* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE GUERNSEY LITERARY AND POTATO PEEL PIE SOCIETY
  • Availability : Available
  • Translators : MAITREYEE JOSHI
  • ISBN : 9788184982480
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 259
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ANNIE BARROWS BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN THE TITLE OF THE BOOK IS SO INTRIGUING, YOU EXPECT A LOT FROM THE BOOK ITSELF. ONCE YOU GET OVER THE INTRIGUE FACTOR OF THE TITLE, YOU FIND THAT THE BOOK IS ABOUT A BOOK CLUB FORMED IN THE TOWN OF GUERNSEY WHICH IS THE ONLY BRITISH LAND OCCUPIED BY THE GERMANS DURING WORLD WAR 2. THE NAME OF THE BOOK CLUB IS ‘THE GUERNSEY LITERARY AND POTATO PEEL PIE SOCIETY’. (MY FINGERS ACHE!) THERE IS AN INTERESTING STORY BEHIND WHY THE CLUB WAS NAMED THAT WAY AND I THINK YOU SHOULD READ THE BOOK FOR THAT. THE BOOK STARTS WITH JULIET ASHTON CELEBRATING THE SUCCESS OF HER LATEST BOOK AND SEARCHING FOR A TOPIC FOR HER NEXT BOOK. SHE GETS AN UNEXPECTED LETTER FROM DAWSEY ADAMS FROM GUERNSEY WHO HAS A COPY OF HER OLD AND ABANDONED BOOK “THE SELECTED ESSAYS OF ELIA” BY CHARLES LAMB. DAWSEY CONTACTS HER WISHING TO KNOW WHERE HE CAN FIND MORE BOOKS FROM THE SAME AUTHOR. DAWSEY HAPPENS TO BE A MEMBER OF THE BOOK CLUB AND THUS STARTS JULIET’S INTERACTION WITH THE OTHER MEMBERS OF THE BOOK CLUB. JULIET FINDS THE CLUB AND ITS SURVIVAL DURING THE OCCUPATION VERY ENGAGING AND DECIDES TO EXPLORE FURTHER IF IT CAN BE TURNED INTO A BOOK. WE SEE JULIET LANDING IN GUERNSEY AND MEETING OTHER PEOPLE ON THE ISLAND TO COLLECT THEIR VERSION OF THE OCCUPATION. THE ENTIRE BOOK IS WRITTEN IN THE FORM OF LETTERS. WE SEE LETTERS BEING EXCHANGED BETWEEN ALL THE CHARACTERS AND THIS GIVES A DIFFERENT STRUCTURE TO THE BOOK. THERE IS NO SINGLE OMNIPOTENT NARRATOR AND EACH CHARACTER TAKES TURN TO NARRATE THE STORY AND THOUGH THIS IS SOME FORM OF OMNIPOTENCE, IT INTRODUCES ITS OWN SET OF COMPLEXITIES. THERE ARE MANY PLACES WHERE A CHARACTER WOULD NOT INCLUDE CERTAIN THINGS IN THE LETTER, BUT SINCE THIS IS INTENDED FOR A READER, THE AUTHOR HAD TO INCLUDE IT. THERE IS A LETTER FROM JULIET TO SIDNEY ABOUT A GIFT THAT HE SENT. DEAR SIDNEY, WHAT AN INSPIRED PRESENT YOU SENT KIT – RED SATIN TAP SHOES COVERED WITH SEQUINS IT’S OBVIOUS THE AUTHOR INCLUDED THIS BECAUSE THERE IS NO OTHER WAY THE READER WOULD HAVE KNOWN WHAT GIFT SIDNEY SENT, BUT IF JULIET WAS ACTUALLY WRITING THIS LETTER, SHE WOULD NOT HAVE INCLUDED THIS DETAIL. SINCE THE MAIN ESSENCE OF THE BOOK IS THE IDEA OF LETTERS BEING SENT BY A GROUP OF PEOPLE IN AN UNKNOWN ISLAND TO A WRITER, I CAN UNDERSTAND WHY THE AUTHOR CHOSE HER ENTIRE BOOK TO BE IN THE FORM OF LETTERS. BUT TACTLESS INCLUSION OF DETAILS LIKE ABOVE (THE AUTHOR COULD HAVE INCLUDED THE DETAIL IN A SMARTER WAY) MAKES YOU CLICK YOUR TONGUE AND DISTRACTS YOU FROM THE STORY. I PERSONALLY FOUND THE STRUCTURE UNAPPEALING. TO KEEP TRACK OF WHO SENT THE LETTER TO WHOM AND WHEN WAS A BIG PROBLEM FOR ME. I HAVE READ SIMILAR STRUCTURED BOOKS BEFORE (WE NEED TO TALK ABOUT KEVIN), BUT THIS BOOK IS PARTICULARLY TAXING BECAUSE OF THE SHORT LETTERS AND TOO MANY CHARACTERS. AFTER A POINT OF TIME, I WANTED TO SCREAM ‘FORGET THE LETTERS, JUST GET ON WITH THE STORY’. CHARACTERS – THERE IS NO DEARTH IN THIS BOOK. THERE ARE CHARACTERS IN ALL FORMS – GENDER, RACE, NATIONALITY, QUIRKS, NATURE, AGE. ONE CHARACTER THAT STOOD OUT FOR ME WAS ELIZABETH MCKENNA. THE IRONY IS SHE DOESN’T APPEAR IN THE BOOK BUT IS ONLY MENTIONED BY THE OTHER CHARACTERS AND THIS ADDS A BIT OF MYSTERY TO HER. ISOLA ALSO SPRINGS TO MY MIND AS AN INTERESTING CHARACTER. THE PROTAGONISTS THOUGH LEAVE A LOT TO BE DESIRED. MARY ANN SHAFFER STARTED WRITING THIS BOOK AND HAD TO ROPE IN HER NIECE ANNIE BARROWS TO COMPLETE IT BECAUSE MARY WAS DIAGNOSED WITH CANCER. SHE DIDN’T LIVE TO CELEBRATE THE SUCCESS OF HER BOOK. IT’S A CHARMING LITTLE BOOK, AS THE ENGLISH WOULD CALL IT, BUT I DIDN’T FIND ANYTHING EXTRAORDINARY IN IT. YES, THERE ARE SOME GOOD THINGS IN THE BOOK, BUT I DON’T THINK YOU WOULD MISS ANYTHING BY NOT READING IT. I WOULDN’T STOP SOMEONE FROM PICKING IT UP, BUT WHY WASTE TIME ON THIS WHEN YOU HAVE BETTER BOOKS TO READ, EH? PS: OSCAR WILDE APPEARS AS A CHARACTER IN THIS BOOK, BUT I CANNOT REVEAL MORE WITHOUT MARKING THIS REVIEW AS A SPOILER. GO READ THE BOOK.
गर्नसी - इंग्लिश चॅनल आयलंड वरील एक निसर्ग रमणीय, चिमुकले बेट. १९४६, जानेवारी, दुसरं महायुद्ध नुकतंच संपलंय आणि गर्नसीलाही या युद्धाच्या झळा बसल्यायत.लंडनही या युद्धाच्या छायेतून वर येतंय. पुन्हा ‘जीवनाला’ सामोरं जातंय. ‘इझ्झी गोज टू वॉर’ या पुस्तकाने प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आलेली ज्युलिएट आता तिच्या पहिल्या पुस्तकासाठी विषय शोधतीये आणि तसा तिला तो मिळालाही – गर्नसीकडून. चार्लस् लँबचा नि:स्सीम भक्त असलेला डॉसी एका प्रतीवर ज्यूलिएटचं नाव पाहून तिला पत्र धाडतो. त्याला लँबची अन्य पुस्तकं कुठं मिळतील विचारायचं असतं आणि इथून सुरू होतो हा पत्रांचा सिलसिला. ‘गर्नसी लिटररी अ‍ॅण्ड पोटॅटो पील- पाय सोसायटी’ असे लांबलचक आणि मजेदार नामकरण झालेल्या या वाचक मंडळातले अन्य सभासदही डॉसीच्या पाठोपाठ ज्यूलिएटचे ‘पत्रमित्र’ बनतात. युद्धाच्या गडद काळोख्या रात्रींमध्ये त्यांना जवळ आणलं या वाचक मंडळानं, त्यांना जिवंत ठेवलं या भेटीगाठींनी. लोभस, गहिरी माणुसकी असलेली ही पात्रं एखाद्या सत्यकथेइतकी जिवंत उतरली आहेत. त्यांच्या साध्यासुध्या आयुष्यातील करुण युद्धाच्या कहाण्या, मजेदार प्रसंग सारं काही ते आपल्या या नव्या मैत्रिणींशी शेअर करतात. त्यांच्या पत्रांतून ज्यूलिएटसमोर त्या अनोख्या बेटाविषयी, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची आवडती पुस्तकं आणि ‘नाझी अंमला’तून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या, मोकळा श्वास घेतलेल्या समाजजीवनाविषयी माहितीपट उलगडत जातो आणि विलक्षण भावबंधांनी हे रहिवासी तिच्याशी बांधले जातात. मग आपसूकच ज्यूलिएट गर्नसीच्या जलप्रवासाला निघते आणि याच बेटावर तिच्या आयुष्याला एक निर्णायक कलाटणी मिळते. कधी करुणरसात भिजलेली, तर कधी सौम्य विनोदाची पखरण असलेली ही स्नेहाद्र्र पत्रं म्हणजे शब्दांचा आनंदोत्सव आहे. हा जल्लोष रसिक वाचकांनाही तितकाच भावेल यात कसलीही शंका नाही.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GUERNSEYVACHAKMANDAL #THEGUERNSEYLITERARYANDPOTATOPEELPIESOCIETY #गर्नसीवाचकमंडळ #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MAITREYEEJOSHI #MARYANNSHAFFERANNIEBARROWS "
Customer Reviews
  • Rating StarUma Amol

    साल १९४६. नुकतेच दुसरे महायुद्ध संपले आहे. या कादंबरीची नायिका ज्युलिएट अॅशटन एक लेखिका आहे जिचे `इझी गोज टू वाॅर` हे पुस्तक प्रसिद्ध झाले अाहे.ती दुसर्या पुस्तकासाठी विषय शोधते आहे. त्याचवेळेस गर्नसी बेटावर राहणारा डाॅसी अॅडम्स नावाचा रहिवासी ज्युलिटला पत्र पाठवतो. त्याच्याकडे चाल्स्र लँबचे एक पुस्तक असते ज्यावर ज्युलिएट चे नावअसते.कदाचित ती चाल्स्‌ लँबची पुस्तके कोठे मिळतील हे सांगू शकेल म्हणून तो तिला पत्र लिहितो. गर्नसी हे एक ब्रिटिश बेट असतं ज्याचा ताबा युद्धकाळात नाझींनी घेतलेला असतो आणि त्यांनी या बेटावरच्या लोकांचे जिणे हराम केलेले असते. जसजसे ज्युलिएट आणि डाॅसी एकमेकांना पत्र पाठवत राहतात तसतशी ती गर्नसी बेटावरच्या माणसांकडे ओढली जाते. डा‌ॅसी आणि त्याच्या मित्रमंडळींनी या गर्नसी वाचक मंडळाची स्थापना केलेली असते. युद्धकाळात संचारबंदी असलेल्या काळोख्या रात्रींमध्ये या सगळ्या लोकांना जवळ आणलं ते या वाचक मंडळानेच. या मंडळाची खरी सुरवात एका मेजवानीमुळे होते. एका रात्री ही मंडळी चोरून एक डुक्कर भाजतात व त्याचा चट्टामट्टा करतात. चोरून अशासाठी की त्या काळात डुक्कर जवळ बाळगणे अपराध मानला जाई.शेतात पिकलेले धान्य, फळे, भाजीपाला, कोंबड्या, डुक्कर, गाईगुरे हे सगळे नाझी सैनिकांनी ताब्यात घेतलेले होते. संचारबंदीच्या काळात एकमेकांच्या घरी जाणं हाही गुन्हा ठरत होता. मेजवानीच्या त्या रात्री ही मंडळी म़ौजमजा करुन गुपचूप आपल्या घरी परतत असताना सैनिकांच्या तावडीत सापडतात. तेव्हा त्याच्यातील एक मैत्रीण एलिझाबेथ सैनिकांना थाप मारते की आम्ही एक वाचक मंडळ सुरू केलय आम्ही एकमेकांच्या घरी जमतो व पुस्तकांचे वाचन करतो. जेव्हा ते सैनिक मंडळाचे नाव विचारतात तेव्हा ती हे `गर्नसी लिटररी अॅन्ड पोटॅटो पील पाय सोसायटी `हे विचित्र पण मजेशीर नाव अचानक तयार करते व त्यांना सांगते. त्यामुळे या सगळ्या मंडळींची सुटका होते. तेव्हापासून ते खरंच पुस्तके वाचायला सुरूवात करतात. हळूहळू डाॅसी बरोबर त्याची मित्र मंडळीही ज्युलिएट ला पत्र लिहायला लागतात. त्यांच्या पत्रातून तिला गर्नसी बेटाविषयी, त्यांच्या आवडीनिवडींविषयी ,नाझी अमलातून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या व सुटकेचा श्वास सोडलेल्या समाजजिवनाविषयीची माहिती मिळत जाते. तिला यावर पुस्तक लिहावसं वाटतं. गर्नसी बेटाची ओढ लागते आणी ज्युलिएट बेटावर पोहोचते.पुढे काय होते ते तुम्हीच पुस्तक वाचून जाणून घ्या. या पुस्तकावर आधारित एक सिनेमा Netflix ने काढला आहे. पुस्तकातील सगळंच काही चित्रपटात नाहीये पण गर्नसी बेटाचं सौंदर्य चित्रपटात बघायला मिळते. तसेच ज्युलिएट आणी डाॅसी चे काम लिली जेम्स आणि मायकेल ह्यूजमन यांनी छान केलयं. तर पुस्तक नक्की वाचा आणि चित्रपट नक्की बघा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रवींद्र वानखडे, पुणे.

`छाटितो गप्पा` आज वाचुन झाले. खुप छान लिहिले आहे. लेखकाशी प्रत्यक्ष गप्पाच मारतोय असे वाटले. काही भावुक गोष्टी मनाला हळवं करून गेल्या. विदर्भातील वर्‍हाडी भाषा आपसूकच आपली असल्याची जाणीव होत राहते. मनातील भाव व्यक्त करण्यास ती अधीक सक्षम असल्याच दिसून येते. लेखकाने असेच लिखाण सुरू ठेवून सर्वांना आनंद देत राहावा. आता पुढील पुस्तकाची प्रतिक्षा आहे. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
अनील सहजे, नाशिक.

`महारुद्र` वाचून झालं. भीमरावांच्या व्यक्तित्वाचं कौतुक करू की लेखकाच्या लिखाणाचं ह्या विचारात पडायला झालं. पण एकाचंच का? अतिशय उत्तम कामगिरी लेखकाच्या हातून घडली आहे. ओघवत्या पाण्यासारखं, खळाळतं असं हे लेखन आहे.