* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GEORGE AND HIS BEST FRIEND ANNIE HAVEN`T HAD ANY SPACE ADVENTURES FOR A WHILE AND THEY`RE MISSING THE EXCITEMENT. BUT NOT FOR LONG. . . SERIOUSLY STRANGE THINGS START HAPPENING. BANKS ARE HANDING OUT FREE MONEY; SUPERMARKETS CAN’T CHARGE FOR THEIR PRODUCE SO PEOPLE ARE GETTING FREE FOOD; AND AIRCRAFT ARE REFUSING TO FLY. IT LOOKS LIKE THE WORLD`S BIGGEST AND BEST COMPUTERS HAVE ALL BEEN HACKED. GEORGE AND ANNIE WILL TRAVEL FURTHER INTO SPACE THAN EVER BEFORE IN ORDER TO FIND OUT WHO IS BEHIND IT.
जॉर्ज आणि अ‍ॅनी काही दिवस अंतराळ साहसांपासून दूर असतात. त्यांना आपल्या साहसी प्रवासातला थरार आठवत राहतो. पण अवघ्या काही दिवसातच त्यांच्यापुढं नवं आव्हान उभं राहतं. बॅंका फुकट पैसे वाटू लागतात. सुपरमार्केटमधलं सामान फुकट वाटलं जाऊ लागतं. विमानं उडायला नकार देतात. जगातले सर्वात मोठे आणि चांगले संगणक अचानक बंद पडतात आणि जणू जगाच्या व्यवहारालाच खीळ बसते. आणि जॉर्ज व अ‍ॅनीला याची कारणं शोधायला पुन्हा अंतराळात झेप घ्यावी लागते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#GEORGE&THEUNBREAKABLECODE #SPACECRAFT #LUCYHAWKINGS #STEPHANHAWKINGS #CHIDRENBOOKS #SPACEFICTION #SCIENCEFICTION #MARATHITRANSLATION #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #ONLINEBOOKS #GEORGE&ANNIE #जॉर्जएण्डअनब्रेकेबलकोड #अंतराळयान #विज्ञानकथा #ल्युसीहॉकिंग #स्टीफनहॉकिंग #बालसाहित्य #मराठीअनुवाद #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more