* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HACH MAZA MARG
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984613
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HACH MAZA MARG IS THE AUTOBIOGRAPHY OF SACHIN, A POPULAR NAME IN INDIAN FILM INDUSTRY. SACHIN MADE HIS DEBUT IN THE FILMDOM THROUGH A MARATHI FILM IN 1963 AT THE AGE OF FOUR, WHICH WON THE NATIONAL AWARD FOR THE BEST CHILD ARTIST. (HE WON IT AGAIN FOR A SECOND TIME NINE YEARS LATER.) THERE HAS BEEN NO LOOKING BACK FOR HIM IN THE LAST FIVE DECADES. HE HAS NOT BEEN ONLY AN ACTOR BUT HE HAS PROVED HIMSELF AS A SUCCESSFUL PRODUCER, DIRECTOR, SCREENPLAY WRITER, EDITOR, MUSIC DIRECTOR. BESIDES THE CELLULOID WORLD HE HAS ALSO MADE HIS MARK IN THEATRE, ON SMALL SCREEN, STAGE SHOWS AND REALITY SHOWS CONCERNING TALENT HUNTING. SACHIN ENTERED THE FILM WORLD AT A TIME WHEN THE THEN MAJOR HERO’S – RAJ KAPOOR, DILIPKUMAR AND DEV ANAND HAD CROSSED THEIR PRIME. INITIALLY WHILE A NEW GENERATION OF TALENTED ACTORS WAS EMERGING, SACHIN MAINLY PLAYED SUPPORTING ROLES. HE SHOT TO FAME AS A PROMINENT ACTOR IN ANKHIYONKE JHAROKHESE, GEET GATA CHAL, AND NADIAKE PAAR. HIS ROLES IN SHOLAY AND TRISHUL WERE ALSO MEMORABLE. AFTER AN ILLUSTRIOUS CAREER IN HINDI, SACHIN TURNED TO MARATHI WHEN HE PRODUCED AND DIRECTED SOME COMMERCIAL SUPER HIT FILMS. HE PLAYED A LEADING ROLE IN THESE FILMS. HACH MAZA MARG IS NOT SIMPLY AN AUTOBIOGRAPHY OF A STAR TRACING PERSONAL LIFE. THROUGH ITS ANECDOTAL STYLE OF NARRATION IT PROVIDES INSIGHT INTO, THOUGH IN PART, A LONG PHASE IN THE HISTORY OF INDIAN CINEMA INDUSTRY, WHICH SAW THE RISE OF THE STAR SYSTEM, HOW SOME EMINENT DIRECTORS WORKED, ADVANCES IN TECHNOLOGY, PRODUCTION OF SOME SUCCESSFUL FILMS, AND NOVEL PROMOTIONAL TECHNIQUES.
बालकलाकार ‘मास्टर सचिन’... सहजसुंदर अभिनय करणारा ‘हिरो’... जबरदस्त परफॉर्मन्स देणारा... नवोदितांना आपुलकीने मार्गदर्शन करणारा ‘महागुरू’... हिंदी चित्रपटसृष्टीत अभिमानाने ‘मराठी मुद्रा’ उमटवणारा कलावंत... आजवर आपण सचिनला अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीतकार अशा भूमिकांमध्ये मोठ्या, तसेच छोट्या पडद्यावर पाहिलं आहे. अशा विविध क्षेत्रांत काम करताना त्याला कोणकोणते अनुभव आले, त्याची सुवर्णमहोत्सवी कारकिर्द कशी बहरली, मुलगा-भाऊ-पती-वडील-मित्र या भूमिका त्याने कशा पार पाडल्या, त्याचं पडद्यामागचं आयुष्य कसं आहे, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल! म्हणूनच सचिन शरद पिळगांवकर याच्या आयुष्याच्या प्रवासाची ही पटकथा...
अ.भा.म.प्र.संघ उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१६

No Records Found
No Records Found
Keywords
#SACHIN PILGAONKAR #ASHI HI BANVA BANVI #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI
Customer Reviews
  • Rating Starकानिकनाथ बि. भडके

    सचिन सर तुमचे पुस्तक जे प्रकाशित झाले , ते तुमच्या जिवनाचा पहिला टप्पाच म्हणला पाहिजे अन् ...हाे तिच खरी जिवनातली खरी कलाटनी हाेय अस मला वाटत ...ऊजळलेला दिवस आपण डाेळ्याने-डाेळा भरून पाहताेय पण ताेच दिवस मात्र परत येत नसताे.. एवढ माञ नक्किच!! सर तुमहच्या नविन प्रराशित झालेल्या लेकराला...हाच माझा मार्ग या गाेडंस पुस्तताला खुप-खुप शुभेच्छा...!! ...Read more

  • Rating StarSmita Deshpande

    सचिन पिळगावकर यांचे हे आत्मकथन. फिल्म इंडस्ट्री मधील `मोठे` नाव. शब्दांकन अभिजीत पेंढारकर यांचे. मेहता पब्लिशिंग हाऊस चे प्रकाशन. ३१२ पानाचे हे जाडजूड पुस्तक. परंतु अर्ध्याहून अधिक पानांवर छायाचित्र आहेत. सचिन चे `शिष्य`, चाहते, ज्यांना सचिन ने सर्प्रथम ब्रेक दिला ते प्रसिद्ध गायक सोनू निगम यांची `मेरे सचिन भैय्या` म्हणुन याला प्रस्तावना आहे. १९६३ साली वयाच्या अवघ्या साडे चार वर्षाच्या सचिन ने बालकलाकार म्हणुन काम केले अणि त्या नंतर करतच राहिले. ५० वर्षाहून अधिक काळ ते या इंडस्ट्री मध्ये वेगवेगळया भूमिकेत आहेत. या पुस्तकातील कथन एकूण ७० भागात आहे. त्याला सीन १,सीन२.. असे नम्बर आहेत. सीन १ म्हणजे माझी नाट्यमय `एंट्री` पासून सीन ७० मध्ये `कृतज्ञ` हा अंतिम सीन आहे. हे आत्मकथन असले तरी यातील सगळी पात्रे आपल्या परिचयाची आहे. सचिन येवढेच या इंडस्ट्री विषयी वाचायला आपल्याला नेहमीच आवडते. बहुतेक सगळी पात्र फिल्म इंडस्ट्री शी जुळलेली आहेत. मराठी पेक्षा अधिक काम त्यांनी हिंदी मध्ये केले आहे. सचिन ने `राज कपूर` व्हावे असे त्यांचे वडील शरद पिळगावकर यांना वाटायचे. त्या करता तसे बाळकडू त्यांच्या वडीलांनी त्यांना दिले. इंडस्ट्रीची ओळख करून दिली. हे आत्मकथन वाचताना आपल्या आवडते हीरो, हीरोइन, दिग्दर्शक, कॅमेरामन 📹, मेकअप आर्टिस्ट, संगीतकार, गायक, तंत्रज्ञान, याबद्दल अनेक किस्से वाचायला मिळतात. त्या सर्वांचे सचिन जी सोबत असणारे भावनिक, प्रोफेशनल संबंध, त्या निमित्ताने घडलेल्या गमती जमती तर काही कटू अनुभव यात आहेत. मीना आप्पा (मीना कुमारी), युसूफ भाई (दिलीप कुमार), हरी भाई (संजीव कुमार), अमित जी, दादा मुनि (अशोक कुमार) या व अनेक कलाकारांसोबत ऋषीदा, पंचम दा, किशोर दा, आशा ताई, दीदी, सुलोचना बाई, महेश कोठारे, अशोक सराफ - निवेदिता, लक्षा, माधुरी, नवीन जुन्या हीरो, हिरोइन सार्‍यांची उजळणी त्या निमित्ताने होते. सचिन - सारिका /सचिन - रंजीता या त्या काळी गाजलेल्या जोड्या. सचिन ची जोडी खूप hit झाली ती त्यांची `नवरी` सुप्रिया सोबत. या जोडी चा `सुखाचा संसार` film industry मध्ये आदराने उल्लेखला जातो. त्यांची `एकुलती एक` श्रीया हिच्यावर अर्थातच स्वतंत्र `सीन` आहे. बालकलाकार म्हणुन सुरवात करून अभिनेता(पारध - १९७७), दिग्दर्शक (मायबाप - १९८२), लेखक (माझा पती करोडपती - १९८८), निर्माता ( आयत्या घरात नागोबा - १९९१), गायक अशा विविध क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. त्या सर्वांचा उल्लेख या पुस्तकात आहे. ४२ मराठी सिनेमे, ३ मराठी नाटके( अपराध मीच केला, म्हैस येता माझ्या घरा, शिकार) , हिंदी, गुजराती, इंग्रजी एकूण ८९ चित्रपट, TV मालिका, Reality Shows, Host, सचिनमय एल्बम अशा अनेक बाबीत त्यांचे अमूल्य योगदान आहे. नच बलिऐं - सीजन १ चे विजेता म्हणुन त्यांची व सुप्रिया ची जोडी सर्वांच्या नेहमी लक्षात राहील. ५० वर्षाहून अधिक काळ इंडस्ट्री मध्ये काम केल्यावर Star या Rockstar या reality show मध्ये गायक म्हणून सहभाग घेणे कौतुकास्पद आहे. त्यांचे होम प्रॉडक्शन `सुश्रिया आर्ट्स` ची `तू तू मैं मैं` ही अतिशय गाजलेली रिमा अणि सुप्रिया ची मालिका ने त्यांना आर्थिक स्थैर्य दिले आहे. याची काबुली ते स्वतः देतात. १९९५ मध्ये परत एकदा मी Income Tax भरण्याच्या टप्प्या पर्यंत गेलो असे ते म्हणतात. Sachin, you are an Asset to Film Industry अशी ऋषीदां कडून त्यांना मिळालेली शाबासकी बरेच काही बोलून जाते. महागुरु ही स्वतःला एका अर्थी त्यांनी दिलेली पदवी हा प्रवास वाचता योग्य वाटते. सचिन महाराष्ट्रचे शान नक्कीच आहे. त्यांचा दांडगा उत्साह, सतत शिकण्याची धडपड, कलेला वाहिलेले, नवीन काही देण्याचे सतत प्रयत्न करणारे सचिन पिळगावकर महाराष्ट्रचे भूषण नक्कीच आहे. `हाच माझा मार्ग` योग्य शीर्षक आहे. हा चॉकलेट हीरो नेहमीच आवडीचा होता अणि राहील. चित्रपट प्रेमींनी हे आत्मकथन नक्की वाचावे. त्यांच्या पुढील वाटचाली करता शुभेच्छा 💐 ...Read more

  • Rating Starअमेय पाटकर

    सचिनचे (सॉरी पण मित्रासारखा वाटतोस) आत्मकथन प्रकाशित झाल्यावर दोन दिवसातच संपूर्ण वाचून काढले. काही माणसांना ते जन्माला आल्यावर कळालेलं असतं की, आपल्याला काय कराचे आहे ते. त्यासाठी लागणाऱ्या मार्गदर्शनाची संधी ती व्यक्ती शोधत असते. प्रत्येक व्यक्तीकडन स्वत:च्या विकासासाठी लागणारे गुण शोधून स्वत:चा विकास कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे आत्मकथन. सांस्कृतिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व करणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी व त्यांच्या परिवारालाही हे फार मार्गदर्शक ठरेल. या क्षेत्रात वावरणाऱ्या ज्येष्ठ साहाय्यक सह तसेच वयाने लहान असणाऱ्या कलाकारांशी कसे वागावे, नम्रता, कल्पकता, गुणग्राहकता, आत्मविश्वास, संयम, सतत्योद्योग, कौतुक, विनोद इत्यादी सचिनच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अभ्यासण्यासारखे आहेत. या प्रचंड धावपळीतही प्रपंच उत्तम कसा करावा हे ही कळते. थोडक्यात काय तर पूर्ण स. चिन्मय (सचिनमय) असणारे हे आत्मकथन सचिनच्या मनाचा आरसा आहे. सर्वांनी जरूर वाचावे. आम्ही तुझे ऋणी आहोत. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA LOKRANG 14-9-2014

    सचिन पिळगावकर या सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शकाच्या पन्नास वर्षांतील कामगिरीचा हा आलेखपट. सचिन यांनी त्यांच्या १९६३ मधील ‘हा माझा मार्ग एकला’ या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील ‘एकुलती एक’ यादरम्यानचा चित्रपटसृष्टीतील पन्नास वर्षांचा प्रवास एकंर ६९ प्रकरणांत उलगडला आहे. बालकलाकार सचिन, अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीत दिग्दर्शक, नर्तक, कॅमेरामन, हिंदी चित्रपट लेखक, टीव्ही मालिका आणि रिअ‍ॅलिटी शो निर्माता, परीक्षक, निवेदक, उर्दू शायर असा अनेक मार्गांनी संपन्न झालेला त्यांचा प्रवास यात दिसतो. याहीपुढे जाऊन एक यशस्वी कुटुंबप्रमुख, गाजावाजा न करता नवोदितांच्या मदतीला धावून जाणारे, माणसे जोडणारे आणि नाती मानणारे तसेच निभावणारे सचिन पिळगावकर माणूस म्हणून यात भावतात. उत्तम निरीक्षणशक्ती, दांडगी स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा, संयमी, दिलदार अशी उद्यमी व्यक्ती या आत्मचरित्रातून आपल्यासमोर साकार होते. पन्नाशीनंतरही विद्यार्थीभावना अंगी बाळगून आजही नवनवे प्रयोग करण्यास सरसावणारा हा कलाकार समजण्यास त्यातून मदत होते, हा या पुस्तकाचा विशेष. पुस्तकाची भाषा विलक्षण संवादी आहे. ही पन्नास वर्षे जशी सचिन यांची होती, तशीच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचीही होती. मात्र, त्यावरील अपेक्षित भाष्य यात आलेले नाही. सचिन यांच्याकडे सांगण्यासारखे खूप काही आहे. त्यातील केवळ हिमनगाचे टोक म्हणावे इतकीच माहिती या चरित्रात आली आहे असे जाणवते. हे चरित्र जसे किश्श्यांमधून तसेच पानोपानी दिलेल्या तब्बल १०८ पूरक छायाचित्रांतूनही उलगडत जाते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more