे पुस्तक देतं. इतिहास आणि तथ्य याची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक.. ...Read more

  • Rating StarB. S Kale

    1946 ते 1948 या काळात घडलेल्या घटनांचे सविस्तर विवेचन यात येते.लॉर्ड माउंटबॅटन यांचे कार्य, महात्मा गांधी,पंडित नेहरू, बॅ. जिना, पाकिस्तान ची निर्मिती, संस्थानिक व त्यांची संस्थाने, सरदार पटेल या सर्वांच्या कार्यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. फाळणी्या वेळी झालेला नरसंहार व गांधीजींचा खून याबद्दल विस्तृत माहिती आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more