* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353174521
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 64
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GRETA THUNBERG IS AN ICON OF 21ST CENTURY. HER BATTLE FOR ENVIRONMENT IS A RALLYING CRY FOR WHY WE MUST ALL WAKE UP AND FIGHT TO PROTECT THE LIVING PLANET, NO MATTER HOW POWERLESS WE FEEL. THIS BOOK NARRATES GRETA’S INSPIRATIONAL JOURNEY FOR YOUNG READERS WITH A SIMPLE NARRATIVE STYLE AND EYE CATCHING PICTURES.
ही गोष्ट आहे एका असाधारण मुलीचा. जिला अगदी लहानग्या वयात जागतिक तापमान वाढीमुळे भविष्यावर होणारे विघातक परिणाम लक्षात आले. तिनं या विरोधात एल्गार पुकारला आणि सारं जग तिच्या सोबतीला उभं राहिलं..ग्रेटाची ही गोष्ट म्हणूनच आपल्या लहानग्यांनाही सांगायला हवी. या पुस्तकात सहजसोप्या शब्दात आणि चित्रमय शैलीत ही गोष्ट सांगितली गेली आहे. जी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
१.ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय श्री स्थानक साहित्य पुरस्कार २०२१
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#GRETACHIGOSHTA #JOSEPHTUSCANO #GRETATHUNBERG #ENVIRONMENTPROBLEMS #BIOGRAPHY #MARATHIBOOKS #ONLINEBOOKS #BOOKSONGRETA #SKOLSTREJKFORKLIMATET #ग्रेटाचीगोष्ट #जोसेफतुस्कानो #मराठीपुस्तके #पर्यावरणसंरक्षण #आॅऩलाइनपुस्तके #ग्रेटाथुनबर्ग #युनेस्को
Customer Reviews
  • Rating Starसुवार्ता सप्टेंबर २०२०

    ग्रेट ग्रेटाची गोष्ट.... ग्रेटा थुनबर्ग या १६ वर्षाच्या मुलीने एक विलक्षण धाडस केलं. स्विडनच्या ह्या पोरीने २० सप्टेंबर २०१९ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणजेच युनोच्या समितीपुढे घणाघाती वक्तव्य केलं, ते ऐहिक गोष्टीच्या मागणीसाठी नव्हे; तर पर्यवरण विस्कटून टाकून प्रदूषणाचा पुरस्कार करणाऱ्या एकूणच जगाच्या मानसिकतेवर बोट दाखवून. त्या दिवशी तिच्यासमोर जागतिक पातळीवरचे दिग्गज नेते बसले होते. जगाचे फौजदार ट्रम्पसाहेबही त्यात होते. पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतलेली ग्रेटा हिने तीन सूत्रे ह्या संदर्भात सांगितली आहेत. पहिले सूत्र : वरवरची माहिती धोक्याची असते. दुसरे सूत्र : कुठल्याही चांगल्या कार्याला स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तिसरे सूत्र : जगाला शाबूत ठेवण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा. आपल्या दैनंदिन जीवनात वावरताना तसेच उगवणाऱ्या दिवसाला सामोरे जाताना आपण किरकोळ गोष्टीपासून महत्वाच्या मोठ्या गोष्टींनासुद्धा तितक्याच गांभीर्याने घेतले पाहिजे असे तिचे सांगणे आहे. कमी बडबड करा आणि जास्त कृती करा असे ती सांगते. या पुस्तकात लेखकाने ग्रेटाच्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. हवामानातील बदल याबद्दल तिने माणसाच्या बेजबाबदार वागण्याला दोष दिला आहे. त्यासाठी ती जगभरातील अनेक महत्वाच्या देशांमध्ये फिरली. जागृती केली. काही ठिकाणी तिला कुत्सित टीकेचे धनी व्हावे लागले. तरीही तिने आपले हे मिशन आजपर्यंत चालू ठेवले आहे. तिच्या या मिशनची यशस्विता अशो की फ्रांस, जर्मनी, न्यूझिलंड या देशांनी कार्बन वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी खर्च वाढवण्यासाठी आपल्या अर्थसंकल्पात तजवीज केली आहे. ग्रेटाची आणखी एक `पी-पी-पी` त्रिसूत्री म्हणजे लोकसंख्या, प्रदूषण आणि प्राणिहत्या ही आहे. ग्रेटाने जगाला भावनिक आणि वस्तुनिष्ठ हाक देताना सांगितले की, `तुम्ही माझे ऐकू नका, पण विज्ञानाचे ऐका.` या तिच्या सादेला आज जगभरातील कोट्यवधी विद्यार्थी साद देत आहेत. `टाइम` मासिकाने तिला `टाइम पर्सन ऑफ द इअर` हा सन्मान दिला आहे. `Skolstrejk For Klimatet` या तिच्या स्विडीश संदेशाचा अर्थ आहे : `School Strike for climate` हा संदेश घेऊन ती आज जगभर फिरत असते. `भविष्यासाठी शुक्रवार` ही शांतीची आणि पर्यावरणसंवर्धनासाठीची तिची अभिनव संकल्पना आहे. भारतातही पदमश्री सालूमारदा थिमाक्का या १०९ वर्षाच्या वृद्धेने आजवर सुमारे ८००० वृक्ष लागवड आपल्या पतीला सोबत घेऊन केली आहे. या श्रमिक महिलेने गाजावाजा ना करता आपले पर्यावरण मिशन चालू ठेवले आहे. थिमक्काच्या नावाने `लॉस एँजिलिस` आणि कॅलिफोर्निया येथे `थिमक्काज` रिसोर्सेस फॉर एन्व्हार्यमेंट एज्युकेशन` असा विभाग सुरु केला आहे. लेखकाने ग्रेटाच्या बाल तारुण्य सुलभ धाडसाची नोंद पुस्तकरूपाने घेतली आहे. ते चांगले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more