* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353172305
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 90
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GOSHTA DOTCOM ANI ITAR BODHKATHA:BHAG-2
९७ बोधकथांचा हा संग्रह म्हणजे संस्कारांची शिदोरीच आहे. या छोट्या छोट्या बोधकथांच्या शेवटी कथेतून काय बोध घ्यावा आणि त्यासाठी कोणता संकल्प करावा हेदेखील मुलांना सांगितले आहे. लहान वयात मुलांच्या कोवळ्या मनावर जे संस्कार होतात, ते पुढे दीर्घ काळ टिकवून राहतात. मुलांच्या कोवळ्या मनावर ज्ञानदा नाईक यांच्या या बोधकथा नक्कीच प्रभाव पाडतील. या कथांमधून नम्रता, सहकार्य, विश्वास, संयम, आदर, प्रामाणिकपणा यांसारखी मूल्ये बालकांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मित्र-मैत्रिणी, नातेसंबंध त्यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या बोधकथा त्यांनी लिहिल्या आहेत. या कथा सांगताना त्यांना परी, यक्ष, जादू अशा मुलांच्या कल्पनांमध्ये असणाऱ्या शब्दांचा छान वापर केला आहे. मुलांनी आपले स्वभावगुण ओळखावेत, डायरी लिहावी, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा, क्षमाशील व्हावे, चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात, निसर्गावर- प्राणिमात्रांवर प्रेम करावे असे संदेश या बोधकथा देतात. मनोरंजन आणि संस्कार यांचा सुरेख मेळ या कथांमधून ज्ञानदा नाईक यांनी घातला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#DNYANADANAIK #DHAVLYAZALANANDIANIETERBODHKATHA #BALSAHITYA #KHELATLAKUTRA #HATTIAALAGHARI #JADUCHEKHADE #SHERUCHAAAJAR #RAJESHCHDUKHA #SONALCHDHADAS #DEEPALIVAAAICHBHANDAN #TAJELDARCANVAS #GURUSHISYAKATHA #BODHKATHA #CHATURYKATHA #ज्ञानदानाईक #ढवळ्याझालानंदीआणिइतरबोधकथा #बालसाहित्य #खेळातलाकुत्रा #हत्तीआलाघरी #जादूचेखडे #शेरूचाआजार #हिरो #राजेशचंदु:ख #सोनलचंधाडस #दीपालीवआईचंभांडण #तजेलदारकॅनव्हास #गुरुशिष्यकथा #बोधकथा #चातुर्यकथा
Customer Reviews
  • Rating StarLOKMAT 2-6-2019

    निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे लहान मुलांच्या कुतुहल बुद्धीने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात आणि त्यांच्याच भाषेत त्या मांडल्या तर बालवाचकांना मनापासून वाचायला आवडतात. याच नजरेतून मेहता पब्लिशिंग हाऊसने लहानांसाठी एक संचात्मक छोटेखानी पुस्तकंची मालिका प्रकाशित केली आहे. त्यातीलच एक चार पुस्तकांचा संच ज्ञानदा नाईक यांनी लिहिला आहे. यात सोनूचा धडा आणि इतर बोधकथा, प्रचंड भोपळ्यातला राक्षस आणि इतर बोधकथा, तळ्याकाठची मैत्री आणि इतर बोधकथा, यक्षाचे ढोलके आणि इतर बोधकथा यांचा या संचात समावेश आहे. निसर्गात आपल्या स्वाभाविक प्रेरणांनी जगणार्या प्राणी, पक्ष्यांचे निसर्गाशी नातं अधोरेखित करताना या पुस्यकांतून त्यांच्या जगण्याशी मानवाच्या कृतीची एक सांगड घालून निसर्गसंवर्धनाच्या बाबीवर बोलका प्रकाश टाकला आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 20-05-2019

    मनोरंजनातून संस्कार... मुलांचं मन समजावून त्यांच्यावर संस्कार रुजवण्याचा मार्ग खरंतर कठीणच, पण लहान-लहान गोष्टीतून त्यांना पटेल, उमजेल अशा पद्धतीने समजावून सांगितलं, काय योग्य-अयोग्य यातला फरक सांगितला, तर मुलं स्वत:ला बदलतात. हाच धागा पकडून ‘गोष्ट ॉटकॉम’ अंतर्गत प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधून चांगल्या गोष्टी मुलांच्या वागण्या-बोलण्यात, जगण्यात रुजवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखिका ज्ञानदा नाईक यांनी केला आहे. कुठल्यातरी स्वप्नवत राजा-राणी-पऱ्यांच्या गोष्टींच्या जगात अनेक मुलं रमतात. या पुस्तकांतही अशा मुलांना कुतूहल, गंमत वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण तरीही या कथा केवळ स्वप्नरंजन ठरत नाहीत. या व्यक्तिरेखा मुलांना आयुष्याचा धडा देऊन जातात. त्यातील चेटकीण भीतीतून निर्माण झालेली आहे, भुरळ घालणारी बाग प्रामाणिकपणाचं महत्त्व अधोरेखित करते, बोटाएवढी परी दुसऱ्याला मदत करण्याचा मार्ग दाखवते. तर बागेतले यक्ष एका नव्या दुनियेची ओळख करून देतात. प्रचंड भोपळ्यातला राक्षस इतरांना मदत करण्याची शिकवण देतो. यक्षाच्या ढोलक्यातून म्हणजेच कचाट्यातून बाहेर पडणारी तानु संकटावर मात करण्याची उर्मी देते. या कथांमध्ये आई-बाबा आहेत, त्यांच्यावर रागवणारी मुले आहेत, प्रेमळ आजी आहे, बहीण-भावामधील वाद आहेत. पण हे प्रत्येकाच्या घराचे चित्र किंवा रोज घडणारे प्रसंग कथेतून वाचताना मजा येते. या कथा शेवटी साहजिकच वेगळा दृष्टिकोन देऊन जातात. लहान मुलांना शिकवताना मोठ्यांकडून होणाऱ्या चुकाही लेखिकेने खुबीने मांडल्या आहेत. यात कामाच्या धावपळीत व्यग्र असणारे पालक, त्यांची मुलांना वेळ देऊ शकत नसल्याची तगमगही दिसते. तसेच बाबांचे प्रेमही काही कथांमधून सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहे. मित्र-मैत्रिणींच्या जिव्हाळ्याच्या, मस्तीच्या, वादाच्या, भांडणाच्या कथाही मजा आणतात. या कथांत आणखी एक मजेशीर दुनिया दिसते ती म्हणजे प्राण्यांची. पक्ष्यांचे, निसर्गाचे, मुक्या जिवांचे जगणे मांडण्यात आले आहे. त्यांना विनाकारण त्रास न देण्याचा धडा मिळतो. तसेच त्यांची काळजी कशी घ्यावी, हेही पटवून सांगितलं आहे. यात पाळीव प्राण्यांसोबत उंट, हत्ती, कासव, सरडा असे प्राणीही भेटतात. काही कथांमध्ये प्राण्यांची फजितीही वाचायला मिळते. शिवाय दुसऱ्याला मदत करण्याचे, भीतीवर मात करण्याचे, आत्मविश्वासाचे मूल्यही या कथांमधून मांडण्यात आले आहे. अगदी लहान-लहान कथा बालमनात छान विहार करतात. त्यांना हसवतात, गुदगुल्या करतात, उत्सुकता ताणून धरतात आणि सरतेशेवटी विचार करायला लावतात. या कथासोबत समर्पक चित्रेही असल्याने गोष्ट छान पद्धतीने उलगडण्यास मदत होते. प्रत्येक कथेच्या शेवटी संकल्प काय करायचा तेही दिले आहे. एकूण तीन संच असून दोन संचात तीन आणि एका संचात चार पुस्तके आहेत. एका पुस्तकात साधारण आठ ते दहा कथा आहेत. यातील प्रत्येक कथा बोलकी आहे. मुलांच्या मानसिकतेशी मेळ साधणारी आहे. म्हणूनच या संचातून करमणुकीसोबत संस्काराचे गाठोडेही मिळते. – ऋतुजा सावंत ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more