* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GETTING THINGS DONE
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788184984842
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 364
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :DAVID ALLEN BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN TODAY`S WORLD, YESTERDAY`S METHODS JUST DON`T WORK. IN GETTING THINGS DONE, VETERAN COACH AND MANAGEMENT CONSULTANT DAVID ALLEN SHARES THE BREAKTHROUGH METHODS FOR STRESS-FREE PERFORMANCE THAT HE HAS INTRODUCED TO TENS OF THOUSANDS OF PEOPLE ACROSS THE COUNTRY. ALLEN`S PREMISE IS SIMPLE: OUR PRODUCTIVITY IS DIRECTLY PROPORTIONAL TO OUR ABILITY TO RELAX. ONLY WHEN OUR MINDS ARE CLEAR AND OUR THOUGHTS ARE ORGANIZED CAN WE ACHIEVE EFFECTIVE PRODUCTIVITY AND UNLEASH OUR CREATIVE POTENTIAL. IN GETTING THINGS DONE ALLEN SHOWS HOW TO: APPLY THE "DO IT, DELEGATE IT, DEFER IT, DROP IT" RULE TO GET YOUR IN-BOX TO EMPTY REASSESS GOALS AND STAY FOCUSED IN CHANGING SITUATIONS PLAN PROJECTS AS WELL AS GET THEM UNSTUCK OVERCOME FEELINGS OF CONFUSION, ANXIETY, AND
संपर्क आणि जबाबदा-या वाढलेल्या आजच्या जगात आपल्यासमोरील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गतकालातील जुन्या सवयींचा फायदा होत नाही. मग अशा वेळी काय करावे, कार्यतत्परता कशी साधावी आणि उत्पादकता व सर्जनशीलता कशी वाढवावी यांसाठी या पुस्तकात विविध क्ऌप्त्या दिल्या आहेत. यातली सर्वांत कळीची आणि आजच्या काळातली अत्यावश्यक गोष्ट म्हणजे तणावमुक्ती! या पुस्तकातले गृहीतक अगदी साधे आहे – उत्पादकता आणि ताणापासून मुक्त राहण्याची क्षमता, यांच्यामध्ये थेट संबंध असतो. आपले मन मोकळे असेल आणि विचार सुसंघटित असतील, तरच आपण तणावमुक्त उत्पादकता साध्य करू शकतो आणि आपल्या सर्जनशील क्षमतांना वाट मोकळी करून देऊ शकतो. या पुस्तकातल्या साध्यासोप्या पद्धती वापरून पाहा, आणि कार्यस्थळी; तसेच वयक्तिक जीवनातही नीटनेटकेपणा आणा; कार्यक्षमता आणि सर्जनशीलता वाढवा!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GETTINGTHINGSDONE #GETTINGTHINGSDONE #गेटिंगथिंग्जडन #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASHANTTALNIKAR #DAVIDALLEN "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more