OUR SURROUNDINGS AND THE HAPPENINGS IN THEM ARE PICTURED THROUGH THE STORIES IN THIS BOOK. MALVIKA, WHOSE LIFE IS SHATTERED BECAUSE OF THE BLANK CALLS, ROHAN WHO IS STUCK IN THE WEB OF PYRAMID MARKETING, MOM WHO IS SACRIFICING EVERYTHING JUST FOR PAPA`S FREEDOM…. WE ALWAYS HEAR OR READ ABOUT ALL THESE THINGS. WHEN SOME YESHWANT IS TRUDGING ALONG THE WAY WITH IMMENSE PERSEVERANCE, WE ALSO TRY TO HELP HIM AS MUCH AS POSSIBLE. WE ALSO WITNESS THE FALL OF SOME VERY SUCCESSFUL VIJA UNCLE. EVERY TOWN AND VILLAGE HOUSES PEOPLE LIKE WHIMSICAL APPA, HIS ADJUSTING DAUGHTER-IN-LAW WHO SUPPORTS HER HUSBAND AND HAS A NATURE TO ADJUST ANY WHERE HIS DAUGHTER NILU WHO IS DISTURBED BECAUSE OF HER FAMILY PROBLEMS. THESE STORIES HAVE THEM AS THE CASTS AND THAT IS WHY WE FIND THEM SO FAMILIAR AND DEAR TO US.
आजकाल आपल्या सभोवती घडणा-या
घटनांचे प्रतिबिंब ‘गोल गोल राणी’यातील कथांमध्ये दिसते. ब्लँक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजालात रोहन,
पपा सुटावेत यासाठी विलक्षण तडजोडी
करणारी ममी... आपण सर्वांनीच पाहिलेले किंवा ऐकलेले असतात. जिद्दीने परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाणा-या यशवंतला मदत करणा-यांत आपलाही खारीचा वाटा असतो आणि
यशस्वी विजाकाकाचा अस्तही आपण पाहिलेला असतो. विक्षिप्त आप्पा, आपल्या नव-याला सांभाळून घेणारी त्यांची समजूतदार सून निमा, कौटुंबिक अडचणींमुळे त-हेवाईक झालेली आप्पांची मुलगी नीलू अशा लोकांनी भरलेली कुटुंबे थोड्या-फार फरकाने शहरात आणि गावात आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामुळेच या कथा मनाला भावणा-या ठरतात.