* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788190757430
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OFFERS DIFFERENT EXERCISES FOR WOMEN WHO WANT TO LIVE HEALTHIER LIVES, AS WELL AS LONGER ONES. THE AUTHOR OFFERS A FRIENDLY FITNESS PROGRAM DESIGNED WOMEN IN THEIR MIDDLE AGE.
टेन्शन! तणाव! आजच्या युगाचे हे अगदी परवलीचे शब्द. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, शहरापासून खेड्यापर्यंत ‘टेन्शन’ हा शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी सतत असतो. आजच्या तरुण पिढीचं जीवन तर धावत्या प्रवाहासारखं आहे. हा प्रवाह सतत वाहतो आहे, थांबणं त्याला माहीतच नाही. मग त्यातून कुटुंब, शिक्षण, व्यवसाय या सर्वच ठिकाणी जाणवणारा ताण! ताण कमी करून तरुण पिढीचं जगणं सुकर करण्यासाठी, ‘हितगूज - तणावयुगातील तरुण पिढीशी’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN #आपण : आपले ताणतणाव : एक चिंतन #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #ANJANI NARAVANE #अंजनी नरवणे #SWATI SHAILESH LODHA #चला उठा कामाला लागा! : स्वाती-शैलेश लोढा #COME ON GET SET GO... #CHALA UTHA KAMALA LAGA #हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी #HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 12-08-2001

    मायलेकीमधील बदलत्या नात्याचा आलेख... मुळात स्त्रीचे जीवन संपूर्ण यशस्वी जगणे कठीण आणि तिचे मन कळणे त्याहून कठीण. मायलेकीचे संबंध प्रेमाचे असावेत असा एक संकेत आहे, पण त्या दोघीही जेव्हा ‘स्त्री’च्या भूमिकेतून बोलतात तेव्हा त्यांना वेगळा अर्थ येतो. त्ांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे विविध कंगोरे स्पष्ट होतात. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेले ‘हितगुज’ हे पुस्तक म्हणजे वृंदा दाभोळकर यांच्या कॅरेन पेन यांच्या पुस्तकाचा अनुवाद आहे. मायलेकींचे संबंध स्पष्ट करताना वापरली गेलेली भूमी पाश्चात्त्य आहे. हिंदुस्थानी नव्हे हे पटकन लक्षात येते. आपल्या समाजात अद्यापही मायलेकीचे संबंध व्यापक स्वरूपात समाजासमोर येत नाहीत. प्रस्तुत पुस्तकात स्त्रियांच्या भावावस्थाच जास्त प्रकट होतात. अक्षम्य उद्रेक, निराशा, भ्रमनिरास, संताप, अलगीकरणाचे तंत्र, दु:ख, राग, विश्वासघात अशा अनेक मूलभूत भावनांचा आविष्कार या पत्रांतून दिसून येतो. विचारांची जत्रा भरलेली वाटत असली तरी विचारांचा मसावि काढता येईल इतके विचार मिळतेजुळते आहेत. स्त्रिया आपल्या चुकांची कबुली देतात हा भागही महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच जगण्यासाठी आवश्यक ते तत्त्वज्ञान देणारा आहे. मूळ लेखिका कॅरन पेन हिच्या ऐंशी पत्रांपैकी चाळीस पत्रे या पुस्तकात आहेत. मायलेकींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची जंत्री वृंदा दाभोळकर या पुस्तकाचा अनुवाद सादर करताना देतात आणि नंतर पत्रे येतात. मायलेकींमधल्या संबंधांची विषयवार मांडणी करून विचारांची एकतानता जपण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. त्यामुळे सिल्विया प्लॅथ, एडिथ समरस्कील इ. पुन्हा येताना दिसतात. व्हर्जिनिया वुल्फने आपल्या लिखाणात अडचण आणणारे भूत एक स्त्री असे सांगून त्यास यक्षिका असे संबोधले. त्याचाच आधार घेऊन पत्रे इथे आली आहेत. माझ्या मुलीने आत्मविश्वासाने समर्थ व्हावे असे हेलन आपल्या मुलीस म्हणते. सिल्विया प्लॅथ आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण आयुष्य जगली. स्वत: आयुष्य खडतर जगूनही ती आईसोबत हिरव्या बगिच्यामधून एकत्र फिरू पाहते. जशी सिल्विया प्लॅथने आत्महत्या केली तशीच अ‍ॅन सेक्सटन हिनेही केली. मात्र अ‍ॅन शांतपणे मरणाला सामोरी गेली. एकाकीपण ही भयानक गोष्ट आहे असे मानूनही हे विशेष. संसारातील आईला आपले अर्धे आयुष्य कुटुंबासाठी खर्च घालून नंतरच आपली स्वप्ने पूर्ण करता येतात हे पुढच्या प्रकरणात सिद्ध होते. १८व्या शतकात लेडी मेरी वर्टले माँटेग्यू हिने भरपूर प्रवास केला. त्या काळात स्त्रीने घर सोडणे टीकास्पद होते हे लक्षात घेतले तर तिचे धाडस लक्षात येईल. फेडरिका ब्रेमर या पत्रकार होत्या आणि त्यांनी स्विडिश स्त्रियांची संपूर्ण मुक्तता करण्यासाठी अथक प्रयत्न केले. हॅरिअट मार्टिना हिनेही स्वातंत्र्य उपभोगले आणि त्याचे परिणामही. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी घेणारी पहिली स्त्री. गुलामगिरीच्या विरुद्ध ती भांडली. आईचे ऋण तिने सतत मान्य केले. डॉक्टर बनले कशी हे तिचे निवेदन छान आहे, लुईसा अ‍ॅलकॉटही यात सामील आहे. आधुनिकतेचे वारे शिरल्यामुळे विचारात झालेला बदल हा स्त्रियांच्या मानसिकतेमधूनही दिसून येऊ लागला. याचे समर्पक दिग्दर्शन पुढील सर्व प्रकरणांमधून होते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 25-03

    मायलेकीच्या नात्याला अनेक पदर असतात. आई हे कन्येसमोर असलेले स्त्रीचे मुख्य रूप. मायलेकीच्या संवादातून, आईने पेरलेल्या संस्काराच्या बीजातून लेकीचे व्यक्तिमत्त्व घडत असते. स्त्री-स्वातंत्र्याच्या लेकीच्या कल्पना घडवण्यात आईचा वाटा महत्त्वाचा असतो. घरच्ा ऊबदार वातावरणातून बाहेर पडल्यावर स्त्री स्वातंत्र्याचे अधिक पैलू लेकीवर तिच्या स्वत:च्या अनुभूतीनुसार पडत राहतात. तिचा असा आत्मविकास होत असताना आई त्याकडे कशा दृष्टिकोनातून बघते, लेक आईकडे आपल्या नव्या जाणिवा किंवा भावना कशा प्रकारे व्यक्त करते, त्या संवादात दोन पिढ्यांच्या नातेबंधात काय बदल घडतात, दोघी एकमेकींना कशा प्रकारे समजून घेतात हे पाहणे फारच रंजक ठरू शकते. स्त्रीविकासाची ही प्रक्रिया साहित्यात शब्दरूप झालेली क्वचितच आढळते. मुळातच आपल्या इतिहासातून स्त्रियांबद्दल फार कमी कळते. महान व्यक्तिंचा इतिहास वाचताना त्या व्यक्तीचे वडील कोण होते हे सहजतेने समजते, आई कोण होती, कशी होती, हे क्वचितच वाचायला मिळते. त्यामुळे स्त्रीच्या समाजातील बदलत्या स्थानाबद्दलचा, स्त्री-मुक्तीच्या प्रक्रियेबद्दलचा सामाजिक इतिहास वाचायला मिळणे दुरापास्तच! स्त्री-मुक्तीच्या वातावरणात मायलेकींबद्दल नाते कसे असेल या औत्सुक्यापोटी लंडनच्या कॅरन पेन यांनी मायलेकींमधील पत्रे जमवण्याचे संशोधन कार्य हाती घेतले. पत्ररूप संवादातून उलगडणारे मायलेकींमधील नाते हा विषयच मुळात खूप छान आहे. कॅरन पेन यांनी हा विषय संशोधनासाठी निवडला आणि त्यांचे कार्य पूर्ण झाल्यावर या नात्याचा एक रंजक इतिहासच त्याच्यासमोर उभा ठाकला. महत्प्रयासाने कॅरन पेन यांनी जमवलेल्या पत्रांपैकी ८० पत्रे Between Owlrselves Lelters `Between Mothers & Daughters` या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. या इंग्रजी पुस्तकाचा वृन्दा दाभोलकर यांनी केलेला अनुवाद ‘हितगुज’ या नावाने ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ ने प्रसिद्ध केला आहे. अनुवादाच्या परीक्षणापूर्वी मूळ लेखिकेने मायलेकीच्या नात्यांमधले विविध विभ्रम कसे उलगडून दाखवले आहेत हे पाहू. खिस्तीन क्लॉज ही न्यूयॉर्कमधील चित्रकार स्त्री. तिचे आणि तिच्या आईचे हेलनचे नाते फार प्रांजळ होते. खिस्तीन कॉलेजला जाऊ लागल्यानंतर, तिचे स्वतंत्र आयुष्य जगू लागल्यानंतर हेलनने तिला लिहिलेल्या पत्रांतून आई म्हणून लेकीबद्दल वाटणारी काळजी, लेकीचे स्त्री-स्वातंत्र्याबद्दलचे विचार ऐकून आईचा उडालेला गोंधळ, तरीही तिच्यावर विश्वास ठेवून लेकीला दिलेले प्रोत्साहन आणि स्वत:त नसलेली धमक मुलीत असावी अशी इच्छा या साऱ्यांचे सुरेख मिश्रण बघायला मिळते. हेलनने कॅरन पेन यांना स्वत:च्या मातृत्वाच्या आदर्शाबाबतचे विचार पत्राद्वारे सांगितले. त्यात या मातेने म्हटले की, सर्कशीत हवेत कसरती करणाऱ्याच्या खाली सुरक्षिततेची तजबीज म्हणून जाळी धरण्याची माझी भूमिका आहे. ही जाळी खाली आहे या जाणिवेने माझ्या एकुलत्या एका लेकीला सुरक्षित वाटावे आणि तिला उंच उडत कसरती करणे शक्य व्हावे अशी माझी तिला वाढवताना धारणा होती. माझ्या मुलीने आत्मविश्वासाने तिच्या आकाशात भराऱ्या माराव्यात. हे करताना तिने या उंच आकाशात माझ्यासाठी जागा ठेवली तर माझ्या संस्कारांचे सार्थक होईल. सिल्व्हिया प्लॅथ ही पुलित्झर पारितोषिक विजेती कवयित्री. ती तिच्या आईला पाठवलेल्या पत्रातून तिच्या यशातील आईचा वाटा किती मोठा आहे हे कृतज्ञतापूर्वक लिहिते. मोठी कवयित्री झाल्यानंतरही तिच्या मनातील आईचे ऋण कायम राहिले. तिच्या विश्वात तुलनेने सामान्य असलेल्या तिच्या आईला कायम अढळपद होते. एडिथ समरस्किल ही ब्रिटिश संसद सदस्य. एक व्यग्र राजकारणी व पेशाने डॉक्टर असलेल्या एडिथला कायम भीती होती शर्ले या आपल्या कन्येला आपण न्याय देऊ शकू की नाही. आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे शर्लेच्या मनात राजकारणाबद्दल द्वेषाची बीजे पेरली जातील, अशीही धाकधूक तिच्या मनात होती. पण शर्लेही राजकारणात उतरली आणि एडिथचा ताण दूर झाला. शर्लेला लिहिलेल्या पत्रातून एडिथच्या या भावना व्यक्त होतात. प्रेमात पडल्याची बातमी प्रत्यक्ष देण्यापेक्षा पत्रातून सांगण्याचा मार्ग आजही अनेक मुलींना सोयीस्कर वाटतो. प्रेमप्रकरणाची माहिती आईला देणारी काही मुलींची पत्रे आणि त्यांना आयांनी दिलेली उत्तरे यांतून ‘सावर गं!’, ‘जपून टाक पाऊल जरा!’ अशा सल्ल्यांपासून ते आईने केलेल्या टोकाच्या विरोधापर्यंतच्या साऱ्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या पत्रांतून व्यक्त झाल्या आहेत. एलिझाबेथ ब्लॅकवेल या आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी घेणाऱ्या पहिल्या स्त्रीच्या तीन पिढ्यांमधील संवाद पत्ररूपाने मांडला आहे. एलिझाबेथ केंटुकी राज्यात राहत होती. तेथील गुलामगिरी पाहून विषण्ण मनाने तिने तिच्या आईला पत्रे लिहिली. पुढे एलिझाबेथ डॉक्टर झाली. तिने तिच्या मुलीला लिहिलेल्या पत्रात आपण वैद्यकीय व्यवसाय कसा निवडला हे सांगितले आहे. हे पत्र म्हणजे या पहिल्या महिला डॉक्टरचे संक्षिप्त आत्मचरित्र ठरावे. या सर्व पत्रांतील आपल्या दृष्टीने एक उल्लेखनीय पत्र म्हणजे मीरा या भारतीय मुलीने तिच्या आईला व मुलीला लिहिलेली पत्रे. मीरा १९६० मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. त्यानंतर तिचा तिच्या आईशी पत्रव्यवहार सुरू झाला. सुरुवातीच्या पत्रात मीरा अमेरिकेत रुळतानाच्या दिवसात आईला वाटणारी काळजी व्यक्त होते. अमेरिकेच्या प्रेमात पडलेल्या व तेथील संस्कृतीत रुळलेल्या मीराने आईला लिहिलेल्या पत्रांतून तिची भारतीय संस्कृतीशी तुटत चालेली नाळ आणि ती व तिची आई यांच्यातील वाढत चाललेला दुरावा यांचे दर्शन घडते. शेवटी तिने तिच्या अमेरिकन मित्राशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे तिचे पत्र आहे. परस्पर लग्न ठरवण्यापेक्षा तू भारतात येऊन आमच्याशी चर्चा करून मग काय ते ठरव असा सल्ला देणारे आईचे पत्र दुर्लक्षून मीरा लग्न करून मोकळी होते. २० वर्षांनंतर मीराची मुलगी रीटा तिला जे पत्र पाठवते त्यातून मीराचे अमेरिकीकरण किती वरवरचे व बेगडी होते ते सिद्ध होते. रीटाने मीराला लिहिलेल्या पत्रात ती म्हणते, ‘जेव्हा तू माझ्या अमेरिकन वडिलांसमवेत इथली संस्कृती अंगिकारण्याचा निर्णय घेतलास तेव्हा तुझ्या पालकांचा तुला पाठिंबा नव्हता. आज आपण दोघी भौगोलिकदृष्ट्या एकमेकांसमवेत असलो तरीही तू मला पाठबळ देऊ शकत नाहीस. आपल्यात जे अंतर पडले आहे त्याचे कारण आहे ‘भारत’. मीरा व रीटा यांच्यातला संघर्ष आज प्रातिनिधिक ठरावा. भारतातून अमेरिकेत स्वखुशीने स्थायिक झालेल्या मीरातील ‘भारतीय-माता- मात्र वारंवार डोकावते. रीटा तिच्या मित्रांसमवेत काही उथळ गोष्टीत रमते, तेव्हा मीरा आक्षेप घेते. आपण करतो ते सर्व योग्य नव्हे याची जाणीव रीटाला असते. तरीही मित्रपरिवारात आपण स्वीकारले जावे यासाठी रीटा त्यांच्यात असताना त्यांच्यासारखी वागते. मीरा हे समजू शकत नाही आणि म्हणून तिच्या व रीटाच्या नातेसंबंधात कडवटपणा येतो. मला माझे जीवन जगू दे हे रीटा तिला सांगत असते. परदेशातील स्थायिक झालेली पहिली पिढी आणि तिथल्याच मातीत जन्मलेली दुसरी पिढी यांच्यातील संघर्षाचे नेमके चित्रण या पत्रांत आहे, जे आजच्या ‘विश्वचि माझे घर’च्या युगात प्रातिनिधिक ठरू शकते. मायलेकीच्या नातेसंबंधांचा असा हा कोलाज! मात्र ढिसाळ अनुवादामुळे तो पार विस्कटलेल्या स्वरूपात आपल्या हाती आला आहे, हे खेदाने म्हणावे लागते. मुळात कॅरन पेन यांच्या पुस्तकातील ८० पत्रांपैकी फक्त ४० पत्रांचाच अनुवाद या पुस्तकात आहे. कारण दिले आहे विस्तारभयाचे. हे भय कोणाला, लेखिकेला की प्रकाशकाला? अर्थात याचे उत्तर अनुवादिकेने दिलेले नाही. चुकीच्या वाक्यरचना, अयोग्य शब्दवापर अगदी ठायी ठायी सापडतात आणि त्याचा पुस्तक वाचताना त्रास होतो. इतका गुंतवून ठेवणारा विषय, पण वाईट अनुवादामुळे पुस्तक सलग वाचणे कठीण होऊन बसते. कॅरन पेन यांनी मायलेकीच्या प्रत्येक जोडीचा परिचय दिला आहे. नंतर त्यांची पत्रे आणि त्यावरील लेखिकेचे भाष्य असे स्वरूप आहे. लेखिकेचे भाष्यही फार छान आहे. ‘हितगुज’ या पुस्तकात लेखिकेचे शब्द आणि पत्रांचा मजकूर यातील वेगळेपण टाईप आणि मांडणी यांद्वारे स्पष्ट करता आले असते. असे न केल्याने अनेकदा पत्रांतील मजकूर कुठे संपतो आणि लेखिकेचे भाष्य कुठे सुरू होते हे स्पष्ट समजत नाही. ही पत्रे वाचताना आपल्या पाश्चात्य संस्कृतीतील मायलेकींमधला सांस्कृतिक फरक फारसा जाणवत नाही. जग जवळ आल्याने सांस्कृतिक भेद कमी झाले आहेत. ही पत्रे वाचताना हेच प्रकर्षाने जाणवते. मित्रांबरोबरच्या प्रेमसंबंधांना पाश्चिमात्त्य आईही आक्षेप घेते... लग्नाशिवाय एक राहण्याचा लेकीचा निर्णय तेथील आईही स्वीकारू शकत नाही! असे मायलेकींतील सांस्कृतिक संघर्ष जसे विश्वव्यापी तशीच ‘आयुष्यात मला स्वातंत्र्य, स्वाभिमान सारं काही हवं आहे आणि तुलासुद्धा हे हवंसहवंस वाटावं हेच मला अभिप्रेत आहे’, ही मातृसुलभ भावना आणि त्यासाठी प्रत्येक आईने आपल्या लेकीला प्रोत्साहन देणे ही कृती विश्वात सर्वत्र सर्रास आढळणारी आहे. असे अधिकाधिक मातांना वाटेल आणि अधिकाधिक लेकी अशा भावनेतून घडतील तेव्हाच स्त्रीयांना खरी मुक्ती लाभेल, हे वैश्विक सत्य आहे. कॅरन पेनने त्याचा उल्लेख प्रस्तावनेत केला आहे. म्हणूनच मायलेकीच्या या नातेसंबंधांचा हा कोलाज सर्वांनी वाचण्यासारखा आहे. तो मराठीत अधिक चांगल्या प्रकारे वाचायला मिळायला हवा होता, तरच या विषयाला आणि मूळ पुस्तकाला न्याय मिळाला असता. -शुभदा चौकर ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 5-4-2009

    सध्याच्या युवा पिढीत `टेन्शन` म्हणजेच ताणतणाव हा शब्द परवलीचा झाला आहे. आपले मूल प्राथमिक शाळेत असल्यापासूनच मेरिटच्या नावाखाली पालक त्याला खाजगी शिकवणीच्या दावणीला बांधून टाकतात. आपल्या मुलाने वर्गात पहिल्या पाचात आलेच पाहिजे, असा त्यांचा अट्टाहास अतो. दहावीपर्यंत याच तणावात मुले राहतात. दहावीला तर त्यांच्यावर अभ्यासाचा प्रचंड ताण असतो. आपल्या मुलावर बहुतांश पालक आपल्या महत्वाकांक्षा लादतात. त्याने काय शिकावे, हेही तेच ठरवतात. त्यांच्या मनाचा, त्यांना काय आवडते याचा विचार सुशिक्षित पालकही करीत नाहीत. परिणामी मुले सतत मानसिक तणावाखाली राहिल्याने त्यांच्या आरोग्यावरही वाईट पणिाम होतात. काही मुले चुकीच्या मार्गाला लागतात, बिघडतात. स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ लावून, चंगळवादी संस्कृतीच्या नादाला लागतात. व्यसनी होतात. आधुनिकता म्हणजे स्वैराचार नव्हे. याचा विचार पौगंडावस्थेतील मुले करीत नाहीत. पालकांना अश्या मुलांची काळजी वाटते. पण हे सारे का घडते, याचा विचार ते करीत नाहीत. सध्याच्या युवा पिढीच्या मानसिकतेचा आणि वस्तुस्थितीचा अचूक वेध घेत अंजनी नरवणे यांनी विद्यार्थी आणि तणावयुगातील तरुण पिढीशी साधलेला हा सुसंवाद, पालक आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवणारा, ताण तणावातून मुक्ततेची दिशा दाखवणारा आहे. गेल्या काही वर्षात देशात पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्याचे खूळ माजले. माध्यमिक शाळेत, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना मोकळेपणाचा खरा अथे समजला नाही. प्रेमाच्या नावाखाली नको ते चाळे करू नयेत, असे भान मुला-मुलींना राहिलेले नाही. शिक्षणाचा धंदा झाल्यामुळे मध्यमवर्गीय पालकांना विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या महत्वाकांक्षा डोनेशन देवून पूर्ण करता येत नाही. विद्यार्थी निराश होतात. हे सारे घडते, त्याचे कारण आपल्या मुलांशी पालकांचा सुसंवाद कमी झाला, काही कुटुंबात तर तो पूर्णपणे तुटला आहे. सुखाच्या कल्पना वेगळ्या झाल्या आहेत. पालकही, तो अमका पाच क्रमांकात आला, तुला का असे गुण मिळत नाहीत, असे मुलांना हिणवतात. त्यांच्यावर टीका करतात. प्रेमाचा अर्थही तरुण पिढीला समजलेला नाही. भारतीय संस्कृतीतील नीतीमूल्यांच्या संकल्पनांचा धाक काही मुलांना राहिलेला नाही. आधुनिक काळातल्या या समस्यांमुळे ताणतणाव तर वाढलेच पण त्यामुळे नव्या समस्याही निर्माण कशा झाल्या आहेत, याचे अचूक विवेचन नरवणे यांनी केले आहे. तुमची मुले नव्या समस्या की आनंदाचा ठेवा, याचा विचार करुनच पालकांनी आपल्या मुलांशी वागायला हवे. नवविवाहित तरुण-तरुणींनी परस्परांना समजून घ्यायला हवे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चंगळवादापासून दूर राहिले पाहिजे. निरामय आयुष्य हाच सुखाचा खरा मूलमंत्र आहे, याचा विसर पडू देऊ नये. पैसा हे सर्वस्व नाही, पार्ट्या म्हणजे आनंद मिळविणे नव्हे, लहान मुलाची जबाबदारी आईवरच असते. त्याला मोठे करणे यातही आनंद असतो, हे नव्या पिढीतल्या मातांनी लक्षात घ्यावे असे नरवणे सांगतात. सर्वांत शेवटी नरवणे यांनी तणावापासून मुक्त होण्याचे १८ उपाय सांगितले आहेत. ते अमलात आणल्यास तणाव कमी होईल, जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या बिल गेट यांनी तरुणांना उद्देशून केलेल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे युवा पिढीने वाचून अमलात आणायलाच हवेत. नरवणे यांनी केलेले हे हितगुज सामाजिक समस्येचा वेध घेणारे आणि सुखी जीवनाचा मंत्र सांगणारा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more