PREMNATH, WHO DECEIVES MANY YOUNG WOMEN BY ADVERTISING IN THE NEWSPAPER SAYING THAT HE WANTS A WORKING BRIDE...ENKATESH WHO LIVES LIFE BY RUNNING A VADA PAV STALL DESPITE BEING CALLED CRAZY BY PEOPLE DUE TO HIS SHOCKING EXPERIENCE IN THE TRANSPORT BUSINESS..SAMBA WHO INVITES TROUBLE BY TREATING HIS SON`S HAND WITH HOME REMEDIES AFTER HE FALLS FROM A BUFFALO.... THE DYING AUNT OF THE PROTAGONIST...THE MAHARAJA WHO IS DISTURBED AFTER HIS MUSLIM GIRLFRIEND COMMITS SUICIDE DUE TO MARRIAGE WITH SOMEONE ELSE AND WISHED THAT HIS OWN GRAVE WOULD BE BUILT AFTER HIS DEATH...WANGCHU WHO FELL IN LOVE WITH SRINAGAR`S NATURAL BEAUTY, EXPERT IN HINDI AND ENGLISH BUT FAILED IN LOVE... MAHADEV MORE DELIGHTS US WITH A SET OF STORIES OF SIMILAR REAL CHARACTERS AND THE WORLD BEYOND THE WORLD.
नोकरी करणारी वधू हवी, अशी जाहिरात पेपरात देऊन अनेक तरुणींना फसवणारा प्रेमनाथ...टेम्पोच्या व्यवसायातील धक्कादायक अनुभवामुळे लोकांनी वेडा ठरवूनही वडापाव तळून जीवनाला सामोरा जाणारा एंकटेश...मुलगा म्हशीवरून पडल्यावर त्याच्या हातावर गावठी उपचार करून आफत ओढवून घेणारा संबा...दादल्याच्या त्रासाने पिचून मरून जाणारी कथानायकाची आत्या...मुस्लीम प्रेयसीचं लग्न दुसर्या कुणाशीतरी झाल्यावर तिच्या आत्महत्येने जीवनातून उठलेला आणि मृत्यूनंतर आपलीही कबर बांधण्यात यावी, अशी इच्छा बाळगणारा महाराजा... श्रीनगरच्या सृष्टिसौंदर्याच्या प्रेमात पडलेला, हिंदी-इंग्रजी भाषांचा अभ्यास केलेला, प्रेमात अपयशी ठरलेला वांगचू... या व अशाच वास्तव व्यक्तिरेखांचं आणि जगाआडच्या जगाचं दर्शन घडवणार्या महादेव मोरे यांच्या व्यामिश्र कथा.