TWELVE-YEAR-OLD HAROUN SETS OUT ON AN ADVENTURE TO RESTORE HIS FATHER’S GIFT OF STORYTELLING BY REVIVING THE POISONED SEA OF STORIES. ON THE WAY, HE ENCOUNTERS MANY FOES, ALL INTENT ON DRAINING THE SEA OF ALL ITS STORYTELLING POWERS. IN THIS WONDROUSLY DELIGHTFUL STORY, SALMAN RUSHDIE GIVES US AN IMAGINATIVE WORK OF EXTRAORDINARY POWER AND ENDEARING HUMOR THAT IS, AT ITS HEART, AN ILLUMINATION OF THE NECESSITY OF STORYTELLING IN OUR LIVES.
हारुन आणि गोष्टींचा समुद्र ही साहस-कथा आहे. अब्बू आणि बेटा, रशीद आणि हारुन यांची गोष्ट आहे. हारुननं त्याच्या अब्बूला त्याचं गोष्टी सांगण्याचं कौशल्य परत मिळवून देण्यासाठी, त्याच्या निराशेतून त्याची सुटका करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची गोष्ट आहे. यात एक पागल बस चालक आहे -पण- नाव त्याचं आणि एक जल-जिन्न आहे - उफ्फ. तरंगणारा माळी आहे आणि अंगभर बडबडणारी तोंडं असलेले सतरातोंडी मासे आहेत. यात एक मस्त गप नगरी आहे [जी कायम उजेडात असते] आणि भयानक चूप नगरी आहे [जी कायम अंधारात असते.] आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फागुंसांअ आहे. म्हणजेच फार गुंतागुंतीची सांगायला अवघड आहे.