* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FOR WHOM THE BELL TOLLS
  • Availability : Available
  • Translators : D.B.MOKASHI
  • ISBN : 9789353172640
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 1941
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 472
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : HISTORICAL, MODERN & CONTEMPORARY FICTION
  • Available in Combos :AMERICAN CLASSICS COMBO SET-17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NOVEL GRAPHICALLY DESCRIBES THE BRUTALITY OF THE CIVIL WAR IN SPAIN DURING THIS TIME. IT IS TOLD PRIMARILY THROUGH THE THOUGHTS AND EXPERIENCES OF THE PROTAGONIST, ROBERT JORDAN. IT DRAWS ON HEMINGWAY`S OWN EXPERIENCES IN THE SPANISH CIVIL WAR AS A REPORTER FOR THE NORTH AMERICAN NEWSPAPER ALLIANCE.[11] JORDAN IS AN AMERICAN WHO HAD LIVED IN SPAIN DURING THE PRE-WAR PERIOD, AND FIGHTS AS AN IRREGULAR SOLDIER FOR THE REPUBLIC AGAINST FRANCISCO FRANCO`S FASCIST FORCES. AN EXPERIENCED DYNAMITER, HE IS ORDERED BY A RUSSIAN GENERAL TO TRAVEL BEHIND ENEMY LINES AND DESTROY A BRIDGE WITH THE AID OF A BAND OF LOCAL ANTI-FASCIST GUERRILLAS, IN ORDER TO PREVENT ENEMY TROOPS FROM RESPONDING TO AN UPCOMING OFFENSIVE. ON HIS MISSION, JORDAN MEETS THE REBEL ANSELMO WHO BRINGS HIM TO THE HIDDEN GUERRILLA CAMP AND INITIALLY ACTS AS AN INTERMEDIARY BETWEEN JORDAN AND THE OTHER GUERRILLA FIGHTERS. IN THE CAMP, JORDAN ENCOUNTERS MARÍA, A YOUNG SPANISH WOMAN WHOSE LIFE HAD BEEN SHATTERED BY HER PARENTS` EXECUTION AND HER RAPE AT THE HANDS OF THE FALANGISTS (PART OF THE FASCIST COALITION) AT THE OUTBREAK OF THE WAR. HIS STRONG SENSE OF DUTY CLASHES WITH BOTH THE UNWILLINGNESS OF THE GUERRILLA LEADER PABLO TO COMMIT TO AN OPERATION THAT WOULD ENDANGER HIMSELF AND HIS BAND, AND JORDAN`S OWN NEW-FOUND LUST FOR LIFE WHICH ARISES FROM HIS LOVE FOR MARÍA. PABLO`S WIFE, PILAR, WITH THE SUPPORT OF THE OTHER GUERILLAS, DISPLACES PABLO AS THE GROUP LEADER AND PLEDGES THE ALLEGIANCE OF THE GUERRILLAS TO JORDAN`S MISSION. WHEN ANOTHER BAND OF ANTI-FASCIST GUERRILLAS, LED BY EL SORDO, IS SURROUNDED AND KILLED DURING A RAID THEY CONDUCTED IN SUPPORT OF JORDAN`S MISSION, PABLO STEALS THE DYNAMITE DETONATORS AND EXPLODER, HOPING TO PREVENT THE DEMOLITION AND THEREBY AVOID FASCIST REPRISALS. ALTHOUGH HE DISPOSES OF THE DETONATORS AND EXPLODER BY THROWING THEM DOWN A GORGE INTO THE RIVER, PABLO REGRETS ABANDONING HIS COMRADES AND RETURNS TO ASSIST IN THE OPERATION.
‘घणघणतो घंटानाद’ हे दि. बा. मोकाशी यांचे पुस्तक मूळ लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’ या कादंबरीवर आधारित आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचे वर्णन या कादंबरीत आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांचे विशेषतः रॉबर्ट जॉर्डनचे विचार आणि कार्यानुभवांतूनच ही कथा साकारली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचे वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिले आणि अनुभवले तेही यामध्ये आले आहे. जॉर्डनचा फॅसिस्टांविरुद्धचा संघर्ष कोणत्या वळणाने जातो, याचं यशासांग चित्रण असणारं पुस्तक म्हणजे घणघणतो घंटानाद होय. या पुस्तकावर आधारित ‘फॉर हूम द बेल टोल्स’ हा चित्रपटही 1943 मध्ये प्रदर्शित झालेला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#FORWHOMTHEBELLTOLLS #GHANGHANTOGHANTANAD #ERNESTHEMINGWAY #DBMOKASHI #SPAINCIVILWAR #ROBERTJORDAN #MARATHITRANSLATION #MARATHIBOOKS #AMERICANCLASSICS # #घणघणतोघंटानाद #दिबामोकाशी #अर्नेस्टहेमिंग्वे #स्पेनयुद्ध #राॅबर्टजाॅर्डन #फाॅरहूमदबेलटोल्स #मराठीअनुवाद #मराठीपुस्तके #अमेरिकनक्लासिक #
Customer Reviews
  • Rating StarDivya Marathi 23.11.19

    स्पेनमधील नागरी युद्धाच्या क्रौर्याचा यथासांग पट मांडणारी कादंबरी...दि. बा. मोकाशी हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं नाव. विशेषत: मराठी कथाविश्वात त्यांचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोकाशींनी दोन पुस्तकांचा अनुवादही केला होता. त्यातील अर्नस्ट हेमिंग्वे यांच्या `फॉर हूम द बेल टोल्स` कादंबरीचं भाषांतर `घणघणतो घंटानाद` या शीर्षकाने त्यांनी केलं आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचं वर्णन या कादंबरीत आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांचे विशेषतः रॉबर्ट जॉर्डनचे विचार आणि कार्यानुभवांतूनच ही कथा साकारली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचं वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिलं आणि अनुभवलं तेही यामध्ये आलं आहे. मूळचा अमेरिकन असलेला जॉर्डन या युद्धापूर्वीपासून स्पेनमध्ये राहत असतो आणि लोकशाहीसाठी फॅसिस्टांविरुद्धच्या चळवळीत तो हंगामी सैनिक म्हणून वावरत असतो. तो अनुभवी सुरुंगउडव्या म्हणूनही प्रसिद्ध असतो. साहजिकच रशियाच्या जनरलने त्याला शत्रूसैन्याच्या रेषेमागे प्रवास करत फॅसिस्टांविरुद्ध लढणाऱ्या स्थानिक गॉरिलांच्या मदतीसाठी एक पूल उडवण्याचा आदेश दिलेला असतो. या मोहिमेदरम्यान जॉर्डनची बंडखोर नेता अॅन्सेल्मोशी भेट होते. अॅन्सेल्मो त्याला गॉरिलांच्या छुप्या अड्ड्यामध्ये घेऊन जातो व तो स्वत: जॉर्डन आणि गॉरिलांमध्ये सहायकाची भूमिका बजावतो. या कॅम्पमध्ये (अड्डा), आई-वडिलांना झालेल्या देहदंडामुळे आणि स्वत:वरील अत्याचारामुळे मानसिक धक्का बसलेल्या मुलीशी - मेरियाशी - जॉर्डनची प्रेमभेट होते. कॅम्पमधील गॉरिलांचा नेता पाब्लो स्वकर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या आणि नियोजित कामगिरी पार पाडण्यास पुढे सरसावलेल्या जॉर्डनला मदत करण्याऐवजी जीवावरील संकटाच्या भीतीने त्यापासून परावृत्त करू पाहतो, तर पाब्लोची पत्नी - पिलर आणि इतर गॉरिलांची जॉर्डनला साथ मिळते. जेव्हा दुसऱ्या एका फॅसिस्टविरोधी गटाचा नेता एल् सार्दो चकमकीत शत्रूकडून मारला जातो, तेव्हा पाब्लो जॉर्डनच्या मोहिमेत येतो; पण पाब्लोच्या या मोहिमेत येण्याने या मोहिमेला एक वेगळंच वळण मिळतं. वास्तविक, युद्धाच्या पार्श्वभूमीवरची ही कादंबरी आहे; पण तरीही यातील संघषार्च संयतपणे चित्रण केलं गेलं आहे, हे नमूद करावंसं वाटतं. फॅसिस्ट असतील किंवा गॉरिला, ती माणसं आहेत. युद्धाचा एक भाग म्हणून ते शत्रूची हत्या करतात; पण या गोष्टीची त्यांच्या मनात कुठेतरी खंत आहे. बंडखोर नेता अॅन्सेल्मोच्या मनातील विचारांतून ही खंत अधोरेखित होते. त्याच्या मनात आलं- `फॅसिस्ट उबेत आहेत. ते आज आरामात आहेत; पण उद्या आम्ही त्यांना मारू. किती विचित्र वाटतोय हा विचार! तो मनात आणणंही बरं वाटत नाही. दिवसभर मी त्यांना पाहतो आहे. ती आमच्याप्रमाणे माणसंच आहेत... ते लोक फॅसिस्ट नाहीत. मी त्यांना फॅसिस्ट म्हणतो, पण ते फॅसिस्ट नाहीत. आमच्यासारखेच ते गरीब आहेत. आमच्याविरुद्ध ते लढायला उभे राहायला नको होते. त्यांना मारण्याचा विचार मनाला रुचत नाही.` __ या पार्श्वभूमीवर पाब्लोची व्यक्तिरेखाही उठून दिसते. पाब्लो भ्याड आहे, असं नाही; पण युद्धाच्या किंवा संघर्षाच्या निमित्ताने त्याच्या हातून इतक्या हत्या घडल्या आहेत, की त्याला ते सगळं आता नको वाटतंय; म्हणून तो जॉर्डनलाही फॅसिस्टांशी लढण्यापासून परावृत्त करू पाहतो. अॅन्सेल्मोच्या मनात पाब्लोविषयी विचार येतात त्यावरून हे स्पष्ट होतं. अॅन्सेल्मोच्या मनात येतं `पाब्लोनं चौकीचे लोक झोपले होते, त्या खोलीत खिडकीतून बॉम्ब फेकला. त्याचा स्फोट झाला, तेव्हा सगळी पृथ्वी डोळ्यांसमोर लालपिवळी होऊन फुटावी तसं वाटलं. तोपर्यंत आणखी दोन बॉम्ब आत गेले होते. त्यांच्या पिना काढून ते झटकन खिडकीतून फेकले गेले. या दुसऱ्या बॉम्बमुळे, जे झोपले असल्यानं आधी मेले नव्हते, ते जागे होऊन उठू लागताच मेले. एखाद्या तार्तारप्रमाणे देशभर पाब्लो धुमाकूळ घालीत होता. त्याच्या तेव्हाच्या ऐन बहरातील ही गोष्ट आहे. तेव्हा एकही फॅसिस्ट चौकी सुरक्षित नव्हती आणि तोच पाब्लो आता खलास झाला आहे. खच्ची केलेल्या बैलासारखा खलास झाला आहे.` ...Read more

  • Rating StarSHIVMARG - AUGUST 2019

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी... दि. बा. मोकाशी हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं नाव. विशेषत: मराठी कथाविश्वात त्यांचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोकाशींनी दोन पुस्तकांचा अनुवादही केला होता. त्यातील अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉरहूम द बेल टोल्स’ कादंबरीचं भाषांतर ‘घणघणतो घंटानाद’ या शीर्षकाने त्यांनी केलं आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचं वर्णन या कादंबरीत आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांचे विशेषतः रॉबर्ट जॉर्डनचे विचार आणि कार्यानुभवांतूनच ही कथा साकारली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचं वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिलं आणि अनुभवलं तेही यामध्ये आलं आहे. मूळचा अमेरिकन असलेला जॉर्डन या युद्धापूर्वीपासून स्पेनमध्ये राहत असतो आणि लोकशाहीसाठी फॅसिस्टांविरुद्धच्या चळवळीत तो हंगामी सैनिक म्हणून वावरत असतो. तो अनुभवी सुरुंगउडव्या म्हणूनही प्रसिद्ध असतो. साहजिकच रशियाच्या जनरलने त्याला शत्रूसैन्याच्या रेषेमागे प्रवास करत फॅसिस्टांविरुद्ध लढणाऱ्या स्थानिक गॉरिलांच्या मदतीसाठी एक पूल उडवण्याचा आदेश दिलेला असतो. या मोहिमेदरम्यान जॉर्डनची बंडखोर नेता अॅन्सेल्मोशी भेट होते. अॅन्सेल्मो त्याला गॉरिलांच्या छुप्या अड्ड्यामध्ये घेऊन जातो व तो स्वतः जॉर्डन आणि गॉरिलांमध्ये सहायकाची भूमिका बजावतो. या कॅम्पमध्ये (अड्डा), आई-वडिलांना झालेल्या देहदंडामुळे आणि स्वतःवरील अत्याचारामुळे मानसिक धक्का बसलेल्या मुलीशी - मेरियाशी - जॉर्डनची प्रेमभेट होते. कॅम्पमधील गॉरिलांचा नेता पाब्लो स्वकर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या आणि नियोजित कामगिरी पार पाडण्यास पुढे सरसावलेल्या जॉर्डनला मदत करण्याऐवजी जीवावरील संकटाच्या भीतीने त्यापासून परावृत्त करू पाहतो, तर पाब्लोची पत्नी - पिलर आणि इतर गॉरिलांची जॉर्डनला साथ मिळते. जेव्हा दुसऱ्या एका फॅसिस्टविरोधी गटाचा नेता एल् सार्दो चकमकीत शत्रूकडून मारला जातो, तेव्हा पाब्लो जॉर्डनच्या मोहिमेत येतो; पण पाब्लोच्या या मोहिमेत येण्याने या मोहिमेला एक वेगळंच वळण मिळतं. वास्तविक, युद्धाच्या पार्श्वभूमीवरची ही कादंबरी आहे; पण तरीही यातील संघर्षाचं संयतपणे चित्रण केलं गेलं आहे, हे नमूद करावंसं वाटतं. फॅसिस्ट असतील किंवा गॉरिला, ती माणसं आहेत. युद्धाचा एक भाग म्हणून ते शत्रूची हत्या करतात; पण या गोष्टीची त्यांच्या मनात कुठेतरी खंत आहे. बंडखोर नेता अॅन्सेल्मोच्या मनातील विचारांतून ही खंत अधोरेखित होते. त्याच्या मनात आलं– ‘फॅसिस्ट उबेत आहेत. ते आज आरामात आहेत; पण उद्या आम्ही त्यांना मारू. किती विचित्र वाटतोय हा विचार! तो मनात आणणंही बरं वाटत नाही. दिवसभर मी त्यांना पाहतो आहे. ती आमच्याप्रमाणे माणसंच आहेत... ते लोक फॅसिस्ट नाहीत. मी त्यांना फॅसिस्ट म्हणतो, पण ते फॅसिस्ट नाहीत. आमच्यासारखेच ते गरीब आहेत. आमच्याविरुद्ध ते लढायला उभे राहायला नको होते. त्यांना मारण्याचा विचार मनाला रुचत नाही.’ या पार्श्वभूमीवर पाब्लोची व्यक्तिरेखाव्याqक्तरेखाही उठून दिसते. पाब्लो भ्याड आहे, असं नाही; पण युद्धाच्या किंवा संघर्षाच्या निमित्ताने त्याच्या हातून इतक्या हत्या घडल्या आहेत, की त्याला ते सगळं आता नको वाटतंय; म्हणून तो जॉर्डनलाही फॅसिस्टांशी लढण्यापासून परावृत्त करू पाहतो. अॅन्सेल्मोच्या मनात पाब्लोविषयी विचार येतात त्यावरून हे स्पष्ट होतं. अॅन्सेल्मोच्या मनात येतं ‘पाब्लोनं चौकीचे लोक झोपले होते, त्या खोलीत खिडकीतून बॉम्ब फेकला. त्याचा स्फोट झाला, तेव्हा सगळी पृथ्वी डोळ्यांसमोर लालपिवळी होऊन फुटावी तसं वाटलं. तोपर्यंत आणखी दोन बॉम्ब आत गेले होते. त्यांच्या पिना काढून ते झट्कन खिडकीतून फेकले गेले. या दुसऱ्या बॉम्बमुळे, जे झोपले असल्यानं आधी मेले नव्हते, ते जागे होऊन उठू लागताच मेले. एखाद्या तार्तारप्रमाणे देशभर पाब्लो धुमाकूळ घालीत होता. त्याच्या तेव्हाच्या ऐन बहरातील ही गोष्ट आहे. तेव्हा एकही फॅसिस्ट चौकी सुरक्षित नव्हती आणि तोच पाब्लो आता खलास झाला आहे. खच्ची केलेल्या बैलासारखा खलास झाला आहे.’ एकूण, या कादंबरीतील व्यक्तिरेखा किंवा आशय व्यामिश्र नाही; पण माणसांतील क्रौर्य आणि त्याला हवी असलेली शांती, या दोन टोकांमधील जीवनाचा कुठेतरी मेळ घातला पाहिजे, असा संदेश ही कादंबरी देते, असं म्हणायला हरकत नसावी. तेव्हा त्या संदेशासाठी ही कादंबरी अवश्य वाचावी. -अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more