* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980486
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL AROUND US WE CAN SEE THE SPACE WITH WHICH SCIENCE IS MAKING PROGRESS IN ALL AREAS OF LIFE TODAY. THIS HAS FURTHER ENABLED TO MAKE OUR LIFE BETTER IN MANY WAYS. WE ARE ENDURING LESS PAIN OWING TO THE INVENTIONS. YET, THERE ARE A HUGE NUMBER OF THINGS AND ELEMENTS OF WHICH SCIENCE SEEMS TO FIND NO EXPLANATION. THERE MIGHT BE AN ANSWER SOMEWHERE BUT RIGHT NOW ALL WE ARE CLUELESS ABOUT THEM. THIS HAS FURTHER GIVEN RISE TO MANY WRONG ASSUMPTIONS AND MISCONCEPTIONS. WE AS HUMAN BEINGS ALWAYS GET CARRIED AWAY WITH MYSTERIES AND INDULGE US INTO THOUGHTS RELATED TO THIS VAGUENESS. MRS. GOGATE IS A WELL-KNOWN SCI-FI WRITER. HER MYSTERIES ALSO HAVE THE SAME CAPACITY OF CAPTIVATING THE MINDS OF HER READERS.
आजचं युग हे विज्ञानयुग आहे. विज्ञानाची घोडदौड सर्व क्षेत्रांमध्ये चालू आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक सुखकर, आरामदायी, वेदनारहित होत आहे. असं असलं तरी अजूनही कित्येक गोष्टी अशा आहेत, की ज्यांचं स्पष्टीकरण आजच्या विज्ञानाला देता येत नाही. असं स्पष्टीकरण कदाचित उद्या मिळेल. पण आज तरी त्यांच्याभोवती गूढतेचं धुवंÂ आहे. या धुक्यात दडलेल्या सत्याचं स्पष्ट आणि वास्तव दर्शन होत नाही आणि त्यामुळे त्याविषयी अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज निर्माण होतात. गूढ आणि विलक्षण गोष्टींचं माणसाला नेहमीच आकर्षण असतं. असं असेल का, असं खरंच घडेल का अशा विचारांनी तो भारला जातो. अशा काही भारणाNया कथांचा हा संग्रह. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या विज्ञानकथांप्रमाणेच या गूढकथा वाचकाला खिळवून ठेवतात.
पुणे मराठी ग्रंथालय राजेंद्र बनहट्टी पुरस्कार २००९
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
GHAR #SHUBHADA GOGATE #LANDGA #CHITR #VAT #VAHI #NANDITA DIVAKAR AMIT #ARCHANA #SAMITA #DIDIRAJE #GOVINDA #ROHIT #RAVI
Customer Reviews
  • Rating StarLOUKIK LOKASHA 20-9-2009

    कधी काळी मराठी साहित्यात गूढ कथांना खूपच मागणी होती. कोणत्याही दिवाळी अंकात एखादी गूढकथा असल्याशिवाय अंकाला परिपूर्णता येत नाही असे समजले जाई. विशेषत: रत्नाकर मतकरी यांची गूढकथा असलेल्या दिवाळी अंकाला प्रचंड मागणी असे. अलीकडच्या काळात गूढकथेविषयी औत्ुक्य काही प्रमाणात कमी झाली आहे हे खरे असले तरी याच काळात शुभदा गोगटे यांचे घर हे पुस्तक याच गूढकथा घेऊन आलेले आहे. मागच्या पन्नास वर्षात विज्ञानाने प्रचंड प्रगती केली. माणसाची पावले चंद्रावर पडली. आरोग्य तंत्रज्ञान या क्षेत्रातली प्रगती विचार करण्याच्या पलीकडची आहे. मानवी स्वभाव, मानवी विचार याबद्दलही संशोधन झाले. डॉ. सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्राचा पाया घातला. आज मानसशास्त्रातही प्रचंड प्रगती झाली आहे. माणसाचे जगणे, जगण्याचा उद्देश याबद्दल असंख्य ग्रंथ बाजारात दिसतात. तरीही अजूनपर्यंत कोणत्याही माणसाला माणसाच्या मनाचा अचूक वेध घेता आलेला नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण सर्वश्रुत आहे. जगातल्या एका माणसाचा चेहरा दुसऱ्या माणसाच्या चेहऱ्याशी मिळत नाही. मानवी स्वभावाचेही तसेच असते. एका माणसाचा स्वभाव दुसऱ्या माणसाच्या स्वभावाशी जुळत नाही. माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. आजच्या या प्रगतकाळातही काही माणसांना विज्ञानाच्या पलीकडे खूप काही असते असे वाटत असते. माणसाचा जन्म, त्याची वाढ आणि मृत्यू याचे चक्र अटळ असले तरी मृत्यूनंतरही एक वेगळे जग असते असा समज असलेली किंवा त्या दृष्टीने विचार करणारा एक मोठा वर्ग समाजात असतो. भारतीय माणसालाच गूढतेचे आकर्षण आहे असे नाही. जगभरातील माणसे रंगरुपाने वेगळे असू शकतात परंतु त्यांची विचार करण्याची पद्धत सारखीच असते. अत्यंत प्रगत समजल्या जाणाऱ्या राष्ट्रातूनही गूढकथा साहित्यांना चांगली मागणी असते. माणसाला जन्मापासून मृत्यूची भीती असते. कोणताही सजीव आयुष्यातला बहुतांशी वेळ मृत्यू कशाला म्हणता येईल त्याच विचारात घालवतो. बऱ्याच लोकांना मृत्यूनंतरचे जग कसे असेल, भारतीय परंपरेत तर पुनर्जन्माला खूपच महत्त्व दिले जाते. भारतीय तत्वज्ञान किंवा वैज्ञानिक परंपरा कोणताही सजीव ८४ लाख योनीचक्रातून फिरतो असे सांगत असते. माणसाला पुनर्जन्म मिळाला तर तो कशाचा असेल याबाबतही चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर शुभदा गोगटेंच्या या पुस्तकाकडे बघता येईल. या पुस्तकात असलेल्या पाचही कथातून माणसाला अमूर्त असे काही तरी दिसत असते. कथातील पात्रे आहेत त्यांच्यासोबत गूढतेची सावली आहे. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कधीकधी कथानकातील काही घटनांना विज्ञानाचा पाया असल्याचे जाणवते. गूढकथेसाठी काही शब्द ठरलेले आहेत. भाषा विशिष्ट पद्धतीची पाहिजे. पात्रनिर्मिती करताना प्रचंड कल्पकता दाखवावी लागते. एक भासमान जग प्रत्यक्षपणे उभे करणे सोपे नसते. या कामात शुभदा गोगटे या यशस्वी झाल्या आहेत असे म्हणावे लागेल. गूढकथांना साहित्यिक मूल्य असते का या प्रश्नाबद्दल चर्चा करण्याचे कारण नाही. अशा कथा वाचणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांची तशी गरज आहे. हे लोक गूढकथा फक्त एकाचवेळी वाचतात असे नाही तर एकच पुस्तक अनेक वेळाही वाचतात आणि त्यातून त्याना मानसिक स्तरावर त्यांना पाहिजे असते तसे समाधान मिळते. या बाबींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. वास्तववादी साहित्य लिहिणे काहीसे सोपे असते. दैनंदिन आयुष्यात दिसणारी माणसे, घडणाऱ्या घटना यांच्याविषयी कथेची फ्रेम तयार झाली की आतील त्रुटीच्या जागा कल्पनेने भरून काढायच्या असतात. गूढकथेबद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही. अशा कथातील जवळपास सर्व पात्रे काल्पनिक असतात. गूढकथा लिहिताना प्रचंड अशा कल्पनाशक्तीच्या वापर करावा लागतो. हे सर्व जमले तरच कथा जमते अन्यथा वाचक दहा-वीस ओळी वाचल्यानंतर पुस्तक बाजूला ठेवून मोकळा होतो. ‘घर’मधील कथा खूपच चांगल्या आहेत. वाचक एकदा पुस्तक हातात घेतले की ते पूर्ण करूनच बाजूला ठेवतो ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more