* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GREEN WARS
  • Availability : Available
  • Translators : RAVINDRA BHAGAVATE
  • ISBN : 9789353174729
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SOCIETY & SOCIAL SCIENCES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS MORE IMPORTANT, BUILDING A MODERN AIRPORT IN RURAL UTTAR PRADESH OR CONSERVING THE SHRINKING HABITAT OF THE SARUS CRANES? PRODUCING MORE PALM OIL OR PROTECTING THE ORANG-UTAN? DO WE ALLOW THE DESTRUCTION OF PRISTINE FORESTS WITH THEIR RICH FLORA AND FAUNA SO WE CAN GENERATE MUCH-NEEDED HYDEL POWER? A MODERNIZING ECONOMY BRINGS IN ITS WAKE ECOLOGICAL CHALLENGES AND MISPLACED PRIORITIES. DEVELOPMENT, ENVIRONMENT, CONSERVATION, GLOBAL WARMING - WHAT DO THEY MEAN IN REAL TERMS, ON THE GROUND, TO THE PEOPLE THERE? MUST DEVELOPMENT ALWAYS BE IN CONFLICT WITH ENVIRONMENT? COMBINING RIGOROUS RESEARCH WITH THE EXPERIENCED TRAVELLERS EYE FOR PIQUANT STORIES, CONSERVATIONIST AND ENVIRONMENT JOURNALIST BAHAR DUTT CHASES SOME OF THE BIGGEST STORIES OF OUR TIMES. FROM ARUNACHAL PRADESH TO THE ARCTIC, FROM GOA TO GANGOTRI, FROM ILLEGAL MINING TO CLIMATE CHANGE, GREEN WARS JOURNEYS TO SOME OF THE RICHEST WILDERNESS AREAS, AND EXPLORES THE TENSION BETWEEN A DEVELOPING ECONOMY AND SAVING THE PLANET. LUCID, HEART-WARMING AND INTENSELY PERSONAL, THIS IS A BOOK FOR GREEN WARRIORS, YES, BUT EQUALLY FOR THOSE OF US WHO CRAVE BLUE SKIES AND FRESH AIR.
एका पर्यावरण पत्रकार स्त्रीने केलेलं अनुभवकथन म्हणजे ‘ग्रीन वॉर्स.’ पर्यावरण रक्षणाच्या विविध मोहिमांदरम्यान आलेले हे अनुभव आहेत. त्या अनुभवांचं हे तपशीलवार चित्रण आहे. गारुड्यांचं पुनर्वसन, सारस पक्ष्यांना वाचविण्याची मोहीम, सुसरींच्या कमी होणाNया संख्येबाबत अभ्यास, मेघालयातील जंगलतोड थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न, हुलॉक वानरांसाठी चालवलेलं मुक्तिवेंÂद्र, ‘सरस्वती वन्यजीव अभयारण्य’ वाचविण्यासाठी उघडलेली मोहीम, गोव्यात खाणमाफियांना दिलेली टक्कर, इंडोनेशियातील जंगल आणि ओरंग उटान माकडाचं अस्तित्व जपण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न, हिमनद्या, ग्लोबल वॉर्मिंगसाठी अभ्यासदौरा इ. विविध प्रकारच्या पर्यावरण मोहिमा त्यांनी राबवल्या. तर पर्यावरणाच्या विविध अंगांचा बहार यांनी केलेला अभ्यास, पर्यावरणाच्या त्या त्या प्रश्नातील वंÂगोरे आणि आव्हानं, या समस्यांच्या संदर्भात त्यांना भेटलेली माणसं इत्यादी बाबींबद्दल बहार यांनी वाचकांशी साधलेला हा संवाद मुळातून वाचण्यासारखा आहे. पर्यावरणाच्या विविध बाजू, पर्यावरण आणि विकास या बाबतीत होणारा संघर्ष, पर्यावरणाकडे सत्ताधाNयांचं असलेलं दुर्लक्ष, पर्यावरणाच्या क्षेत्रात शिरलेलं राजकारण, पर्यावरणाच्या Nहासामुळे झालेलं आणि होऊ घातलेलं नुकसान या सगळ्या गोष्टी सामान्य माणसालाही हे पुस्तक वाचून कळतील आणि लोकांमध्ये पर्यावरणाच्या बाबतीत थोडी तरी जागरूकता येईल. तेव्हा पर्यावरणप्रेमींसह सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #हरितयुद्धे #बहारदत्त #रवीभगवते #गारुडी #शिकारी #सारसपक्षी #हुलॉकवानर #हॉग हरीण #अवतार #खाणमाफिया #जंगल #हिमनद्या #ओरंगउटान #गंगा #पर्यावरण #चंबळ #सुसर #मगर #स्टोरी #वनस्पती #वाघ #प्रदूषण #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% GREENWARS #BAHARDUTT #CHARMERS #HUNTERS #SARAS #HOOLOCK #HOGDEER #MININGMAFIA #GOA #ORANGUTAN #GANGA #ENVIRONMENT #EKC #POLLUTION #FOREST #DRVELOPMENT #TIGER #CO2
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 15-02-2021

    पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लढा.. जीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरण पत्रकार बहार दत्त यांच्या ‘ग्रीन वॉर्स’ पुस्तकाचा रवींद्र भगवते यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे ‘हरित युद्धे’ हे पुस्तक होय. बहार दत्त यांनी विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि निसर्गाचा नाश रणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध युद्धच पुकारले होते. या क्षेत्रात धडाडीनं काम करताना बहार दत्त यांनी भारतात आणि परदेशात अनेक स्थळांना भेट देऊन विकास व पर्यावरण यांच्यातील संघर्ष जगासमोर आणला. बहार दत्त यांच्या या धाडसी प्रवासाची चित्तथरारक कहाणी या पुस्तकात वाचायला मिळते. ‘‘गारुडी आणि शिकारी’ या प्रकरणात दिल्लीजवळ असलेल्या गारुड्यांच्या वस्तीत १० वर्षं राहून बहार दत्त यांनी केलेलं अभ्यासपूर्ण संशोधन आणि गारुड्यांच्या पुनर्वसन कार्याची तपशीलवार नोंद आहे. गारुड्यांचं सर्पविषयक ज्ञान वापरून त्यांना सर्पशिक्षक बनवण्याचा प्रयत्न, शंभर गारुड्यांचा वाद्यवृंद बनवून त्याचे देश-विदेशात अनेक कार्यक्रम करणं. त्यांना इतर व्यवसायात प्रस्थापित करण्याचे प्रयत्न इत्यादीचं रोमहर्षक वर्णन वाचायला मिळतं. त्या पुढील प्रकरणात उत्तर प्रदेशातील एटावा जिल्ह्यात विमानतळ बांधण्यासाठी त्या जागेवर सारस पक्षी नाहीत, असं सांगण्यात आलं. तेव्हा बहार दत्त यांनी धोका पत्करून, यंत्रणेविरुद्ध लढा देऊन तो प्रकल्प मागे घ्यायला लावला. याचा रोमहर्षक वृत्तांत आहे. ‘खरी अवतार कहाणी’ या प्रकरणात ओदिसा राज्यातील वेदांत कंपनीच्या बॉक्साइट प्रकल्पाविरोधात तेथील डोंगरिया लढ्यात बहार दत्त यांनी केलेला संघर्ष वाचनीय आहे. अशाच प्रकारे इतर प्रकरणात ‘गोव्यातील बेकायदा खाणी आणि तेथील माफिया’, ‘उत्तराखंड येथील गंगेच्या आणि उपनद्यांच्या भागातील जल-प्रकल्प आणि निसर्गाचा विध्वंस’, ‘हरयाणामधील अभयारण्यातील नामशेष होणारे हॉग हरण’ आणि ‘अरुणाचलमधील दिबांग धरणामुळे ५००० हेक्टर्स जंगलातील जैवविविधतेचा नाश’ याविषयी लिहिलं आहे. ‘मेघालयातील जंगलतोड’, ‘चंबळ नदीतील सुसरींना वाळू माफियांच्या खोदकामापासून वाचवण्याचे प्रयत्न’, आसामच्या अभयारण्यातील हुलॉक वानर’ आणि ‘इंडोनेशियातील नष्ट होत चाललेले ओरांग उटान’ यांच्यावर केलेलं संशोधन आणि ज्ञानवर्धक माहिती पुस्तकात वाचायला मिळते. बहार दत्त यांच्या पुस्तकातील मूळ इंग्रजी निवेदनाची ओघवती शैली रवींद्र भगवते यांनी मराठी अनुवादात कायम राखल्यानं हे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे. - रमेश सावंत ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more