SITUATION IN THE TIME OF CORONA - ROLE OF ADMINISTRATION - ONGOING EFFORTS OF THE GOVERNMENT - WEDDING CEREMONY IN THE PRESENCE OF TWENTY-FIVE TO FIFTY PEOPLE – CHAOS OF THE BRIDE-GROOM INCLUDING RELATIVES - INCREASING EFFECT AND POSSIBLE NEED OF MASKS, SANITIZERS - MEDICAL SITUATION – A STRAINED DOCTOR-PATIENT RELATIONSHIP - MEDICAL STORE SITUATION - RUSH TO GET REMDESIVIR - SOCIAL DISTANCING TO BE FOLLOWED - TIMES OF CRISIS OR TIMES OF PROSPERITY, BE IT A CORONA WAVE OR A NORMAL SITUATION, HUMAN NATURE NEVER CHANGES. THEREFORE, THE DIFFERENT PATTERNS OF HUMAN NATURE IN THE CORONA PERIOD, THE WORKING METHOD OF THE POLICE, VARIOUS GOVERNMENT DEPARTMENTS INCLUDING THE HEALTH DEPARTMENT, THE INCONSISTENCY IN PUBLIC LIFE, THE ARGUMENTS BETWEEN HUSBAND AND WIFE, THE AMUSING EPISODES OF SUSPICION BETWEEN THEM, THE PEOPLE SNARLING AT EACH OTHER, ETC. CONTINUED TO CAUSE `WAVES OF LAUGHTER` EVEN DURING THE CORONA PERIOD.
कोरोना काळातील परिस्थिती - प्रशासनाची भूमिका - सरकारचे चालू असणारे प्रयत्न – पंचवीस ते पन्नास जणांच्या उपस्थितीत पार पडणारा विवाहसोहळा - वधू-वरांसह नातेवाइकांची उडालेली धांदल - मास्क, सॅनिटायझरचा वाढता प्रभाव व संभाव्य गरज - वैद्यकीय परिस्थिती - डॉक्टर-रुग्णांचे दुरावलेले नाते - मेडिकल स्टोअरची परिस्थिती - रेमडिसिव्हर औषध मिळवण्यासाठी अनेकांची होणारी धावपळ – पाळावे लागणारे सोशल डिस्टन्सिंग - संकटकाळ असो वा सुखासीन काळ असो, कोरोना लाट असो वा सर्वसाधारण परिस्थिती असो, माणसाचा स्वभाव कधी बदलत नसतो. त्यामुळे कोरोना काळातील मानवी स्वभावाचे विविध नमुने, पोलीस, विविध सरकारी खात्यांसह आरोग्य विभागाच्या कामकाजाची पद्धत, सार्वजनिक जीवनातील विसंगती, नवरा-बायकोमधील वाद, त्यांच्यात रंगत जाणारा संगीत संशयकल्लोळचा प्रयोग, एकमेकांवर कुरघोडी करणारी माणसं आदींमुळे कोरोना काळातही ‘हास्याच्या लाटा’ धडकत राहिल्या.