* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983609
  • Edition : 17
  • Publishing Year : JANUARY 1951
  • Weight : 190.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I AM INSPIRED WITH A STORY AND THIS STORY HAS ITS DEFINITE SHAPE AS IT ACQUIRES MY THOUGHTS. BUT I CANNOT SAY THAT THIS IS WHAT HAPPENS ALWAYS. AT TIMES, THERE JUST A TINY SEEDLING THAT DROPS ONTO THE SOFT CUSHIONS OF MY MIND, AWAITING FAVOURABLE CONDITIONS FOR GERMINATION, JUST LIKE THE PEEPUL SEED. IT IS ALSO TRUE THAT EVERY NOW AND THEN MANY SUCH SEEDS DROP INTO MY MIND. IT IS NOT POSSIBLE TO DIFFERENTIATE THE PEEPUL SEED FROM THAT OF GRASS. YET, I CAN SURELY HEAR THE WIND PASSING THROUGH THE DENSE FOLIAGE OF THE PEEPUL. THESE STORIES RESEMBLE THE WIND PASSING THROUGH IT.
गोष्ट जेव्हा स्फुरते, तेव्हा ती आपला आकार घेऊनच येते. पण हे नेहमीच होते, असे नाही. काही वेळा कथेचे अगदी लहान बीज मनात येऊन पडते – पिंपळाच्या बीजासारखे. अशी बीजे नेहमीच पडत असतात; पण त्यातले गवताचे कोणते आणि पिंपळाचे कोणते, हे मात्र कळते. नेमके कळत नाही; पण पुढे जो विस्तीर्ण अश्वत्थ वृक्ष होणार असतो, त्याच्या पानांची नुसती गंभीर सळसळच ऐकू येते. ...अशीच पानांची सळसळ असलेला वृक्ष! म्हणजे ‘गावाकडच्या गोष्टी’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarPankaj Kharade

    " गावाकडच्या गोष्टी" हा व्यंकटेश मांडगुळकर लिखित कथासंग्रह . खरतर ` कथा ` म्हटलं की काहीतरी काल्पनिक गोष्टी किंवा उथळ काहीतरी भाकड गोष्टी असाच काहीसा समज असतो . शीर्षकावरून या पुस्तकाच्या खोलीचा अंदाज कधीच लागणार नाही. एखाद्या अस्सल खवय्या लाजसं काहीतरी गावरान खाण्याची भूक असते ती काहीतरी चमचमीत खाण्याने पूर्ण होते तसच एखाद्या अस्सल वाचकाला जर काही अस्सल गावरान किंवा ग्रामीण वाचायची इच्छा असेल तर त्याची वाचनाची भूक हे पुस्तक नक्कीच शमवेल . असे हे पुस्तक आहे . पुस्तकातील काळ हा ६०/७० च्या दशकातील असावा , तेव्हाची खेड्यांतील परिस्थिती , तेव्हाची अंधश्रध्दा , चालीरीती, परंपरा , न्यायव्यवस्था , आर्थिक साधने , वेशभूषा , यांचे वर्णन लेखकांनी इतकं हुबेहूब आणि अस्सल गावरान भाषेत केलं आहे की पुस्तक संपेपर्यंत ते खाली ठेऊच शकत नाही इतकं गुंतवून ठेवत . प्रत्येक गोष्ट इतकी अप्रतिम आहे की जसं किनाऱ्यावरून सागराच्या खोलीचा अंदाज लावू शकत नाही तस गोष्टीच्या शीर्षकावरून या पुस्तकातील गोष्टीचा अंदाज लावू शकत . प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्याला त्याकाळात घेऊन जाते . इतकं सुंदर वर्णन आहे की वाचक त्या कथेत गुंतत जातो आणि प्रत्येक गोष्टीच्या शेवटी मनाला चटका लावणारा आणि विचार करायला लावणारा शेवट हा या पुस्तकाचा plus point आहे. १२२ पानी १६ कथांचा संग्रह असणारे हे छोटेखानी पुस्तक निव्वळ अप्रतिम असा वाचानानंद देते हे हमखास . ...Read more

  • Rating StarMangesh Bhalerao

    Very nice....

  • Rating StarMadhavi Deshpande

    मस्तच आहेत! पुन्हा पुन्हा वाचाव्याशा

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more