POETRY COLLECTION BY RENOWN MARATHI POET `SHANTA SHELKE`. THESE POEMS NICELY DESCRIBES EMOTIONS OF WOMEN AND HER BONDING TOWARDS FAMILY AND SOCIETY.
गोंदण हा शान्ताबार्इंचा तिसरा कवितासंग्रह. आधीच्या कवितांतून व्यक्त होणारी ज्येष्ठांच्या अनुकरणाची प्रवृत्ती, शैलीतली सांकेतिकता, शब्दांचा सोस या गोष्टींचा गोंदण मधील कवितांत क्वचितच आढळ होतो. इथे कवयित्री आपल्या अनुभवविश्वाचा अधिक खोलवर शोध घेत आहे आणि त्या अनुभवांचे केवळ वर्णन करण्याऐवजी त्यांचा प्रत्यय वाचकांना देण्याची धडपड करत आहे असे जाणवते. त्याबरोबर छंदोबद्ध आणि वृत्तबद्ध कवितांच्या जोडीला अनेक कवितांतून मुक्तछंद िंकवा मुक्त रचना यांचा वापर इथे प्रथमच केलेला दिसतो. उपमा-रूपकांऐवजी प्रतिमांची योजना जाणीवपूर्वक केली जात आहे, असेही प्रत्ययाला येते. तरीही जुन्या कवितेशी असलेले आपले अनुबंध शान्ताबाई अद्याप जपत आहेत. शार्दूलविक्रीडितात लिहिलेली, पण आशयातील नावीन्य प्रकट करणारी अनेक सुनीते ‘गोंदण’ मध्ये आहेत. ही सुनीते ‘गोंदण’चे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणावे लागेल.