* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983616
  • Edition : 8
  • Publishing Year : AUGUST 1990
  • Weight : 160.00 gms
  • Pages : 108
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL AROUND US, WE SEE PEOPLE WHO HAVE AGED FOR ALL OUR LIFE. THE NEEM TREE HERE IS ALSO ONE OF THEM. HAS ANYONE SEEN THE TREE WHEN IT WAS YOUNG, IS A DOUBT THAT I HAVE ABOUT IT. IT HAS A HUGE TRUNK. ALL OVER THE TRUNK YOU WILL FIND MANY HARD KNOTLIKE STRUCTURES. IT IS AS IF THE NEEM HAS REACHED A CERTAIN AGE AND IS GOING TO REMAIN LIKE THAT FOREVER. AS IF THE TIME FOR IT HAS STOOD STILL. BUT THE MONTH OF CHAITRA BRINGS SOME CHANGE WITH IT. MANY SHADES OF PARROT GREEN START APPEARING ALL OVER THE AGEOLD NEEM TREE. IT SPREADS A SORT OF AURA ALL OVER. IT SHADES A WONDERFUL LIGHT. AS THE SCORCHING SUN GOES ON ROASTING EVERYONE AROUND, PEOPLE AUTOMATICALLY TURN TOWARDS THE NEEM TREE. ITS SHADOW HAS MESMERIZING EFFECT, THAT OF THE AIR CONDITIONING SYSTEM.
वर्षानुवर्षे म्हातारीच असलेली माणसे आपण पाहतो, तसाच पारावरचा निंब आहे. त्याला तरणा कोणी पाहिला असेल का, याची मला शंका आहे. प्रचंड बुंधा असलेला आणि गुरवाच्या म्हातारीप्रमाणे अंगावर लहान-लहान आवाळे असलेला निंब आपला आहे तसा आहे. निंबाचे म्हातारपण एका विशिष्ट जागी येऊन थांबलेच आहे. चैत्रमासात पुन्हा चमत्कार होतो. म्हाताऱ्या निंबात पोपटी रंगाची पालवी चहू अंगांनी उसळ्या घेऊ लागते. तिच्या रूपाचा अगदी उजेड पडतो. उन्हात तगमग होऊ लागली की, पारावर येऊन बसावे – वाळ्याचे पडदे चोहो बाजूंना सोडले आहेत, असे वाटते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#JUNYAGHARACHIAATHVAN#AAMCHAPAAV#PANI#SHALA#PAAR#ODHA#DEOUL#DADA#TATYA#KA#MAZEVADILBANDHU#AAJINE PAHILELACHOR#PAVHANA#
Customer Reviews
  • Rating Starअनिल गवारी

    व्यंकटेश माडगूळकर हे भारतातील एक महान लेखक आहेत. त्यांच्या शब्द चिञांची जादू ईतकी अपूर्व आहे की त्यांच्या लिखाणाची सहज सुंदर शैली आपल्या समोर त्यांच्या कथा वाचकासमोर रंग- रूप आणि गंधासहित उभ्या रहातात. अञे आणि फडके ह्या दोन लेखकांमध्ये कलेसाठी कला ी जीवनासाठी कला हा मोठा वाद होता. हा वाद ह्या दोघांमध्येच मिटला. कारण कलेसाठी कला म्हनणार्यांमध्ये कुणी नंतर पुढे, खासकरून पुढे आलेच नाही. प्रत्येकाला जीवनासाठी कला ह्याच गोटात बरे वाटू लागले परंतु व्यंकटेश माडगूळकर ह्यानी खर्या अर्थानं साहित्यात कला जोपासली. आपली प्रती सृष्टी निर्माण करणारा ईतका महान लेखक मराठीत दुसरा नाही. कला ही फार साधी सोपी आणि सरळ गोष्ट आहे परंतु सहज साध्य होणारी नाही. ह्याची प्रचिती माडगूळकरांचं साहित्य वाचताना येते.आपल्याला आपलं जग साहित्यातून दाखविण्याची अद्भुत किमया यांच्या पाशी आहे. फार मोठ्या कलावंताचं आयुष्य कला भावणेनं होरपळून निघतं. नंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे अनेकांनी प्रयत्न केले परंतु उर बडवाबडवी फार दिसून येते. ...Read more

  • Rating StarAshutosh Deole

    एका गोष्टीत ग दि मां बद्दल अाठवण सांगितली अाहे ती फारच सुंदर अाहे.

  • Rating StarDilip Mote

    त्यांच्या गावाला पर्वा जाण्याचा योग आला होता आजही रस्त्यावरून बामनाचा पत्रा म्हणून कौलारू मोडकळीस आलेली इमारत दिसते तिथलं सगळं वर्णन आहे त्यात, माडगूळ ता आटपाडी, सांगली.

  • Rating StarSandesh Dhamangaonkar

    व्यंकटेश माडगूळकर यांचा हा एक अतिशय सुंदर असा कथासंग्रह! त्यांनी यात त्यांच्या घराकडील आठवणी वर्णिलेल्या आहेत. पण त्या फक्त त्यांच्यापुरत्याच मर्यादित आहेत, असं वाटतच नाही. खरंतर माझं सगळं लहानपण शहरात गेले आहे. सर्व शहरी संस्कृतीची सवय मला लागली आहे पण मला थोडीफार ओळख ग्रामीण संस्कृतीचीसुद्धा आहे. या पुस्तकातील सगळ्या आठवणी पूर्णपणे ग्रामीण आहेत. माझा वैयक्तिक असा हा अतिशय आवडता कथासंग्रह आहे. कितीही वेळा वाचला, तरी पुनःपुन्हा वाचावा वाटतो. पूर्ण पुस्तक (आणि प्रत्येक कथा) वाचून झाल्यावर मनाला एक प्रकारची हुरहूर लागून राहते. अतिशय सुंदर पुस्तक.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more