THE RUSSIA-UKRAINE WAR HAS UNSETTLED THE ENTIRE WORLD. IN THIS LONG STRUGGLE, A SMALL COUNTRY LIKE UKRAINE IS PUTTING ALL THE EFFORTS. THESE STORIES HIGHLIGHT THE COURAGEOUS CITIZENS OF THIS COUNTRY AND THEIR STRUGGLE.
या कथासंग्रहातील सातही कथा रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या वर्तमान युद्धाच्या पार्श्वभूमीवरील आहेत. ‘द ग्रेट डिक्टेटर’मधील अभिनेत्री / मॉडेल बार्बारा देशप्रेमाने भारून, युद्धात उतरून, रशिया-युक्रेन युद्धावर आधारित सिनेमाची निर्मिती करते; पण... ‘लव्ह, वॉर अॅन्ड...?’मधील घटस्फोटित अँजेलिना आणि सैनिक असलेल्या बोरिसचं वैवाहिक आयुष्य एक दिवसाचं ठरतं. बोरिस मारला जातो युद्धात; पण त्याचा वंश वाढत असतो अँजेलिनाच्या पोटात. मग अँजेलिनाच्या मनात पडतं महाकादंबरीचं बीज... ‘फ्रीडम ऑन फायर’मध्ये इगोर आणि सोफिया या पिता-पुत्रीच्या आंधळ्या रशियानिष्ठेला दिमित्री हा इगोरचाच मुलगा दाखवतो युक्रेनमधील विध्वंसाचा आरसा आणि मग सोफिया जाग आणू पाहते रशियनांना... ‘सच ए लाँग जर्नी’ मध्ये भारतीय शिवच्या मनात पाकिस्तानविषयी असलेल्या अढीमुळे माहजबिन ऊर्फ मून या पाकिस्तानी मुलीची दोस्ती स्वीकारायला तो तयार नसतो; पण युक्रेनमधील युद्धामुळे आपापल्या मायदेशी परतत असतानाच्या प्रवासात शिवचं मनपरिवर्तन होतं...रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे दोन्ही देशांतील नागरिकांच्या मनात उठलेल्या भावनिक/मानसिक संघर्षाच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या उत्कट कथा