* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GEORGE`S PET PIG BREAKS THROUGH THE FENCE INTO THE GARDEN NEXT DOOR - INTRODUCING HIM TO HIS NEW NEIGHBOURS: THE SCIENTIST, ERIC, HIS DAUGHTER, ANNIE AND A SUPER-INTELLIGENT COMPUTER CALLED COSMOS. AND FROM THAT MOMENT GEORGE`S LIFE WILL NEVER BE THE SAME AGAIN, FOR COSMOS CAN OPEN A PORTAL TO ANY POINT IN OUTER SPACE. . . WRITTEN BY SCIENCE EDUCATOR LUCY HAWKING AND HER FATHER - THE MOST FAMOUS SCIENTIST IN THE WORLD - AND ILLUSTRATED BY GARRY PARSONS, GEORGE`S SECRET KEY TO THE UNIVERSE WILL TAKE YOU ON A ROLLER COASTER RIDE THROUGH SPACE TO DISCOVER THE MYSTERIES OF OUR UNIVERSE.
‘जॉर्जेस सिक्रेट की टू द युनिव्हर्स’ हे पुस्तक म्हणजे जॉर्ज या शाळकरी मुलाच्या अपूर्व धाडसाची आणि त्याच्या हुशारीची कथा आहे. जॉर्जच्या शेजारी एरिक नावाचे वैज्ञानिक राहायला येतात. त्यांची लहान मुलगी अ‍ॅनी आणि कॉसमॉस हा त्यांचा सुपर कॉम्प्युटर यांच्यासह ते राहत असतात. जॉर्जची एरिक आणि अ‍ॅनीशी घनिष्ठ मैत्री होते. ‘कॉसमॉस’मुळे अंतराळात जाणं एरिक आणि अ‍ॅनी यांना अगदी सहजसाध्य असतं. अ‍ॅनी एरिकच्या चोरून एकदा जॉर्जलाही अंतराळाची सफर घडवते. जॉर्जच्या शाळेतील एक शिक्षक डॉ. रीपर एरिकच्या विरोधात असतात. एरिकची दिशाभूल करून ते एरिकना अंतराळात पाठवतात आणि कॉसमॉसला चोरून नेतात. एरिकचा जीव धोक्यात आहे, हे जॉर्जला समजतं. तो एरिकना वाचवण्यासाठी काय करतो? डॉ. रीपर आणि एरिकमध्ये कोणत्या कारणामुळे शत्रुत्व असतं? जॉर्ज रीपरकडून कॉसमॉसला कसा हस्तगत करतो...याची उत्कंठापूर्ण कहाणी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#PRAMODJOGLEKAR #प्रमोदजोगळेकर #LUCYHAWKING #STEPHENHAWKING #GEORGESANDBIGBANG #जॉजअँडदबिगबँग #SCIENCEFICTION #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI"
Customer Reviews
  • Rating StarIshwari soliwal

    I like thise book very mach but I don` t undrestant english .😞😞😞

  • Rating StarLOKPRABHA 17-05-2019

    जॉर्जबरोबर विश्वाची सफर... अवकाशाविषयीच्या आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत मानवाने विश्वाच्या पोटातील असंख्य रहस्ये खणून काढली आहेत. तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’चे लेखक, प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग आणि त्यांची मुलग ल्युसी हॉकिंग यांनी मिळून लिहिलेले हे पुस्तक अशा प्रश्नांची उत्तरे देते. एखादे शाळेत शिकू लागणारे लहान मूल त्याच्या भोवतालच्या वातावरणातून, घरात मिळणाऱ्या शिकवणीतून आणि निरीक्षणांमधून खूप काही शिकत असते. घरात ज्या गोष्टींना प्रतिबंध आहे अशा गोष्टींविषयी तर मुलांना जास्तच उत्सुकता असते. अवकाशासंबंधीच्या प्रश्नांनी मुलांनी उत्सुकता दाखवली ते, लहानांच्या या प्रश्नाला मोठ्यांना लहानांच्या पचनी पडेल असे उत्तर देताच येत नाही, कारण वैज्ञानिक भाषेतले उत्तर अगदी कठीण, मग हे देवाने तयार केले असे काहीतरी सांगून वेळ मारून नेली जाते. पण त्याऐवजी सोप्या भाषेत हे मुलांना समजले तर त्यामुळे मुलांच्या उत्सुकतेला खतपाणीच घातले जाते. पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे काहीतरी विज्ञान - खगोलशास्त्राचे कठीण पुस्तक आहे अशा आविर्भावात न शिरता एका मुलाच्या गोष्टीतून सुरुवात होते. जॉर्ज नावाच्या लहान मुलाचे आईवडील त्याने कायम नैसर्गिक गोष्टीतून शिकावे असाच विचार करत असतात. जॉर्जला नैसर्गिक वातावरणात वाढवायचे म्हणून कॉम्प्युटर, मोटार यापासून त्याला दूर ठेवलेले असते. एवढेच काय, त्यासाठी त्यांनी अगदी घरात वीजसुद्धा घेतलेली नसते. अशा वेळी आत्ताच्या विज्ञानाच्या जगात त्याला अनेक प्रश्न पडणे स्वाभाविक असते. त्याच्या प्रश्नांना वाव मिळते ती शेजारी असलेल्या विज्ञानप्रेमी घरात अपघातानेच शिरल्यावर. या कथेच्या पार्श्वभूमीला धरून ‘जॉर्जेस सिक्रेट की टू युनिव्हर्स’ या पुस्तकात विज्ञानाची वेगवेगळी अनेक रहस्ये अगदी सहजतेने उलगडून दाखवली आहेत. गोष्ट जसजशी पुढे सरकते तसे जॉर्जच्या कुतूहलातून आपल्यालाही अनेक माहीत नसलेल्या गोष्टी समजतात. अगदी ग्रह तारे म्हणजे काय इथपासून ते ताऱ्यांचा जन्म कसा होतो, दीर्घिका म्हणजे नेमके काय, पृथ्वी-चंद्र यांच्याविषयीची अगदी सखोल माहिती, प्रकाश, त्याचा वेग आणि त्या अनुषंगानेच आपल्याला माहिती होत जाणाऱ्या इतर गोष्टी, ज्या खरंतर आपल्याला शाळेत शिकवलेल्या असतात, पण त्यातल्या क्लिष्ट भाषेमुळे आणि अभ्यासाच्या धाकामुळे त्यातली रंजकता कधी कळतच नाही अशा अनेक गोष्टी यातून नव्याने आपल्याला कळतात. जॉर्जच्या गोष्टीसोबत त्याव्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या ज्या लहान लहान चौकटी आहेत, त्यामध्ये गोष्टीत येणाऱ्या विषयाची आणखी तपशीलवार माहिती दिली आहे, ती संग्राह्य आहे. कथा जसजशी पुढे जाते तसे जॉर्जचे कुतूहल आणि त्याचे कल्पनाविश्व विस्तारत जाते. त्याला मिळालेल्या नवीन मैत्रिणीच्या कॉसमॉस या संगणकावर ते खूप नव्या गोष्टी शिकतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने तो अवकाशातल्या कितीतरी गोष्टी अक्षरश: अनुभवतो. ही माहिती त्याला देणारे वैज्ञानिक एरिक त्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी उत्साहाने त्याला देतात. याच वेळी एरिक यांचं बाह्य अवकाशाबद्दल संशोधन सुरू असतं आणि एकदा तर चक्क कॉसमॉस या संगणकाच्या मदतीने जॉर्ज अवकाशाची सफरसुद्धा करून येतो. जॉर्जची ही माहितीची सफर त्याला आईवडिलांना, इतर शाळासोबत्यांना माहीत नसते. या सफरीमध्ये आपल्या कुतूहलापोटी जॉर्ज कधी कधी आपला जीवही धोक्यात घालतो. जॉर्जच्या शाळेत एकीकडे विज्ञान स्पर्धा सुरू झालेली असते, ज्याचं बक्षीस असतं, एक कॉम्प्युटर पण जॉर्जच्या पालकांना मात्र जॉर्जने या सगळ्यापासून दूर राहावे असेच वाटत असते. तरीही तो या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवतो, मग या स्पर्धेचे काय होते? जॉर्जला कॉम्प्युटर मिळतो का? हे प्रश्न एकीकडे, तर दुसरीकडे एरिक यांच्यासोबत अंतराळात जाऊ लागलेला जॉर्ज तिथे जाऊन काय काय अनुभवतो? कोणकोणत्या धोक्यांना तोंड देतो अशा अगदी गुंग करून टाकणाऱ्या प्रसंगांसोबत जॉर्जच्या निमित्ताने आपल्यालाही या सफरीचा भाग होता येते. जॉर्ज या विश्वात असताना ज्या एरिक यांनी जॉर्जला हे सगळं विश्व दाखवलेलं असतं, त्यांना कुणीतरी त्यांच्यावर असलेल्या रागातून कायमचे नष्ट करण्याचा डाव आखत असतं. एरिकचे बाह्यविश्वाच्या संशोधनाचे काम सुरू असतानाच त्यांना एका कृष्णविवरात अडकण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग नव्याने विज्ञान शिकणाऱ्या जॉर्जला एरिक यांना बाहेर काढायचे साहस करावे लागते. हे वाचताना अगदी थरारक प्रसंगांचा अनुभव मिळतो. विज्ञान आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या मुलांसाठीही ही कादंबरी म्हटली तर अगदी वैज्ञानिक, म्हटली तर अगदी ‘फिक्शन’, शाळेतील विज्ञान क्लिष्ट वाटणाऱ्या मुलांना हे पुस्तक वाचून त्यात नक्की रस निर्माण होईल अशाच पद्धतीने या पुस्तकाची मांडणी आहे. मुलांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. –विशाखा कुलकर्णी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 02-12-2018

    मुलांसाठी ज्ञानवर्धक विज्ञान कादंबरी... ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ या पुस्तकाचे लेखक जागतिक कीर्तीचे महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे नुकतेच मार्च महिन्यात निधन झाले. ते आणि त्यांची मुलगी ल्यूसी हॉकिंग यांनी एकत्रितपणे लहान मुलांसाठी काही विज्ञा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’तर्फे त्यांचा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्यातील पहिली कादंबरी म्हणजे ‘जॉर्जेस सिक्रेट की टू द युनिव्हर्स’ ही होय. या कादंबरीतून मूलभूत विज्ञान आणि विशेषत: भौतिक विज्ञानातील अनेक संकल्पना या पुस्तकात त्यांनी अतिशय सोप्या करून सांगितल्या आहेत. कादंबरीचा नायक जॉर्ज आणि त्याची मैत्रीण अ‍ॅनी यांच्या माध्यमातून घडलेली ही सफर उत्कंठावर्धक करताना विज्ञानातील तथ्यं दर्जाशी तडजोड न करता लेखकद्वयीने मुलांसमोर ठेवली आहेत. या पुस्तकातील रंजकतेमुळे वाचक त्यात हरवून जातो. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 11-11-2018

    हॉकिंगची दुसरी विज्ञान कादंबरी... जागतिक कीर्तीचे महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि त्यांची मुलगी ल्यूसी हॉकिंग यांनी एकत्रितपणे बालवाचकांसाठी लिहिलेलं ‘जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हंट’ हे पुस्तक म्हणजे ‘जॉर्जेस सिक्रेट टू द युनिव्हर्स’ या यशस्वी पु्तकानंतरचं दुसरं पुस्तक. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’तर्फे याचाही मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला असून, डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी तो केला आहे. जॉर्जच्या धाडसांच्या मालिकेतील हे दुसरं पुस्तकही पहिल्याइतकंच मनोरंजक आणि मूलभूत विज्ञानाची उत्कृष्ट माहिती देणारे आहे. मूलभूत विज्ञान आणि विशेषत: भौतिक विज्ञानातील अनेक संकल्पना या पुस्तकात त्यांनी अतिशय सोप्या करून सांगितल्या आहेत. या विज्ञान कादंबरीत अनेक ठिकाणी महान वैज्ञानिकांबद्दल संदर्भ आले आहेत. जॉर्जची ही पुढची साहससफर वाचकांना नक्कीच आवडेल अशी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more